प्रश्‍नमंजुषा (90) : म्यानमार : लष्करी राजवट

  • प्रश्‍नमंजुषा (90) : म्यानमार : लष्करी राजवट

    प्रश्‍नमंजुषा (90) : म्यानमार : लष्करी राजवट

    • 05 Feb 2021
    • Posted By : Study Circle
    • 235 Views
    • 0 Shares

     प्रश्‍नमंजुषा (90) : म्यानमार : लष्करी राजवट

    1) ‘ग्रेट गेम ऑफ द ईस्ट : इंडिया, चायना अँड स्ट्रगल फॉर द एशियाज मोस्ट व्होलाटाइल फ्रंटिअर’ हे पुस्तक कोणत्या लेखकचे आहे ?
    1) ब्रिटनचे मार्क टुली
    2) आंग सान स्यू की यांचे पती मायकल एरिस 
    3) स्वीडिश पत्रकार बर्टील लिंटनर 
    4) सीएनेनेचे रफिक झकेरिया
     
    2) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) म्यानमारमध्ये लष्कराचा पाठिंबा असलेला पक्ष म्हणजे युनिअन सॉलिडॅरीटी आणि डेव्हेलपमेंट पार्टी.
    ब) म्यानमारमध्ये लष्करप्रमुख त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    3) कोणत्या साली ब्रिटिशांनी म्यानमारच्या थिबा राजाचा पराभव करुन म्यानमार बळकावला आणि थिबाला कैद करून भारतात रत्नागिरीत आणून ठेवले होते ?
    1) 1825
    2) 1886
    3) 1895
    4) 1925
     
    4) म्यानमारसंबंधी खालील विधाने विचारात घ्या :
    अ) 1942 मध्ये तेथे जपान्यांची राजवट होती.
    ब) 1937 मध्ये स्वतंत्र ब्रिटिश वसाहतीचा दर्जा मिळाला. 
    क) 4 जानेवारी 1949 रोजी बर्माला स्वातंत्र्य मिळाले. 
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    5) फेब्रुवारी 2021 पासून म्यानमारचे कार्यकारी राष्ट्रपती म्हणून यांची नेमणूक झाली.
    1) लष्करप्रमुख मिन आँग हलेंग
    2) माजी लष्कर उपप्रमुख मिंट स्वे
    3) जनरल सॉ माँग 
    4) जनरल ने विन
     
    6) योग्य घटनाक्रम लावा. 
    अ) म्यानमारमध्ये जपानी राजवट
    ब) म्यानमारमध्ये बर्मा सोशॅलिस्ट प्रोग्रॅम पार्टीची सत्ता
    क) म्यानमारचा ब्रिटिश भारत साम्राज्यात समावेश 
    ड) म्यानमारमध्ये अँटी फॅसिस्ट पीपल्स फ्रिडम पक्षाची सत्ता
    पर्यायी उत्तरे :
    1) अ - ब - क - ड
    2) क - अ - ड - ब
    3) ब -  ड - अ - क
    4) क - ब - अ - ड
     
    7) म्यानमारकडून व्यापारासाठी अनेक बंदरांचा विकास केला जात आहे. त्यासंदर्भात योग्य विधान शोधा-
    1) धिलावा येथे बहुउद्देशीय स्वरूपाचे बंदर भारताच्या साहयाने विकसित केले जात आहे.
    2) सितवे बंदराचा विकास चीनद्वारे केला जात आहे. 
    3) क्यामूकफिमू येथे मोठी जहाजे येऊ शकतील, असे खोल पाण्याचे बंदर विकसित केले जात आहे.
    4) यापैकी नाही
    8) खालील विधाने विचारात घ्या:
    a) म्यानमारच्या मोटामा खाडीमध्ये नैसर्गिक वायूचे मोठे साठे आहेत.
    b) येथील मेतागुन क्षेत्रातील नैसर्गिक वायूची आयात भारताला केली जाते.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    1) फक्त (a)
    2) फक्त (b)
    3) (a) व (b) दोन्ही
    4) दोन्हीही नाहीत
     
    9) क्षेत्रफळाच्या दृष्टीने आग्नेय आशियातील सर्वांत मोठा देश कोणता ?
    1) म्यानमार
    2) इंडोनेशिया
    3) थायलंड
    4) मलेशिया
     
    10) खालील जोड्या अचूक जुळवा :
            स्तंभ अ (घटना)                                      स्तंभ ब (वर्ष)
    अ. राजधानी रंगूनचे यांगोन असे नामांतर                  I. 1989
    ब. नेपिडो ही म्यानमारची राजधानी                         II.  2006
    क. म्यानमारमधील लष्करी क्रांती                                III. 1962
    ड. म्यानमारमध्ये टेलिकम्युनिकेशन्स कायदा संमत        IV. 2013
    पर्यायी उत्तरे :
    (1) II III IV I
    (2) IV I III I
    (3) III II IV I
    (4) I II III IV
     
    11) 2015 सालापासून आंग सान स्यू की यांनी म्यानमार सरकारमध्ये कोणते पद भूषविले ?
    1) राष्ट्राध्यक्ष 
    2) प्रिमिअर
    3) प्राइम मिनिस्टर
    4) स्टेट कौन्सिलर ऑफ म्यानमार 
     
    12) आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यानुसार एखाद्या राष्ट्राच्या समुद्री किनारपट्टीपासून -
    अ) 12 नॉटिकल मैल दुरीपर्यंतचा प्रदेश हा त्या राष्ट्राचे प्रादेशिक क्षेत्र मानले जाते.
    ब) पुढचे 12 नॉटिकल मैल हे कॉन्टिग्युअस झोन म्हणजेच मर्यादित स्वरूपाचे हक्क असलेले क्षेत्र असते.
    क) पुढचे 100 नॉटिकल मैल हे मिलिटरी झोन म्हणजेच लष्करी हक्क असलेले क्षेत्र असते.
    ड) 200 नॉटिकल मैलाचे क्षेत्र हे त्या राष्ट्राचे विशेष आर्थिक क्षेत्र असते. य
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2) ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    13) आधुनिक म्यानमारचे राष्ट्रपिता म्हणून कोणास ओळखले जाते ?
    1) जनरल सॉ माँग 
    2) आँग सान 
    3) जनरल ने विन 
    4) मिन आँग हलेंग
     
    14) म्यानमारच्या उष्णकटिबंधीय पर्जन्यवनात कोणती दुर्मीळ वृक्षसंपदा आढळते ?
    अ) पदौक 
    ब) महोगनी
    क) सागवान
    ड) रोझवूड
    पर्यायी उत्तरे :
    1) विधाने अ, ब आणि क बरोबर
    2) विधाने ब, क आणि ड बरोबर
    3)  विधाने अ, ब आणि ड बरोबर
    4) विधाने अ, क आणि ड बरोबर
     
    15) म्यानमारमधील बौद्ध लोकांच्या जीवनात कोनता संप्रदाय महत्त्वपूर्ण आहे ?
    1) महायान
    2) हिनयान
    3) थेरवादी
    4) स्थाविनवादी
     
    16) खालीलपैकी कोणी म्यानमारमध्ये राज्य केलेले आहे ?
    अ) जपान
    ब) आंग सान
    क) जनरल ने विन
    ड) जनरल सॉ माँग
    इ) लाल चीन
    फ) जनरल यू नू 
    ग) ब्रिटन
    पर्यायी उत्तरे :
    1) वरील सर्व
    2) ड आणि फ वगळता सर्व  
    3) ब वगळता सर्व
    4) इ वगळता सर्व
     
    17) म्यानमारमध्ये 1962 ते 1988 पर्यंत कोणत्या पक्षाच्या नावाखाली लष्करशहा सत्ता राबवीत राहिले ?
    1) अँटी फॅसिस्ट पीपल्स फ्रिडम पार्टी
    2) बर्मा सोशॅलिस्ट प्रोग्रॅम पार्टी
    3) युनियन सॉलिडॅरिटी आणि डेव्हेलपमेंट  पार्टी
    4) नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी  पार्टी
     
    18) म्यानमार-मणिपूर सीमेवरील भारतातले शेवटचे गाव कोणते ?
    1) नाम फा लाँग बाजार
    2) सितवे 
    3) यांगून
    4) मोरेह
     
    19) म्यानमारच्या सीमारेषेबाबत खालील जोड्या अचूक जुळवा :
          स्तंभ अ (सीमा)       स्तंभ ब (प्रदेश)
    अ.  दक्षिण           I. बांगलादेश व भारत 
    ब.  पश्रि्चम   II. चीन 
    क.  पूर्व          III. अंदमान सागर व बंगालचा उपसागर 
    ड.  उत्तर          IV. लाओस व थायलंड
    पर्यायी उत्तरे :
    (1) II III I IV
    (2) II I III IV
    (3) III I IV I
    (4) IV III I II
     
    20) 2008 मध्ये म्यानमारच्या राज्यघटनेत करण्यात आलेल्या वादग्रस्त बदलामुळे  ......
    अ) राज्यघटनेत बदल करण्यासाठी संसदेत 75 टक्के पाठिंबा गरजेचा आहे. 
    ब) गृह, संरक्षण आणि सीमांच्या सुरक्षेबाबत निर्णय घेणारे मंत्रालय लष्कराच्या नियंत्रणात असते.
    क) म्यानमारमध्ये लष्कराला संसदेतील 25 टक्के जागा मिळतात.
    ड) ज्याचा पती वा पत्नी दुसर्‍या देशाचा नागरिक असेल, त्यांना म्यानमारचे राष्ट्रपती बनता येत नाही.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (90)
    1-3
     
    2-1
     
    3-2
     
    4-2
     
    5-2
     
    6-2
     
    7-3
     
    8-1
     
    9-1
     
    10-4
     
    11-4
     
    12-4
     
    13-2
     
    14-4
     
    15-3
     
    16-4
     
    17-2
     
    18-4
     
    19-3
     
    20-1
     
     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 235