अवकाशविज्ञान : 2020 मधील घटना
- 25 Feb 2021
- Posted By : Study Circle
- 1388 Views
- 0 Shares
अवकाशविज्ञान 2020 मधील घटना
आर्टेमिस मून-लँडिंग : नासा चांद्रमोहिम
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने 2024 मध्ये सुरू होणार्या आपल्या चांद्रमोहिमेसाठी 18 अंतराळवीरांची निवड केली. निम्मी संख्या महिला अंतराळवीरांची आहे. आर्टेमिस मोहिमेत चांद्रभूमीवर एका महिलेचे पाऊल पडेल अशा पद्धतीने या मोहिमेची आखणी करण्यात येत आहे.
• नासा मध्ये 47 अंतराळवीर सक्रिय आहेत. त्यापैकी निम्म्या अंतराळवीरांना अंतराळयानातून प्रवास करण्याचा अनुभव आहे.
• 2024 च्या चांद्रमोहिमेत चंद्रावरून 85 किलो वजनाचे माती व खडकांचे नमुने पृथ्वीवर आणण्यात येतील.
• 1969 ते 1972 या काळातील नासाच्या अपोलो मोहिमेतून सरासरी 64 किलो वजनाचेच नमुने आणण्यात आले होते.
स्पेस क्ष च्या रॉकेटचा स्फोट
प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने विकसित केलेल्या स्टारशिप रॉकेटचा लँडिंग दरम्यान टेक्सास येथील तळावर स्फोट झाला.
• स्टारशिप हे एक स्वयंचलित रॉकेट असून लँडिंग पॅडला स्पर्श करताना या रॉकेटचा स्फोट झाला.
• लँडिंगच्यावेळी इंधन टाकीवरील दबाव कमी झाल्यामुळे रॉकेट जास्त गतीने उतरताना स्फोट झाला.
• स्पेसएक्सने नव्याने विकसित केलेल्या रॅप्टर इंजिनचा प्रथमच या मध्ये वापर
स्टारशिप रॉकेट -
1) मंगळ आणि चंद्र मोहिमाच्या दृष्टीने मस्क यांची स्पेसएक्स कंपनी या शक्तीशाली रॉकेटची उभारणी
2) स्टारशिप रॉकेटसाठी नासाने स्पेसएक्सला 13 कोटीपेक्षा जास्त डॉलर्सची मदत केली.
3) माणसं आणि 100 टनापर्यंत सामान वाहून नेण्यासाठी 16 मजली स्टारशिप रॉकेटची निर्मिती
4) टेस्ट फ्लाईट दरम्यान 41 हजार फूटापर्यंतची उंची गाठण्याचे लक्ष्य होते.
खगोलशास्त्रीय घटना
गुरू आणि शनी हे सौर यंत्रणेतील सर्वात मोठे ग्रह, 397 वर्षांनंतर आकाशात एकमेकांना स्पर्श करताना बघायला मिळतील. हा योगायोग 21 डिसेंबर रोजी पाहायला मिळेल. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या दुर्मिळ घटनेत या दोघांमधील आभासी अंतर केवळ 0.06 अंश असेल. या दोन्ही चंद्रांना एक डिग्री अंतराने पाहण्याची संधी मिळेल. असा योग नंतर 376 वर्षांनंतर येईल. आपण सध्या खुल्या डोळ्यांनी शनी आणि गुरुला आकाशात पाहू शकतो. शनी चांदीच्या रंगाच्या रिंग्जमध्ये गुंडाळलेला असून त्याचे टायटन आणि रे हे उपग्रहही दिसतील. गुरुचे 4 उपग्रह गायनामिड, कॅलेस्टो, आयओ व युरोपा हेदेखील या वेळी खगोलप्रेमींना बघायला मिळणार आहेत.
• पहिल्यांदा गॅलिलियो यांनी पाहिली होती ही घटना : महान शास्त्रज्ञ गॅलिलियो गॅलिली यांनी टेलिस्कोप बनवल्यावा 1623 मध्ये शनी व गुरुला इतक्या जवळून पाहिले होते. दुर्बिणीच्या सुविधेच्या उपलब्धतेमुळे, ग्रह आणि नक्षत्रांसह विश्वाच्या अनेक रहस्यमय व दिशाभूल करणार्या वस्तुस्थितीची सत्यता कळाली. या घटनेची रोचकता आणखीन वाढली आहे कारण ही खगोलशास्त्रीय घटना वर्षाच्या सर्वात छोट्या दिवशी होणार आहे. शास्त्रज्ञांनी या दुर्मिळ घटनेला ग्रेट कंजेक्शन असे नाव दिले आहे.
अवकाश स्थानकात मुळ्याची लागवड यशस्वी
• आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात मुळ्याची लागवड प्रथमच यशस्वी झाली असून त्यामुळे अवकाशवीरांना आता ताज्या मुळ्यांचा आस्वाद घेता येणार आहे. महिला अवकाशवीर केट रुबीन्स यांनी लागवड केलेल्या बियाण्यांना कोंब फुटून नंतर त्याचे रोप झाले व 30 नोव्हेंबर 2020 ला मुळे तयार झाले.
• ऐतिहासिक अशी ही घटना मानली जात असून अवकाशस्थानकातील वनस्पती उद्यानात सूक्ष्म गुरुत्वाला मुळ्याची लागवड करण्यात आली होती. वनस्पती अवकाशात वाढवणे कठीण असते, त्यामुळे एका विशिष्ट कक्षात त्याची लागवड करून त्यावर एलइडीचा प्रकाश सोडला होता. त्याला नियंत्रित पद्धतीने पाणी, पोषके व खते तसेच ऑक्सिजन देण्यात आला. मुळ्याचे रोप परिपक्व होण्यास केवळ 27 दिवस लागतात त्यामुळे मुळ्याची लागवडीसाठी निवड करण्यात आली होती. ते मुळे 2021 मध्ये पृथ्वीवर आणले जाणार आहेत.
• आतापर्यंत अवकाश स्थानकात कोबी, मोहरी, झिनिया पुष्प वनस्पती, आणि एका रशियन वनस्पतीची लागवड यशस्वी झाली आहे. अवकाशवीरांना ताजे अन्न मिळावे व तेथे वनस्पतींची वाढ कशी होते याचा अभ्यास करणे या हेतूने प्रयोग केले जात आहेत.
स्मॅश 2000 प्लस ड्रोन तंत्रज्ञान
देशाच्या सागरी सीमांवर नौदल सातत्याने सामर्थ्य वाढवत आहे. त्यासाठी भारतीय नौदलाने इस्राईलकडून स्मॅश 2000 प्लस अग्निशमन यंत्रणा खरेदी करण्याच्या करारास मान्यता दिली. नौदलाच्या म्हणण्यानुसार, शत्रूंच्या ड्रोन हल्ल्यात किंवा त्यासंबंधित माहिती गोळा करण्यासाठी ही नवीन यंत्रणा (डचअडक 2000) एक महत्त्वपूर्ण शस्त्र असेल. हे रायफलवर बसवले जाऊ शकते (फिट केले जाऊ शकते). दिवसा किंवा रात्री कधीही आकाशात उडणारी छोटी ड्रोन्स हे सहज लक्ष्य करू शकते. यंत्रणेची पहिली डिलिव्हरी पुढील वर्षापर्यंत केली जाईल.
स्मॅश 2000 प्लसची वैशिष्ट्ये -
• स्मॅश 2000 ची किंमत 10 लाखांपेक्षा कमी आहे.
• स्मॅश 2000 ची रचना इस्त्रायली कंपनी स्मार्ट शूटरने केली आहे. ड्रोन्स हल्ला नाकाम करणे हे त्याचे मुख्य काम आहे. चीनशी निपटण्यात हे अत्यंत प्रभावी सिद्ध होऊ शकते.
• स्मॅश 2000 ची किंमत 10 लाखांपेक्षा कमी असेल.
• स्मॅश 2000 पल्स 120 मीटरच्या अंतरावरुन शत्रूंचे ड्रोन नष्ट करु शकते. अलीकडच्या काळात लहान ड्रोन हा भारतासाठी एक मोठा धोका म्हणून उदयास आले आहेत. विशेषत: जेव्हा अनेक छोटी ड्रोन एकाच वेळी वापरली जातात तेव्हा ती अधिक धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. अशाप्रकारे, गटामध्ये पाठवलेले ड्रोन त्यांच्या शत्रूची हवाई संरक्षण पूर्णपणे नष्ट करू शकतात.
कसे काम करतात ?
• इस्त्राईल डिफेन्स वेबसाइटच्या मते, डचअडक 2000 स्मार्ट इलेक्ट्रो ऑप्टिकल रायफल ही साइट आहे (कॅमेरे). यात संगणक नियंत्रण आहे जे फायर कंट्रोल करते. त्यांचे लक्ष्य अत्यंत अचूक आहे, जे पापणी लवण्यापूर्वीच आपल्या रेंजमध्ये येणार्या ऑब्जेक्ट्सला हाणून पाडते. एक खास गोष्ट अशी आहे की ते हलणारी आणि स्टील दोन्हीही टार्गेटला हिट करु शकते. कंपनीच्या म्हणण्यानुसार भारतीय सेना याला अघ-47/103 रायफल्समध्ये फिट करेल.
नौदलाची शक्ती वाढत आहे -
* देशाच्या सागरी सीमांवर नौदल सातत्याने सामर्थ्य वाढवत आहे. चीनशी झालेल्या वादानंतर याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. चीनच्या युद्धनौकाही बर्याच वेळेस हिंद महासागरात दिसल्या आहेत. अशा परिस्थितीत भारतीय नौदल त्यांच्याकडून होणार्या कोणत्याही धोक्याबाबत सतर्क आहे. नुकताच नौदलाने अमेरिकेतून प्रीडेटर ड्रोनही भाड्याने घेतले आहेत. दोन महिन्यांपूर्वी भारतीय नौदलाने अँटी-सबमरीन वारफेयर लेस जहाज आयएनएस कवरत्ती आपल्या ताफ्यात समाविष्ट केले.
पृथ्वीवरील जीवसृष्टी ही धूमकेतूचीच देणगी
पृथ्वीवर जीवसृष्टी कशी निर्माण झाली याबाबतचे कोडे उलगडण्याचा प्रयत्न नेहमी केला जात असतो. धूमकेतूंमुळेच पृथ्वीवर पाण्यासारखे काही प्राथमिक घटक आले असे म्हटले जाते. आता त्याला पुष्टी देणारे नवे संशोधन झाले असून पृथ्वीवरील जीवसृष्टी ही धूमकेतूंचीच देणगी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
• याबाबत 67 पी/चुर्युमोव्ह गेरासिमेन्को नावाच्या धूमकेतूचा अभ्यास करण्यात आला. त्यावर जीवसृष्टीसाठी आवश्यक असे सर्व घटक असल्याचे दिसून आले. युरोपियन स्पेस एजन्सीने रोसेटा मोहिमेतून याबाबतचे संशोधन केले. त्यामध्ये आढळले की या धूमकेतूवर जीवसृष्टीसाठी आवश्यक असलेला फॉस्फरसही अस्तित्वात आहे. फिनलँडमध्ये तुर्कू युनिव्हर्सिटीतील संशोधकांबरोबर अॅस्ट्रोफिजिसिस्ट आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर एस्को गार्डनर यांच्या नेतृत्वाखाली याबाबतचे संशोधन झाले. त्याची माहिती मंथली नोटिसेस ऑफ द रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
• त्यामध्ये म्हटले आहे की जीवनासाठी आवश्यक असणार्या घटकांना उकजझड असे म्हटले जाते. त्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस आणि सल्फर यांचा समावेश होतो. याच सहा घटकांचे मिश्रण पृथ्वीच्या बहुतांश जैविक अणूंची निर्मिती करते. 67 पी/चुर्युमोव्ह गेरासिमेन्को धूमकेतूच्या आतील स्तरात फॉस्फरस आणि फ्लोरिनही आढळले आहे. हे दोन्ही घटक रोसेटाच्या सीओमेट्री सेकंडरी आयन मास अॅनालायझर उपकरणाने धूमकेतूपासून काही अंतरावर गोळा केलेल्या ठोस कणांमध्ये सापडले. पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी फॉस्फरसचे महत्त्व मोठे आहे.
चीनच्या उपग्रहाची जगावर निगराणी
जगाला कोरोना महामारी दिलेल्या चीनने आता अंतराळात एक असा उपग्रह प्रस्थापित केला आहे की, जो संपूर्ण जगावर निगराणी ठेवणार आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून पृथ्वीच्या कुठल्याही ठिकाणची अगदी जवळून छायाचित्रे घेता येणे चीनला शक्य झाले.
• गाओफेन-14 असे या उपग्रहाचे नाव आहे. शिचांग सॅटेलाईट सेंटरमधून मार्च-3 बी रॉकेटच्या सहाय्याने या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. गाओफेन हा त्याच्या श्रेणीतील सर्वाधिक अद्ययावत असा उपग्रह आहे. पृथ्वीच्या कुठल्याही भागातील संपूर्ण भौगोलिक स्थिती, त्या भागाची अद्ययावत छायाचित्रे घेण्याची याची क्षमता आहे.
चीनचे चांद्रयान परत येण्यास सज्ज -
• चीनने 24 नोव्हेंबर रोजी चंद्रावर पाठविलेल्या चँग-5 या यानाने चंद्रावरील जवळपास दोन किलोग्रॅम नमुने घेऊन ते पृथ्वीवर परत येण्यासाठी तयार आहे.
• चीनच्या चंद्रदेवतेच्या नावावरून चँग हे नाव ठेवण्यात आले आहे. चीनच्या अंतराळ कारकिर्दीत चंद्रावरून नमुने आणण्याचे हे पहिलेच अभियान होते.
• मानवरहित रॉकेट पाठविण्यासाठी अत्यंत गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. हे अभियान यशस्वी झाल्यास हे यश मिळवणारा रशिया, अमेरिकेनंतर चीन तिसरा देश बनेल.
सर्वात मोठा ड्रोन करणार उपग्रहांचे प्रक्षेपण
कोणत्याही उपग्रहाला अवकाशात स्थापन करावयाचे असल्यास त्याला अत्यंत किचकट लाँचिंग प्रक्रियेतून जावे लागते. मात्र, अमेरिकेतील एक ड्रोन उत्पादक कंपनीने ही समस्या आता निकालात काढली आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. या कंपनीने उपग्रहांच्या लाँचिंगसाठी एक चांगला पर्याय विकसित केला आहे.
• अमेरिका स्थित फर्म एईवनने रॅवन एक्स नावाचे एक ड्रोन तयार केले आहे. खासकरून लहान उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यासाठी हे ड्रोन डिझाईन करण्यात आले आहे. मात्र, सध्या रॉकेट लॅब, स्पेसएक्स, वर्जिन ऑर्बिट व अन्य काही स्टार्टअप कंपन्यांनी भविष्यातील स्पेस तंत्रज्ञान अधिक सुलभ व नॉवेल लाँच सिस्टम विकसित करण्याबाबत उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
• उल्लेखनीय म्हणजे एईवम कंपनीने तयार केलेले हे ड्रोन आकारात लहान नसून ते फारच मोठे आहे. ते ऑटोनोमस रूपाने 1.6 कि.मी. लांब रनवेवरही उतरविले जाऊ शकते. हे ड्रोन सुमारे 80 फूट लांब (24 मीटर), 18 फूट उंच (5.5 मीटर) आणि 60 फूट रंद आहे. हा ड्रोन आठ हजार चौरस फूट परिसरातील हँगरमध्ये उभा केला जाऊ शकतो.
• उल्लेखनीय म्हणजे रॅवन एक्समध्ये नियमित विमानासारखे जेट इंधनाचाही वापर केला जाऊ शकतो. कोणत्याही वातावरणाचा या ड्रोनवर कसलाच परिणाम होऊ शकत नाही. या ड्रोनचा 70 टक्के भाग रियुजेबल आहे. कंपनी सध्या 100 टक्के रियुजेबल करण्यासाठी कार्यरत आहे.
लूनार आउटपोस्ट
नासाने ही अमेरिकन अंतराळ संस्था चंद्राच्या पृष्ठभागावरून दगड-माती आणण्यासाठी लूनार आउटपोस्ट या खासगी कंपनीला 1 अमेरिकी डॉलर एवढी रक्कम दिली.
नासाने एकूण चार कंपन्यांना अशा प्रकारचे कंत्राट दिले होते. यामध्ये कॅलिफोर्नियातील मास्टेन स्पेस सिस्टम्स, टोकियो इथली आय-स्पेस आणि तिसरी कंपनी याच आय-स्पेसची युरोपातली सहाय्यक कंपनी आहे. नासाने या कंपन्यांना चंद्रावरून दगड, धोंडे आणि माती आणण्यासाठी मोबदला दिला.
• हे नमुने 50 ग्राम ते 500 ग्राम वजनाचे असू शकतात.
• या कंपन्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावरील नमुने गोळा करून नासाला दिले.
• लूनार आउटपोस्टचे सीईओ जस्टिन सायरस यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, 2023 साली ही मोहीम पार पडणार आहे. मात्र, आम्ही काही लँडर कंपन्यांशी चर्चा करतोय. सर्व योग्य पद्धतीने पार पडल्यास ठरलेल्या वेळेच्या आधीसुद्धा मोहीम सुरू करता येईल.
प्रश्न पैशांचा नाही -
• अमेरिकेतील कोलोरॅडोमधली लूनार आउटपोस्ट ही एक रोबोटिक्स कंपनी आहे. नासाशी केलेल्या करारानुसार या कंपनीला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरून दगड, मातीचे नमुने आणण्यासाठी 1 अमेरिकन डॉलर मिळेल.
• या कामासाठी नासाकडून मिळणारी रक्कम केवळ प्रेरणा नाही तर या मोहिमेतून कंपन्यांना इतरही अनेक वैज्ञानिक फायदे मिळणार आहेत. उदाहरणार्थ कंपन्यांना चंद्राच्या पृष्ठभागावरून संसाधनांचा उपसा करण्यासाठीच्या अभ्यासाठीची परवानगी मिळणार आहे.
• या मोहिमेमुळे मोठा बदल घडणार आहे. विशेषतः अंतराळ संशोधनाशी संबंधित विचारधारेत आमूलाग्र परिवर्तन होईल.
• सायरस यांची कंपनी चंद्रावर प्रवासाच्या दृष्टीने काम करणार्या ब्लू ओरायझनसारख्या इतर काही कंपन्यांच्या संपर्कात आहे. ब्लू ओरायझन कंपनीच्या निर्मितीत अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बोसेफ यांचा मोठा हातभार आहे.
• जपानच्या ज्या कंपनीसोबत नासाने करार केला आहे, त्या कंपनीला 5 हजार डॉलर्स देण्यात येणार आहेत. ही जपानी कंपनी 2022 साली चंद्राची उत्तर-पूर्व भागातून नमुने गोळा करेल.
एक डॉलर तीन हफ्त्यांमध्ये मिळणार -
• अंतराळतज्ज्ञ सीनिएड ओ सुलीवान म्हणतात, स्पेस प्रोग्रामसाठी इथे 1 अमेरिकी डॉलर ही रक्कम महत्त्वाची नाही तर अशा कार्यक्रमांमध्ये नासाचं सहभागी होणंच मुळात महत्त्वाचं आहे. याद्वारे नासा एक उदाहरण घालून देत आहे.
• या कार्यक्रमासाठी किती रक्कम दिली हे महत्त्वाचं नाही तर पृथ्वीच्या बाहेर खरेदी-विक्रीसाठीची बाजारपेठ उभारण्यासाठी व्यावसायिक आणि कायदेशीर निकष तयार करणं महत्त्वाचं आहे.
• तिन्ही कंपन्यांच्या रकमेचं वितरण तीन हफ्त्यांमध्ये करण्यात येईल, असं नासाकडून सांगण्यात आलं आहे.
• पहिल्या हफ्त्यात कंपन्यांना 10% रक्कम मिळेल. त्यानंतर स्पेसक्राफ्ट लाँच करतानाच्या दुसर्या टप्प्यात पुढील 10% रक्कम देण्यात येईल. यानंतर कंपन्यांनी गोळा केलेल्या नमुन्यांची नासाकडून पडताळणी झाल्यानंतर उर्वरित 80% रक्कम सुपूर्द करण्यात येईल.
चीनचे यान चंद्रावर उतरले
• 1 डिसेंबर 2020 - चंद्राच्या पृष्ठभागावर चीनचे चंग व्हे-5 (उहरपसश-5) यान मंगळवारी यशस्वीरित्या उतरले.
• 24 नोव्हेंबर 2020 - चंग व्हे-5 यान चंद्राच्या दिशेने पाठवले होते.
चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी चीनने ही मोहीम आखली आहे. चीनच्या पुराण कथांमध्ये चंद्र ही देवता मानली जात असून तिला चंग व्हे म्हणतात.
मोहीमेचे वैशिष्ट्य -
• या चंद्रमोहिमेत हे यान चंद्रावरच्या ओशनस प्रोसेलॅरम या लाव्हा पठारावरील 2 किलो ग्रॅम वजनाचे अवशेष गोळा करणार आहे. ही मोहीम यशस्वी ठरल्यास चंद्रावरचे अवशेष गोळा करणार्या अमेरिका व सोव्हिएट युनियननंतरचा चीन हा तिसरा देश ठरेल.
• चंग व्हे-5मधील एक रोबो चंद्राच्या पृष्ठभागाचे खोदकाम करेल. या खोदकामातून मिळालेली माती व खडकांचे अवशेष गोळा केले जातील. हे सर्व अवशेष एका कॅप्सुलमध्ये ठेवून ही कॅप्सूल चीनच्या अंतर्गत मंगोलियात उतरणार आहे.
• 2019 मध्ये चीनने चंग व्हे-4 हे यान चंद्राच्या भागात उतरवलेले होते.
अंतराळवीराला अचानक हार्ट अॅटॅक
• अंतराळवीरांच्या जीवनाविषयी लोकांना वेगवेगळ्या बाबतीत मोठेच कुतुहल असते. अंतराळ प्रवासाला जाण्यापूर्वीच अंतराळवीरांनी अनेक बाबतीत काळजी घेतलेली असते व त्यामुळे त्यांचा अंतराळप्रवास सुखरूप होतो. मात्र, अंतराळात असतानाच जर एखाद्या अंतराळवीराला अचानक हार्ट अॅटॅक आला तर? अशावेळी अन्य अंतराळवीर त्याला कशी मदत करू शकतील, याचेही आता धडे देण्यात येत आहेत.
• सध्या अंतराळ पर्यटनाचे दालनही खुले झालेले असल्याने अंतराळातील वेगवेगळ्या धोक्यांना गृहित धरून त्यावरील उपाय शोधले जात आहेत. हार्ट अॅटॅकसारख्या आरोग्याशी संबंधित काही गंभीर समस्यांचाही यामध्ये समावेश आहे. पृथ्वीवर जर एखाद्या व्यक्तीला हार्ट अॅटॅक म्हणजेच हृदयविकाराचा झटका आला तर त्याच्यावर सीपीआर तंत्राने उपचार केला जात असतो. सीपीआर म्हणजे कार्डियो पल्मोनरी रिसस्किटेशन. या तंत्रामध्ये अचानक एखाद्याला हार्ट अॅटॅक आला तर दुसरी व्यक्ती त्याच्या हृदयावर योग्य पद्धतीने दाब देते व आपल्या तोंडातून त्याला श्वास देते. त्यामुळे रुग्णाची हृदयक्रिया पुन्हा सुरू होऊ शकते. अर्थात अशी पद्धत अंतराळात शक्य नाही. आतापर्यंत अंतराळात तशी समस्याही उद्भवलेली नाही. मात्र, भविष्यात तसे घडलेच तर काय करता येईल या दृष्टीने काम सुरू आहे. सोसायटी ऑफ एव्हिएशन अँड स्पेस मेडिसिनचे उपाध्यक्ष योफेन हिंकेलबेन आणि त्यांचे सहकारी स्टीफन केर्कहॉफ यांनी अंतराळातील सीपीआरबाबत नवे संशोधन केले आहे.
ड्रोन अंतराळात उपग्रह लाँच करू शकणार
अमेरिकेतील एईवम (Aevum) कंपनीने रॅवन एक्स (RAVN X) नावाने डिझाईन केलेले ड्रोन जगातील सर्वात मोठे ड्रोन आहेच पण ते छोटे उपग्रह अंतराळात स्थापन करण्यासाठी सुद्धा वापरता येणार आहे. जगातील बहुतेक देशांनी आपापले विविध कार्यासाठी बनविलेले उपग्रह अंतराळात स्थापित केले आहेत. उपग्रह अंतराळात स्थापन करणे ही एक जटील प्रक्रिया आहे. त्यासाठी अतिशय अचूक मोहीम आखावी लागते. एईवम (Aevum) कंपनीने छोटे उपग्रह लाँच करण्यासाठी स्वयंचलित हवाई प्रक्षेपण प्रणालीसाठी हे ड्रोन खास डिझाईन केले आहेत.
• सध्या रॉकेट लॅब, स्पेस एक्स, वर्जीन ऑर्बीट अश्या अनेक स्टार्टअप भविष्यात अंतराळात सहज, सुलभ आणि सोपे लाँचिंग तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी काम करत आहेत. एईवम (Aevum) ने बनविलेले ड्रोन 1.6 किमी लांबीच्या रनवेवर सहज लँड होऊ शकते. हे ड्रोन 80 फुट लांब, 18 फुट उंच आणि 60 फुट रुंद आहे. त्याच्या पंखांचा विस्तार 18 फुट आहे. ते ठेवण्यासाठी 8 हजार चौरस फुटाचा हँगर पुरतो. हे ड्रोन विमानासाठी वापरल्या जाणार्या जेट इंधनावर चालते. या ड्रोन वर कोणत्याही हवामानाचा परिणाम होत नाही त्यामुळे कोणत्याही हवामानात ते काम करू शकते.
• सध्या या ड्रोनचा 70 टक्के भाग पुन्हा उपयोगात आणता येतो. एईवम (Aevum) हे ड्रोन 100 टक्के रीयुजेबल बनविण्यासाठी सध्या काम करत आहे. वर्जीन कंपनीचे विमान सुद्धा जगातील मोठे विमान असून ते अंतराळात पेलोड लाँच करण्यासाठीच विकसित केले गेले आहे. पण या विमानाला पायलटची गरज आहे. एईवम (Aevum) च्या ड्रोन साठी पायलटची आवश्यकता नाही. ते 180 मिनिट प्रती लाँच वेगाने पेलोड फायर करू शकते.
• कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी जे स्कायलस यांनी दिलेल्या माहितीनुसार या ड्रोनचे पाहिले ग्राहक अमेरिकन हवाई दल असून पृथ्वीच्या कक्षेत छोटे उपग्रह समूह स्थापन करण्याची हवाई दलाची योजना आहे.
• भारताच्या जेहान दारुवाला याने बहरीन येथे पार पडलेल्या फॉर्मुला टू रेसमध्ये इतिहास रचला आहे. जेहान याने साखिर ग्रां. प्री या स्पर्धेत फार्मुला टू रेस जिंकली आहे. जेहान अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला आहे. 22 वर्षीय जेहानने फॉर्मूला टू विजेता मिक शूमाकर आणि डेनिअल टिकटुम यांच्याविरोधातील लढतीत विजय मिळवला.
• ग्रीडवर दूसर्या क्रमांकाने रेयो रेसिंगसाठी ड्राइव्हिंग करणार्या जेहान याने सुरुवात केली होती. तो आणि डेनियल टिकटुम सोबत होते. जेहानला अनेकदा टिकटुमने साइडला करण्याचा प्रयत्न केला. शूमाकर दोघांच्या लढाईचा फायदा घेत पुढे निघून गेला. जेहानच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्याने आपला स्पीड तात्काळ वाढवला. त्यानंतर जेहान याने दोघांनाही मागे टाकत स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. दुसर्या क्रमांकावर जपानी युकी सुनोडा राहिला. जेहान आणि युकी यांच्यामध्ये फक्त 3.5 सेकंदाचे अंतर होते. गतविजेता टिकटुम तिसर्या क्रमांकावर फेकला गेला. जेहान विजयानंतर म्हणाला की, भारतीयांना मला दाखवून द्यायचे होते की, युरोपीयन ड्राइव्हरसारखी आपल्याकडे संसाधने नसली तरी कठोर मेहनतीच्या बळावर आपण देखील जिंकू शकतो.
अमेरिकेची स्पेस फोर्स
अमेरिकेच्या स्पेस फोर्सला नवीन नाव मिळालं आहे. स्पेस फोर्सच्या अधिकार्यांना 'Guardians' म्हणजे रक्षणकर्ते असं म्हटलं जाणार आहे. यानंतर लोकांनी स्पेस फोर्सची तुलना सुप्रसिद्ध चित्रपट 'Guardians of the Galaxy' सोबत करणे सुरु केली आहे.
उपराष्ट्रपती माईक पेंस यांनी सांगितलं की, सैनिक, नाविक, एअरमेन, नौसैनिक आणि गार्डियन्स आपल्या देशाचे रक्षण करत राहतील. स्पेस फोर्स संघटन अंतराळामध्ये अमेरिका आणि सहयोही देशांच्या रक्षणासाठी ट्रेनिंग देते आणि अनेक अत्याधुनिक उपकरणांवर काम करते. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 2019 मध्ये याची स्थापना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर 10 महिन्यांनी हे तयार झाले आहे.
अंतराळवीर याचे सदस्य असतात का?
• 1947 नंतर तयार झालेली ही पहिली मिलिट्री ब्रँच आहे. स्पेस फोर्स एअर फोर्सचाही एक हिस्सा आहे. ट्रम्प यांचे लक्ष अंतराळात ताकद वाढवण्यासाठी आणि त्यावर प्रभूत्व मिळवण्यासाठी राहिले आहे. गेल्या काही दिवसात अंतराळात अमेरिकेला रशिया आणि चीनकडून आव्हान निर्माण झाले आहे. अंतराळवीर याचे सदस्य नसतात, तर जमिनीवरुनच नॅशनल सेक्युरिटीवर लक्ष ठेवले जाते.
ट्रम्प यांना का पडली आवश्यकता?
• 2007 मध्ये चीनने एक मिसाईल लॉन्च केले होते, ज्यात उंचीवरील एक निष्क्रिय सॅटेलाईट पाडण्यात आले होते. असंच काही रशियाने 2014 मध्ये केलं होतं. त्यानंतर अमेरिकेला भविष्यातील संभावना लक्षात येत स्पेस फोर्सची गरज समजली होती. आज सॅटेलाईटचे महत्व अत्यंत वाढले आहे. त्यामुळे युद्धादरम्यान या सॅटेलाईटचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा शत्रू पूर्ण यंत्रणा बंद पाडू शकतात.
• अमेरिकेकडे जगातील सर्वाधिक सॅटेलाईन असून ज्यांचा वापर हेरगिरी आणि गुप्त माहिती गोळा करण्यासाठी केला जातो. चीनकडे अंतराळात हल्ला करण्याची क्षमता आहे. भारतानेही मार्च 2019 मध्ये अँटी सॅटेलाई मिसाईलचे यशस्वी परिक्षण करुन जगाला आश्चर्यचकित केलं होतं.
सौरमालेबाहेरील रेडिओ सिग्नल प्रथमच टिपला
आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाला आपल्या सौर यंत्रणेबाहेरील रेडिओ सिग्नल टिपण्यात प्रथमच यश आले आहे. पृथ्वीपासून सुमारे 51 प्रकाशवर्षे दूर असलेल्या ग्रहाने हा रेडिओ सिग्नल उत्सर्जित केला आहे. नेदरलँडसमधील लो फ्रिक्वन्सी रे (लोफर) या दुर्बिणीने हा सिग्नल टिपला. ताऊ बूट्स या प्रणालीतून हा सिग्नल उत्सर्जित झाला होता.
• अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या संशोधकांच्या पथकाने इतर संभाव्य रेडिओ उत्सर्जनाचेही निरीक्षण केले. स्ट्रॉनॉमी ंड स्ट्रोफिजिक्स या नियतकालिकात याबाबतचे संशोधन प्रकाशित झाले आहे. संशोधकांनी सातत्याने केलेल्या निरीक्षणातून हा सिग्नल सौरमालेबाहेरील संबंधित ग्रहातून आल्याचे स्पष्ट झाले.
• या सिग्नलमुळे सौरमालेबाहेरील दूरवरच्या ग्रहाकडे पाहण्याची एक नवीन प्रकारची खिडकीच संशोधकांना मिळाली आहे. त्याचप्रमाणे, त्यामुळे परग्रहावरील जीवसृष्टीच्या शोधासाठीही नावीन्यपूर्ण पर्याय उपलब्ध झाल्याचा संशेधकांचा दावा आहे.
• संबंधित ग्रहाच्या चुंबकीय क्षेत्राच्या निरीक्षणातून ग्रहाची अंतर्गत रचना व वातावरण समजून घेण्यास मदत होईल, असाही संशोधकांचा विश्वास आहे. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र तिचे सौरवार्यांच्या धोक्यापासून रक्षण करते. त्यामुळे, पृथ्वी सजीव जीवसृष्टीस अनुकूल बनते. त्यामुळे, या नव्या ग्रहाच्या चुंबकीय क्षेत्राच्या अभ्यासातूनही त्यावरील जीवसृष्टीबद्दल समजू शकते. पृथ्वीसारख्या ग्रहाचे चुंबकीय क्षेत्रही अशा प्रकारे बाह्य धोक्यापासून त्या ग्रहाचे व वातावरणाचे रक्षण करू शकते.
गुरूच्या संशोधनाचा फायदा
• कॉर्नेल विद्यापीठातील संशोधकांनी दोन वर्षांपूर्वी गुरू ग्रहाच्या रेडिओ सिग्नलचे निरीक्षण केले होते. त्यांनी पृथ्वी किंवा आपल्या सौरमालेपासून दूर असलेल्या ग्रहांकडून उत्सर्जित हाणार्या संभाव्य रेडिओ सिग्नलसाठी त्यांनी हा अभ्यास केला. त्याचा फायदा त्यांना या नव्या ग्रहाचा रेडिओ सिग्नल टिपण्यात झाला.
• हा रेडिओ सिग्नल पृथ्वीपासून अतिशय दूर असलेल्या ताऊ बूट्स या प्रणालीतून उत्सर्जित झालेला आहे. या प्रणालीत तारे व ग्रहांचाही समावेश आहे.
• जेक डी. टर्नर, संशोधक, कॉर्नेल विद्यापीठ, अमेरिका
थेट चंद्रावर जाऊन होणार रिसर्च
चीनची नॅशनल स्पेस अँडमिनिस्ट्रेशन ही अवकाश संस्था चीनवर संशोधन तळ तयार करण्याचा विचार करीत आहे. त्यासाठीच चीनने चँग ई-5 हे अवकाश यान चंद्रावर पाठविले होते. हे यान चंद्रावरून सॅम्पल घेऊन परत आले आहे. भविष्यात चँग ई-8 या मिशनद्वारे चंद्रावर संशोधन केंद्र सुरू करण्याचा चीनचा विचार आहे. विशेष म्हणजे बेस बनविण्यासाठी 3 डी प्रिंटिंगचा वापर करण्याचीही योजना आहे.
• चीन सध्या एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आहे. त्याचे कारण आहे चंद्र. चीनने चंद्रावर यान पाठवून तेथील 4.4 टन खडकांचे तुकडे परत पृथ्वीवर आणण्याची कमाल केली आहे.
• चीनची नॅशनल स्पेस अँडमिनिस्ट्रेशन ही अवकाश संस्था चीनवर संशोधन तळ तयार करण्याचा विचार करीत आहे. त्यासाठीच चीनने चँग ई-5 हे अवकाश यान चंद्रावर पाठविले होते. हे यान चंद्रावरून सॅम्पल घेऊन परत आले आहे.
• भविष्यातील चँग ई-8 या मिशनद्वारे चंद्रावर संशोधन केंद्र सुरू करण्याचा विचार आहे. विशेष म्हणजे बेस बनविण्यासाठी 3 डी प्रिंटिंगचा वापर करण्याचीही योजना आहे. हे सारं येत्या दहा वर्षांत अस्तित्वात आणण्याचा विचार आहे. यासाठी चीन इतर देशांचीही मदत घेणार आहे, तसेच तिथे संशोधनासाठी अवकाशवीरही पाठविणार आहे; पण यासाठी दहा वर्षे तयारी करावी लागणार आहे.
• चंद्रावरून पृथ्वीवर सॅम्पल आणणारा चीन हा तिसरा देश; परंतु हे करताना चीनने आपली अवकाश संशोधन क्षमता सिद्ध केली आहे. आतापर्यंत चीनने तीन वेळा चंद्रावर स्वारी केली आहे आणि तिन्ही वेळा चीन यशस्वी ठरला आहे.
• आता येत्या काळात भारतही चंद्रावर स्वारी करणार आहे. त्याची तयारी केली जात आहे. भारताला यात किती यश येते ते पाहावे लागेल.
एलियन्स पृथ्वीवर आलेत काय?
• गेल्या काही दिवसांपासून एलियन्सबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. एलियन्स म्हणजेच परग्रहवासी पृथ्वीवर आले आहेत आणि ते अमेरिका व इस्रायलला माहीत आहेत, अशीही चर्चा झाली; पण प्रत्यक्ष त्याचा कुठलाही पुरावा अद्याप मिळालेला आहे. एका अवकाश संशोधकाने असाही दावा केला की, ट्रम्प यांना याबाबत सर्वकाही कल्पना आहे. त्यांना एलियन्सचीही माहिती आहे.
• या सार्या चर्चा होत असतानाच जगात वेगवेगळ्या ठिकाणी एक स्टीलचा स्तंभ अचानक रात्रीतून अभा राहिला असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याबद्दल अद्यापही कुतूहल कायम आहे. हे स्तंभ येतात कसे? ते लावते कोण? हे स्तंभ नाहीसे होतात कसे? हे प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि ते अद्यापही अनुत्तरित आहेत. त्यांचाही संबंध एलियन्सशी जोडला जात आहे.
• अमेरिकेला एलियन्ससंदर्भात माहिती मिळालेली असल्याचा आरोप यापूर्वीही अनेकदा झालेला आहे; पण अमेरिकेच्या कोणत्याही संस्थेने त्यावर खुलासा केलेला नाही. अमेरिकेत एरिया 51 म्हणून एक जागा आहे. तिथे अमेरिकेच्या सैन्यासंदर्भात संशोधन केले जाते, असे म्हणतात; पण या जागी एलियनसंदर्भात संशोधन होत असल्याचा संशय आतापर्यंत अनेकांनी व्यक्त केलेला आहे. सत्य काय, हे अद्यापही समोर आलेले नाही. अमेरिकेचे एलियन्सशी संबंध असल्याचा काही डेटा एडवर्ड स्नोडेन यांच्याही हाती लागला होता.
• अमेरिका आणि एलियन्स यांच्यासंबंधाविषयी संशय घेतले जाऊ शकतील असे वक्तव्य नासाच्याच काही संशोधकांनीही मे महिन्यात केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार अमेरिका येत्या दहा वर्षांत एलियन्सचा शोध लावेल, असे त्यांनी म्हटले होते. याचा अर्थ एलियन्सबद्दल अमेरिकेच्या हाती काहीतरी लागलेले आहे आणि जगापासून ते लपवीत आहेत.
मोबाईलपासून ते टिव्हीच्या सिग्नल्सचा दर्जा सुधारणारे सॅटेलाईट
आपल्या मोबाईल फोनपासून ते टीव्हीच्या सिग्नल्सपर्यंतच्या सर्व गोष्टींचा दर्जा सुधारणार्या कम्यूनिकेशन सॅटेलाईट सीएमएस-01 आज बुधवारी लाँच होणार आहे. याबाबतची माहिती इस्रोने दिली आहे. सॅटेलाईट पीएसएलव्ही-सी 50 रॉकेटमध्ये स्थापित केल्यानंतर 25 तासांचा मोठा काऊंटडाऊन सुरु करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी 3 वाजून 41 मिनिटांनी हे सॅटेलाईट चेन्नईपासून 120 किमी दूर श्रीहरीकोटामधील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसर्या लाँच पॅडवरुन पाठवले जाईल. मात्र, आजचे हे सॅटेलाईटचे लाँचिंग हवामानावर देखील अवलंबून आहे.
• इस्रोने म्हटलं की, पीएसएलव्ही-सीएमएस-01 मिशनचे काऊंटडाऊन बुधवारी दुपारी 2:41 वाजता सतीश धवन अंतराळ केंद्रामध्ये सुरु झाले. हे पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकलचे 52 वे मिशन आहे. सीएमएस-01 (आधीचे नाव जीसॅट-12 आर) इस्रोचे 42 वे कम्यूनिकेशन सॅटेलाईट आहे. हे सॅटेलाईट कम्यूनिकेशन सॅटेलाईट फ्रिक्वेंसी स्पेक्ट्रमचे एक्सटेंडेड सी बँडमध्ये सेवा उपलब्ध करुन देईल. या सॅटेलाईटच्या कार्यक्षेत्रात भारताची मुख्य भूमी, अंदमान निकोबार आणि लक्षदीप द्वीपसमूह असणार आहेत. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन केंद्रातून लाँच होणारे हे 77 वे लाँच व्हेईकल मिशन असेल.
• पीएसएलव्ही-सी 50 मिशनमुळे कम्यूनिकेशन सेवांमध्ये खासकरुन सुधारणा होणार आहे. या मदतीने टिव्ही चॅनेल्सच्या पिक्चरची गुणवत्ता सुधारण्यासोबतच सरकारला टेली-एज्यूकेशन, टेली-मेडीसीनला पुढे नेण्याबरोबरच आपत्ती नियोजनामध्येही मदत प्राप्त होईल. हे सॅटेलाईट 2011 मध्ये लाँच केल्या गेलेल्या जीसॅट-2 टेलीकम्यूनिकेशन सॅटेलाईटची जागा घेईल.
सीएमएस-01 पुढच्या सात वर्षांपर्यंत देईल सेवा -
• हे पीएसएलव्हीच्या एक्सएल कॉन्फीगरेशनमधले 22 वे उड्डान असेल. यावर्षी कोरोनाच्या संक्रमणामुळे मागच्या महिन्यात लाँच केल्या गेलेल्या इस्रोच्या पहिल्या मिशननंतर होणारे हे दुसरे अभियान आहे. सीएमएस-01 ला पृथ्वीच्या कक्षेत सर्वांत उंच ठिकाणी म्हणजेच 42,164 किमी वर स्थापित करण्यात येणार आहे. हे पृथ्वीच्या कक्षेत स्थापित झाल्यानंतर पृथ्वीच्या चारी बाजूला त्याच्या गतीने फिरेल.
इस्रोच्या सीएमएस-01 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
• पीएसएलव्ही-सी50 या प्रक्षेपकाने अवकाशात झेप घेतल्यानंतर वीस मिनिटांनी हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आला. आज दुपारी 3 वाजून 41 मिनिटांनी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.
• भारताने सीएमएस-01 दूरसंचार उपग्रहाचे आज ध्रुवीय प्रक्षेपकाच्या माध्यमातून येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण केले. कोरोनाकाळातील हे दुसरे प्रक्षेपण असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
• पीएसएलव्ही-सी50 या प्रक्षेपकाने अवकाशात झेप घेतल्यानंतर वीस मिनिटांनी हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आला. आज दुपारी 3 वाजून 41 मिनिटांनी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. सीएमएस-01 हा इस्रोचा 42 वा संवाद उपग्रह आहे. तो अंदमान- निकोबार आणि लक्षद्वीप या बेटांना देखील आपल्या कवेमध्ये घेईल. भविष्यात हा उपग्रह सी बँड स्पेक्ट्रमच्या माध्यमातून सेवा देऊ शकेल. या उपग्रहाचा जीवनकाळ हा सात वर्षांचा असेही इस्रोकडून सांगण्यात आले.
जीसॅट-12 जागा घेणार
• हा उपग्रह अंतराळातील जीसॅट-12 या उपग्रहाची जागा घेईल. पूर्वीच्या उपग्रहाचे वजन 1 हजार 410 एवढे वजन होते. या उपग्रहाला 11 जुलै 2011 रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. त्याचा जीवनकाळ हा आठ वर्षांचा होता. आजची मोहीम ही इस्रोची चालू वर्षातील शेवटची मोहीम होती.
• सध्या हा उपग्रह खूप चांगल्यारितीने काम करतो आहे. पुढील चार दिवसांमध्ये तो आपली निर्धारित जागा घेईल. कोरोनाच्या काळात देखील आमच्या टीमने सुरक्षेची काळजी घेऊन ही मोहीम फत्ते केली आहे.
मोहीम अवकाश कचर्याच्या स्वच्छतेची
एखाद्या उपग्रहाला किंवा अवकाशयानाचे मोठे नुकसान करण्यास हे तुकडे पुरेसे आहेत. अवकाश कचरा जसजसा वाढत जाईल, तस तसा उपग्रहांसाठी धोका वाढत जाईल.
• मानवाने अवकाशात उपग्रह सोडायला सुरुवात केल्यापासून आतापर्यंत अनेक प्रकारचा कचरा अवकाशात तयार झाला आहे. हा कचरा आता इतका वाढला आहे की येत्या काही वर्षांत त्याचा फटका उपग्रहांना बसू शकेल. त्यामुळे हा कचरा कमी करण्यासाठीही मोहीम हाती घेतली जाणार आहे.
• अवकाश कचर्याच्या स्वच्छतेसाठी पहिली मोहीम 2025 मध्ये आखण्यात येणार आहे. युरोपीय अवकाश संशोधन संस्थेने (इएसए) ही मोहीम आखली आहे. त्यासाठीच्या करारावर नुकत्याच स्वाक्षर्या करण्यात आल्या.
• पृथ्वीच्या कक्षेमध्ये मानवनिर्मित यानांचे, अवकाश स्थानकांचे हजारो तुकडे फिरत आहेत. त्यात लघुग्रहांपासून नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या कचर्याचीही भर पडत असते. सॉफ्टबॉलहून मोठ्या आकाराचे 20 हजारांहून अधिक अशा कचर्याचे तुकडे सध्या पृथ्वीभोवती फिरत असल्याचा अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ॠनासाॠचा अंदाज आहे. अवकाश संशोधनाचे क्षेत्र जसजसे विस्तारत जाईल, तसेच या क्षेत्रात खासगी कंपन्यांचा समावेश होत जाईल, तसतसा हा कचरा वाढत जाणार आहे. या कचर्यापैकी काही तुकडे सुमारे 17500 मैल प्रतितास (28,163 किलोमीटर प्रतितास) एवढ्या वेगाने फिरत आहेत. एखाद्या उपग्रहाला किंवा अवकाशयानाचे मोठे नुकसान करण्यास हे तुकडे पुरेसे आहेत. अवकाश कचरा जसजसा वाढत जाईल, तस तसा उपग्रहांसाठी धोका वाढत जाईल.
• हा कचरा काढण्यासाठीचे क्लिअरस्पेस-1 ही पहिलीच मोहीम असणार आहे. कचरा गोळा करण्यासाठी चार भुजा असलेले विशेष यान तयार करण्यात येत आहे. त्या भुजांच्या साह्याने कचरा धरला जाईल व पृथ्वीच्या वातावरणात आणला जाईल, तेथे तो कचरा जळून जाईल, अशी माहिती युरोपीय अवकाश संशोधन संस्थेने दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये उपग्रह सोडण्यासाठी वापरण्यात येणार्या अग्निबाणांचे तुकडे गोळा करण्यात येणार आहेत. अवकाशातील कचर्याचा उपग्रहांना आणि आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला धोका पोहोचू नये, यासाठी संशोधकांचे अनेक संघ त्यावर काम करत आहेत. अवकाश कचर्यामध्ये सॉफ्टबॉलच्या आकारापासून अगदी रेफ्रिजरेटच्या आकाराच्या तुकड्यांचाही समावेश आहे. ॠक्लिअरवनॠ मोहिमेत पहिल्यांदा ॠव्हेगा सेकंडरी पेलोड अॅडॉप्टरचा (व्हेस्पा) कचरा गोळा केला जाणार आहे. उपग्रह सोडण्यासाठी 2013मध्ये याचा वापर केला होता. त्याचे वजन 112 किलो आहे. एखाद्या छोट्या उपग्रहाएवढे त्याचे वजन आहे. 801 किमी ु 664 किमी या कक्षेत सध्या ॠव्हेस्पाॠ फिरत आहे. इतर कचरा नंतरच्या टप्प्यात गोळा केला जाणार आहे.
• गेल्या साठ वर्षांमध्ये साडेपाच हजारांहून अधिक उपग्रह आणि अग्निबाणांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर कचरा तयार झाला आहे. यानांचे अब्जावधी असे तुकडे आहेत की ज्यांची मोजणी आणि स्थान निश्रि्चतीही करणे शक्य नाही, असे नासाचे म्हणणे आहे.
चेंगई-5चे लँडिंग यशस्वी
चंद्रावरील मातीचे नमुने घेऊन चीनचे चेंगई-5 हे अवकाशयान आज यशस्वीरीत्या पृथ्वीवर परतले. चीनचे यान चीनमधील इनर मंगोलिया प्रदेशातील सिझिवँग जिल्ह्यात स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री 1 वाजून 59 मिनिटांनी उतरले.
• बीजिंग - चंद्रावरील मातीचे नमुने घेऊन चीनचे चेंगई-5 हे अवकाशयान आज यशस्वीरीत्या पृथ्वीवर परतले. चीनचे यान चीनमधील इनर मंगोलिया प्रदेशातील सिझिवँग जिल्ह्यात स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री 1 वाजून 59 मिनिटांनी उतरले.
• चीनच्या आठ टन वजनाच्या चेंगई-5 यानाचे चार स्वतंत्र, पण एकमेकांशी समन्वय राखून काम करणार्या घटकांचा समावेश होता. ऑर्बिटर, असेंडर ,लँडर, रिटर्नर असे ते भाग होते. काल मध्यरात्री यान पृथ्वीपासून 5 हजार किलोमीटरवर असताना चेंगई-5मधील ऑर्बिटरपासून नमुने असलेली कुपी वेगळी झाली आणि जमिनीपासून 120 किलोमीटर उंचीवर असताना ती पृथ्वीच्या वातावरणात शिरली. पृष्ठभागापासून दहा किलोमीटर अंतरावर असताना कुपीतील पॅराशूट उघडले गेले आणि कुपी अलगद जमिनीवर नियोजित ठिकाणी पडली. शोध पथकाने ही कुपी ताब्यात घेतली.
चंद्रावरील विशिष्ट जागा -
• चीनचे यान चंद्राच्या उत्तर ध्रुवावरील ओशनस प्रोसेलॅरम या भागात उतरले होते. अमेरिका आणि रशियाचे यान चाळीस वर्षांपूर्वी जिथे उतरले होते, त्या भागाच्या तुलनेत भौगोलिकदृष्ट्या हा भाग नवीन असल्याने याच भागाची चीनने निवड केली होती.
जपानी संशोधकांच्या हाती रयुगू लघुग्रहाची माती
जपानी संशोधकांच्या हाती आता 30 कोटी किलोमीटरवरून आलेली अनमोल भेट आली आहे. रयुगू नावाच्या एका लघुग्रहावरील दगड व मातीचे नमुने गोळा करून जपानचे हायाबुसा-2 हे यान परतले आहे. त्यामधील हे नमुने आता संशोधकांना मिळाले असून या क्षणाची त्यांनी गेल्या सहा वर्षांपासून वाट पाहिली होती!
• ब-ह्मांडाच्या निर्मितीबाबतची अनेक रहस्ये या नमुन्यांच्या अभ्यासाने उलगडू शकतील असे संशोधकांना वाटते. सहा वर्षांपूर्वी म्हणजेच डिसेंबर 2014 मध्ये जपानने रयुगू लघुग्रहावरून नमुने आणण्यासाठी हायाबुसा-2 यान पाठवले होते.
• लाँचच्या तीन वर्षांनी तीस कोटी किलोमीटरचा प्रवास करून हे यान सप्टेंबर 2018 मध्ये या लघुग्रहावर उतरले. या लघुग्रहाला 162173 जेयू 3 या नावानेही ओळखले जाते.
• जपानने या मोहिमेचे नाव फाल्कन पक्ष्यावरून ठेवले होते. त्याला जपानी भाषेत हायाबुसा असे म्हटले जाते. हे यान ज्या लघुग्रहावर उतरले त्याची माहिती सुरुवातीला मे 1999 मध्ये संशोधकांना मिळाली होती. हा लघुग्रह सुमारे एक किलोमीटर रुंदीचा आहे. सप्टेंबर 2015 मध्ये मायनर प्लॅनेट सेंटरने त्याचे नामकरण केले व त्याला रयुगू असे नाव दिले. त्याचा अर्थ ड्रॅगन पॅलेस!
• हा लघुग्रह 16 महिन्यांमध्ये सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. या लघुग्रहावर उतरून हायाबुसा-2ने तेथील खडक व मातीचे नमुने गोळा केले. पृथ्वीवर परतल्यावर त्याचे कॅप्सूल ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटात पडले. तिथे आधीच संशोधकांचे एक पथक उपस्थित होते. या कॅप्सूलमध्ये एक कंटेनर होते. या कंटेनरमध्येच रयुगूवरील खडक व मातीचे नमुने होते.
चीनचं चँग-5 यान पृथ्वीवर उतरलं
चीनचं चँग-5 यान चंद्रावरचे दगड आणि मातीचे नमुने घेऊन पृथ्वीवर परतले. चंद्राच्या अप्रकाशित अशा भागात कार्यरत चँग-5 यान दगड आणि मातीच्या नमुन्यांचा समावेश असणारी कॅप्सूल घेऊन मंगोलियात स्थानिक वेळेनुसार दीड वाजता उतरले.
• अमेरिकेचं अपोलो आणि रशियाच्या लुना या चांद्रमोहिमा यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर 40 वर्षांनी चीनचं यान मातीच्या नमुन्यांसह परतलं आहे. यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाबद्दल, तिथल्या भौगोलिक स्थितीबद्दल, भूगर्भाबद्दल, इतिहासाबद्दल नव्याने काही कळू शकतं.
• चँग-5 यशस्वी परतणं हे चीनच्या अंतराळविश्वातल्या दमदार मुशाफिरीचं द्योतक आहे.
• चंद्रावरून परतलेली हे यान इन्फ्रारेड कॅमेरे वापरणार्या हेलिकॉप्टरांना दिसलं. यानाची ओळख पटल्यानंतर चीनने त्या बर्फाच्छादित भागात आपला ध्वज फडकावला.
• नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस चँग-5 चंद्राच्या दिशेने झेपावलं होतं. विविध गोष्टींचं परीक्षण करण्यासाठी चीनचं यान अंतराळात झेपावलं होतं. यानाचा एक भाग चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी तिथे उतरला.
• यानाने चंद्रावर दोन दिवस व्यतीत करून नमुने गोळा केले.
• नमुने घेण्यासाठी यानाने स्कूप अँड ड्रिल पद्धती वापरली. किती व्याप्तीचं परीक्षण करण्यात आलं हे समजू शकलेलं नाही मात्र दोन ते चार किलो आकाराचे हे नमुने असू शकतात.
• चंद्रावरून परतणारं चँग-5 आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रातून परतणार्या कॅप्सूलपेक्षा वेगाने परतलं आहे.
• चंद्राच्या पृष्ठभागाच्या नमुन्यांची काटेकोर तपासणी करण्यात येईल.
• परतण्याआधी पृथ्वीच्या बाह्य आवरणात असलेल्या वायूपटलामध्ये हे यान होतं. तिथून पृथ्वीवर उतरण्याचे त्याचे प्रयत्न सुरू झाले.
• चीनमधल्या इनर मंगोलिया प्रदेशातल्या सिझिवांग भागात पॅराशूटच्या माध्यमातून ही कॅप्सूल पृथ्वीवर परतली. चीनचे अंतराळवीरही मोहीम फत्ते करून याच भागात उतरले होते.
• इन्फ्रारेड कॅमेर्यांनी कॅप्सूलच्या आगमनाने निर्माण झालेली उष्णता टिपत अचूक स्थान ओळखलं.
• अमेरिकेच्या अपोलो आणि तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या लुना या मोहिमांमध्ये चंद्रावरच्या पृष्ठभागावरचे 400 किलो नमुने जमा करण्यात आले होते.
• पण हे नमुने खूप जुने होते. काही दशलक्ष वर्ष जुने. चँग-5 ने आणलेले एकदमच वेगळे असतील.
• चंद्राच्या उत्तर पश्रि्चमेकडचा मॉन्स रुमकर या ज्वालामुखीमय भागाकडे चीनने लक्ष केंद्रित केलं होतं.
• या भागातल्या दगडांचे, मातीचे नमुने 1.2, 1.3 दशलक्ष वर्षांपेक्षा जुने असणार नाहीत. चंद्राची अंतर्गत रचना नेमकी कशी झाली याचा उलगडा या नमुन्यांद्वारे होऊ शकतो.
• सौर मंडळातल्या ग्रहांचे पृष्ठभाग किती वर्षांचे आहेत हे अधिक अचूकपणे कळू शकेल. क्रेटरची संख्या जास्त तेवढा तो पृष्ठभाग जुना. क्रेटरच्या मोजणीद्वारे हे समजू शकतं. कॅप्सूलने किती ठिकाणचे नमुने गोळा केले आहेत यावर ते अवलंबून आहे.
• अपोलो आणि सोव्हिएत लुनासंदर्भात हा संदर्भ महत्त्वाचा होता. चँग-5 येत्या काळातल्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण तपशील देऊ शकतं.
चँग-5 चा प्रवास -
• चंद्र हा अनेक देशांना खुणावतो आहे. या दशकाच्या मध्यापर्यंत अमेरिकेचे अंतराळवीर चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. रोबोटिक यान माणसांना घेऊन येणार्या यानाआधी पाहणी करेल.
• यापैकी काही मोहिमा राष्ट्रीय अवकाश संस्थांतर्फे हाती घेतल्या जातील तर काही खाजगी स्वरुपाच्या असतील.
• युकेतल्या अक्सेस स्पेस अलायन्स या कंपनीचे संचालक टोनी अझारली म्हणाले, येणारा काळ खूपच उत्साहवर्धक असेल. स्पेसबिट या कंपनीने चंद्रावर यान पाठवण्याची तयारी केली आहे.
• पहिल्यांदाच माणसासारखा दिसणारा, काम करणारा रोबो चंद्रावर जाण्याची ही पहिलीच वेळ असेल. चंद्रावरून माणसं यशस्वीपणे परतल्यानंतरच या मोहिमांना चालना मिळू शकते असं त्यांनी सांगितलं.
स्टारशिपचे नवे प्रोटोटाईप
अमेरिकन उद्योजक व स्पेस एक्सचे सीईओ एलन मस्क यांनी त्यांच्या स्टारशिप या अंतराळयानाचे नवे प्रोटोटाईप टेक्सासमध्ये सादर केले. त्याला एसएन8 असे कोड नाव देण्यात आले आहे. 50 मीटर उंचीचे हे यान चाचणीवेळी जमिनीवर परत येत असताना कोसळले. मात्र, या चाचणीतून जी माहिती मिळाली त्याबाबतही मस्क खूश आहेत. या यानाने आकाशात 12.5 किलोमीटर उंचीचा प्रवास केला.
• स्टारशिप पूर्णपणे विकसित झाल्यानंतर त्याच्याकडून आपल्याला मोठ्या अपेक्षा आहेत, असे मस्क यांनी म्हटले आहे. स्पेस एक्स कंपनीसाठी ते उज्ज्वल भविष्य असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. स्टारशिपमधून अंतराळवीरांना तसेच साहित्यसामग्रीलाही अंतराळात पाठवले जाईल. चंद्र आणि मंगळ मोहिमांसाठी अशा अद्ययावत यानाचा वापर केला जाऊ शकतो. स्टारशिपच्या विकासासाठी आपल्या टीमने केलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले आहे. नव्या अंतराळयानाच्या लाँचिंग आणि लँडिंगच्या तंत्रात काही सुधारणा असतील. सध्याच्या प्रचलित यानांपेक्षा यामध्ये अनेक गोष्टी सुधारित व नव्या असतील.
भारताची अवकाशझेप
स्वातंत्र्यानंतर भारताने घेतलेली अवकाशझेप थक्क करून टाकणारी आहे. अवकाशविज्ञान हे एकाचवेळी संरक्षण आणि विकास या दोन्ही आघाड्यांवर देशाला बलवान बनवत असते. भारत हा असा बलवान देश बनला आहे...
• स्वातंत्र्यानंतर भारताने घेतलेली अवकाशझेप थक्क करून टाकणारी आहे. अवकाशविज्ञान हे एकाचवेळी संरक्षण आणि विकास या दोन्ही आघाड्यांवर देशाला बलवान बनवत असते. भारत हा असा बलवान देश बनला आहे...
• सध्याचं युग विशेषकरून अवकाश संशोधनं, विज्ञानाचं, युग! द्रुतगती विकासाला, अवकाशाएवढा वाव असल्याने, जगातील विज्ञानप्रगत देश या क्षेत्रातील अभिनव प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी पुढे येत आहेत. रशिया, अमेरिका तर यात कमालीचे अग्रेसर आहेत. आपला प्रतिभावंत, सामर्थ्यशाली देश अवकाश संशोधनात चौफेर प्रगत करत जगात चौथ्या स्थानावर आला आहे.
• सध्या कुणी कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठवत आहेत, तर कुणी नवनवीन तंत्राचे अग्निबाण प्रक्षेपित करत आहेत. देशाचे लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी कुणी संहारक क्षेपणास्त्र निर्मिती करत आहेत. तर कुणी, अवकाश यानांच्या माध्यमातून अंतरिक्षातील गृहगोलांना, गवसणी घालत असतात.
• कृत्रिम उपग्रह (सॅटेलाइटस्), अग्निबाण (रॉकेटस्), क्षेपणास्त्रे (मिसाइल्स), अवकाश याने (स्पेस क्राफ्टस्), स्पेस शटल याने (परत परत वापरता येणारी रॉकेटस्), अवकाश स्थानके (स्पेस स्टेशन्स) आणि अंतराळ संचार (स्पेस ट्रव्हल) हे अवकाश संशोधन क्षेत्रातील महत्त्वाचे घटक.
• आर्यभट्ट, भास्कर, इनसॅट ही भारताच्या तर स्फुटनिक, एक्प्लोअरर ही काही अन्य देशांनी विकसित केलेल्या कृत्रिम उपग्रहांची उदाहरणे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा शोध, हवामानविषयक माहिती संकलन, दळणवळणात आमूलाग्र सुधारणा घडवून आणणे ही कृत्रिम उपग्रहांची महत्त्वाची कामे. कृत्रिम उपग्रह, म्हणजे कॅमेरे आणि नियोजित कार्यासाठी आवश्यक अशा यंत्रोपकरणांनी सज्ज पृथ्वीभोवती भ्रमण करीत राहणारे धातूगोल. कृत्रिम उपग्रहांना विशिष्ट उंचीवरील कक्षेत दाखल करण्यासाठी अग्निबाणाच्या उर्जेची गरज लागते. मात्र, त्यांना पृथ्वीच्या कक्षेत फिरण्यासाठी ऊर्जा लागत नाही, हे विशेष! न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमानुसार विनाऊर्जा त्यांचे भ्रमण चालते. उपग्रहावरील उपकरणांना, सौरविजेर्यातून ऊर्जा मिळते.
• पीएसएलव्ही, जीएसएलव्ही ही काही भारताच्या तर अॅटलास, सॅटर्न ही अमेरिकेच्या अग्निबाणांची उदाहरणे. अग्निबाण हे कृत्रिम उपग्रह, अवकाशयाने, अवकाशस्थानके इत्यादी घटकांना विशिष्ट उंचीवरील कक्षेपर्यंत किंवा अपेक्षित अन्य ग्रहगोलापर्यंत पोहचवण्यासाठी उपयोगी पडणारे वाहन होय. अग्निबाणांना कार्यरत करण्यासाठी पुरेसे इंधन भरून त्या इंधनाचे इंजिनांच्या मदतीने ज्वलन घडवावे लागते. प्रत्येक क्रियेला तितक्याच परिमाणाची परंतु उलट प्रतिक्रिया घडत असते, या न्यूटनच्या गतिविषयक तिसर्या नियमानुसार अग्निबाण अंतराळात भरारी घेतात. जीएसएलव्ही हा शक्तिशाली अग्निबाण. या अग्निबाणातून भारताला संदेश दळणवळणासाठी उपयुक्त ठरणारे, 36 हजार किलोमीटर उंचीवरील कक्षेतून फिरणारे भूस्थिर उपग्रह अवकाशात पाठवता येतात किंवा शत्रुराष्ट्रावर आंतरखंडीय क्षेपणास्त्रे डागता येऊ शकतील. थोडक्यात, अग्निबाण हे झोतबलावर गती घेणारे वाहन होय.
• अग्नी, ब्राह्मोस, इंटरसेप्टर ही आपल्या तर पेट्रिएट, एम्. एक्स ही काही परदेशी क्षेपणास्त्रांची उदाहरणे. युद्धात रासायनिक, जैवरासायनिक किंवा अणुबॉम्ब, हैड्रोजन बॉम्ब अशी अण्वस्त्रे पोटात घेऊन शत्रुराष्ट्रातील लक्ष्यावर मारा करण्यासाठीही अग्निबाणाचा वापर होतो. ज्या अग्निबाणांचा लष्करी वापर होतो त्यांना क्षेपणास्त्र किंवा प्रक्षेपणास्त्र म्हणतात.
• ज्या यानातून कल्पना चावलाने अंतराळ प्रवास केला ते कोलंबिया यान किंवा ज्या यानातून सुनीता पंड्याने अवकाशात झेप घेतली ते डिस्कव्हरी यान ही अमेरिकेने बांधलेल्या स्पेसशटल यानांची उदाहरणे. उपग्रह किंवा अवकाशयान पाठविण्याच्या प्रत्येक मोहिमेत एक अग्निबाण खर्ची पडतो, जळून जातो. देशाचे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान कमी व्हावे या हेतूने परत परत वापरता येणारा अग्निबाण असावा, या कल्पनेतून स्पेस शटल यानांची निर्मिती झाली.
• चांद्रयान, मंगळयान ही भारताची तर पायोनिअर, व्हायोजर, व्होस्टोक ही रशिया, अमेरिकेची अवकाशयाने. सूर्यमालिकेतील किंवा त्याबाहेरील ग्रहगोलांचा व खगोलज्योतींच्या अभ्यासासाठी अवकाशयान लागतेच. बराच काळ निरीक्षणासाठी किंवा अंतराळवीरांच्या दीर्घकालीन वास्तव्यासाठी अवकाशस्थानक या घटकाची निर्मिती अनिवार्य ठरते. आनंद म्हणजे, या सार्यांमध्येच भारत फार झपाट्याने प्रगती करीत आहे.
चंद्र पुन्हा खुणावतोय...
नासा या अमेरिकेच्या अंतरिक्ष संशोधन संस्थेने आखलेली अपोलो मोहीम संपल्यानंतर माणूस पुन्हा एकदा चंद्रावर जाण्याचा प्रयत्न सुरू करेल, असे त्यावेळी कुणाला वाटले नव्हते. परंतु, चंद्रावर माणसाचे पाऊल पहिल्यांदा उमटल्याच्या घटनेला पन्नास वर्षे लोटल्यानंतर आता याबाबतीत जगभरात हालचाली पुन्हा एकदा गतिमान झाल्या आहेत. सर्वांत ताजा प्रयत्न चीनकडून करण्यात आला आहे. चांग ई-5 ही चीनची चांद्रमोहीम 24 नोव्हेंबर 2020 रोजी सुरू झाली. त्या दिवशी प्रक्षेपित केलेले हे यान डिसेंबरमध्ये चंद्रावर पोहोचले आहे. दोन दिवसांतच त्या यानाने चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे पाठविण्यास सुरुवात केली. चंद्रावरील माती आणि दगडांचे नमुने जमा करून पृथ्वीवर आणण्यासाठी चीनकडून हे यान पाठविण्यात आले आहे. त्यामुळेच या मोहिमेद्वारे चंद्राबाबतची आणखी काही रहस्ये उकलण्याची चिन्हे आहेत.
• परंतु, असा प्रयत्न करणार्यांमध्ये चीन एकमेव देश नाही. भारत आणि चीनव्यतिरिक्त खुद्द नासानेही चंद्रावर यान पाठविण्याच्या आपल्या योजनेचा खुलासा नुकताच केला आहे. 2024 मध्ये नासा चंद्रावर पहिल्या महिलेला पाठविणार असून, एका पुरुष अंतराळवीरालाही चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मानवाला पुन्हा पाठविणे हे आजही मोठे आव्हान आहे हे खरेच आहे. सरकारी आणि खासगी संस्थांच्या प्रयत्नांमधून अंतरिक्षात यान घेऊन जाणे आणि ते सुरक्षित परत आणणे हे काम करणारी रॉकेट आज विकसित झाली आहेत. परंतु, तरीही पृथ्वीवरून एकदा उड्डाण करून अंतरिक्षात पोहोचलेले यान एखाद्या ग्रहावर, उपग्रहावर चपखलपणे उतरविणे आणि पुन्हा त्याच कौशल्याचे दर्शन घडवून यान परत पृथ्वीवर आणणे ही प्रक्रिया आजही प्रचंड जटिल आणि जोखमीची आहे. परंतु, याबाबतीत भारत आणि चीनने आयोजित केलेल्या अनेक मोहिमांनी शास्त्रज्ञांमध्ये नवा उत्साह भरला आहे. त्यामुळेच शास्त्रज्ञ आपल्या सर्वांत जवळच्या शेजार्याकडे म्हणजेच पृथ्वीपासून अवघ्या तीन लाख चौर्याहत्तर हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्राकडे पुन्हा एकदा नव्या नजरेने पाहू लागले आहेत.
• दुसर्या महायुद्धानंतर स्वतःला महाशक्ती म्हणून प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात अमेरिका आणि रशिया (तत्कालीन सोव्हिएत संघ) यांच्यादरम्यान शीतयुद्ध सुरू झाले आणि त्या काळात अंतरिक्षातील संशोधनाची जी स्पर्धा सुरू झाली, ती 1969 ते 1972 दरम्यानच्या काळात अमेरिकेने अपोलो मोहीम यशस्वी केल्यानंतर बर्याच प्रमाणात कमी झाली होती. या अवधीत नासाने सहा वेळा मानवाला चंद्रावर उतरविले होते. त्यानंतर असे मानले गेले होते की, चंद्राबाबत बरेचसे संशोधन आता पूर्ण झाले आहे आणि त्यामुळे पुन्हा चंद्रावर मानवाला पाठविण्याची वेळ जगावर येणार नाही. चंद्राकडून जगाचे लक्ष ढळण्याची काही अन्य कारणेही आहेत. या मोहिमांमुळे अमेरिकेने जगातील एकमेव सुपरपॉवर असल्याचा मान पटकावला होता. त्यामुळे स्वतःला अधिक ताकदवान असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुन्हा अंतरिक्ष मोहिमा चालविण्याची गरज अमेरिकेला नव्हती. त्याचप्रमाणे एवढा अवाढव्य खर्च करून अंतरिक्ष मोहिमा नेमक्या कोणत्या संशोधनासाठी आखायच्या, हेही समजेनासे झाले होते.
• चंद्रावर जाण्यासाठी सध्या सुरू असलेल्या दुसर्या शर्यतीचे बरेचसे श्रेय भारताला दिले जाऊ शकते. इस्रो या भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेने 22 ऑक्टोबर 2008 रोजी जेव्हा आपले चांद्रयान-1 रवाना केले, तेव्हा भारताने अंतरिक्ष संशोधनात आणखी एक दमदार पाऊल उचलले आहे, हे दाखवून देण्यापलीकडे या मोहिमेकडून फारशी आशा कुणाला नव्हती. परंतु, सातत्यपूर्ण संशोधन केल्यानंतर जेव्हा चांद्रयान-1ने चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे दिले, तेव्हा जग थक्क झाले. चांद्रयान-1च्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचविण्यात आलेल्या मून इम्पॅक्ट प्रोब या उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागावर डोंगर आणि धूलिकणांमध्ये वाफेच्या स्वरूपात पाणी पाहिले होते. चंद्रावरील हे डोंगर दहा लाख वर्षांपेक्षाही अधिक जुने मानले जातात. याच प्रकारचे अन्य एक उपकरण गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये चांद्रयान-2 यानातून पाठविण्यात आले. प्रज्ञान नावाचे हे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाकडे पाठविण्यात आले होते. या रोव्हरचा उद्देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरल्यानंतर तेथील पृष्ठभागावर पाणी आणि खनिजांचा शोध घेणे हा होता. अर्थात, चांद्रयान-2 मोहीम अपयशी ठरली. या अपयशामुळे भारताचे इरादे मात्र कमकुवत झाले नाहीत. 2022 मध्ये गगनयान या मोहिमेच्या माध्यमातून नासाप्रमाणेच अंतराळवीरांना अंतरिक्षात पाठविणार असल्याची घोषणा इस्रोने केली आहे. अन्य अनेक देशही चंद्रावर पोहोचण्याच्या शर्यतीत सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षी इस्रायलनेही आपले एक छोटेसे रोबोटिक लँडर चंद्रावर उतरण्यासाठी पाठविले होते. परंतु, ते सुरक्षितपणे चंद्रावर उतरू शकले नव्हते. सध्या या बाबतीत यश केवळ चीनला मिळाले आहे. चीनच्या ई-4 या यानाने गेल्या वर्षी जानेवारीत एक रोबोटिक रोव्हर चंद्रावर यशस्वीपणे उतरवून इतिहास रचला आहे.
• सर्वांत महत्त्वाची बाब अशी की, चीनचे हे यान चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणार्या बाजूला म्हणजेच पलीकडील बाजूला उतरविण्यात आले होते. या भागात कोणत्याही अन्य देशाचे यान तोपर्यंत उतरू शकले नव्हते. भारत, चीन, इस्रायल आणि जपान या देशांच्या चंद्रावर जाण्याच्या तयारीमुळे प्रेरित होऊन नासाने आर्टेमिस मून नावाची मोहीम आखून चंद्रावर मानवाला पाठविण्याची व्यापक योजना जाहीर केली आहे. या मोहिमेसाठी नासाने आठ देशांबरोबर महत्त्वाचा करारसुद्धा केला आहे. या करारांतर्गत सर्व आठ देश शांततापूर्ण मार्गाने आणि जबाबदारीने चंद्राच्या संशोधनात एकमेकांना सहकार्य करणार आहेत. योजनेनुसार, आर्टेमिस मिशनसुद्धा अपोलो-11 प्रमाणेच एक आठवडा अवधीचे असेल. परंतु, शास्त्रीय उपक्रमांच्या दृष्टीने विचार केल्यास ही मोहीम अपोलो-11पेक्षा कितीतरी मोठी असणार आहे.
प्रॉक्सिमा बी ग्रहावरही जीवनाची शक्यता कमी
पृथ्वी वगळता अन्य ग्रहांवर जीवनाचा शोध घेत असलेल्या शास्त्रज्ञांच्या अपेक्षांना नुकताच मोठा धक्का बसला आहे. कारण आतापर्यंत असे मानण्यात येत होते की, पृथ्वीपासून जवळ असलेल्या प्रॉक्सिमा बी नामक ग्रहावर जीवनाची शक्यता आहे. मात्र, यासंदर्भात एका नव्या संशोधनातील माहितीनुसार ही शक्यता धुसर बनू पाहत आहे.
• प्रॉक्सिमा बी हा ग्रह आपल्या पृथ्वीपासून अवघ्या 4.2 प्रकाशवर्षे दूर आहे. तो प्रॉक्सिमॉ सेंटॉरी नामक आपल्या तार्याभोवती फिरत असतो. या ग्रहासंदर्भात आतापर्यंत करण्यात आलेल्या संशोधनातून प्रॉक्सिमा बीवर तरल रूपात पाणी असू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. यामुळेच तेथे जीवनाची शक्यताही व्यक्त करण्यात येत होती. मात्र, नव्या संशोधनातून ही शक्यता आता धुसर बनू पाहत आहे.
• खरेतर प्रॉक्सिमा बी हा ग्रह आपल्या प्रॉक्सिमॉ सेंटॉरी या तार्यापासून योग्य अंतरावर आहे. मात्र, प्रॉक्सिमा बीवर सातत्याने घातक रेडिएशन पोहोचत आहे. यामुळे या ग्रहावर जीवनाची शक्यता अत्यंत कमी आहे, असे संशोधकांचे मत आहे.
• युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या खगोलशास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात असे आढळून आले की, प्रॉक्सिमा सेंटॉरी या तार्यावरून सातत्याने घातक रेडिएशन बाहेर पडते आणि ते प्रॉक्सिमॉ बीवर पोहोचते. अशा स्थितीत या ग्रहावर जीवनाची शक्यता फारच कमी आहे.
इतरत्र जीवसृष्टी कुठे असेल ?
पृथ्वीबाहेर इतरत्र जीवसृष्टी कुठे असू शकेल, हा प्रश्नही शास्त्रज्ञ बरीच वर्षे सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे उत्तर शोधायला काही मर्यादा आहेत. दुसरीकडची जीवसृष्टी कशी असेल याविषयी काहीच अंदाज बांधता येणे अवघड आहे. त्यामुळे ती पृथ्वीवरच्या जीवसृष्टीच्या जवळपास सारखी असावी असे गृहीत धरूनच हा अभ्यास केला जातो. या संदर्भात हेबिटेबल झोन” किंवा रहाण्यायोग्य भाग ही कल्पना महत्त्वाची आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, आज आपल्याला जीवसृष्टीविषयी जी माहिती आहे ती विचारात घेऊन, बाहेरच्या कुठल्या ग्रहांवर सजीवसृष्टी असू शकेल हा विचार करताना ज्या ग्रहांवर योग्य परिस्थिती असेल त्यांना रहाण्यायोग्य मानले जाते. कारण तिथे पाणी द्रवरूपात असू शकते. त्याशिवाय ग्रहाचा आकार, गुरुत्वाकर्षण असे इतरही काही गुणधर्म जीवनासाठी आवश्यक आहेत. सूर्यमालेतल्या ग्रहात जे ग्रह सूर्याच्या जवळ असतील तिथे तापमान खूप जास्त असते आणि ते वायुरुपात असतात त्यामुळे तिथे जीवसृष्टी असण्याची शक्यता कमी. तसेच फार दूर असलेल्या ग्रहांवर तापमान खूप कमी त्यामुळे तिथेही जीवसृष्टी असू शकणार नाही. याच्यामध्ये, म्हणजे सूर्यापासून योग्य अंतरावर असलेल्या ग्रहांवरच जीवसृष्टी असू शकते. आपल्या ग्रहमालेचा विचार करता अशी योग्य परिस्थिती आज फक्त पृथ्वीवर आहे. मंगळ ह्या रहाण्यायोग्य भागाच्या अगदी कडेवर आहे. म्हणूनच तिथे पूर्वी सूर्याचे तापमान जास्त असताना जीवसृष्टी असावी असा अंदाज केला जातो. संपूर्ण विश्वात किती ग्रहांवर जीवसृष्टी असू शकेल याविषयी आपल्याला आत थोडाफार अंदाज करता येऊ शकतो. नासाने नुकताच केप्लर दुर्बिणीतून केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष प्रसिद्ध केले.
• त्यानुसार आपल्या आकाशगंगेत असलेल्या 1 ते 4 खर्व तार्यांचा आणि त्यांच्या ग्रहमालांचा विचार केला. तर वर सांगितलेल्या निकषांनुसार सुमारे 30 कोटी ग्रहांवर जीवसृष्टी योग्य परिस्थिती आहे. हा अंदाज जरी दिलासादायक वाटला तरी यापैकी पृथ्वीला सगळ्यात जवळचा असलेला ग्रहदेखील निदान 20 प्रकाशवर्षे दूर आहे. एक प्रकाश वर्ष म्हणजे 9 हजार 500 अब्ज किमी हे लक्षात घेतले तर हे अंतर 19 हजार अब्ज किमी इतके होते. आपण सगळ्यात वेगवान अवकाश यानाचा विचार केला तरी त्याला एक प्रकाशवर्षे अंतर प्रवास करायला 37 हजार 200 वर्षे लागतील म्हणजे आपल्या आकाशगंगेतल्या सगळ्यात जवळच्या ग्रहावर जीवसृष्टी असली तरी तिथे फक्त पोचायला 7 लाख 44 हजार वर्षे लागतील. त्यापेक्षा जवळ असलेल्या प्रोक्सिमा सेंटोरी बी च्या ग्रहावर जीवसृष्टी असल्याचे मानले तरीही तो तारा 4.2 प्रकाशवर्षे दूर आहे म्हणजे तिथे पोचायलाही 1 लाख 86 हजार वर्षे लागतील. आपल्याला माहिती असलेला कोणताही सजीव इतका काळ जिवंत राहू शकत नाही. जिवाणू याला अपवाद असू शकतात कारण, 2000 मध्ये शास्त्रज्ञांनी 25 कोटी (2500 लक्ष) वर्षांपूर्वीच्या एका मिठाच्या खड्यातून जिवाणू प्रयोग शाळेत यशस्वीपणे वाढवून दाखवले. नुकतेच पॅसिफिक महासागराच्या तळातुन 10 कोटी (1 हजार लक्ष) वर्षांपूर्वीचे जिवाणूही यशस्वीरीत्या वाढवता आले. एक ते 20 हजार लक्ष वर्ष सुप्तावस्थेत राहू शकणार्या जिवाणूंना सात ते आठ लक्ष वर्षे सुप्तावस्थेत राहणे अवघड नाही.
• अशा ग्रहांवर जीवाणुंपलीकडे जीवसृष्टी असेल का, असल्यास ते पृथ्वीवर येऊ शकतील का, हा पुढचा प्रश्न. आपल्याला सध्या माहिती असलेल्या ज्ञानाचा विचार केला. तर अगदी जवळच्या ग्रहावरुनही पृथ्वीवर येण्यासाठी त्यांना एकतर प्रचंड वेगाची अवकाश याने लागतील किंवा त्यांचे आयुष्य कित्येक लक्ष वर्षांचे असायला पाहिजे. शिवाय ते पृथ्वीवर आले तरी इथल्या वातावरणात जिवंत राहण्यासाठी त्या ग्रहावरही पृथ्वीसारखीच परिस्थिती असायला हवी. ते माणसांसारखेच असणे तर आणखी पुढची पायरी झाली. आपल्याला आज दिसणारी प्रुथ्वीवरची सजीवसृष्टी निर्माण होण्यामागे पृथ्वीवर घडलेल्या अनेक घटना कारणीभूत आहेत. सुरवातीला पृथ्वीवर प्राणवायू नव्हता, सुरवातीच्या काळात नीलहरीत शैवालामुळे तो तयार झाला आणि त्याच्यावर अवलंबून असणारी जीवसृष्टी उत्क्रांत झाली. एके काळी पृथ्वीवर राज्य करणारा डायनासोरचा उल्कापात किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नाश झाला.
• आफ्रिका खंडातून मानवाचा प्रवास आणि त्याच्या मेंदूची वाढ पृथ्वीचा आस गोलाकार फिरण्यामुळे होणार्या तलावांच्या पाण्याच्या पातळीतल्या चढउतारामुळे झाली. त्यामुळे जर पृथ्वीसदृष्य जीवसृष्टी दुसरीकडे असायची तर, तिथेही अशाच घटना घडलेल्या असायला हवा आणि तसे असण्याची शक्यता फारच कमी. त्यामुळे विश्वात इतरत्र जीवसृष्टी असेल तर ती कशी असेल, त्यांच्याशी आपला संपर्क कसा आणि कधी येईल ह्याचा अंदाज बांधणे फार अवघड आहे. तोपर्यंत परग्रहावरच्या पाहुण्यांची पृथ्वीला भेट केवळ विज्ञान काल्पनिकातुनच होत राहणार.
पुण्यातील दोन शालेय विद्यार्थ्यांनी मंगळ-गुरुदरम्यान शोधले सहा नवे लघुग्रह
पुण्यातील दोन शालेय विद्यार्थ्यांनी खगोल विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. या दोन विद्यार्थ्यांनी अंतराळात सहा लघुग्रहाचा शोध लावला आहे. त्यांना लघुग्रहांचा शोध घेत असताना असे दिसून आले की, 27 लघुग्रहांचाच हे सहा लघुग्रह भाग होते.
• या दोन्ही विद्यार्थ्यांनी हा शोध कलाम सेंटर आणि आंतरराष्ट्रीय एस्ट्रॉनॉमिकल सर्च कोलॅबरेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लघुग्रह शोध मोहिमेदम्यान लावला. 9 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत एका जागतिक स्तरावरील कार्यक्रमाद्वारे या अभियानासाठी 22 जणांची निवड करण्यात आली होती.
• मंगळ आणि गुरू या दोन्ही ग्रहांच्या कक्षांमधील स्थिती आणि पृथ्वीजवळील संभावित असलेल्या लघुग्रहाचे विश्लेषण करण्यासाठी जगभरातून निवडण्यात आलेल्या या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. प्राथमिक लघुग्रहांचा सहभागी झालेल्या स्पर्धकांनी 27 शोध घेतला. यात पुण्यातील दोन विद्यार्थ्यांनी सहा लघुग्रहांचा शोध लावला आहे. पुणे जिल्ह्यातील लोहगावमध्ये असलेल्या विखे पाटील शाळेचे या दोव्ही विद्यार्थिनी आहेत. या विद्यार्थ्यींनीची आर्या पुळाटे आणि श्रेया वाघमारे अशी नावे आहेत.
• मंगळ आणि गुरू या दोन्ही ग्रहांच्या कक्षेच्या दरम्यान शोधण्यात आलेले हे लघुग्रह दिसून आले आहेत. लघुग्रहांना छोटे ग्रह म्हणून नोंदवण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागतो. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे माजी सल्लागार आणि कलाम सेंटरचे संस्थापक श्रीजनपाल सिंह यांनी सांगितले की, या लघुग्रहांना ओळखण्यासाठी आणि त्यांचे आरेखन करण्यासाठी आम्ही लावलेला शोध महत्त्वपूर्ण आहे.
एलियन खरंच आहेत
• परग्रहावासी (एलियन) आहेत का ? ते असतील तर कसे असतील, यावर सतत चर्चा सुरू असते. इस्राईलच्या गुप्तहेर प्रमुखांनी नुकताच परग्रहवासींबद्दल म्हणजे एलियनबद्दल नुकताच दावा केला आहे. त्यामुळं या चर्चेला पुन्हा जोर आला. परग्रहवासी असण्याची शक्यता खरोखर किती आहे. याबद्दल शास्त्रीय माहिती घेतल्यावर दुसरी बाजू समोर येते. काय आहे ही बाजू ?
• परग्रहावासी (एलियन) आहेत का ? ते असतील तर कसे असतील, यावर सतत चर्चा सुरू असते. इस्राईलच्या गुप्तहेर प्रमुखांनी नुकताच परग्रहवासींबद्दल म्हणजे एलियनबद्दल नुकताच दावा केला आहे. त्यामुळं या चर्चेला पुन्हा जोर आला. परग्रहवासी असण्याची शक्यता खरोखर किती आहे. याबद्दल शास्त्रीय माहिती घेतल्यावर दुसरी बाजू समोर येते. काय आहे ही बाजू ?
• पृथ्वीपलिकडे जीवसृष्टी आहे का? हा प्रश्न नेहमीच शास्त्रज्ञ आणि सामान्य माणूस यांना आकर्षित करत राहिला आहे. त्यातूनच वारंवार कुठेतरी परग्रहवासी म्हणजे एलियन दिसल्याच्या, उडत्या तबकड्या किंवा अगदी अवकाशयानही दिसल्याच्या बातम्यांवर चवीने चर्चा केल्या जातात. पृथ्वी बाहेर जीवन आहे का? हे माहिती करुन घेण्याआधी काही मूलभूत गोष्टींची माहिती करून घेणे आवश्यक आहे.
रयुगू लघुग्रहावरून जपानने आणलेले नमुने
जपानी अवकाश यान हायाबुसा-2 ने रयुगू नामक लघुग्रहावरून नमुने आणण्यात यश मिळविल्याने जपानी खगोलशास्त्रज्ञ अपेक्षेपेक्षा जास्त खूश आहेत. या नमुन्यांच्या अभ्यासानंतर चांगले परिणाम पाहावयास मिळतील, अशी त्यांना आशा वाटत आहे.
• रयुगू लघुग्रहावरून आणण्यात आलेल्या नमुन्यांचा सध्या जपानसह जगभरातील शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. या नमुन्यांना हायाबुसा-2 या यानाने पृथ्वीच्या कक्षेत सोडले होते. तेथून ते ऑस्ट्रेलियातील जमिनीवर पडले होते.
• या नमुन्यांची छायाचित्रे नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहेत. जपानी अधिकार्यांनी या संदर्भात सांगितले की, या नमुन्यांमधील काही तुकडे एक सेंटीमीटरपेक्षाही मोठे आहेत. तसेच ते दगडासारखे टणक असून ते सहजपणे तुटत नाहीत. तसे पाहिल्यास हे नमुने लाकडी कोळशासारखे अथवा काळ्या वाळूपासून तयार झालेल्या खड्यासारखे वाटतात. याशिवाय यामध्ये थोडी बारीक मातीही आहे. जपानच्या हायाबुसा-2 या यानाने पृथ्वीपासून तब्बल तीस कोटी कि.मी. अंतरावर असलेल्या रयुगू नामक लघुग्रहावरील दोन ठिकाणांहून नमुने गोळा केले होते. येत्या वर्षात या नमुन्यांचा सविस्तरपणे अभ्यास करण्यात येणार आहे. यामुळे आपली सूर्यमाला आणि पृथ्वीच्या निर्मितीबद्दल महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. संशोधनानंतर हे नमुने नासा आणि अन्य आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.
मंगळाचा वरचा थर बनलाय केकसारखा
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा सध्या मंगळ ग्रहावरील संभाव्य जीवनाच्या शक्यतांचा शोध घेत आहे. याबाबत जर सकारात्मक संकेत मिळाले तर नासाच्या भविष्यातील मानवी मंगळ मोहिमांना बळ मिळणार आहे.
• या संदर्भात संशोधन करण्यासाठी नासाने आपले इनसाईट लँडर नामक अवकाश यान मंगळावर पाठविले आहे. या यानाने मंगळाच्या अंतर्गत रचनेची अत्यंत विशेष माहिती पाठविली आहे. या माहितीनुसार मंगळाचा वरचा थर (क्रस्ट) केकसारखा असून ते तीन थरांनी बनला आहे.
• इनसाईट लँडर हा असा पहिला लँडर आहे की, तो दुसर्या ग्रहावरील भूगर्भीय संशोधनासाठी त्या ग्रहाच्या पृष्ठभागावर पाठवण्यात आला आहे. इनसाईट लँडरला 2018 मध्ये लाँच करण्यात आले आहे. या रोबोटिक लँडरने मंगळाच्या विषुववृत्तीय भागात असलेल्या भूकंप व भूकंप प्रवण क्षेत्राची माहिती मिळविण्याचे काम केले आहे.
• नासाच्या या इनसाईट लँडरवर अतिसंवेदनशील सिस्मोमीटर बसवण्यात आले आहेत. या सिस्मोमीटरने गेल्या दोन वर्षांत मंगळावरील शेकडो भूकंपाची नोंद केली आहे. या ग्रहावरील प्रत्येक भूकंप हा दोन प्रकारचे भूकंपीय लहरी उत्सर्जित करत असतो. या लहरींच्या हालचालीवरून खगोलशास्त्रज्ञ लाल ग्रहाच्या क्रस्ट, मेंटल आणि कोअरची माहिती मिळवू शकत आहेत. आता या थरांबाबत अधिक माहिती जाणून घेण्याबाबत आपल्याकडे आकडेवारी उपलब्ध असल्याचे शास्त्रज्ञ ब्रूस बॅनर्ट यांनी सांगितले.
स्पेसएक्स अंतराळयात्रा बनवणार आणखी सुलभ
काही मिनिटांत अवकाश यात्रा पूर्ण करून पुन्हा पृथ्वीवर येऊ शकू, अशी तुम्ही कधी कल्पना केली आहे का? सध्या ज्या अंतराळ मोहिमांना अनेक वर्षे लागतात, त्या मोहिमा जर काही तासांत पूर्ण झाल्या तर? असे जर झाल्यास मानवाचे अवकाशातील काम आणखी सुलभ होणार आहे. या जरी कल्पना असल्या तरी अॅलन मस्क यांच्या नेतृत्वाखालील अंतराळ कंपनी स्पेसएक्स या दिशेने वेगाने काम करत आहे.
• काही विशेषज्ज्ञांच्या मते, स्पेसएक्सकडून ज्या वेगाने यावर काम सुरू आहे, ते पाहता पुढील 20 वर्षांत मानवापासून अंतराळ फार अंतरावर राहणार नाही. अंतराळ मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडू शकणार्या बुस्टरांची आता लवकरच स्पेसएक्सकडून चाचणी घेतली जाणार आहे.
• स्पेसएक्सचे सीईओ अॅलन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, येत्या काही महिन्यांनंतर आपली कंपनी सुपर हेवी बुस्टर्सची चाचणी सुरू करणार आहे. या बुस्टरांचा उपयोग मंगळासह अनेक अंतराळ मोहिमांमध्ये स्टारशिप च्या प्रक्षेपणासाठी केला जाणार आहे.
• ट्विटरवरील एका फॉलोअरच्या प्रश्नाला उत्तर देताना मस्क यांनी सांगितले की, पहिल्या सुपर हेवी हॉपची चाचणी आता काहीच महिने दूरवर आहे. यासाठी टेक्सासच्या बोका चिका येथे दोन लाँचिंग पॅडचा वापर करणार आहे. प्रत्येक हापमध्ये प्रोटोटाईप रॉकेट बसवण्यात येणार आहे. हे बुस्टर्स 250 फूट लांब व त्यामध्ये 28 रॅप्टर इंजिन असतील.
थेट चंद्रावर जाऊन होणार रिसर्च
चीनची नॅशनल स्पेस अँडमिनिस्ट्रेशन ही अवकाश संस्था चीनवर संशोधन तळ तयार करण्याचा विचार करीत आहे. त्यासाठीच चीनने चँग ई-5 हे अवकाश यान चंद्रावर पाठविले होते. हे यान चंद्रावरून सॅम्पल घेऊन परत आले आहे.
ठळक मुद्दे -
• भविष्यात चँग ई-8 या मिशनद्वारे चंद्रावर संशोधन केंद्र सुरू करण्याचा चीनचा विचार आहे. विशेष म्हणजे बेस बनविण्यासाठी 3 डी प्रिंटिंगचा वापर करण्याचीही योजना आहे.
• चीन सध्या एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आहे. त्याचे कारण आहे चंद्र. चीनने चंद्रावर यान पाठवून तेथील 4.4 टन खडकांचे तुकडे परत पृथ्वीवर आणण्याची कमाल केली आहे.
• चीनची नॅशनल स्पेस अँडमिनिस्ट्रेशन ही अवकाश संस्था चीनवर संशोधन तळ तयार करण्याचा विचार करीत आहे. त्यासाठीच चीनने चँग ई-5 हे अवकाश यान चंद्रावर पाठविले होते.
• हे यान चंद्रावरून सॅम्पल घेऊन परत आले आहे. भविष्यातील चँग ई-8 या मिशनद्वारे चंद्रावर संशोधन केंद्र सुरू करण्याचा विचार आहे. विशेष म्हणजे बेस बनविण्यासाठी 3 डी प्रिंटिंगचा वापर करण्याचीही योजना आहे. हे सारं येत्या दहा वर्षांत अस्तित्वात आणण्याचा विचार आहे. यासाठी चीन इतर देशांचीही मदत घेणार आहे, तसेच तिथे संशोधनासाठी अवकाशवीरही पाठविणार आहे; पण यासाठी दहा वर्षे तयारी करावी लागणार आहे.
• चंद्रावरून पृथ्वीवर सॅम्पल आणणारा चीन हा तिसरा देश; परंतु हे करताना चीनने आपली अवकाश संशोधन क्षमता सिद्ध केली आहे. आतापर्यंत चीनने तीन वेळा चंद्रावर स्वारी केली आहे आणि तिन्ही वेळा चीन यशस्वी ठरला आहे. असे आतापर्यंत कोणत्याही देशाला करता आलेले नाही.
• आता येत्या काळात भारतही चंद्रावर स्वारी करणार आहे. त्याची तयारी केली जात आहे. भारताला यात किती यश येते ते पाहावे लागेल.
एलियन्स पृथ्वीवर आलेत काय?
• गेल्या काही दिवसांपासून एलियन्सबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. एलियन्स म्हणजेच परग्रहवासी पृथ्वीवर आले आहेत आणि ते अमेरिका व इस्रायलला माहीत आहेत, अशीही चर्चा झाली; पण प्रत्यक्ष त्याचा कुठलाही पुरावा अद्याप मिळालेला आहे. एका अवकाश संशोधकाने असाही दावा केला की, ट्रम्प यांना याबाबत सर्वकाही कल्पना आहे. त्यांना एलियन्सचीही माहिती आहे.
• या सार्या चर्चा होत असतानाच जगात वेगवेगळ्या ठिकाणी एक स्टीलचा स्तंभ अचानक रात्रीतून अभा राहिला असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याबद्दल अद्यापही कुतूहल कायम आहे. हे स्तंभ येतात कसे? ते लावते कोण? हे स्तंभ नाहीसे होतात कसे? हे प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि ते अद्यापही अनुत्तरित आहेत. त्यांचाही संबंध एलियन्सशी जोडला जात आहे.
• अमेरिकेला एलियन्ससंदर्भात माहिती मिळालेली असल्याचा आरोप यापूर्वीही अनेकदा झालेला आहे; पण अमेरिकेच्या कोणत्याही संस्थेने त्यावर खुलासा केलेला नाही. अमेरिकेत एरिया 51 म्हणून एक जागा आहे. तिथे अमेरिकेच्या सैन्यासंदर्भात संशोधन केले जाते, असे म्हणतात; पण या जागी एलियनसंदर्भात संशोधन होत असल्याचा संशय आतापर्यंत अनेकांनी व्यक्त केलेला आहे. सत्य काय, हे अद्यापही समोर आलेले नाही. अमेरिकेचे एलियन्सशी संबंध असल्याचा काही डेटा एडवर्ड स्नोडेन यांच्याही हाती लागला होता.
• अमेरिका आणि एलियन्स यांच्यासंबंधाविषयी संशय घेतले जाऊ शकतील असे वक्तव्य नासाच्याच काही संशोधकांनीही मे महिन्यात केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार अमेरिका येत्या दहा वर्षांत एलियन्सचा शोध लावेल, असे त्यांनी म्हटले होते. याचा अर्थ एलियन्सबद्दल अमेरिकेच्या हाती काहीतरी लागलेले आहे आणि जगापासून ते लपवीत आहेत.
सीएमएस-01
17 डिसेंबर 2020 रोजी चेन्नईपासून 120 किलोमीटर अंतरावरील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्राच्या दुसर्या लाँच पॅडवरून पीएसएलव्ही-सी 50 प्रक्षेपकाद्वारे 42 व्या दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी उड्डाण करण्यात आले. सीएमएस-01 असे या उपग्रहाचे नाव आहे.
उपग्रहवाहक पीएसएलव्ही-सी 50 -
1) हे रॉकेट 320 टन वजनाचे आहे.
2) त्यांने प्रक्षेपित केलेला उपग्रह सीएमएस-01 उड्डाणानंतर 20 मिनिटांत भूस्थिर कक्षेत (जिओसिंक्रोनस ट्रान्स्फर ऑर्बिट-जीटीओ) भ्रमण करू लागला.
1) पीएसएलव्ही (ध्रुवीय उपग्रह) प्रक्षेपण यानाची ही 52 वी मोहीम होती
2) पीएसएलव्ही-एक्सएल रॉकेटचे हे 22 वे यशस्वी उड्डाण ठरले.
3) सतीश धवन स्पेस सेंटरवरून इस्रोने केलेले हे 77 वे उड्डाण होते.
सीएमएस-01 हा उपग्रह -
1) सीएमएस-01 हा इस्रोच्या नव्या नामकरण योजनेंतर्गत अंतरिक्षात प्रस्थापित केलेला पहिला दूरसंचार उपग्रह आहे. या उपग्रहाचे पूर्वीचे नाव जीसॅट-12 आर हे होते.
2) तो पृथ्वीपासून 42,164 किलोमीटर या सर्वांत दूरच्या अंतरावर स्थापित आहे.
6) या उपग्रहामुळे टीव्हीची प्रक्षेपणप्रणाली, टीव्हीशी संबंधित अन्य संचारप्रणाली आणि व्यवस्थांमध्ये सुधारणा. मोबाईलपासून टीव्हीपर्यंत सर्व स्तरावरील लहरींचा (सिग्नल) स्तर सुधारण्यासाठी तैनात.
3) या उपग्रहामुळे सी-बँड फ्रीक्वेन्सी यंत्रणा जास्त कार्यक्षम होणार.
5) अंदमान-निकोबार बेटे आणि लक्ष्यद्वीपला कव्हर करणार्या स्पेक्ट्रमच्या विस्तारित सी-बँडमध्ये सेवा उपलब्ध
जीसॅट-30 :
1) 17 जानेवारी 2020 रोजी एरियनस्पेस या युरोपीय अंतरिक्ष संस्थेने एरियन-5 रॉकेटच्या माध्यमातून जीसॅट-30 हा संचार उपग्रह प्रक्षेपित केला होता.
ईओएस-01 :
2) 7 नोव्हेंबर 2020 रोजी इस्रोने पीएसएलव्ही सी-49च्या मदतीने ईओएस-01 हा टेहळणी उपग्रह अंतरिक्षात सोडला. त्याच्याबरोबरच 9 परदेशी उपग्रहांचेही यशस्वी प्रक्षेपण केले.
सीएमएस-01 :
3) 17 डिसेंबर 2020 रोजी सीएमएस-01 चे प्रक्षेपण हे 2020 या वर्षातील दुसरे उड्डाण होते.
ईओएक्स-01:
1) अर्थ ऑब्जर्वेशन रसॅट उपग्रहांच्या मालिकेतील सुधारित उपग्रह आहे.
2) हा एक रडार इमेजिंग उपग्रह असून, सिंथेटिक अपार्चरमुळे ढगाळ वातावरणात तसेच कोणत्याही हवामानात आणि दिवसाबरोबर रात्रीसुद्धा या उपग्रहावरून पृथ्वीची अत्यंत सुस्पष्ट छायाचित्रे घेता येतात.
2020 मध्ये इस्रोने उपग्रहांचे नामकरण त्यांच्या वर्गाच्या आधारावर केले आहे -
1) टेहळणी उपग्रहाचे नामकरण ईओएस असे केले.
2) दूरसंचार उपग्रहांचे नाव सीएमएस असे केले.
पीएसएलव्ही - सी 51-
1) फेब्रुवारी-मार्च 2021 मध्ये प्रक्षेपित होणार
2) प्राथमिक पेलोड 600 ते 700 किलो वजनाचा ब्राझीलचा उपग्रह
3) पिक्ससेल या भारतीय स्टार्टअपमधून तयार टेहळणी उपग्रह
4) स्पेसकिडस् टीम अंतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेला संचार उपग्रह
5) 3 विद्यापीठांच्या समूहाने तयार केलेला उपग्रह
लाकडी उपग्रह
कोरोनाचा प्रकोप सुरू असताना 2020 मध्ये अनेक देशांनी अवकाश क्षेत्रात चांगले यश मिळविले. यामध्ये जपान बाजी मारली असून हा देश लाकडी उपग्रह अवकाशात सोडणार आहे. या लाकडी उपग्रहामुळे अवकाशातील प्रदूषण कमी होण्यास मदत मिळेल. हा इको-फ्रेंडली सॅटेलाईट 2023 पर्यर्ंत अवकाशात सोडण्याची जपानची योजना आहे.
• क्योटो युनिव्हर्सिटी आणि सुमिटोमो फॉरेस्ट्री यांचे संयुक्तपणे या प्रकल्पावर कार्य.
• अवकाशात इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी प्रचंड वेगाने जात असतात.
ख्रिसमसच्या रात्री पृथ्वीजवळून गेला लघुग्रह
25 डिसेंबर रोजी संपूर्ण जग ज्यावेळी ख्रिसमस उत्सव साजरा करण्यात मग्न होते, तेव्हा एक मोठा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने प्रचंड वेगाने येत होता. मात्र, सुदैवाने आकारात स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अथवा दोन फुटबॉल मैदाना एवढा मोठा असलेला हा लघुग्रह पृथ्वीपासून सुरक्षित अंतरावरून निघून गेला.
• अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने या लघुग्रहावर खास नजर ठेवली होती. या लघुग्रहाचे नाव एसडी 224 असे असून त्याचा 2014 मध्ये शोध लावण्यात आला होता. हा लघुग्रह ताशी 36 हजार कि.मी. वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत होता आणि त्याच वेगाने पृथ्वीजवळून निघून केला.
• ज्यावेळी एसडी 224 हा लघुग्रह पृथ्वीजवळून गेला त्यावेळी त्याची लांबी 200 मीटर असल्याचे मोजण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे शुक्रवारी रात्री या लघुग्रहाबरोबच आणखी दोन लघुग्रह पृथ्वीजवळून प्रचंड वेगाने निघून गेले. या लघुग्रहांचा आकार फार मोठा नसल्याने त्यांचा पृथ्वीला कोणताच धोका नव्हता. यातील एकाचे नाव (एक्सई 133) असे असून त्याचा शोध 2012 मध्ये लावण्यात आला होता. हा लघुग्रह 120 मीटर लांब होता.
• नासाने दिलेल्या माहितीनुसार एसडी 224 हा लघुग्रह 25 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी पृथ्वीच्या अगदी जवळ होता. मात्र, पृथ्वीपासून सुमारे 30 लाख कि.मी. अंतरावरून निघून गेला. यामुळे पृथ्वीला त्यापासून कोणताच धोका नव्हता.
एलियन्सची उपस्थिती
आपल्या सूर्यापासून नजीकच असलेल्या प्रॉक्सिमा सेंच्युरीच्या तार्यापासून आलेल्या रहस्यमयी रेडिओ लहरींचा शोध लागला आहे. या लहरींचा आधार घेऊन खगोल शास्त्रज्ञांनी दावा केलाआहे की, ब्रह्मांडात कोठेतरी एलियन्स निश्चितपणे आहेत.
• द गार्जियनने सादर केलेल्या अहवालानुसार ज्यावेळी शास्त्रज्ञ पृथ्वीच्या बाहेरील जीवनाचा शोध घेत होते, त्यावेळी या रेडिओ लहरी आढळून आल्या. 2019 मध्ये पहिल्यांदाचऑस्ट्रेलियाच्या पार्केस टेलिस्कोपने या रहस्यमयी रेडिओ लहरींना पकडले. मात्र, त्या नेमक्या कोठून आल्या, याचा शोध लागू शकला नाही. या रेडिओ लहरींची फ्रिक्वेन्सी 980 मेगाहार्टज् इतकी जास्त होती. उल्लेखनीय म्हणजे ज्यावेळी या रेडिओ लहरी येत होत्या त्यावेळी प्रॉक्सिमा सेंच्युरीच्या तार्याच्या गतीमध्ये सातत्याने बदल होत होता. शास्त्रज्ञांनी या रेडिओ लहरींना बीएलसी 1 असे नाव दिले. या लहरी एलियन्सनीच पाठविल्या आहेत, असे निश्चितपणे म्हणता येणार नाही, असे खगोल शास्त्रज्ञांचे मत आहे. मात्र, असे संकेत दिसून येतात. पेन स्टेट युनिव्हर्सिटी च्या सोफिया शेख यांच्या मते, 1997 मध्ये एम 55 या तार्याच्या समूहाजवळूनही असे संकेत आले होते. आतापर्यंतमिळालेल्या संकेतांपैकी हे संकेत फारच रहस्यमयी होते. या संकेतांचा व्यापक अभ्यास करण्याची गरज आहे. कारण असेही असू शकते की, एलियन्सच आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतील.
देश-चंद्राऐवजी पृथ्वीच उगवली
सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या असाच एक भन्नाट फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. हा फोटो पोस्ट केला आहे अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था असणार्या नासाने. नासाने त्यांच्या इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या फोटोमध्ये चंद्राऐवजी आकाशात पृथ्वी उगवल्याचे दिसत आहे. आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे. तर हे शक्य आहे कारण हा फोटो चंद्रावरुन काढलेला आहे. बरं हा फोटो नेमका कालच म्हणजे 24 डिसेंबर रोजी पोस्ट करण्यामागेही विशेष कारण असून या फोटोबद्दलच्या काही खास गोष्टी नासाने आपल्या पोस्टमध्ये सांगितल्या आहेत. 11 तासांमध्ये या फोटोला 11 लाखांहून अधिक जणांनी लाईक केलं असून यावरुनच या फोटोसंदर्भात किती चर्चा होतेय याचा अंदाज तुम्हाला बांधता येईल.
• नासाने शेअर केलेला हा फोटो 52 वर्षांपूर्वीचा म्हणजेच 1968 सालातील आहे. या फोटोला कॅप्शन देताना नासाने एक ओळीत फोटोचं वर्णन करताना, इथून दिसणारी पृथ्वी ही रिकाम्या अंतराळामध्ये वाळवंटात एखादा हिरवळीचा टापू दिसावा अशी वाटतेय असं म्हटलं आहे. फोटोबद्दल सविस्तर माहिती देताना नासाने, हे ह्युस्टनमधील सकाळच्या साडेदहा वाजता घडलं होतं डिसेंबर 24, 1968 रोजी, म्हणजेच 52 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी. अपोलो 8 मधील नासाचे अंतराळवीर फ्रँक बोरमॅन, जीम लव्हली आणि बिल अॅण्ड्रेस हे चंद्राभोवती प्रदक्षिणा पूर्ण करणारे पहिले व्यक्ती ठरते. त्यावेळी त्यांनी अशाप्रकारे चंद्राच्या पृष्ठभागावरुन होणारा पृथ्वीचा उदय पाहिला, असं म्हटलं आहे.
• या फोटोला अर्थराईज म्हणजेच पृथ्वीचा उदय या नावाने ओळखलं जातं असही नासाने सांगितलं आहे. हा फोटो अपोलो 8 मधील अंतराळवीर बिल अॅण्ड्रेस यांनी काढला आहे. तेव्हा पहिल्यांदाच हा असा फोटो जगाने पाहिला होता. हा अर्थराईजचा फोटो या ग्रहावर राहणार्या आपल्या सर्वांना कायमच प्रेरणा देत राहील, असं नासाने या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
नेपच्यूनवर घोंगावत आहे भीषण वादळ
आपल्या सूर्यमालेतील एक दीर्घ अंतरावरचा पण महत्त्वपूर्ण असलेल्या नेपच्यून या ग्रहावरील ध्रुवीय भागात सध्या घोंगावत असलेल्या जोरदार वादळाने खगोल शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. खरेतर या ग्रहावर वादळ ही काही नवी बाब नाही. मात्र, यावेळचे वादळ आणि त्याची दिशा जरा वेगळी आहे.
• सुरुवातीला हे वादळ ध्रुवीय भागातून विषुववृत्तीय भागाकडे गेले आणि पुन्हा ते विषुववृत्तीय भागाकडून ध्रुवीय भागाकडे जात असल्याचे दिसत आहे. असे प्रथमच होताना खगोलशास्त्रज्ञ पहात आहेत.
• नेपच्यूनवरील वादळाने आपली दिशा का बदलली? याचे कारण खगोलशास्त्रज्ञांनाही माहीत नाही. मात्र, यामुळे या दूरस्थ ग्रहाच्या वातावरणाबद्दल महत्त्वाची माहिती मिळू शकते. तसे पाहिल्यास आपल्या सूर्यमालेतील अन्य ग्रहांच्या तुलनेत नेपच्यूनला पाहणे अत्यंत अवघड आहे. कारण हा ग्रह सूर्यापासून दीर्घ अंतरावर आहे. हा ग्रह पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतरापेक्षा 30 पटीने जास्त अंतरावर आहे.
• 1989 मध्ये वॉएजर-2 हे यान ज्यावेळी नेपच्यूनजवळून गेले त्यावेळी या ग्रहावरील दोन वादळे दिसून आली होती. त्यानंतर या ग्रहावरील वादळे पाहण्यास केवळ हबल स्पेस टेलिस्कोपच सक्षम आहे. या दुर्बिणीने अशा चार वादळांचे अवलोकन केले. ज्यांना डार्क स्पॉट असे नाव दिले गेले.
चंद्रावरून अशी दिसेल पृथ्वी
मानवाची अंतराळाबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच आहे. चंद्र आणि मंगळाबाबत अधिक माहिती उपलब्ध होत असल्याने येथे मानवी वस्ती स्थापन करण्याच्या कल्पना आता सत्यात उतरविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था याबाबतीत अधिकच गंभीर दिसत आहे. नासाकडून चंद्रावर कायमस्वरूपी तळ उभारण्याची योजना तयार करण्यात येत आहे.
• 2024 मध्ये नासाकडून एक महिला आणि एका पुरुष अंतराळयात्रीला चंद्रावर पाठवण्याची योजना तयार करण्यात येत आहे. यासंदर्भातील काही छायाचित्रे नासाने शेअर केली आहेत, ती अत्यंत महत्त्वपूर्ण समजली जात आहेत.
• या छायाचित्रांमधून हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की, चंद्रावरून पृथ्वी नेमकी कशी दिसेल? नासाच्या भविष्यातील चांद्रमोहिमेचा प्रमुख उद्देश म्हणजे पृथ्वीच्या या उपग्रहावर मानवी वस्ती स्थापन करणे हा आहे.
• शास्त्रज्ञांच्या मते, एक मीटर रूंदीची रिगोलिथची भिंत उभारल्यास चंद्रावरील रेडिएशनपासून बचाव करणे शक्य होईल. चंद्रावरील सुरुवातीची काही वर्षे फारच आव्हानात्मक असतील. मात्र, काही वर्षानंतर तेथे कायमस्वरूपी तळ उभा करण्याची शक्यता बळावेल.
• चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सातत्याने सूर्यप्रकाश असतो. यामुळे तेथे सौलपॅनेलच्या मदतीने विजेची निर्मिती केली जाऊ शकते. याशिवाय तेथील क्रेटरमध्ये असलेल्या बर्फापासून ऑक्सिजन व इंधनासाठी हायड्रोजनची निर्मिती करता येऊ शकते.
तारे कसे व का मृत होतात?
अवकाशातील तार्यांना अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. किंबहुना या तार्यांनाच शास्त्रज्ञ चक्क ब्रह्मांडाची चावी म्हणून ओळखतात. कारण या खगोलीय पिंडापासूनच ब्रह्मांडाबद्दलची जास्त माहिती मिळते. ब्रह्मांडातील दुसर्या पिंडांच्या निर्मितीत या तार्यांचा जरा तरी सहभाग असतोच. यासंदर्भात करण्यात आलेल्या एका संशोधनातूनतार्यांच्या प्रक्रियांबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती उपलब्ध झाली आहे. यातून तारे कसे आणि का मरतात? या खगोलीय प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे.
• या संशोधनामध्ये शास्त्रज्ञांनी तार्यांची खास अवस्था सुपरनोव्हा व त्यातील कणांचे सर्वात सूक्ष्म रूप असलेल्या न्यूट्रिनोचा अभ्यासकरून तार्यांच्या मृत्यूबाबत महत्त्वाची माहिती मिळविण्यात यश प्राप्त केले. तार्यांमध्ये न्यूट्रिनोची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. तर सुपरनोव्हा ही तार्यांची अंतिमअवस्था असते. काहीवेळा दुसर्या तार्याच्या निर्मितीदरम्यान ही अवस्था बदलत असते. यामध्ये न्यूट्रिनोही महत्त्वाचे असतात.
• ज्यावेळी आकुंचन पावणार्या सुपरनोव्हाच्या केंद्रभागी शक्तिशाली स्फोट होतो, त्यावेळी त्यातून मोठ्या संख्येने न्यूट्रिनो बाहेर पडत असतात. ज्यावेळी या न्यूट्रिनोचे घनत्वजास्त असते, त्यावेळी ते आपले प्रारूप बदलत असतात.
• संशोधकांनी सुपरनोव्हाच्या सर्व तीन प्रारूपांचा अभ्यास केला. यामधून त्याने तारे कसे आणि का मरतात, याची माहिती मिळविली. यासाठी संशोधकांनी नॉन लिलियरसिम्युलेशन तयार केले. हे सिम्युलेशन सुपरनोव्हाच्या तिन्ही प्रारूपांवेळी होणार्या बदलाचे होते. या बदलामध्ये छोटे छोटे कण न्यूट्रिनोमधील आंतरक्रियेचे रूप बदलतात. यान्यूट्रिनोंचेही तीन प्रारूप असतात यामध्ये म्यूओन, इलेक्ट्रोन व ताऊ न्यूट्रिनो यांचा समावेश असतो. केंद्रस्थानी स्फोट झाल्यानंतर तार्यांच्या अशा सूक्ष्म कणांत तुकडे होऊनत्यांचे अवकाशातील अस्तित्व नाहीसे होते म्हणजे ते मृत होतात. हे संशोधन सिम्युलेशन रिव्ह्यू लेटर्स नामक जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
चंद्रावर एक लाखाहून अधिक क्रेटर
सध्या चीनची चांगई-5 ही चांद्र मोहीम सर्वत्र चर्चेत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून चीनने चंद्रावरून मातीचे नमुने आणण्यात यश मिळविले. मात्र, चीनने आपल्याचांग-ई-1 व चांग ई-2 या मोहिमांवर आधारित एक संशोधन नुकतेच प्रसिद्ध केले आहे. या संशोधनातील माहितीनुसार चंद्रावर मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट क्रेटर्स असून त्यांचीसंख्या एक लाखाहून अधिक असू शकते.
• नेचर नामक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, चंद्रावर आढळून आलेल्या क्रेटर्सच्या माध्यमातून आपल्या सूर्यमालेच्या निर्मितीबद्दल माहिती मिळू शकते. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीसाठी जसे जीवाश्म महत्त्वपूर्ण ठरतात, अगदी तसेच हे क्रेटर्स चंद्रासाठी महत्त्वाचे आहेत. क्रेटर हे चंद्राच्या भूभागाची महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. तसेपाहिल्यास हे क्रेटर्स सूर्यमालेच्या इतिहासाचा ठेवा आहेत, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. यामुळे खगोल शास्त्रज्ञांची चंद्राबद्दलच्या अभ्यासाची व्याप्ती वाढणार आहे.
• सुरुवातीला चंद्रावर 7895 इतके क्रेटर्स असल्याचे म्हटले जात होते. यातील सुमारे 1411 क्रेटर्स किती प्राचीन आहेत? याचा अंदाजही बांधण्यात आला. मात्र, चीनच्या चांग-ईमोहिमेने चंद्रावरील नवे क्रेटर्स शोधून काढताना ते किती जुने असतील? याचीही माहिती मिळविली. यासाठी डीप न्यूरल नेटवर्कच्या मदतीने स्टॅटिग्राफिकचाही वापर केला. यामुळे चंद्रावर लाखाहून जास्त क्रेटर असल्याचा दावा करण्यात आला.
एमिसॅट
पूर्व लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे. लष्करी स्तरावर चर्चा सुरू असली तरी ही चर्चा एक औपचारीकता असल्याचं चीनच्या वर्तणुकीतून दिसतंय. चीने चर्चा सुरू ठेवून दुसरी सीमेवर मोठ्या प्रमाणावर हजारो सैनिक तैनात केलेत आणि शस्त्रासांसह लढाऊ विमानंही. यामुळे भारताने पूर्ण तयारी केली आहे. आता भारतीय उपग्रहाने चिनी सैन्याच्या हालचाली टिपल्याने चीनमध्ये खळबळ उडाली आहे.
• भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) चा हा उपग्रह एचखड-ढ गुप्त माहिती गोळा करण्याचे काम करतो. यात एङखछढ म्हणजेच इलेक्ट्रॉनिक इंटेलिजेंस सिस्टम कौटिल्य बसवण्यात आले आहे. ज्यात संरक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण माहिती एकत्रित करण्याची क्षमता आहे. अरुणाचल प्रदेश जवळील तिबेटच्या त्या भागावरून हा उपग्रह नुकताच गेला जिथे पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) कब्जा केलेला आहे.
शत्रूचे रेडिओ सिग्नल वाचतो भारताचा कौटिल्य
• इस्रोने बनवलेल्या EMISAT या उपग्रहाची ELINT सिस्टममध्ये शत्रूच्या प्रदेशात वापरल्या जाणार्या रेडिओ सिग्नल्स वाचतो. लडाखमध्ये पँगाँग त्सोमधील फिंगर 4 विषयी भारत-चीनमधील चर्चा फिसकटल्यानंतर दुसर्याच दिवशी हा उपग्रह तिबेटवरून गेला. यामुळे चीनमध्ये खळबळ उडाली आहे. तर दोन्ही देश लडाखमधील सीमावादावर पुढील चर्चा करण्यास तयार आहेत.
• डेपसांग सेक्टरमध्ये चीने आपल्या सैन्याची जमवाजमवही केली आहे. चिनी सैनिक एलएसीजवळ खड्डे खोदतानाही दिसून आलेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. पीएलएने यापूर्वी 2013 मध्ये देखील डेपसांगमध्ये घुसखोरी केली होती. भारताचा रेडार उपग्रह RISAT-2BR1 चीनच्या पिप्लस लिबरेशन आर्मी नेव्ही (प्लॅन) च्या जिबूती बेस (आफ्रिका) वरून गेला होता. जिबूती नेव्ही बेस हा चीनचा एकमेव बेस आहे जो देशाबाहेर आहे. चीनने जिबूतीजवळ आपले तीन लढाऊ जहाज तैनात केले आहेत, असं सांगण्यात येत होतं.
पाकिस्तानवरही लक्ष ठेवतो हा उपग्रह -
* यापूर्वी भारतीय उपग्रह EMISAT च्या ELINT ने पाकिस्तान नौदलाच्या ओरमारा बेस (जिन्ना नेव्ही बेस) वरून फिरला होता. या ठिकाणी पाकिस्तानने चीनच्या मदतीने पाणबुड्या गोळ्या केल्या आहेत. भारत आणि चीन यांच्यात चर्चा सुरूच असली तरी पाकिस्तान आणि चीन एकत्र येऊन येत्या हिवाळ्यापर्यंत काश्मीर आणि लडाखमध्ये भारताविरूद्ध दुहेरी लढाईची तयारी करत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्पेसएक्स
काही मिनिटांत अवकाश यात्रा पूर्ण करून पुन्हा पृथ्वीवर येऊ शकू, अशी तुम्ही कधी कल्पना केली आहे का? सध्या ज्या अंतराळ मोहिमांना अनेक वर्षे लागतात, त्या मोहिमा जर काही तासांत पूर्ण झाल्या तर? असे जर झाल्यास मानवाचे अवकाशातील काम आणखी सुलभ होणार आहे. या जरी कल्पना असल्या तरी अॅलन मस्क यांच्या नेतृत्वाखालील अंतराळ कंपनी स्पेसएक्स या दिशेने वेगाने काम करत आहे.
• काही विशेषज्ज्ञांच्या मते, स्पेसएक्सकडून ज्या वेगाने यावर काम सुरू आहे, ते पाहता पुढील 20 वर्षांत मानवापासून अंतराळ फार अंतरावर राहणार नाही. अंतराळ मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडू शकणार्या बुस्टरांची आता लवकरच स्पेसएक्सकडून चाचणी घेतली जाणार आहे.
• स्पेसएक्सचे सीईओ अॅलन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, येत्या काही महिन्यांनंतर आपली कंपनी सुपर हेवी बुस्टर्सची चाचणी सुरू करणार आहे. या बुस्टरांचा उपयोग मंगळासह अनेक अंतराळ मोहिमांमध्ये स्टारशिप च्या प्रक्षेपणासाठी केला जाणार आहे.
• ट्विटरवरील एका फॉलोअरच्या प्रश्नाला उत्तर देताना मस्क यांनी सांगितले की, पहिल्या सुपर हेवी हॉपची चाचणी आता काहीच महिने दूरवर आहे. यासाठी टेक्सासच्या बोका चिका येथे दोन लाँचिंग पॅडचा वापर करणार आहे. प्रत्येक हापमध्ये प्रोटोटाईप रॉकेट बसवण्यात येणार आहे. हे बुस्टर्स 250 फूट लांब व त्यामध्ये 28 रॅप्टर इंजिन असतील.
• गुजरातमध्ये सरदार सरोवर धरणाजवळ केवाडिया कॉलनी येथे जगातील सर्वात मोठा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी चे 2018 मध्ये अनावरण करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या पुतळ्याची उंची तब्बल 182 मीटर आहे.
• 8 नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री आठ वाजता देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून हटवल्याचे जाहीर केले. काळा पैसा हटवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारने म्हटले. त्यानंतर अनेक दिवस लोकांनी बँकांच्या दारात जाऊन पाचशे व एक हजारच्या नोटा देण्यासाठी रांगा लावल्या. तशाच रांगा एटीएमबाहेर अडीच हजार रुपयांपर्यंतची रोकड काढण्यासाठी लागल्या! जर रोकडच्या स्वरूपात अघोषित संपत्ती असेल तर त्यावर कर भरण्याचीही सरकारने मुभा दिली होती. नोटाबंदीचा निर्णय हिताचा आणि यशस्वी होता असे सरकारचे म्हणणे होते तर हा निर्णय चुकीचा होता असे विरोधी पक्षांनी म्हटले.
• सुमारे पाचशे वर्षांपासून सुरू असलेला अयोध्या प्रश्न नोव्हेंबर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने संपुष्टात आला. अयोध्येतील संपूर्ण वादग्रस्त जागा रामलल्ला विराजमानला देण्यात आली व मशिदीसाठी अन्यत्र जागा देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. वाद मिटल्यानंतर रामजन्मभूमीवर भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभे करण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनही झाले.
• काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार भ्रष्टाचाराचे आरोप आणि बोटचेपे धोरणांमुळे टीकेचे धनी बनलेले असतानाच भाजपने गुजरातचे 2001 पासून मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांना 2014 मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवले. अब की बार, मोदी सरकार हा नारा देऊन देशभर धूमधडाक्यात प्रचार सुरू झाला आणि मोदी लाटेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने तीनशेपेक्षा अधिक जागा मिळवून केंद्रात बहुमताने सत्ता मिळवली. पाच वर्षांनंतर 2019 च्या निवडणुकीत तर भाजपला आणखीच मोठे यश मिळाले. एकट्या भाजपनेच तीनशेचा आकडा पार केला आणि रालोआला 350 पेक्षा अधिक जागा मिळून प्रचंड बहुमताने पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत आले.
• सप्टेंबर 2014 मध्ये आपल्या पहिल्याच प्रयत्नात भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला मंगळावर यान पाठवण्यात यश मिळाले. फेब्रुवारी 2017 मध्ये पीएसएलव्ही-सी 37 या एकाच रॉकेटच्या सहाय्याने तब्बल 104 उपग्रह अंतराळात सोडण्याचा नवा विश्वविक्रम इस्रोने केला. जुलै 2019 मध्ये भारताने चांद्रयान-2 ही मोहीम पार पाडली. चांद्रयान-1 प्रमाणे या यानात केवळ ऑर्बिटरच नव्हे तर विक्रम हे लँडर आणि प्रज्ञान हे रोव्हरही होते. लँडरला चांद्रभूमीवर सॉफ्ट लँडिंग करण्यात अपयश आले तरी ऑर्बिटरने चंद्राभोवती भ्रमण करीत अनेक नोंदी पृथ्वीवर पाठवून मोहिमेला यश दिले. 2022 मध्ये इस्रो भारताची पहिली मानवयुक्त अंतराळमोहीम गगनयान सुरू करणार आहे. त्यामध्ये भारतातच बनवलेल्या अंतराळयानातून भारतीय अंतराळवीर अंतराळाचा प्रवास करतील.
अवकाश घटना
2021 या वर्षात 4 ग्रहण, 11 उल्कावर्षाव, 3 धूमकेतू, युती-प्रतियुती, सुपरमून, ब्लॅक मून आणि ग्रह पाहण्याची संधी मिळेल. पृथ्वीजवळून सहा धोकादायक लघुग्रह जातील, अशी माहिती खगोल अभ्यासकांनी दिली.
• 2021 मध्ये केवळ 4 ग्रहण होणार असून, त्यात दोन चंद्र व दोन सूर्यग्रहण आहेत. भारतातून मात्र काही भागातून केवळ दोन ग्रहण पाहता येतील. 2021 मध्ये 18 धूमकेतू पृथ्वीजवळ येणार आहेत. त्यापैकी बहुतेक दुर्बिणीतून दिसतील. काही साध्या डोळ्याने दिसणार आहेत. 2 मार्च, 21 मार्च, 25 मे, 1 जून, 4 जुलै, 13 जुलै, 14 ऑगस्ट या काळात लघुग्रह पृथ्वीजवळ येणार आहेत. तर 2021 मध्ये 18 धूमकेतू पृथ्वीजवळ येतील. त्यापैकी बहुतेक दुर्बिणीतून दिसतील.
• काही साध्या डोळ्याने दिसतील. 27 मे रोजी 7 पी पॉन्स-विनेक हा धूमकेतू 15 जूनपर्यंत पृथ्वीच्या 0.44 एयू अंतरावर येईल तेव्हा त्याची तीव्रता 10/11 असेल. तो साध्या डोळ्याने दक्षिण गोलार्धातून दिसू शकेल. तर 27 सप्टेंबर, 9 नोव्हेंबर रोजीही धूमकेतू पृथ्वीजवळ येणार आहेत.