अण्वस्त्रांची संख्या

  • अण्वस्त्रांची संख्या

    अण्वस्त्रांची संख्या

    • 23 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 204 Views
    • 0 Shares
    अण्वस्त्रांची संख्या
     
        महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात आण्विक तंत्रज्ञानया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात अण्वस्त्र शस्त्रास्त्रांच्या विळख्यात जगव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (४) : विज्ञान व तंत्रज्ञान विकास

        राज्यसेवा (पूर्व) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    ३.५ भारताचे आण्विक  कार्यक्रम -
        प्रस्तावना, ठळक वैशिष्ट्ये, आवश्यकता, अलीकडील आण्विक धोरणे, आण्विक चाचण्या, आण्विक - औष्णिक वीज निर्मिती - तत्त्व, रचना, कार्य आणि पर्यावरण (आण्विक कचरा, अपघात)
        भारतातील आण्विक विद्युत निर्मिती केंद्र, आण्विक तंत्रज्ञानाचे उपयोग उदा. ग्राहक उत्पादने, अन्न आणि शेती उत्पादने, वैद्यकीय औषधे इत्यादी.

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    अण्वस्त्रांची संख्या
     
    *   दुसर्‍या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अमेरिकेने अण्वस्त्रे टाकून ही शहरे बेचीराख करत हे युद्ध संपुष्टात आणले. या घटनेने अण्वस्त्रांची संहारक क्षमता संपूर्ण जगाने अनुभवली. मात्र, असे असतानाही अण्वस्त्र सज्ज होण्यासाठी आज अनेक देशही झटत आहे.
     
    *   ईंटरनॅशनल कॅम्पेन टू बॉलिश न्यूक्लिअर वेपन्स (आयसीएएन) ही संस्था अण्वस्त्र कपात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करीत आहे. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना हवे तसे यश मिळाले नाही.
     
    *   स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (सीप्री) या जागतिक संस्था जगात अस्तित्वात असलेल्या अण्वस्त्रांची माहिती ठेवते. दर वर्षी ही संस्था आपला अहवाल प्रसिद्ध करत असते.
     
    *   १४ जून २०२१ रोजी स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (सीप्री) या संस्थेने आपला अहवाल प्रसिद्ध केला असून तो चिंताजनक आहे. गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीमुळे त्रस्त आहे. असे असतानाही जगातील प्रमुख ९ देशांनी त्यांच्या अण्वस्त्र संख्येत वाढ केली आहे. अमेरिका आणि रशिया या दोन देशांकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत. त्या खालोखाल चीन आणि पाकिस्तानचा क्रमांक लागतो. त्यानंतर फ्रान्स, ब्रिटन आणि भारताचा क्रमांक लागतो.
     
    *   स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (सीप्री) चा अहवाल २०२१  -
     
    १)  भारतासह जगातील ९ प्रमुख देशांकडे सुमारे १३, ४०० अण्वस्त्रे आहेत. रशिया, अमेरिका आणि चीन यांच्याकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत. अमेरिका आपले जागतिक वर्चस्व टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर चीन या प्रतिष्ठेला शह देऊन ते स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तर रशियाही आपली पूर्वीची प्रतिष्ठा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या संघर्षामुळे संपूर्ण जग आण्विक हल्ल्याच्या विळख्यात सापडले आहे.
     
    २)  रशियाकडे सर्वाधिक ६,२५५ अण्वस्त्रे आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत १२० अण्वस्त्रात रशियाने कपात केली.
     
    ३)  अमेरिकेकडे ५,५०० अण्वस्त्रे आहेत. अमेरिकेनेही त्यांच्या शस्त्रागारातील अण्वस्त्रांमध्ये २५० च्या संख्येने कपात केली.
     
    ४)  ब्रिटन, पाकिस्तान आणि चीनने त्यांच्या अण्वस्त्र शस्त्रागारात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ केली. ब्रिटनकडे २२५, फ्रान्सकडे २९०, चीनकडे ३५०, पाकिस्तानकडे १६५ अण्वस्त्रे आहेत.
     
    ५)  भारताकडे १५६, इस्राईलकडे ९० तर उत्तर कोरियाकडे ४० ते ५० अण्वस्त्रे आहेत.
     
    ६)  भारताने ‘सेकंड स्ट्राईक न्यूक्लिअर’क्षमता विकसित केली असली तरी चीन आणि पाकिस्तानकडील वाढती अण्वस्त्रे ही भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.
     
    *   तयार अवस्थेतील अण्वस्त्रे -
     
    १)  अमेरिकेकडे १८०० अण्वस्त्रे ही तयार अवस्थेत आहेत.
     
    २)  रशियाकडे १६२५ तयार अण्वस्त्रे आहेत. कुठल्याही क्षणी ती शत्रूवर डागता येईल अशा अवस्थेत ती आहेत.
     
    ३)  भारत, चीन, पाकिस्तानकडे अशी किती अण्वस्त्रे आहेत याची माहिती संस्थेला उपलब्ध होऊ शकली नसली, तरी ही संख्याही मोठी आहे.
     
    *   जागतिक अण्वस्त्र वापरापर्यंत जाण्याची शक्यता - जगात असलेली शीतयुद्धासारखी परिस्थिती मोठ्या संघर्षाचे रूप धारण करू शकते. हा संघर्ष अण्वस्त्र वापरापर्यंत जाण्याचीही शक्यता असल्याने संपूर्ण पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.
     
    १)  कोरोनाचा उगम चीनमधून झाला असल्याचा आरोप माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत होते. आता नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनीही चीनवर लक्ष साधत त्यांच्या गुप्तचर संस्थांना ९० दिवसांत याचा शोध घेण्याचे आदेश दिले आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापर युद्ध तर आहेच, तसेच दक्षिण चीन समुद्र आणि तैवान प्रश्नावरून सातत्याने संघर्ष सुरू आहे.
     
    २)  २०२० पासून चीनने भारताशी सीमावाद उकरून लडाख परिसरात मोठ्या प्रमाणात सैन्य जमवले. दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थिती आहे. चीनने त्यांची अत्याधुनिक शस्त्रे सीमेवर तैनात केली. भारतानेही चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी सीमेवर सैन्यव्यवस्था मजबूत केली. दोन्ही देशांत चर्चा सुरू असली, तरी तणाव निवळला नाही.
     
    ३)  आखाती देशात इस्राईल-पॅलेस्टाईनवरून संघर्ष सुरू आहे. इराण अण्वस्त्र सज्ज होण्यासाठी प्रयत्नशील आहे.
     
    ४)  २०२१ च्या जी-७ राष्ट्रांच्या बैठकीतही चीनला लक्ष करण्यात आले. त्याला चीननेही प्रत्युत्तर दिले.
     
    ५)  रशियातील ब्लादमिर पुतीन यांचे विरोधक असलेले लेक्सी नवेलनी आणि युक्रेन प्रश्नावरून अमेरिका आणि रशिया यांचा तणाव आहे. पुतीन आणि बायडेन यांची जिन्हेवा येथे बैठक झाली. यावर विस्तृत चर्चा झाली असली, तरी प्रत्येक मुद्यावर तोडगा निघाला असे नाही.
     
    ६)  चीनला शह देण्यासाठी भारत, जपान, अमेरीका आणि ऑस्ट्रेलिया यांनी क्वाड समूहाची स्थापना केली. यामुळेही तणावाचे वातावरण आहे.
     
    ७)  दुसर्‍या महायुद्धानंतर शीतयुद्धाच्या काळात अमेरिका सोव्हिएत रशिया यांच्यातील संघर्ष हा आण्विक युद्धापर्यंत येऊन ठेपला होता. मात्र, आण्विक प्ररोधनामुळे (न्यूक्लिअर डिटरन्स) यामुळे दोघांनीही एकमेकांवर हल्ला करण्याचे टाळले. सोव्हिएत रशियाच्या पतनानंतर हा संघर्ष कमी झाला. मात्र, चीन आणि रशिया यांच्यात नवे शीतयुद्ध सुरू झाले.
     
    सौजन्य व आभार : दैनिक लोकमत
    २० जून २०२१ / निनाद देशमुख

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 204