तुर्कमेनिस्तान

  • तुर्कमेनिस्तान

    तुर्कमेनिस्तान

    • 15 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 30 Views
    • 0 Shares
    तुर्कमेनिस्तान
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात पर्यटन व जागतिक भूगोलया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात तुर्कमेनिस्तान देशाबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (१) : भूगोल

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    २.४ आर्थिक भूगोल :
    *   पर्यटन - पर्यटनाचे प्रकार, सांस्कृतिक वारसा

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    तुर्कमेनिस्तान
     
    *   कोरोना काळात तुर्कमेनिस्तान या देश्शात एकही कोरोनाची केस सापडलेली नाही.
     
    *   तुर्कमेनिस्तान हा देश ७० टक्के वाळवंटांनी व्यापलेला आहे. त्या वाळवंटाला काराकुम वाळवंट म्हणतात. काराकुम वाळवंट जगातील मोठ्या वाळवंटांपैकी एक आहे. जिथं १० वर्षांतून एकद वेळेलाच पाऊस पडतो. या काराकुम वाळावंटात ’दरवाजा’ नावाचा एक मोठा खड्डा आहे. या खड्ड्यामध्ये गेली ५० वर्षांपासून सलगपणे आग धगधगत आहे. ती आग आजपर्यंत कोणाला विझवता आलेली नाही. याच स्थानाला ’नरकाचा दरवाजा’ असं म्हंटलं जातं. वास्तविक पाहता हा खड्डा एक  गॅस क्रेटर आहे. या खड्ड्यामध्ये जमिनीमधून कित्येक वर्षांपासून मिथेन वायू बाहेर पडत आहे. हे स्थळ पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचे स्थळ बनले आहे.
     
    *   हा मानवनिर्मित खड्डा म्हणून नोंद झालेला आहे. तुर्कमेनिस्तान पहिला सोविएत संघाचा भाग होता. १९७० च्या सुरुवातीला नैसर्गिक गॅसचा मोठा साठा असल्याचे माहीत झाले होते. त्यावेळी रशिया दुसर्‍या महायुद्धानंतर आर्थिक संकटात सापडलेला होता. ही अडचण दूर करण्यासाठी गॅसचा हा मोठा साठा आपल्याला तारू शकतो, असं रशियाला वाटलं. १९७१ मध्ये नैसर्गिक गॅस मिळविण्याच्या आशेपोटी या ठिकाणी काही संशोधक आणि इंजिनियर आले. त्यांनी काम करत असताना मोठा स्फोट घडवून आणला. त्या विस्फोटोतून काराकुमच्या वाळवंटात भला मोठा खड्डा तयार झाला. या स्फोटामध्ये जमिनीतील मिथेन गॅस मोठ्या प्रमाणात बाहेर येऊ लागला. त्याला थांबवणं अशक्य झालं. मिथेनचा दर्प इतका घाणरेडा होती की तिथं थांबणं अवघड होऊन गेलं. मिथेन वायू थांबविण्यासाठी शास्त्रज्ञांनी तेथे आग लावली, उद्देश हा की गॅस संपला की आग विझून जाईल. पण गेली ५० वर्षे या खड्ड्यातील आग विझलेली नाही. यामागील कारण शोधण्याचा बराच प्रयत्न झाला. मात्रत्याचे खरे कारण समजलेले नाही. ते एक रहस्यच बनून राहिले आहे.
     
    *   फुटबॉल मैदान असावं इतकं मोठा - २२९ फूट रुंद आणि ६५ फूट खोल - हा खड्डा आहे. या खड्ड्यामधील आगीमुळे मिथेन आणि सल्फरचा उग्र वास वातावरणात पसरलेला असतो. ही आग इतकी भयानक आहे की, आगीच्या ज्वाला कित्येक मीटर उंच असलेल्या दिसतात. खड्ड्यात तापलेली वाळू आणि माती पाहायला मिळते. 

Share this story

Total Shares : 0 Total Views : 30