मोबाईलमधून होणारे उत्सर्जन

  • मोबाईलमधून होणारे उत्सर्जन

    मोबाईलमधून होणारे उत्सर्जन

    • 22 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 48 Views
    • 0 Shares
     मोबाईलमधून होणारे उत्सर्जन 
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात माहिती व दूरसंचार तंत्रज्ञानया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात  मोबाईलमधून होणारे उत्सर्जनव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (४) : विज्ञान व तंत्रज्ञान विकास

    ३.२ संगणक व माहिती तंत्रज्ञान :
        कम्युनिकेशन, नेटवर्किंग-वायर्ड / वायरलेस, इंटरनेट

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    मोबाईलमधून होणारे उत्सर्जन
     
    *   काहींच्या मते, मोबाईल टॉवर्समधून होणार्‍या उत्सर्जनाचा पशू-पक्ष्यांवर व मानवावर विपरीत परिणाम होतो; पण याचा ठोस पुरावा (प्रात्यक्षिकासकट) कोणीही सिद्ध करू शकलेले नाही. मोबाईल टॉवर हे मनुष्यासाठी हानिकारक नसल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
     
    *   सध्याच्या जागतिक न्यू नॉर्मलमध्ये तंत्रावलंबी (व्हर्च्युअल) जीवनपद्धती सर्वांच्या अंगवळणी पडली आहे. लहान बालकांपासून आबालवृद्ध संगणक, स्मार्टफोन अशी डिजिटल उपकरणे सहज हाताळत आहेत. मोबाईल तर जणू शरीराचा एक अवयवच झाल्यासारखी स्थिती आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून अधिकाधिक अ‍ॅप्स (मनोरंजन व ज्ञानप्राप्ती) वापरली जात आहेत. इलेक्ट्रॉनिक युगाच्या सुरुवातीपासून (सुमारे १९७०) गेल्या ४७ वर्षांत सर्वाधिक वेगाने प्रसार झालेले उपकरण म्हणजे सेलफोन होय. याबाबतीत त्याने संगणकाला केव्हाच मागे टाकले आहे. किंबहुना हँडसेटमध्येच आता परिपूर्ण संगणक समाविष्ट झाला आहे.
     
    *   आज जगाच्या ७ अब्ज लोकसंख्येपैकी ३४ टक्के लोक इंटरनेट वापरतात. भारतात ५० कोटीहून अधिक  सेलफोनधारक आहेत आणि त्यांची संख्या दरमहा ५० ते ६० लाखांनी वाढते आहे. जिओ-गुगलच्या ३० हजार कोटींच्या करारामुळे भारतात ५-जी तंत्रज्ञान विकासाला वेग येणार आहे. त्यामुळे इंटरनेटच्या सध्याच्या स्पीडमध्ये वाढ होणार आहे. या स्पीडमुळे हाय-डेफिनेशन मूव्हीज, मोठे सॉफ्टवेअर्स काही सेकंदात डाऊनलोड करणे शक्य होणार आहे. अर्थात, एखाद्या उपकरणाचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात आणि सातत्याने होऊ लागल्यावर, गेल्या काही वर्षांत, त्याच्याशी संबंधित असलेले विविध छुपे धोकेदेखील समोर येऊ लागले आहेत.
     
    *   मोबाईल टॉवर्समधून होणार्या उत्सर्जनाचा मुद्दा गाजतो आहे. काहींचे मत आहे की या उत्सर्जनाचा पशुपक्ष्यांवर व मानवावर विपरीत परिणाम होतो; पण याचा ठोस पुरावा (प्रात्यक्षिकासकट) कोणीही सिद्ध करू शकलेले नाही. उत्सर्जन ही अशी ऊर्जा आहे जी लाटा किंवा कणांच्या रूपात अंतराळातून प्रवास करते. हे नैसर्गिकरीत्या उद्भवते आणि सदैव असते.  मोबाईल फोनमधून उत्सर्जित होते ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. कॉल करण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी (आरएफ) लाटा  वापरतात.
     
    *   लॉकडाऊनच्या काळात मोबाईल वापर जोमात होता. अनेक ठिकाणी पक्षी परत आले जे पूर्वी येत नव्हते. याचा साधा अर्थ आहे की पक्ष्यांच्या स्थलांतराचा मोबाईलशी संबंध नसून हवेतील व ध्वनिप्रदूषणाशी आहे.
     
    *   उत्सर्जनामुळे ५-जी नको ही भीती अनाठायी आहे. अनेक प्रगत देशांनी व आफ्रिकेतही देशांनी देशांतर्गत ५-जी सेवेला परवानगी दिली आहे. प्रातिनिधिक यादी  इंग्लंड, जर्मनी, एस्टोनिया, इटली, लॅटव्हिया, स्पेन, स्विडन, स्वित्झर्लंड, उरुग्वे, त्रिनिनाद, ऑस्ट्रेलिया, चीन, दक्षिण कोरिया इत्यादी.
    *   २०१८ मध्ये बर्‍याच गृहनिर्माण संस्था मोबाईल टॉवरला परवानगी देत होत्या. कंपन्या त्यांच्या टेरेसवर टॉवर्स बांधत असत व भाडेही भरत असत; परंतु सिग्नल उत्सर्जनामुळे आरोग्यास होणार्‍या धोक्यांविषयीच्या बातम्यांमुळे, अनेक गृहनिर्माण संस्थांनी हे धोरण बंद केले हे एक कारण व सतत स्पर्धेमुळे होणार्‍या तोट्यामुळे कमी आर्थिक गुंतवणूक यामुळे अचानक टॉवर्सची कमतरता निर्माण झाली आहे. या सर्व कारणांमुळे भारत देश एक मोबाईल वापराच्या दर्जामध्ये मागे पडला आहे. कोट्यवधी मोबाईल वापरकर्ते कॉल ड्रॉप समस्येने त्रस्त झाले आहेत.
     
    *   वापरकर्त्यांच्या संख्येनुसार नवीन टॉवर उभारणे बंधनकारक करणे अत्यावश्यक आहे. नवीन सेल टॉवर्स जलदगतीने मंजुरीसाठी सरकार नवीन महसूल सामाईकरण तत्त्व (राज्य, स्थानिक संस्था) आखू शकते. यासाठी सरकारी इमारतीचा वापर (भाडेतत्त्वावर) केला जाऊ शकतो. त्याचबरोबर टॉवर्स बांधण्यासाठी डोंगराचा वापर करण्यास परवानगी दिली जावी. मोबाईल टॉवर हे मनुष्यासाठी हानिकारक नसल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी मोबाईल टॉवर बसविण्यासाठी परवानगी देणे जरूरी आहे.
     
    सौजन्य व आभार : दैनिक पुढारी
    १८ जून २०२१ / डॉ. दीपक शिकारपूर

Share this story

Total Shares : 0 Total Views : 48