बॅड बँक / प्रश्नमंजुषा (152)
- 18 May 2021
- Posted By : study circle
- 32 Views
- 0 Shares
प्रश्नमंजुषा (152)
1) ’‘तुमच्या नावावर बँकेचे 100 पौंडाचे कर्ज असेल तर ती तुमची समस्या असते. पण समजा, तुमच्या नावावर 10 लाख पौंड कर्ज असेल तर ती बँकेची डोकेदुखी होते”... असे केनिशिअन अर्थशास्त्राचे जनक जॉन मेनार्ड केन्स यांनी जे म्हटले आहे, ते कोण होते ?
1) विसाव्या शतकातील ब्रिटिश मध्यवर्ती बॅकेचे गव्हर्नर
2) विसाव्या शतकातील ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ
3) विसाव्या शतकातील ब्रिटिश पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार
4) वरील सर्व
2) ” भारतीय बॅड बँक “ संदर्भात खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) या बँकेचे खरे नाव ‘नॅशनल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड’ (एनएआरसीएल) असे आहे.
ब) या बँकेचे पहिले सीईओ पद्मकुमार माधवन नायर हे आहेत.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
3) भारतात बॅड बँकेच्या स्थापनेची शिफारस कोनी केली होती ?
1) पंतप्रधानांचे वित्तीय सल्लागार अरविंद सुब्रमण्यम
2) नीती आयोग
3) इंडियन बँक असोसिएशन
4) रिझर्व्ह बेंकेचे माजी गव्हर्नर बिमल जालन
4) खाली दोन विधान दिलेली आहेत.
(अ) विधान असून (र) हे कारण आहे. त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
विधान (अ) : रघुराम राजन यांच्यासारखे अर्थतज्ज्ञ बॅड बँक संकल्पनेच्या विरोधात आहेत.
कारण (र) : बॅड बँक ही ''person who can't pay, gets another person who can' t pay, to guarantee that he can pay'' अशा स्वरुपाची आहे.
पर्यायी उत्तरे :
1) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
2) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
3) (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
4) (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
5) जगातील पहिली बॅड बँक कधी स्थापन झाली ?
1) स्वीडनमध्ये 1992 मध्ये
2) अमेरिकेत 1988 मध्ये
3) स्वित्झर्लंडमध्ये 1921 मध्ये
4) अमेरिकेत 2008 मध्ये
6) नॅशनल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड’ (एनएआरसीएल) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) धनको बँक आणि वित्तसंस्था यांच्या मोठ्या रकमेच्या बुडित कर्जाची जबाबदारी घेऊन ती कर्जे कमी करण्याचे काम या बँकेस करावे लागते.
ब) 1 जून 2021 पासून ही बँक अस्तित्वात
क) 2020-21 चा केंद्रीय अंदाजपत्रक मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या बँकेच्या स्थापनेची घोषणा केली होती.
ड) बँकांची अनुत्पादित कर्जे (एनपीए) कमी किमतीत खरेदी करून त्याच्या अधिकाधिक वसुलीसाठी ही कंपनी (बॅड बँक) प्रयत्न करते.
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
7) भारतात सध्या (2021) किती अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपन्या खासगी क्षेत्रात अस्तित्वात आहेत ?
1) सुमारे 40 हून अधिक
2) सुमारे 50 हून अधिक
3) सुमारे 60 हून अधिक
4) सुमारे 30 हून अधिक
8) केंद्र सरकारने थकीत कर्ज वसुलीसाठी केलेल्या उपाय योजना कोणत्या ?
अ) द सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रशन ऑफ फिनान्शिअल अॅसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटीज इंटरेस्ट अॅक्ट (SARFESI)
ब) इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी कोड
क) कर्ज वसुली लवाद
ड) सिक इंडस्ट्रीअल कंपनीज अॅक्ट
पर्यायी उत्तरे :
1) विधाने अ, ब आणि क बरोबर
2) विधाने अ, ब, क आणि ड बरोबर
3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
4) विधाने अ, क आणि ड बरोबर
9) रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार बँकांमधील अनुत्पादित मालमत्तेचे वितरित कर्जाच्या तुलनेतील प्रमाण (सप्टेंबर 2021 पर्यंत) असे असेल ........
1) राष्ट्रीयीकृत बँका - 16.2 टक्के
2) खासगी बँका - 7.9 टक्के
3) खासगी बँका - 5.4 टक्के
4) वरील सर्व
10) भारतीय बँकांमधल्या एनपीए संबंधी खालील विधाने विचारात घ्या :
अ) अनुत्पादक मालमत्तेचे आदर्श प्रमाण जास्तीत जास्त 3 टक्के गृहीत धरले गेले आहे.
ब) कोरोना काळातील आर्थिक व्यवहारामुळे अनुत्पादक मालमत्तेचे आदर्श प्रमाण कर्ज वितरणाच्या 10 टक्के झाले.
क) मार्च 2020 मध्ये अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण देशाच्या जीडीपीच्या तुलनेत 1.3 टक्के होते.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
उत्तरे : प्रश्नमंजुषा (152)
1-2
2-3
3-3
4-2
5-2
6-4
7-4
8-2
9-4
10-3
बॅड बँक