युनिकॉर्न कंपन्या

  • युनिकॉर्न कंपन्या

    युनिकॉर्न कंपन्या

    • 16 Jun 2021
    • Posted By : vaishali
    • 55 Views
    • 0 Shares
     युनिकॉर्न कंपन्या
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात उद्योग व सेवा क्षेत्र या घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सद लेखात स्टार्ट अप्सचे अब्जाधीश किमयागारव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (४) : भारतीय अर्थव्यवस्था

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
    २.६ उद्योग व सेवा क्षेत्र :
        आर्थिक आणि सामाजिक विकासातील उद्योगांचे महत्त्व व भूमिका, वृद्धीचे स्वरूप
        भारत व व्यवसाय सुलभता.
        भारतातील सेवा क्षेत्राची रचना व वृद्धी

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्यज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    स्टार्ट अप्सचे अब्जाधीश किमयागार
     
    *   आपल्या देशातील २० ते २४ या वयोगटातील तरुणांची संख्या ११ कोटींच्या घरात असून, या डेमोग्राफिक डिव्हिडंडचा फायदा स्टार्ट अप संस्कृतीला होत आहे. वयाच्या तिशीत भारतीय युवा उद्योजक आपल्या नावीन्यपूर्ण कल्पनेच्या भांडवलावर अब्जाधीश बनत आहेत. वाढत्या संख्येने स्टार्ट अप कंपन्यांना युनिकॉर्नचा दर्जा प्राप्त होत आहे.
     
    *   ज्या स्टार्ट अप्स्चे मूल्यांकन एक अब्ज डॉलर्स किंवा त्याहून अधिक म्हणजे साधारणत: ७३०० कोटी रुपये आहे, त्यांना युनिकॉर्नचा मानाचा दर्जा प्राप्त होतो. अशा युनिकॉर्नची संख्या भारतात वाढत आहे. २०२१ च्या पहिल्या शंभर दिवसांत १० स्टार्ट अप कंपन्यांनी हा मान पटकावला. गेल्या वर्षात ११ स्टार्ट अप कंपन्यांना हा दर्जा मिळाला होता. यंदा हा आकडा १४ च्या पुढे जाईल, असा अंदाज आहे.
     
    *   ‘सुपर फाऊंडर्स : व्हॉट डाटा रिव्हील्स अबाऊट बिलियन डॉलर स्टार्ट अप’ या अली तमासेब यांच्या  संशोधनपर पुस्तकात नवउद्योजकांच्या असाधारण कामगिरीचे जे चित्र उभे केले आहे, ते युवा पिढीविषयी अपेक्षा उंचावणारे आहे. यात १ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक मूल्यांकन असलेल्या २०० हून अधिक युनिकॉर्न स्टार्ट अप्सचा अभ्यास करण्यात आला. या पुस्तकानुसार गेल्या १५ वर्षांत या युनिकॉर्न कंपन्यांच्या संस्थापक नवउद्योजकाचे सरासरी वय कंपनी स्थापनेच्या वेळेस ३४ होते. ज्या उद्योगात त्यांनी मोठी उलथापालथ (डिसरप्शन) घडवून आणली, त्याचा बहुसंख्यांना थेट कामाचा अनुभवदेखील नव्हता. यातील निम्म्याहून अधिक कंपन्या त्यांच्या स्थापनेवेळी असलेल्या त्यांच्या क्षेत्रातील असंख्य कंपन्यांशी जोरदार स्पर्धा करीत होत्या.
     
    *   ‘मिंट’ या अर्थविषयक इंग्रजी दैनिकाने विविध क्षेत्रांतील युनिकॉर्न दर्जा प्राप्त शंभर कंपन्यांच्या नवउद्यमींची जी पाहणी केली तीही बरीच बोलकी आहे. या यशस्वी तरुणांनी नव कल्पनांवर आधारित आपल्या उद्योगाची स्वप्ने विशीत पाहिली, अशी ही पाहणी सांगते. उदाहरणाथर् ओयो ही हॉटेल साखळी उभा करणारा रितेश आगरवाल हा वयाच्या विशीत या संकल्पनेचा पाठपुरावा करीत होता. ‘अनअ‍ॅकॅडमी’ची उभारणी करणारा गौरव मुंजाळ कंपनी स्थापनेच्या वेळी २४ वर्षांचा होता. या शंभर स्टार्ट अप्स्मधील १४ उद्योजक पंचविशीच्या आतले आहेत आणि तेवढ्याच संख्येचे २५ ते ३० वयोगटातील आहेत. चाळिशीनंतर असे धाडस करणारा त्यात एकच आढळला.
     
        बिल गेट्स आणि झुकेरबर्ग -
     
    *   आपली स्वत:ची कंपनी सुरू करण्याचा ध्यास घेतलेले मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग यांनी वयाच्या १९ व्या वर्षी हार्वर्ड विद्यापीठातील शिक्षण अर्धवट सोडले आणि या ड्रॉप आऊटस्नी आपली स्वप्ने पूर्ण केली.
     
    *   अ‍ॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज हे कंपनी स्थापन करताना २१ वर्षांचे होते.
     
    *   अमेझॉनचे जेफ बेझोस आणि टेस्ला या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनीचे सीईओ एलॉन मस्क या दोघांमध्ये जगातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत अव्वल राहण्याची स्पर्धा सुरू आहे. त्यांनी आपला उद्योग सुरू केला, त्यावेळी ते वयाच्या तिशीतच होते. एकूण वयाचा, पदवीचा आणि यशाचा पूर्वीचा समज या पिढीने खोडून काढल्याचे यावरून स्पष्ट होते.
     
    *   मिंटच्या पाहणीतील शंभरपैकी तीन चतुर्थांश नवउद्योजक भारतातील आयआयटी, आयआयएम किंवा अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात शिकल्याचे आढळले. या क्षेत्रात यश संपादन करण्याचा मोठा आधार उच्च्च शिक्षणाचा आहे हेच यातून अधोरेखित होते. त्यामुळे बिल गेट्स आणि झुकेरबर्ग सारखे उद्योगपती अपवाद आहेत.
     
        युनिकॉर्न : भारत तिसर्‍या स्थानावर -
     
    *   युनिकॉर्नचा विचार करावयाचा झाल्यास जागतिक पातळीवर भारताचे स्थान अमेरिका आणि चीनपाठोपाठ तिसर्या क्रमांकावर आहे. या निकषावर आपण इंग्लंड आणि जर्मनीच्याही पुढे आहोत.
     
        ओयो मॉडेल -
     
    *   ज्यांच्याकडून या क्षेत्रात येऊ इच्छिणार्यांनी प्रेरणा आणि स्फूर्ती घ्यावी, अशा काही मोजक्या नावात ओयोच्या रूपाने हॉटेलची साखळी उभ्या करणार्या रितेश आगरवाल यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. कोरोनामुळे हॉटेल व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला, त्याची झळ त्यांच्याही व्यवसायाला बसली. या उद्योगाचे मूल्यांकन ४५०० कोटींचे होते. पण, कोरोनाने त्यात ४० टक्के घट होऊन ते ३ हजार कोटींवर आले.
     
    *   कायली जेनर या अमेरिकन महिला उद्योजिकेनंतर जगातील दुसरा तरुण सेल्फ मेड बिल्यनिअर म्हणून रितेश यांचे नाव घेतले जाते. ते मूळचे ओडिशातील रायगड जिल्ह्यातील. त्यांचे बालपण  हलाकीच्या स्थितीत गेले. पुढे नवी दिल्लीत गेल्यावर इंडियन स्कूल ऑफ बिझनेस फायनान्समध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता; पण उद्योग सुरू करण्याच्या ध्यासापोटी त्यांनी हे शिक्षण अर्धवट सोडून दिले. आयुष्यात संघर्ष करीत असतानाच्या काळात या तरुणाने त्याच्या परिसरातील व्यवसाय करण्यात अपयशी ठरलेल्या एका हॉटेलची दुरवस्था पाहिली. त्यावरून त्याला या व्यवसायाची कल्पना सुचली. हॉटेल मालकाला भेटून त्याने हे हॉटेल मी बदलवून उत्तम चालेल, असे करून देतो, याची हमी दिली. त्याने खोल्यांमधील लाईट बल्ब, बेडस, भिंतीवर पिक्चर फ्रेम्स, रूम सर्व्हिस, इंटरनेटवर हॉटेलच्या आधुनिक रूपातील फोटो इत्यादींमधून त्याचा कायापालट केला. त्याचे नवे ओयो हॉटेल असे नामकरण करून आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. हा फॉर्म्युला यशस्वी ठरला आणि मोडकळीला आलेल्या या हॉटेलचा व्यवसाय तेजीत गेला. ओयो मॉडेलमध्ये हॉटेलची मालकी या कंपनीकडे नसते. ही कंपनी हॉटेलांशी करार करून काही रूम्स आपल्याकडे घेते. ज्यांना ओयो सेवा हवी असेल, त्यांना त्या दिल्या जातात. ब्रॅड नसलेल्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न इथे केला जातो.
     
    *   सॉफ्टवेअरची आवड असणार्या रितेशने वयाच्या आठव्या वर्षी कोडिंग शिकून घेतले. वयाच्या १३ व्या वर्षी त्याने सीमकार्ड आणि ग्राहकोपयोगी वस्तू विकल्या. वयाच्या १७ व्या वर्षी एअर बीएनबीच्या धर्तीवर त्याने ओरावेल ट्रॅव्हल्स ही कंपनी सुरू केली. बजेट हॉटेल्सच्या समस्या समजावून घेण्यासाठी देशभर प्रवास करताना त्याला या समस्या मोठ्या असल्याचे जाणवल्यामुळे त्याने या कंपनीचे रूपांतर ओयो रूम्समध्ये केले. पुढे ही कंपनी ‘ओयो’ म्हणून प्रस्थापित केली.
     
        अनअ‍ॅकॅडमी -
     
    *   अनअ‍ॅकॅडमी या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफार्म स्टार्ट अपचे सहसंस्थापक आणि सीईओ गौरव मुंजाळ (वय ३१) यांनी आपल्या ३० व्या वाढदिवसाच्या आत आपल्या कंपनीला युनिकॉर्नचा दर्जा प्राप्त करण्याचा जो निर्धार केला होता, तो त्यांनी गेल्या वर्षी प्रत्यक्षात आणून दाखविला. आता या कंपनीचे मूल्यांकन २ अब्ज डॉलर्सच्या पुढे गेलेले आहे. आयएएस असलेले रोमन सैनी आणि हिमेश सिंग या आपल्या राजस्थानच्या मित्रांच्या साहाय्याने अनअ‍ॅकॅडमी २०१५ मध्ये नोंदली गेली. आजमितीला ४ कोटी विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेतात. पैसे देऊन त्याचा लाभ घेणार्यांची संख्या ४ लाखांवर आ. १५ हजारांवर शिक्षक ऑनलाईन ट्युटोरिअल क्लासेस घेतात. गौरव मूळचे जयपूरचे असून ते मुंबईच्या कॉलेजचे बी टेक पदवीधर आहेत.
     
        बायजू -
     
    *   कोरोनाच्या कठीण काळातही आपला उद्योग वाढवून तो नव्या उंचीवर नेणार्‍या बायजूचे रवींद्रन यांचाही असामान्य तरुण अब्जाधीशांमध्ये उल्लेख करायला हवा. बायजू या लर्निंग अ‍ॅपचे संस्थापक आणि सीईओ असलेल्या या उद्योजकाने वयाच्या ३६ व्या वर्षी २०१५ मध्ये आपला भाऊ आणि त्याची पत्नी यांच्या मदतीने किंडरगार्डनपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या अ‍ॅपच्या माध्यमातून  ऑनलाईन व्यासपीठावर आणले. शिक्षकी पेशात असणार्‍या या तरुणाने या अ‍ॅपची निर्मिती २०११ मध्येच केली होती. त्यानंतरच्या दुसर्‍या वर्षात फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिशिला चॅन यांच्या लिमिटेड लायेबिलिटी कंपनीकडून मोठी गुंतवणूक त्यांच्या कंपनीत केली गेली. २०१९ मध्ये फोर्ब्ज इंडियाच्या श्रीमंताच्या यादीतही त्यांना (७२ वे) स्थान प्राप्त झाले. ११.१ अब्ज डॉलर्सचे मूल्यांकन असलेल्या या कंपनीचा शाहरूख खान ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर आहे. टेन्सेंट आणि अब्जाधीश असलेल्या राजन पै यांच्याकडूनही यात गुंतवणूक करण्यात आली आहे. देशातील किमान ४ कोटी विद्यार्थी बायजू अ‍ॅप वापरतात. आई-वडील शिक्षक असलेल्या बायजू यांचे शिक्षण मल्याळी माध्यमातून झाले. त्यांनी शिपिंग कंपनीत इंजिनिअर म्हणूनही काम केले. ऑनलाईन शिक्षणातील आकाशसह अनेक कंपन्याही या कंपनीने खरेदी केल्या. बायजूच्या सहसंस्थापक दिव्या गोकुलनाथ (वय ३५) या  बीटेक असून त्यांची नेट वर्थ १८०० कोटी रुपयांची आहे.
     
        पेटीएम -
     
    *   पेटीएमचे तरुण संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा (वय ४१) यांची यशोगाथा स्फूर्तिदायी वाटावी अशीच आहे. त्यांचे वडील अलिगडचे आणि तेही शिक्षकी पेशातील. विसाव्या वर्षी २००० मध्ये त्यांनी पेटीएमच्या वन ९७ कम्युनिकेशन्स या मूळ कंपनीची स्थापना केली. ही कंपनी सुरुवातीला स्मार्टफोनवर क्रिकेटचा स्कोअर, रिंगटोन्स, विनोद, परीक्षांचे निकाल आदी बाबी देत असे. २०११ मध्ये त्यांनी पेटीएमचा प्रारंभ केला. २०१६ मधील नोटाबंदीमुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली तरी या उद्योजकाला मात्र या योजनेचा मोठा लाभ झाला. कारण, त्या काळापासून ऑनलाईन पेमेंटमध्ये वाढ झाली. २०१८ मध्ये वॉरन बफे यांच्या बर्कशायर हाथवेने त्यात ३० कोटी डॉलर्स (सुमारे २०१९ कोटी रुपये) गुंतविले. आता पेटीएम अ‍ॅप केवळ मोबाईल पेमेंट सुविधा देणारी मर्यादित कंपनी न राहता ई कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी झाली असून त्याचे श्रेय शर्मा यांना जाते. कंपनी देशातील सर्वात मोठ्या आकाराचा (३ अब्ज डॉलर्स म्हणजे २१ हजार कोटी रुपयांचा) आयपीओ चालू वर्षात आणण्याच्या तयारीत आहे. सॉफ्ट बँक आणि अलिबाबा यांच्या पाठबळावरील या कंपनीचे मूल्यांकन १६ अब्ज डॉलर्सचे (११२८ अब्ज रुपये) असून ते २५ ते ३० अब्ज डॉलर्सवर नेण्याचा कंपनीचा निर्धार आहे.
     
        एफ मीडिया डॉट नेट -
     
    *   एफ मीडिया डॉट नेटचे संस्थापक दिव्यांक तुरखिया यांची संपत्ती (नेट वर्थ) १३ हजार कोटींची असून ते ३९ वर्षांचे आहेत. आपले बंधू भाविनबरोबर त्यांनी १२ कंपन्या स्थापन केल्या. हे दोघे विशीच्या आत लक्षाधीश झाले होते. मुंबईत मध्यमवर्गीय जैन कुटुंबात जन्म घेतलेल्या या बंधूंनी फोर्ब्जच्या २०१६ च्या भारतातील पहिल्या शंभर श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळविले.
     
        झोमॅटो -
     
    *   झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपनीचे यशही असेच नेत्रदीपक आहे. पंजाबमधील दीपिंदर गोएल (वय ३८) यांनी पंकज चढ्ढा या मित्राच्या मदतीने ही स्टार्ट अप कंपनी २००८ मध्ये सुरू केली असून तिचा विस्तार आता २४ देशांमध्ये झाला आहे. इंटिग्रेटेड मॅथ्स आणि कंम्पुटिंगमध्ये एम टेक केलेल्या दीपिंदर यांनी सुरू केलेल्या कंपनीने लॉकडाऊन काळात लाखो लोकांना रेस्टॉरंटमधील अन्नपदार्थ घरी पोहोचविले. आज या कंपनीचे मूल्यांकन ५.४ अब्ज डॉलर्स (३९४.२ अब्ज रुपये) आहे. आता ही कंपनी १.१ अब्ज डॉलर्सचा म्हणजे ८२५० कोटी रुपयांचा आयपीओ बाजारात आणणार आहे.
     
        नावीन्यतेवर अधिक भर -
     
    *   स्टार्ट अप्सचा हब म्हणून भारताची ओळख जगाच्या कानाकोपर्यात अधिक पक्की होण्यामागे आपल्या देशातील अशा तरुण उद्योजकांच्या नावीन्यपूर्ण इनोव्हेटिव्ह कल्पनांचे भांडवल आहे. आपल्या देशात  वर्षाला  अशा किमान ३ हजार  कंपन्या नोंदविल्या जातात. स्टार्ट अप इंडियाच्या आकडेवारीनुसार १ लाख ३७ हजार ६४० नोंदणीकृत स्टार्ट अप्स् आपल्याकडे आहेत.
     
    *   आपल्या देशातील २० ते २४ या वयोगटातील तरुणांची संख्या ११ कोटींच्या घरात असून या डेमोग्राफिक डिव्हिडंडचा फायदा स्टार्ट अप संस्कृतीला होत आहे.
     
    *   जॉब सीकर होण्याऐवजी जॉब क्रिएटर होण्याचे स्वप्नही या निमित्ताने अंशत: पूर्ण होताना दिसते. स्टार्ट अपचे यश प्रामुख्याने उद्योगाच्या नावीन्यपूर्ण कल्पनेवर आधारित असते.
     
    *   नावीन्यता म्हणजेच इनोव्हेशनमध्ये जागतिक क्रमवारीत भारताचा  २०१५ मध्ये ८१ वा क्रमांक होता. २०१७ मध्ये त्यात सुधारणा होत तो ६० वर आला. २०२० मध्ये त्यात आणखी प्रगती होऊन हा ४८ वा झाला.
     
    *   आपल्या देशाला ५ लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठायचे असेल तर नावीन्यतेच्या निकषाला पर्याय नाही.
     
    *   २०१५ पासून २०२० पर्यंत भारतात २५० अब्ज डॉलर्सची जी थेट परकीय गुंतवणूक झाली, त्यापैकी सुमारे ७५ टक्के म्हणजे १८४ अब्ज डॉलर्स गुंतवणूक ही व्हेंचर कॅपिटल आणि खासगी इक्विटी फंडिंगच्या माध्यमातून झाली आहे. याचा अर्थ हा ७५ टक्के निधी अनलिस्टेड स्टार्ट अप्स् आणि वाढीची क्षमता असणार्या या नवउद्योजकांच्या कंपन्यांत गुंतवला गेला. त्याला केवढे मोठे आर्थिक पाठबळ मिळत आहे, हे यावरून लक्षात येईल. म्हणूनच उद्योग क्षेत्रातील धुरिणांना’ भारतीय युनिकॉर्न कंपन्या निर्माण होणे, हे आता दुर्मीळ असणार नाही.
     
    *   युनिकॉर्नबरोबर ३ डेकाकॉर्न्सही (१० अब्ज डॉलर्सहून अधिक मूल्यांकन असलेले स्टार्ट अप्स्) भारतात तयार झाले आहेत. अशा आश्वासक वातावरणात सर्वच नवउद्योजकांना सुरक्षा कवच पुरविणे आणि त्यांच्या समस्या सोडविणे ही जबाबदारी सरकारची आहे..
     
        आणखी काही अब्जाधीश -
     
    १)  शमशीर वायालील : संस्थापक, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक व्हीपीएस हेल्थ ग्रुप, मूळ केरळचे, रेडिओलॉजिस्ट, ४ देशांत २३ हॉस्पिटल्स, वय ४४, नेट वर्थ ९९८२ कोटी रुपये.
     
    २)  रंजन पै : मणिपाल एज्युकेशन अँड मेडिकल ग्रुपचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक, व्यवसायाने डॉक्टर, ६ कॉलेजेस आणि १६ हॉस्पिटल्सची उभारणी, वय ४८, नेट वर्थ ११,४०९ कोटी रुपये.
     
    ३)  आचार्य बालकृष्ण : सहसंस्थापक, सीईओ आणि व्यवस्था
     
    सौजन्य व आभार : दैनिक पुढारी
    १२ जून २०२१ / डॉ. योगेश प्र. जाधव

Share this story

Total Shares : 0 Total Views : 55