साहित्य अकादमी पुरस्कार 2020 / प्रश्नमंजुषा (119)

  • साहित्य अकादमी पुरस्कार  2020 / प्रश्नमंजुषा (119)

    साहित्य अकादमी पुरस्कार 2020 / प्रश्नमंजुषा (119)

    • 06 Apr 2021
    • Posted By : study circle
    • 465 Views
    • 0 Shares
    प्रश्नमंजुषा (११९)
     
    १) साहित्य अकादमी पुरस्कार संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
    १) दरवर्षी साहित्य अकादमीच्या स्थापना दिनी जाहीर केले जातात.
    २) साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणारर्‍या २४ भाषांतील साहित्यिकांना दिले जातात.
    ३) १९५५ साली पहिले साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आले.
    ४) २००१ सालापासून पुरस्काराची रक्कम १ लाख रुपये करण्यात आली. 
     
    २) जोड्या लावा  (साहित्य अकादमी पुरस्कार, २०२०)
       ’अ’ (लेखक/साहित्यकार)            ’ब’ (ग्रंथ/साहित्यकृती)
    अ) जेहाद i) जेठो लालवानी
    ब) श्री बाहुबली अहिंसादिविजयम ii) एम. वीरप्पा मोइली
    क)व्हेन गॉड इज ट्रॅव्हलर iii) अरुंधति सुब्रमण्यम
    ड) अग्निवास iv) निखिलेश्वiर
    पर्यायी उत्तरे :
    (अ) (ब) (क) (ड)
    १) (ii) (i) (iv) (iii)
    २) (i) (ii) (iii) (iv)
    ३) (iv) (iii) (ii) (i)
    ४) (ii) (iv) (i) (iii)
     
    ३) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) १२ मार्च १९५४ रोजी नवी दिल्ली येथे साहित्य अकादमी ही साहित्यसंस्था स्थापन झाली. 
    ब) १९६१ मध्ये साहित्यसंस्था म्हणून साहित्य अकादमीची अधिकृत नोंदणी झाली.
    पर्यायी उत्तरे :
    १) फक्त अ
    २) फक्त ब
    ३) अ आणि ब दोन्ही
    ४) कोणतेही नाही
     
    ४) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
    १)  सॅम पित्रोदा : “ ड्रिमिंग बिग“
    २) कमलनाथ  : “ इंडियाज सेंच्युरी“
    ३) के. नटवर सिंग : ‘’ वन लाइफ इज नॉट इनफ “ 
    ४) अरविंद केजरीवाल :  ”सिटीझन दिल्ली : माय टाईम, माय लाईफ ‘’
     
    ५) साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त वर्षनिहाय पुढील साहित्यकृतींची कालक्रमानुसार मांडणी करा.
    a) उपरा
    b) स्वामी
    c) डांगोरा एका नगरीचा
    d) झाडाझडती
    पर्यायी उत्तरे :
    १)  (a),  (d),  (b),  (c)
    २)  (a),  (b),  (c),  (d)
    ३)  (b),  (a),  (d),  (c) 
    ४)  (c),  (b),  (a),  (d)
     
    ६) नासीरुद्दीन शहा यांचे आत्मचरित्र अँड द वन डे चे मराठीत भाषांतर कोणी केलेले आहे ?
    १) शारदा साठे
    २) सई परांजपे 
    ३) मिलिंद चंपानेरकर
    ४) भास्कर लक्ष्मण भोळे
     
    ७) साहित्य अकादमी पुरस्कार संदर्भात योग्य पर्याय ओळखून जोड्या लावा :
    स्तंभ-I (वर्ष)        स्तंभ-II (लेखक)
    a)  २०१६ (i) श्रीकांत देशमुख
    b)  २०१७ (ii) म. सु. पाटील
    c)  २०१८ (iii) अनुराधा पाटील
    d)  २०१९ (iv) आसाराम लोमटे
    पर्यायी उत्तरे :
    (a) (b) (c) (d)
    १) (i) (ii) (iii) (iv)
    २) (iv) (i) (ii) (iii)
    ३) (iii) (iv) (i) (ii)
    ४) (iii) (iv) (ii) (i)
     
    ८) खालीलपैकी कोणत्या आत्मचरित्रास साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे ? 
    १) विश्राम बेडेकर : एक झाड आणि दोन पक्षी
    २) गंगाधर गाडगीळ : एका मुंगीचे महाभारत
    ३) चिंतामण गणेश कोल्हटकर : बहुरूपी
    ४) वरील सर्व
     
    ९) आबा गोविंदा महाजन  यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणता/कोणते पर्याय बरोबर आहे/आहेत?
    a)   ना. धों. महानोर, अशोक कोतवाल यांच्यानंतर राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार मिळवणारे ते तिसरे खान्देशी साहित्यिक आहेत.
    b)  ’मन्हा मामानं गावले जावू’ या त्यांच्या पुस्तकाचा  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश केला गेला आहे. 
    c)  त्यांच्यावर साने गुरुजी, बालकवी, बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्याचा प्रभाव आहे.
    d)  त्यांच्या ‘आबाची गोष्ट’ या लघुकथासंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार २०२० जाहीर झाला.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) आणि (c)
    २) (b) आणि (d)
    ३) (a) आणि (b)
    ४) (c) फक्त
     
    १०) वीराप्पा मोईली यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही ?
    १) २००७ मध्ये मूर्तीदेवी पुरस्कार
    २) २०१४ मध्ये सरस्वती भूषण सन्मान
    ३) २०२० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार
    ४) २०१० मध्ये कन्नड साहित्यश्रेष्ष्ठ  बहुमान
     
    ११) खालीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
    a)  पी. व्ही. नरसिंह राव यांनी ’इनसायडर’ हे आत्मचरित्र लिहिले.
    b) डॉ. मनमोहन सिंग यांनी ’चेंजिंग इंडिया : १९५०-२०१४’ हा ग्रंथ लिहिला.
    c) प्रणव मुखर्जी यांनी ” द ड्रॅमॅटिक डिकेड : त इंदिरा गांधी इयर्स ‘ हे पुस्तक लिहिले.
    पर्यायी उत्तरे :
    १) (a) आणि (b)
    २) (a) आणि (c)
    ३) (b) आणि (c)
    ४) वरील तीनही विधाने बरोबर आहेत.
     
    १२) पुढील वाक्यांमध्ये पुढीलपैकी कोणत्या पुरस्काराचे वर्णन केले गेले आहे ?
    a) ज्ञानपीठ पुरस्कारानंतरचा देशातील दोन क्रमांकाचा साहित्य पुरस्कार.
    b) २०२० चा सदर पुरस्कार नंदा खरे यांनी हा नाकारला.
    c)  कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीराप्पा मोईली यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
    d) १९५५ पासून साहित्य अकादमीने सर्वोत्कृष्ट भारतीय ग्रंथांना सदर पुरस्कार देण्याची योजना सुरू केली.
    पर्यायी उत्तरे :
    १) साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार
    २) साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार 
    ३) साहित्य अकादमी पुरस्कार
    ४) भाषा सन्मान 
     
    १३) साहित्य अकादमी युवा पुरस्कार संदर्भात योग्य पर्याय ओळखून जोड्या लावा :
       स्तंभ-I (वर्ष) स्तंभ-II (लेखक)
    a)  २०१६ (i) नवनाथ गोरे
    b)  २०१७ (ii) सुशिलकुमार शिंदे
    c)  २०१८ (iii) मनस्विनी लता रवींद्र
    d)  २०१९ (iv) राहुल कौसंबी
    पर्यायी उत्तरे :
    (a) (b) (c) (d)
    १) (i) (ii) (iii) (iv)
    २) (iv) (i) (ii) (iii)
    ३) (iii) (iv) (i) (ii)
    ४) (iii) (iv) (ii) (i)
     
    १४) नंदा खरे यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) त्यांनी भाषांतरित केलेल्या एडवर्ड विल्सन यांच्या ‘वारूळपुराण’ पुस्तकाला डॉक्टर माधव गाडगीळ यांची प्रस्तावना आहे. 
    ब) त्यांनी ‘डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य’ या पुस्तकाचे संपादन केलेले आहे.
    क) त्यांनी लिहिलेले पहिले ऐतिहासिक पुस्तक - अंताजीची बखर
    ड) त्यांनी डॉक्टर लक्ष्मण सत्या यांच्या भाषांतरित केलेल्या पुस्तकाचे नाव - कापूसकोंड्याची गोष्ट
    पर्यायी उत्तरे :
    १) विधाने अ, ब आणि क बरोबर
    २) विधाने ब, क आणि ड बरोबर
    ३)  विधाने अ, ब आणि ड बरोबर
    ४) विधाने अ, क आणि ड बरोबर
     
    १५) साहित्य अकादमीच्या भाषांतर विभागाची कार्यालये कोठे आहेत ?
    १)  दिल्ली, मुंबई, बंगलोर व चेन्नई
    २)  कोलकाता, मुंबई, दिल्ली व चेन्नई 
    ३)  बंगलोर, दिल्ली, अहमदाबाद व कोलकाता
    ४)  कोलकाता, मुंबई, बंगलोर व चेन्नई 
     
    १६) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) पं. जवाहरलाल नेहरु हे साहित्य अकादमी  संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. 
    ब) सध्या गणेश मूर्ती हे साहित्य अकादमीचे अध्यक्ष आहेत.
    पर्यायी उत्तरे :
    १) फक्त अ
    २) फक्त ब
    ३) अ आणि ब दोन्ही
    ४) कोणतेही नाही
     
    १७) पुढील भाषांचा समूह कशासंबंधी आहे ?
    a) डोग्री
    b) बोडो
    c) मैथिली
    d) कोंकणी 
    e) राजस्थानी
    f) संथाळी 
    g) इंग्रजी
    h) काश्मिरी
    i) आसामी
    पर्यायी उत्तरे :
    १) भारतातील आदिवासी भाषा समूह
    २) साहित्य अकादमीने साहित्य अकादमी पुरस्कारासाठी मान्यता दिलेल्या काही भाषा
    ३) भारतीय संविधानाच्या ८ व्या भागात सुरुवातीस नसलेल्या पण कालांतराणे समाविष्ट केलेल्या काही भाषा
    ४) या भाषांच्या विकासासाठी कार्य करणार्यांगना साहित्य अकादमीद्वारे भाषा सन्मान दिला जातो.
     
    १८) साहित्य अकादमीसंबंधी खालील विधाने विचारात घ्या :
    अ) दक्षिण आशियाई भाषांतील विद्वानांना ‘आनंद कुमारस्वामी’ पुरस्कार देण्यात येतो.
    ब) भारतीय साहित्याच्या संदर्भात विशेष मौलिक कार्य करणार्या् परकीय विद्वानांना सन्मान्य गौरववृत्ती दिली जाते.
    क) १९८९ सालापासून भाषा सन्मान हा पुरस्कार प्रादेशिक भाषांच्या विकासकार्यार्थ दिला जातो. 
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    १) फक्त अ
    २) फक्त अ आणि ब
    ३) फक्त अ आणि क
    ४) अ, ब आणि क
     
    १९) साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार संदर्भात योग्य पर्याय ओळखून जोड्या लावा :
    स्तंभ-I (वर्ष) स्तंभ-II (लेखक)
    a)  २०१६ (i) सलीम सरदार मुल्ला
    b)  २०१७ (ii) रत्नाकर मतकरी
    c)  २०१८ (iii) राजीव तांबे
    d)  २०१९ (iv) एल. एम. कडू
    पर्यायी उत्तरे :
    (a) (b) (c) (d)
    १) (i) (ii) (iii) (iv)
    २) (iv) (i) (ii) (iii)
    ३) (iii) (iv) (i) (ii)
    ४) (iii) (iv) (ii) (i)

    २०) पहिला साहित्य अकादमी पुरस्कार लक्ष्मणशास्त्री जोशी यांना कोणत्या साहित्यकृतीसाठी  देण्यात आला होता?
    १) भारतीय साहित्यशास्त्र
    २) सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य
    ३)  वैदिक संस्कृतीचा विकास
    ४) ज्ञानेश्व्रीतील लौकिक सृष्टी
     
    २१) राजकीय नेते आणि त्यांची साहित्यकृती यांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी योग्य पर्याय निवडा.
    a) मोहित सेन : द ट्रॅव्हलर
    b) सोमनाथ चटर्जी : किपींग द फेथ : मेमॉयर्स ऑफ द पार्लमेंटेरियन
    c) मधु लिमये : ‘सौहार्द’
    d) जयराम रमेश : इंदिरा गांधी यांचे चरित्र 
    e) यशवंतराव चव्हाण : कृष्णाकाठ 
    f) एम. वीरप्पा मोइली : श्री बाहुबली अहिंसादिग्विजयम 
    पर्यायी उत्तरे :
    १) केवळ (a), (b), (c) आणि (e)
    २) केवळ (a), (b), (e) आणि (f)
    ३) केवळ (a), (b), (d) आणि (f)
    ४) (a),  (b), (c), (d), (e) आणि (f)
     
    २२) साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित लेखक व साहित्यकृतीबाबत चुकीची जोडी शोधा .
    १) मंगेश पाडगावकर : सलाम
    २) इंदिरा संत : सौंदर्यानुभव
    ३) व्यंकटेश माडगूळकर : सत्तांतर
    ४) दुर्गा भागवत : पैस
     
    २३) खालीलपैकी कोणती पुस्तके नंदा खरे यांनी लिहिेली आहेत ?
    अ) २०५० (भविष्यवेधी कादंबरी)
    ब) जीवोत्पत्ती 
    क) शहर आत्महत्या करायचं म्हणतंय
    ड) दगड-धोंडे
    इ) पाणी चारू, आरो इत्यादि
    फ) दगडावर दगड विटेवर वीट
    ग) जीवोत्पत्ती 
    पर्यायी उत्तरे :
    १) वरील सर्व
    २) अ, ब, ड, फ आणि ग 
    ३) ब आणि ग वगळता सर्व
    ४) ड, फ, ग वगळता सर्व
     
    २४) भारतातील उदारीकरणानंतर झालेल्या बदलांविषयी “ ब्रिंक अँड द ब्लॅक : इंडियाज १९९१ स्टोरी“ हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
    १) पी. चिदम्बरम 
    २) जगदीश भगवती
    ३) जयराम रमेश 
    ४) विजय केळकर
     
    २५) खालील जोड्या अचूक जुळवा :
             स्तंभ अ (ग्रंथ)                                        स्तंभ  ब (लेखक )
    अ. फअरलेस इन द ऑपोझिशन I. शीला दीक्षित 
    ब. ग्रेन ऑफ सँड इन द अवरग्लास ऑफ टाइम II. अर्जुन सिंग
    क. इंडियाज सेंच्युरी III. पी. चिदम्बरम
    ड. सिटीझन दिल्ली : माय टाईम, माय लाईफ IV.  कमलनाथ
    पर्यायी उत्तरे :
    (1) II III I IV
    (2) II I III IV
    (3) III II IV I
    (4) IV III I II
     
    २६) डॉ. सुगता बोस यांचे  ‘’ द नेशन अॅ ज मदर “  हे पुस्तक भारतीय राष्ट्रवादावर वेगळा विचार करायला लावणारे आहे. ते कोणत्या पक्षाचे नेते आहेत ?
    १) तृणमूल कॉग्रेस
    २) कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
    ३) भारतीय जनता पक्ष
    ४) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
     
    २७) पुढीलपैकी कोणत्या पुस्तकांचे लेखन पी. चिदंबरम यानी केलेले आहे ?
    a)  सेव्हींग द आयडिया ऑफ इंडिया
    b)  स्टँडिग गार्ड - ए इयर इन द ऑपोझिशन
    c)  ब्रिंक अँड द ब्लॅक : इंडियाज १९९१ स्टोरी
    d)  फिअरलेस इन द ऑपोझिशन
    e)  स्पिकीएंग ट्रूथ टू द पॉवर  : माय अल्टर्नेटिव्ह व्ह्यू
    पर्यायी उत्तरे :
    १) (a), (c) आणि (e) फक्त
    २) (b), (c), (d) आणि (e) फक्त
    ३) (a), (b), (c) आणि (d) फक्त
    ४) (a), (b), (d) आणि (e)
     
    २८) खालील विधानांचा विचार करा :
    a)  साहित्य अकादमी भाषा पुरस्काराची सध्याची रक्कम १ लाख रुपये आहे.
    b)  साहित्य अकादमी अनुवाद पुरस्काराची सध्याची रक्कमही १ लाख रुपये आहे.
    पर्यायी उत्तरे :
    १) विधान (a) सत्य आहे आणि (b) विधानाची कारणमिमांसा आहे.
    २) (a) आणि (b) दोन्ही विधाने चूक आहेत.
    ३) (a) विधान सत्य आहे परंतु (b) चूक आहे.
    ४) (a) आणि (b) एकमेकांशी संबंधित नाहीत.
     
    २९) ”आपल्या देशातील विविध भाषांचा परिचय सर्वांना असणे शक्य नाही; परंतु भारतातील प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीने आपल्या भाषेतील ज्ञानाबरोबरच इतर भाषांतील साहित्याची माहिती करून घेण्याची इच्छा ठेवली पाहिजे. इतर भाषांत लिहिलेल्या ग्रंथांचा, तसेच प्रसिद्घ पुस्तकांचा परिचय करून घेतला पाहिजे व या प्रकारे आपल्या व्यक्तिमत्त्वात भारतीय संस्कृतीचा विशाल व उदार दृष्टिकोन आणि बहुभाषिक प्रेरणा वृद्घिंगत केली पाहिजे”- साहित्य अकादमीच्या कार्याची उद्दिष्टे नेमकेपणाने प्रतिबिंबित करणारे हे उदगार कोणी काढले होते?
    १) इरावती कर्वे 
    २) जवाहरलाल नेहरु
    ३) अबुल कलाम आझाद
    ४) पप्पुल जयकर
     
    ३०) पुढील विधाने विचारात घ्या :
    a) ३५ वर्षाखालील युवा लेखकांना  साहित्य अकादमी युवा पुरस्कार दिला जातो.
    b) सदर  पुरस्कार देताना गेल्या ५ वर्षापर्यंत लेखकाची प्रकाशित पहिली साहित्यकृती विचारात घेतली जाते.
    पर्यायी उत्तरे :
    १) फक्त (a) बरोबर आहे.
    २) फक्त (b) बरोबर आहे.
    ३) (a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत.
    ४) (a) आणि (b) दोन्ही चूक आहेत.

    उत्तरे : प्रश्नतमंजुषा (119)
    १-४
     
    २-२
     
    ३-१
     
    ४-४
     
    ५-३
     
    ६-२
     
    ७-२
     
    ८-४
     
    ९-१
     
    १०-४
     
    ११-३
     
    १२-३
     
    १३-३
     
    १४-३
     
    १५-३
     
    १६-१
     
    १७-२
     
    १८-२
     
    १९-४
     
    २०-३
     
    २१-४
     
    २२-२
     
    २३-२
     
    २४-३
     
    २५-३
     
    २६-१
     
    २७-४
     
    २८-३
     
    २९-२
     
    ३०-३
     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 465