सिरो सर्वेक्षण

  • सिरो सर्वेक्षण

    सिरो सर्वेक्षण

    • 26 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 23 Views
    • 0 Shares
     सिरो सर्वेक्षण
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात आरोग्यया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात सिरो सर्वेक्षणव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (३) : मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
    १.४ आरोग्य -
        भारतातील आरोग्य सेवा यंत्रणा. भारतातील आरोग्यविषयक महत्त्वाची आकडेवारी.

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    सिरो सर्वेक्षण
    *   देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. कोरोनाच्या नवीन प्रकरणात घट झाली असून मृत्यूचे आकडेही दिवसेंदिवस कमी होत आहे. सरकार आता तिसर्या लाटेचा सामना करण्याची तयारी करत आहे. तिस-या लाटेचा परिणाम लहान मुलांवर अधिक होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. हे जाणून घेण्यासाठी, दिल्ली एम्सने चार राज्यांमधील ७०० मुलांवर सिरो सर्वेक्षण केले आहे, त्याचा निकाल दिलासा देणारा आहे. सिरो सर्वेक्षणात, लहान मुलांमध्ये प्रौढांसारखी सिरोपॉझिटिव्हिटी आढळली आहे. म्हणजेच, लहान मुले प्रौढांइतकीच संक्रमित झाली आणि त्यांच्यात अँटीबॉडीज निर्माण झाल्या आहेत.
     
        सिरो सर्वेक्षणाचे निकाल काय सांगतात?
     
    *   दिल्ली -IIMS ने WHO सह मिळून ५ ठिकाणी १५ मार्च ते १० जून या कालावधीत सिरो सर्वेक्षण केले. अगरतला, दिल्ली (शहरी आणि ग्रामीण), भुवनेश्वर आणि गोरखपूर येथे ४५०९ लोकांवर केलेल्या सर्वेक्षणात ७०० मुलांचा समावेश होता. देशातील हा पहिले सिरो सर्व्हे होता ज्यात लहान मुलांचादेखील समावेश होता. सर्वेक्षणात सामील झालेल्या ५५.७% मुलांमध्ये सिरोपॉझिटिव्हिटी आढळली. ती प्रौढांमध्ये ६३.% इतकी आहे. याचा अर्थ असा होतो की, बहुतेक मुलांमध्ये प्रौढांइतकेच अँटीबॉडीज आढळले. म्हणजेच जर देशात कोरोनाची तिसरी लाट आली तर ती मुलांसाठी इतकी घातक ठरणार नाही जेवढी त्याची भीती व्यक्त केली जात आहे.
     
        सिरो सर्वेक्षण म्हणजे काय?
     
    *   सिरो सर्वेक्षण सेरोलॉजी चाचणी करून केले जाते. यात रक्ताचा नमुना घेऊन तपासणी केली जाते. म्हणजेच एखाद्या विशिष्ट संसर्गाविरूद्ध बनवलेल्या अँटीबॉडीजची चाचणी केली जाते. जेव्हा एखादा व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती त्या विषाणूविरूद्ध प्रतिपिंडे (अँटीबॉडी) बनवते. हे अँटीबॉडी तुमच्या रक्तात सुमारे एक महिना राहतात. याचाच अर्थ म्हणजे जर तुमच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या असतील तर तुम्हाला अलीकडच्या काळात संसर्ग झाला असावा.
     
        सिरो सर्वेक्षण कसे केले जाते?
     
    *   सिरो सर्व्हेसाठी रँडम सॅम्पलिंग केले जाते. मागील वर्षी देशात पहिला सिरो सर्व्हे करण्यात आला होता, तेव्हा देशाचे दोन भागात विभाजन करण्यात आले होते. पहिल्या भागात, अशी शहरे किंवा जिल्हे होती जिथे संसर्ग दर सर्वाधिक होता. या शहरांमधील ५ कंटेन्मेंट झोन निवडले गेले. प्रत्येक कंटेन्मेंट झोनमधून १०-१० लोकांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते.
     
    *   दुसर्या भागात, जवळपास ६० जिल्हे आणि शहरे निवडली गेली, जी कोरोनाच्या पुष्टी झालेल्या घटनेच्या आधारे कमी, मध्यम आणि उच्च श्रेणींमध्ये विभागली गेली. या सर्व ठिकाणांमधील १० कंटेन्मेंट झोनमधून रक्ताचे नमुने घेण्यात आले. म्हणजेच, देशातील ब-याच भागातील वेगवेगळ्या वर्गातील लोकांचे नमुने घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे जेणेकरून अचूक आणि नेमके आकडे सापडतील.
     
        सिरो सर्वेक्षण किती महत्वाचे आहे?
     
    *   कोरोना साथीचा रोग वैद्यकीय जगात नवीन आहे. या आजाराविषयी शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांना आधीपासूनच कोणतीही माहिती नाही. म्हणूनच, साथीच्या रोगाशी संबंधित मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सिरो सर्वेक्षण केले जाते, जेणेकरून भविष्यात रोगाचा सामना करण्यासाठी एक रणनीती तयार केली जाऊ शकेल. सिरो सर्व्हेद्वारे शास्त्रज्ञ आणि डॉक्टर या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात.
     
    *   ज्या लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत, ते संसर्ग रोखण्यासाठी एखाद्या ढालीसारखे काम करतात. याला समुहाची रोग प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) असे म्हणतात. सिरो सर्वेक्षण याचा शोध घेण्यात मदत करते.
     
    *    सिरो सर्वेक्षणातून देशातील किती टक्के लोकसंख्येत अँटीबॉडी आहेत, याची माहिती मिळते. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा ६०-७०% लोकसंख्येमध्ये अँटीबॉडीज विकसित होतात, तेव्हा समूहाची रोग प्रतिकारशक्ती तयार होईल.
     
    *    देशातील कोणत्या भागात आणि कोणत्या वयोगटातील लोकांना जास्त संसर्ग होतो? किती लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि संक्रमित लोकांमध्ये अँटीबॉडी किती काळ राहतील?
     
        आतापर्यंत देशात किती सिरो सर्व्हे करण्यात आले आहेत आणि त्याचे निकाल काय आहेत?
     
    *   आयसीएमआरने मे २०२० मध्ये देशात पहिला सिरो सर्व्हे केला होता. यानंतर आणखी २ सिरो सर्व्हे करण्यात आले. शेवटचा सिरो सर्व्हे १७ डिसेंबर २०२० ते ८ जानेवारी २०२१ या काळातघेण्यात आला. या सर्वेक्षणातील निष्कर्षांमध्ये असे दिसून आले आहे की, देशातील २१.५% लोकसंख्या कोरोनाने संक्रमित झाली आहे. अद्याप ८०% लोकांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे.
     
    *   संपूर्ण देशभरात रँडम सॅम्पलिंगच्या आधारे हे सर्वेक्षण २८,५८९ जणांमध्ये करण्यात आले. पहिल्या सिरो सर्वेक्षणात केवळ १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचा समावेश होता. त्यानंतरच्या दोन्ही सर्वेक्षणांमध्ये १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांचा देखील समावेश होता. भिन्न शहरे आणि राज्यांनी देखील त्यांच्या स्तरावर सिरो सर्वेक्षण केले.

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 23