नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (अमेंडमेंट) बील 2021 / प्रश्नमंजुषा (108)

  •  नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (अमेंडमेंट) बील 2021 / प्रश्नमंजुषा (108)

    नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (अमेंडमेंट) बील 2021 / प्रश्नमंजुषा (108)

    • 28 Mar 2021
    • Posted By : study circle
    • 850 Views
    • 0 Shares

    प्रश्नमंजुषा (108)

    1) खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे दिल्लीला ’राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा’ दर्जा देण्यात आला. 
    1) 7 वी घटनादुरुस्ती
    2) 67 वी घटनादुरुस्ती
    3) 71 वी घटनादुरुस्ती
    4) 69 वी घटनादुरुस्ती 
     
    2) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) 24 मार्च 2021 रोजी दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सरकार (सुधारणा) विधेयक, 2021 विधेयक संसदेत संमत झाले. 
    ब) 1 जानेवारी 1991 रोजी गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (जीएनसीटीडी ) अ‍ॅक्ट, 1991 लागू करण्यात आला.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    3) दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यात एखाद्या मुद्द्यावरून वाद झाल्यास राष्ट्रपतींचा निर्णय अंतिम असेल, अशी तरतूद  कोणत्या कलमात आहे ?
    1) कलम 239 एए 
    2) कलम 239 ए 
    3) कलम 239 एएए 
    4) कलम 239 एबी 
     
    4) दिल्लीतील प्रशासकीय व्यवस्था कोणत्या कायद्यांवर आधारित आहे ?
    अ) ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस ऑफ जीएनसीटीडी  रुल्स 1993
    ब) जीएनसीटीडी (गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली ) अ‍ॅक्ट 1991
    क) जीएनसीटीडी (गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली ) अ‍ॅक्ट 20211
    ड) राज्यघटनेतील कलम 239 एए
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, ब, क आणि ड बरोबर
     
    5) दिल्लीत जनतेने निवडून दिलेल्या सरकारला काही अधिकार देणे हा राज्यघटनेतील कोणत्या तरतुदीचा  उद्देश होता ?
    1) कलम 239 एबी
    2) कलम 239 ए 
    3) कलम 239 एएए 
    4) कलम 239 एए
     
    6) ‘नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (अमेंडमेंट) बील 2021’ ला संसदेत कोणत्या पक्षाने पाठिंबा दिला होता?
    अ) आरपीआय (आठवले गट)
    ब) बीजेडी
    क) वायएसआर काँग्रेस
    ड) एआएडीएमके
    पर्यायी उत्तरे :
    1) विधाने अ, ब आणि क बरोबर
    2) विधाने ब, क आणि ड बरोबर
    3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
    4) विधाने अ, क आणि ड बरोबर
     
    7) तीन अपवाद - भूखंड, पब्लिक ऑर्डर आणि कायदा-सुव्यवस्था वगळता दिल्लीच्या निवडून आलेल्या सरकारलाच कायदा बनवण्याचा अधिकार देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठाने कधी दिला होता ?
    1) 1992
    2) 2015
    3) 2018
    4) 2013
     
    8) खालील विधाने विचारात घ्या : भारतीय राज्यघटनेनुसार ..........
    अ) राज्यघटनेत सुधारणेसाठी दुरुस्ती विधेयक आणण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असतो. 
    ब) संसदेचा कायदा घटनेला अनुसरून आहे का, हे ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाला आहे.
    क) कायदा तयार करण्याचा अधिकार संसदेकडे आहे.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    9) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
    1) राज्यघटनेत सुधारणा करून तयार करण्यात आलेल्या कायद्यात बदल करण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयक आणावं लागते.
    2) राज्यघटनेत काही सुधारणा करायची असेल तर त्यासाठी घटना दुरुस्ती विधेयक आणणे गरजेचे असल्याने सामान्य सुधारणा विधेयकाद्वारे असे करता येत नाही.
    3)  सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने एखाद्या कायद्याचा एक विशिष्ट अर्थ लावला तर संसद त्यावर कायदा बनवू शकत नाही.
    4) दिल्ली सरकारला देण्यात आलेले अधिकार घटनेत सुधारणा करून देण्यात आले होते. 
     
    10) खालील जोड्या अचूक जुळवा :
       स्तंभ अ (वर्ष)         स्तंभ ब (दिल्लीस असलेला दर्जा)
    अ. 1911   I.   राष्ट्रीय राजधानी क्षेत्र
    ब. 1950   II.   केंद्र शासित प्रदेश
    क. 1956   III.   भारतीय गणराज्यातील क वर्गाचे राज्य
    ड. 1991   IV.   ब्रिटिश भारताची राजधानी
    पर्यायी उत्तरे :
    (1) II III I IV
    (2) IV I III II
    (3) III II IV I
    (4) IV III II I
     
    11) दिल्लीत निवडून दिलेले सरकार दिल्लीच्या विधानसभेप्रती उत्तरदायी आणि जबाबदार असेल, असे  कोठे नमूद आहे ?  
    1) राज्यघटनेच्या 239एए कलमाच्या दुसर्‍या परिच्छेदात 
    2) राज्यघटनेच्या 239एए कलमाच्या चौथ्या परिच्छेदात 
    3) राज्यघटनेच्या 239एए कलमाच्या पाचव्या परिच्छेदात 
    4) राज्यघटनेच्या 239एए कलमाच्या सहाव्या परिच्छेदात 
     
    12) गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (जीएनसीटीडी ) अ‍ॅक्ट, 1991 नुसार कोणत्या विषयांची जबाबदारी दिल्ली कॅबिनेटकडे आहे ?
    अ) कायदा-सुव्यवस्था
    ब)  सार्वजनिक वाहतूक 
    क)  भूखंड
    ड)  सार्वजनिक आरोग्य
    इ)  शिक्षण
    फ) पाणी व वीजपुरवठा 
    ग) प्रशासन व पब्लिक ऑर्डर 
    पर्यायी उत्तरे  :
    1) वरील सर्व
    2) ब, ड, इ आणि फ 
    3) अ, फ व ग  वगळता सर्व
    4) ड, फ, ग वगळता सर्व
     
    13) खालीलपैकी कोणी गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (जीएनसीटीडी ) अ‍ॅक्ट दुरुस्ती विधेयक 2021 ’ संसदेत मांडले होते ?
    1) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
    2) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
    3) केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी 
    4)  केंद्रीय कायदा मंत्री रवीप्रसाद शंकर
     
    14) खालील जोड्या अचूक जुळवा :
             स्तंभ अ (जीएनसीटीडी 2021 तरतूद )                     स्तंभ ब (तपशील)
    अ. सेक्शन 21 I.   कायदा राष्ट्रपतीच्या विचारार्थ पाठवण्याची तरतूद 
    ब. सेक्शन 24 II.  दिल्ली विधानसभा सभागृह कामकाजाचे नियम बनवण्यास बंधने
    क. सेक्शन 33 III. सरकार म्हणजे नायब राज्यपाल
    पर्यायी उत्तरे :
    (1) II III I
    (2) II I III
    (3) III I II
    (4) I III II
     
    15) डेरेक ओब्रायन हे खालीलपैकी कोणत्या पक्षाचे राज्यसभेतील खासदार आहेत ?
    1) वायएसआर काँग्रेस
    2) केरळ काँग्रेस
    3) तृणमूल काँग्रेस
    4) आम आदमी पार्टी
     
    उत्तरे : प्रश्नमंजुषा (108)
    1-4
     
    2-1
     
    3-1
     
    4-4
     
    5-4
     
    6-4
     
    7-3
     
    8-3
     
    9-3
     
    10-4
     
    11-4
     
    12-2
     
    13-3
     
    14-3
     
    15-3
     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 850