सोयाबीनचा हमीभाव

  • सोयाबीनचा हमीभाव

    सोयाबीनचा हमीभाव

    • 22 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 48 Views
    • 0 Shares
     सोयाबीनचा हमीभाव
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात कृषी अर्थव्यवस्थाया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात सोयाबीनचा हमीभावव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (४) : कृषी अर्थव्यवस्था

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    *   कृषी मूल्य - कृषी मूल्यांचे विविध घटक आणि विविध कृषी उत्पादनावर परिणाम करणारे घटक, कृषी मालांच्या विविध शासकीय आधारभूत किंमती, केंद्रीय कृषी मूल्य आयोग.

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्यज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    सोयाबीनचा हमीभाव
     
    *   जून २०२१ मध्ये केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी नवीन हमीभाव जाहीर केले.
     
    *   खाद्यतेलांचे किरकोळ भाव दुप्पट झाल्यामुळे सरकारने आयात शुल्क कमी करण्याबरोबरच पुरवठा वाढण्यासाठी इतरही काही निर्णयांचा विचार चालू केला असल्यामुळे हमीभाव ठरवताना सोयाबीनला झुकते माप मिळणे अपेक्षित होते.
     
    *   तेलबिया आणि खाद्यतेल यांचा देशांतर्गत पुरवठा मोठय प्रमाणावर वाढवून या क्षेत्रातील आपली आयातनिर्भरता ६५ टक्क्यांवरून निदान ५० टक्क्यांवर टप्प्याटप्प्याने आणण्यासाठी कधी नव्हे एवढे प्रयत्न सरकारी आणि खासगी पातळीवरून होताना दिसत होते.त्यासाठी खरीप हंगामात तेलबियांखाली ६ लाख हेक्टर अतिरिक्त क्षेत्र आणण्याचा निर्धार व्यक्त केला गेला होता. यातून सुमारे १२ लाख टन अतिरिक्त तेलबियांचे उत्पादन अपेक्षित होते. या पाश्वभूमीवरदेखील खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनसाठी हमीभाव वाढ अधिक असेल असे वाटले होते. परंतु प्रत्यक्षात ती अत्यल्प आहे. सोयाबीनचा हमीभाव ३,८८० रुपये प्रति क्विंटलवरून ३,९५० रुपयांवर नेण्यात आला. म्हणजे ७० रुपये किंवा २ टक्क्यांहून कमी वाढ केली गेली.
     
    *   तिसर्‍या उत्पादन अनुमानामध्ये कडधान्यांचे उत्पादन विक्रमी २५ दशलक्ष टनांहून अधिक अंदाजित केल्यामुळे, तसेच आयात र्निबध कमी केल्याच्या पार्श्‍वभूमीवर तूर, मूग, उडीद इत्यादींसाठी हमीभावातील वाढ तुलनेने कमी राहील असेही वाटत होते. प्रत्यक्षात तूर आणि उडदासाठी हा भाव ३०० रुपयांनी वाढवून तो प्रत्येकी ६,३०० रुपये प्रति क्विंटलवर नेण्यात आला.
     
    *   शेंगदाणा अथवा भुईमूग पिकासाठी हमीभावात ५ टक्के वाढ करून ती ५,२७५ रुपयांवरून ५,५५० रुपयांवर नेण्यात आली. शेंगदाणा हे मुख्यत्वे गुजरातमधील पीक असून त्यामुळे या हमीभाव वाढीमागे राजकारण आणण्याचा प्रयत्न करेल. परंतु कमॉडिटी व्यापार हा देशस्तरावर होत असतो आणि मागणी पुरवठा या समीकरणांची व्याप्ती एका राज्यापुरती मर्यादित राहू शकत नाही. शेंगदाणा तेल हे सोयाबीनच्या तुलनेत महाग असल्यामुळे सामान्य माणसांचा ओढा सोयाबीन तेलाकडे असतो. म्हणून सोयाबीनकडे जास्त लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
     
    *   तेलबियांचे उत्पादन वाढवताना भाताखालील क्षेत्र कमी करून ते तेलबियांखाली वळवण्याचे प्रयत्न होण्यासाठी सार्वत्रिक एकमत झालेले असूनही हमीभावामध्ये त्याचे प्रतिबिंब पडलेले दिसत नाही. सोयाबीनबरोबर भाताचा हमीभाव देखील ७२ रुपयांनी वाढवला असला तरी टक्केवारीमध्ये ही वाढ सोयाबीनच्या दुप्पट म्हणजे ४ टक्के आहे.
     
    *   हमीभावांमधील विसंगतीनंतरही सोयाबीन खालील क्षेत्र चांगलेच वाढेल असे दिसून येत आहे. कारण सोयबीनची विक्रमी तेजी अजूनही टिकून राहिली असून भारतीय बाजारात सोयाबीन सध्या ६,६०० रुपयांवर आहे. पुढील काळातील बाजारांमधील भाव काय राहतील याबाबतची माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे म्हणा किंवा पारंपरिक विचारपद्धतीमधून बाहेर येण्यास तयार नसल्यामुळे म्हणा, परंतु शेतकरी मागील हंगामातील भाव बघून पीक निवड आणि पेरण्या करताना दिसतात. सोयाबीन तेजीमुळे अगदी तमिळनाडू आणि तेलंगणामध्येदेखील सोयाबीन उत्पादन वाढणार आहे. हीच स्थिती जागतिक बाजारात आहे. अमेरिका, अर्जेंटिना आणि ब्राझिलमधील उत्पादनवाढीच्या अंदाजानंतर इतरही देश सोयाबीनकडे वळले आहेत या परिस्थितीत उत्पादकांसाठी सोयाबीनमध्ये भाव जोखीमदेखील वाढणार आहे.
     
    सौजन्य व आभार : दैनिक लोकसत्ता
    १४  जून २०२१ / श्रीकांत कुवळेकर

Share this story

Total Shares : 0 Total Views : 48