पुलित्झर २०२१

  • पुलित्झर २०२१

    पुलित्झर २०२१

    • 22 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 84 Views
    • 0 Shares
     पुलित्झर २०२१
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात प्रसार माध्यमेया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात पुलित्झर २०२१ चे मानकरीव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (२) : भारतीय संविधान, राजकारण व कायदा

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    ९.  प्रसार माध्यमे :
        * मुद्रण व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे-जनमत तयार करणे व लोकजागृती करणे.

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    पुलित्झर पुरस्कार २०२१
     
    *   ११ जून २०२१ ला पुलित्झर पुरस्कार कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीतून झालेल्या ऑनलाईन सेमिनारमधून जाहीर करण्यात आले. त्यात २ भारतीय वंशाच्या पत्रकारांचा समावेश आहे. पुलित्झर पुरस्कार हा वृत्तपत्रीय लिखाण, वाङ्मय आणि सांगीतिक रचनेसाठी दिला जातो.
     
    *   चीनमधल्या मुस्लिमांच्या छळाबद्दल वृत्तांत लिहिणार्‍या मेघा राजगोपालन या भारतीय वंशाच्या महिला पत्रकारास २०२१ चा पुलित्झर पुरस्कार मिळाला.
     
    *  स्थानिक पत्रकारितेच्या विभागात भारतीय वंशांचे नील बेदी यांनी फ्लोरिडामध्ये सरकारी अधिकारी आणि लहान मुलांच्या तस्करीबाबत ‘टम्पा बे टाइम्स’साठी शोधपत्रकारिता केली होती. त्यासाठी त्यांना ‘पुलित्झर’  मिळाला.
     
    *   अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया युनिव्हर्सिटीकडून दरवर्षी पत्रकारिता, कला, संगीत आणि साहित्यासाठी २१ विभागांतून पुलित्झर पुरस्कार दिले जातात. यात १४ पुरस्कार पत्रकारितेसाठी, ६ साहित्य आणि एक संगीत क्षेत्रातल्या व्यक्तीला दिला जातो. सोबतीला ४ फेलोशिपही दिल्या जातात. या पुरस्कारांची निवड करण्यासाठी एक स्वतंत्र मंडळही असतं.
     
    *   १५ हजार डॉलर आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असतं. समाजसेवास्वरूप वृत्तपत्रीय लेखनासाठी एक सुवर्णपदकही असते.
     
    *   अमेरिकेतले पत्रकार जोसेफ पुलित्झर यांच्या नावाने गेल्या १०५ वर्षांपासून (१९१७) हे पुरस्कार दिले जात आहेत. १९०४ साली लिहिलेल्या जोसेफ पुलित्झर यांच्या मृत्युपत्रानुसार, लेखनास उत्तम प्रोत्साहन प्रदान करण्याच्या हेतूने हा पुरस्कार सुरू झाला.
     
    पुलित्झर २०२१ चे मानकरी
     
    १)  पत्रकारिता -
        ब्रेकिंग न्यूज रिपोर्टिंग  - स्टार ट्रिब्यून, मिनियापोलिस
        शोध पत्रकारिता - मैट रोशेलु, वेरनल कोलमैन, लॉरा क्रिमाल्डी, एवान एलन, द बोस्टन ग्लोबचे ब्रेंडन मैकार्थी
     
    २)  व्याख्यात्मक रिपोर्टिंग - अटलांटिकचे एड योंग; एंड्रयू चुंग, लॉरेंस हर्ले, एंड्रिया जानुटा, जैमी डोडेल, रॉयटर्सचे जैकी बॉट्स
     
    ३)  स्थानिक  रिपोर्टिंग - टॅम्पा बे टाइम्सच्या कैथलीन मैकग्रोरी व नील बेदी
     
    ४)  राष्ट्रीय रिपोर्टिंग म्- मार्शल प्रोजेक्टचे कर्मचारी, एएल डॉटकॉम, बर्मिंघम; इंडीस्टार, इंडियानापोलिस
     
    ५)  अंतरराष्ट्रीय रिपोर्टिंग - मेघा राजगोपालन, एलिसन किलिंग व बज़फीड न्यूज न्यूयॉर्कचे क्रिस्टो बुशचेक
     
    ६)  फीचर लेखन - नादजा ड्रोस्ट, फ्रीलांस योगदानकर्ता, द कैलिफोर्निया संडे मैगज़ीन; मिशेल एस जैक्सन,
     
    ७)  कॉमेंटरी - रिचमंड टाइम्स डिस्पैचचे माइकल पॉल विलियम्स
     
    ८)  समीक्षा - द न्यूयॉर्क टाइम्सचे वेस्ली मॉरिस
     
    ९)  संपादकीय लेखन -लॉस एंजिल्स टाइम्सचे रॉबर्ट ग्रीन
     
    १०) संपादकीय कार्टूनिंग - एन/ए
     
    ११) ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफी - एसोसिएटेड प्रेसचा फोटोग्राफी स्टाफ
     
    १२) फीचर फोटोग्राफी - एसोसिएटेड प्रेसच्या एमिलियो मोरेनाटी
     
    १३) ऑडियो रिपोर्टिंग - लिसा हेगन, क्रिस हैक्सेल, ग्राहम स्मिथ और नेशनल पब्लिक रेडियोचे रॉबर्ट लिटिल
     
    १४) लोक सेवा  -द न्यूयॉर्क टाइम्स
     
    १५) नाटक -कटोरी हॉल लिखित  द हॉट विंग किंग
     
    १६) इतिहास -फ्रैंचाइज: द गोल्डन आर्चेस इन ब्लैक अमेरिका मार्सिया चेटेलैन
     
    १७) चरित्र -द डेड आर अराइजिंग: द लाइफ ऑफ मैल्कम एक्स लेट लेस पायने ,  तमारा पायने (लाइवराइट/ नॉर्टन)
     
    १८) कादंबरी - द नाइट वॉचमैन लुईस एर्ड्रिच (हार्पर)
     
    १९) कविता -नताली डियाज लिखित उत्तर औपनिवेशिक प्रेम कविता (ग्रेवॉल्फ प्रेस)
     
    २०) जनरल नोटिफिकेशन -विलमिंगटन लाई: द मर्डरस कूप ऑफ १८९८ एंड द राइज ऑफ व्हाइट सुपरमेसी डेविड जुचिनो (अटलांटिक मंथली प्रेस)
     
    २१) संगीत - तानिया लियोन द्वारा स्ट्राइड (पीरम्यूजिक क्लासिकल)
     
    *   २०२१ च्या पुरस्कारांत बहुतेक जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येनंतर उसळलेल्या चळवळीचं आणि कोरोना साथरोगाचं वृत्तांकन करणारे पत्रकार आहेत. विजेत्यामध्ये ‘न्यूयॉर्क टाइम्स’सोडल्यास अनेक स्थानिक संस्थांमध्ये किंवा फ्रीलान्सर म्हणून काम करणारे पत्रकार आहेत.
     
    *   ब्रेकिंग न्यूज रिपोर्टिंगमध्ये जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येची ब्रेकिंग न्यूज देणार्या ‘द स्टार ट्रिब्युन’च्या कर्मचार्यांना मिळाला.
     
    *   एक्सप्लेनेटरी रिपोर्टिंगमध्ये एका व्हायरसनं जगातल्या सगळ्यात मोठ्या देशाला कसं भाग पाडलं, हे सांगणार्या ‘द अटलांटिक’च्या एड याँग यांना पुरस्कार मिळाला. याशिवाय, पोलिसांच्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे दरवर्षी मृत्युमुखी पडणार्या हजारो लोकांचं गार्हाणं मांडणारं मार्शल प्रोजेक्टच्या कर्मचार्यांचं वृत्तांकन राष्ट्रीयस्तरावर नावाजलं गेलं.
     
    *   आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या वृत्तांकनासाठी  भारतीय वंशाच्या मेघा राजगोपालन यांच्यासोबत अ‍ॅरिसन किलिंग आणि चेरिस्टो बुशेक यांना पुरस्कार मिळाला. न्यूयॉर्कच्या बझफिड न्यूजमधून या तिघांची सॅटेलाईटचे फोटो आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून तयार केलेली लेखमाला प्रसिद्ध झाली होती. रिएज्युकेशन कॅम्पच्या नावाखाली चिनी सरकारने मुस्लिमांना कैद करण्यासाठी उभारलेल्या तुरुंगाचं वृत्तांकन या लेखमालेत आहे.
     
    *   फोटो जर्नालिझममध्ये यावेळी ब्लॅक लाईव्ज मॅटर चळवळीदरम्यान काढलेल्या फोटोंनीच बाजी मारली. याशिवाय एका पत्रकाराचाही खास उल्लेख करून ‘पुलित्झर’ देण्यात आला. जॉर्ज फ्लॉईडची हत्या होत असताना शेजारून जाणार्‍या डार्नेला फ्रेजियर या १८ वर्षांच्या मुलीनं पटकन घटनेचा व्हिडीओ शूट केला. तिच्या एका व्हिडीओमुळेच ब्लॅक लाईव्ज मॅटर ही चळवळ जगात सगळीकडे चालू झाली. सामान्य नागरिकांची पत्रकारितेतली भूमिका किंवा सिटिझन जर्नालिझम किती महत्त्वाचं आहे, हे अधोरेखित करण्यासाठी हा पुरस्कार तिला दिला.
     
        पुलित्झर पुरस्कार मिळालेले भारतीय -
     
    *   चन्नी आनंद, यासीन दार, मुख्तार खान - या तीन भारतीय फोटोग्राफरना फिचर फोटोग्राफीसाठी २०२० चा ‘पुलित्झर’ देण्यात आला. २०१९ मध्ये भारतात ३७० कलम रद्द करून काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला आणि तिथे कर्फ्यू लावला. या कर्फ्यूचं, तिथल्या परिस्थितीचं त्यांनी चित्रण केले होते.
     
    *   गोविंद बिहारीलाल - हे बर्कले येथील कोलंबिया विद्यापीठात शिकत होते. नंतर ते सॅनफ्रान्सिस्को एक्झॅमिनरमध्ये विज्ञान संपादक झाले. त्यांना १९३७ मध्ये पत्रकारितेत पुलित्झर पुरस्कार मिळाला.
     
    *   झुंपा लहिरी - भारतीय वंशाच्या झुंपा लाहिरी यांना ’इंटरप्रीटर्स ऑफ मेलडीज’ या पुस्तकासाठी ’कादंबरी’ गटात हा पुरस्कार २००० मध्ये मिळाला. त्यांच्या ’द नेमसेक’ या कादंबरीवर मीरा नायर यांनी चित्रपट काढला. त्या बंगाली वंशाच्या असून सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या कला व मानवविद्या समितीच्या सदस्या आहेत.
     
    *   गीता आनंद - या भारतीय वंशाच्या पत्रकार असलेल्या महिलेस २००३ मध्ये ’पॉम्प डिसीज अ मस्क्युलर कंडिशन’ या मालिकेसाठी हा पुरस्कार मिळाला. त्यावर नंतर ’एक्स्ट्रॅऑर्डिनरी मेझर्स’ हा चित्रपट निघाला.’बोस्टन ग्लोब’मध्ये त्या पत्रकारिता करीत होत्या.
     
    *   सिद्धार्थ मुखर्जी - हे कर्करोगाचे डॉक्टर असून त्यांनी त्या रोगावर संशोधन केले आहे. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. स्टॅनफर्ड विद्यापीठाचे ते पदवीधर असून ’र्‍होडस स्कॉलर’ म्हणून नावाजले गेले आहेत. त्यांना ’नॉन फिक्शन’ गटात ’द एम्परर ऑफ ऑल मेलडीज- अ बायोग्राफी ऑफ कॅन्सर’ या पुस्तकासाठी २०११ मध्ये पुलित्झर पुरस्कार मिळाला.
     
    *   विजय शेषाद्री - एक भारतीय वंशाचे पत्रकार. यांना ’थ्री सेक्शन्स’ या काव्यसंग्रहासाठी २०१४ साली पुलित्झर पारितोषिक मिळाले आहे. शेषाद्री न्यूयोर्कमधील एका महाविद्यालयात कविता आणि काव्यशास्त्र शिकवतात. गेलीदोन दशके शेषाद्रींचे नाव अमेरिकी कविजगतात प्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्यालेखनाची सुरुवात ’न्यूयॉर्कर’ या वृत्तपत्रातून मुद्रितशोधक म्हणून केली होती. अमेरिकेतील ट्विन टॉवर्स पडल्यानंतर शेषाद्री यांच्या त्या विषयावर लिहिलेल्या ’डिसपिरन्सेस’ या कवितेने त्यांचे नाव जगभरात गेले.
     
    सौजन्य व आभार :  दैनिक पुढारी
    १९ जून २०२१ / रेणुका कल्पना

Share this story

Total Shares : 0 Total Views : 84