नरेटिव्ह वॉरफेअर

  • नरेटिव्ह वॉरफेअर

    नरेटिव्ह वॉरफेअर

    • 15 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 47 Views
    • 0 Shares
     नरेटिव्ह वॉरफेअर
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात प्रसार माध्यमया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात चीनचे नॅरेटिव्ह वॉरफेअरव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (२) : भारतीय संविधान, राजकारण व कायदा

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक  -

    ९.  प्रसार माध्यमे :
    *   मुद्रण व इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे - धोरण निर्धारणावर त्यांचा होणारा परिणाम, जनमत तयार करणे व लोकजागृती करणे.
    *   फेक न्यूज व पेड न्यूज

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    चीनचे ‘नॅरेटिव्ह वॉरफेअर’
     
    *   बदलत्या काळात माहितीयुद्धाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आज सोशल मीडियाचा प्रभाव वाढला असला तरी पारंपरिक माध्यमांची महत्ताही कमी झालेली नाही. या दोन्हीही बाबतीत दूरदर्शी चतुराई वापरत चीन सातत्याने जगाची दिशाभूल करत आहे. यासाठी जगभरातील माध्यमविश्‍वात चीन अफाट पैसा गुंतवत आहे. त्या-त्या देशातील पत्रकारांना, तज्ज्ञांना आमिषे दाखवून आपल्या समर्थनार्थ वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच त्यांच्याकडून स्पर्धक शत्रूदेशातील गोपनीय माहिती मिळवण्याचाही चीनचा प्रयत्न आहे.
     
    *   प्रचंड आर्थिक ताकदीचा वापर करून चीनने अमेरिका, युरोप खंडातल्या मीडियाला ‘मॅनेज’ केले आहे. कोरोना विषाणूच्या निर्मिती आणि प्रसारावरून अवघे जग चीनविरोधात प्रक्षुब्ध झाल्याचे लक्षात आल्यानंतर चीनने या माध्यमशक्तीचा वापर करून घेण्यास सुरुवात केली. दुर्दैवाने, चीनने हे माहिती युद्ध पूर्णपणे जिंकले आहे, असे म्हणावे लागेल. याचे कारण आजघडीला अनेक देशांचा चीनच्या विरोधातील राग केवळ मावळलेलाच नाही, तर या जैविक महायुद्धाच्या काळात लस डिप्लोमसी आणि इतर वैद्यकीय मदत केल्यामुळे हे देश चीनचे आभार मानत आहेत.
     
        हा चमत्कार कसा घडला ?
     
    *   चीनबाबत हा चमत्कार घडण्याचे कारण म्हणजे, अमेरिका, युरोपमधील बड्या मीडिया हाऊसेसमध्ये चीनने आर्थिक घुसखोरी केली. काही ठिकाणी इतर देशातल्या कंपन्यांमधून चीनने या मीडिया हाऊसेसमधील शेअर्स विकत घेतले. इतकेच नव्हे तर माध्यमांची  मते आपल्या बाजूला वळविण्यासाठी चीनकडून या कंपन्यांमार्फत दरवर्षी हजारो कोटी रुपयांच्या जाहिराती दिल्या जातात. अनेकांना हे माहीत नसेल; पण वॉशिंग्टन पोस्ट, अ‍ॅमेझॉन, सीएनएन, वॉर्नर मीडिया, द अमेरिकन ब्रॉडकास्ट कंपनी, ईएसपीएन, वॉल्ट डिस्नेद न्यूयॉर्क टाईम्स, द वॉशिंग्टन टाईम्स, वॉल स्ट्रीट जर्नल, लॉस एंजेलिस टाइम्स आदी नामांकित अमेरिकन मीडिया हाऊसेसमध्ये चीनचे शेअर होल्डिंग खूप मोठे आहे. हाच प्रकार  युरोपमधील मीडियात दिसून येतो.
     
    *   अमेरिकेमध्ये एखाद्या मीडिया हाऊसेसमधील समभागांची जर परदेशी व्यक्ती अथवा संस्थेने खरेदी केली तर त्याविषयीची माहिती जाहीर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे ही माहिती बाहेर आली. यानुसार, अ‍ॅमेझॉन आणि वॉशिंग्टन पोस्टमध्ये २५० दशलक्ष डॉलर्स इतकी चिनी गुंतवणूक आहे. वॉर्नर मीडिया, सीएनएनमध्ये ५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक आहे. अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कंपनीमध्येही २० टक्के चिनी गुंतवणूक आहे. शांघायमध्ये थीम पार्क निर्माण करायला परवानगी देऊन डिस्ने वर्ल्डला आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न चीनने केला. या सर्वांचा वापर करत चीनने आता नॅरेटिव्ह वॉरफेअरची सुरुवात केली आहे. अलीकडील काळात युरोपमध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे डिजिटल फलक झळकले. या फलकांवर, ‘थँक्यू चीन किंवा धन्यवाद क्षी भाई’ असे लिहिलेले दिसून आले.
     
    *   आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघाने चीनच्या या अपप्रचार युद्धाचा अभ्यास केला. त्यातून काही महत्त्वाचे निष्कर्ष काढले. त्यानुसार, जगाला इतक्या मोठ्या महामारीच्या खाईत ढकलूनही जग चीनला दोषी मानण्यास तयार नाही. उलटपक्षी याबाबतचा दोष त्या- त्या देशांमध्ये असलेल्या केंद्र व राज्य सरकार आणि सरकारी संस्थांवर टाकला जातो. त्यांनी या महामारीचा चांगल्या प्रकारे मुकाबला केला नाही, त्या त्या देशातील सरकारे कुचकामी ठरल्यामुळेच कोरोनाचा प्रचंड प्रसार झाला आणि त्या देशांचे नुकसान झाले, असा प्रचार चीनकडून केला जात आहे.
     
    *   परदेशातील माध्यमांना मॅनेज करण्यासाठी चीन अनेक उपाय करतो. अनेक वेळा त्यांना चीनसाठी आवश्यक असलेली कामे दिली जातात. त्यांना चीनमध्ये पर्यटक म्हणून नेले जाते. यादरम्यान त्यांच्या प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च चीन करतो. युरोप आणि अमेरिकेच्या माध्यमक्षेत्रामधील अनेक वृत्तपत्रांशी चीनने करार केले असून, यानुसार या माध्यमांना चीनने पाठविलेल्या ५० बातम्या व लेख प्रकाशित करावे लागतात.
     
    *   कोरोना विषाणूचा प्रसार जसजसा जगभरात फैलावू लागला तसतसे चीनने आपले प्रचंड मीडिया सैन्य उभे केले. यामध्ये त्या देशात असलेले चिनी नागरिक, चिनी हस्तक, पैसे देऊन तयार केलेली सोशल मीडियावरची ट्रोल आर्मी यांचा सहभाग होता. आज जगाच्या, खासकरून युरोप आणि अमेरिकेमधल्या मीडियावर चीनचे एक प्रकारचे वर्चस्व दिसत आहे. कारण सद्यःस्थितीत बहुतांश परदेशी माध्यमे चीनविरोधात किंवा चीनला सोयीस्कर नसलेली कुठलीही बातमी प्रकाशित करत नाहीत. यामुळे अमेरिका आणि युरोपमधली मीडिया आता चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र बनली आहेत, अशी टीकाही आंतरराष्ट्रीय जाणकार करत आहेत. इतकेच नव्हे तर चीनने या देशातील अनेक राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना मॅनेज करून त्या देशातील चिनी विरोध कमी केला. याचे एक उदाहरण म्हणजे, अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर याचा चिनी कम्युनिस्ट पार्टीशी अतिशय गहिरा संबंध आहे. याबाबतची बातमी प्रकाशित होताच ती मीडियातून आणि सोशल मीडियामधून ‘अदृश्य’ झाली. आज ट्विटर, फेसबुक किंवा इतर मोठ्या सोशल मीडियांचे दिग्गज भारतीय कायद्यांची जराही पर्वा करत नाहीत. मात्र, हेच दिग्गज चीनचे कायदे पूर्णपणे मानतात, चीनचे ऐकतात. अमेरिका, युरोप आणि इतर राष्ट्रांत चीनने तयार केलेल्या ट्रोल आर्मीमार्फत चीनसाठी सोयीस्कर बातम्या प्रकाशित केल्या जातात. गेल्या वर्षभरात कोरोना महामारीमुळे जगभरातील माध्यमांचे अर्थकारण कोलमडले आहे. मुद्रित माध्यमांचा खप आणि दृक्श्राव्य माध्यमांचा टीआरपी घसरला. औद्योगिक विश्‍वातील मंदीमुळे जाहिरातींचा ओघ आटला. या स्थितीचा फायदा घेत चीनने आपले फासे अचूकपणाने टाकत ‘नॅरेटिव्ह वॉरफेअर’ गतिमान केले आहे. भारतानेही यातून योग्य तो धडा घेण्याची गरज आहे.
     
    सौजन्य व आभार :  दैनिक पुढारी
    १२ जून २०२१ / ब्रिगेडियर हेमंत महाजन

Share this story

Total Shares : 0 Total Views : 47