बुद्धिमत्ता व अध्ययन

  • बुद्धिमत्ता व अध्ययन

    बुद्धिमत्ता व अध्ययन

    • 14 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 33 Views
    • 0 Shares
     बुद्धिमत्ता व अध्ययन
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात शिक्षणया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात बुद्धिमत्ता विकसनातील अडथळेव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (३) : मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    १.२ शिक्षण :  भारतातील (पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण) शिक्षण प्रणाली (शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शिक्षणाचे व्यवसायिकीकरण, दर्जा वाढ, गळतीचे प्रमाण इत्यादी) समस्या आणि प्रश्‍न

    २.२ बालविकास - समस्या व प्रश्‍न (मुलांचे शिक्षण) शासकीय धोरण, कल्याणकारी योजना आणि कार्यक्रम, बालविकास आणि आंतरराष्ट्रीय संस्थांची भूमिका, स्वयंसेवी संघटना, अशासकीय संस्था, सामुदायिक साधने

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    बुद्धिमत्ता विकसनातील अडथळे
     
    *   लहान बालकामध्ये डिसलेक्सिया, डिसग्राफिया, डिसकॅलक्युलिया, ए.डी. (चंचलता व एकाग्रतेचा अभाव) मतिमंदत्व, ऑटिझम, ताणतणाव, तणावजन्य शारीरिक आजार, नर्व्हस डिसऑर्डर (तोतरं बोलणं, नखं खाणं, अंथरुणात लघवी करणं), फोबिया (भयगंड)... अशा अनेक समस्या असू शकतात. या सर्वांचा त्यांच्या शिक्षण्प्रक्रियेवर अनिष्ट परिणाम होतो. याकडे दुर्लक्ष झाल्यास संपूर्ण जीवनावर परिणाम होऊ शकतात. करिअरव दूरगामी दुष्परिणाम होऊ शकतात. मुलं न्यूनगंड, नैराश्याची शिकार होऊ शकतात. गुण व बुद्धिमत्ता असूनही मागे पडतात. प्रवाहाबाहेरही जातात. मात्र, वेळीच उपाय उपचार केल्यास अशी मुलंसुद्धा उत्तम करिअर करू शकतात. लर्निंग डिसऑर्डर्सनी ग्रस्त आणि पण महान झालेल्या काही व्यक्ती - वॉल्ट डिस्ने, अलेक्झांडर ग्रॅहम बेल, विन्स्टन चर्चिल, थॉमस एडिसन, मोहमद अली हेन्री फोर्ड, आगाथा ख्रिस्ती, लिओनॉर्ड द व्हिन्सी, टॉम क्रुझ रिचर्ड ब्रॉन्सन, अभिषेक बच्चन इत्यादी.
     
        डिसलेक्सिया -
    १.  रीडिंग डिसऑर्डर-वाचन अक्षमता
        Reading Disorder
     
    *   अडखळत वाचणे, वाचण्याची गती खूप कमी असणे, उच्चारांमध्ये स्पष्टता नसणे, वाक्य अर्धवट वाचणे, मधले शब्द गाळणे, वाचल्यानंतर त्याचा अथबोध न होणे, बोबडे बोलणे. भारतात डिस्लेक्शिआसारख्या समस्या असण्याच प्रमाण १२ ते १३ टक्के आहे.
     
    २. मॅथेमॅटिकल डिस्ऑर्डर - गणितीय अक्षमता
        Mathematical Disorder
     
    *   आकडे व चिन्ह समजून न घेता येणं, लेखी प्रश्नावरून योग्य गणिती प्रक्रिया न समजणं, साधी गणितं सोडवितानाही चुका करणे
     
    ३.  रायटिंग डिसऑर्डर - लेखन अक्षमता
        Writing Disorder
     
    *   शुद्धलेखनाच्या खूप चुका करणं (काना, मात्रा, उकार, वेलांटी) फक्त साधी सोपी वाक्यच लिहिणं. कठीण जोडाक्षरं असलेली वाक्य न लिहिणं, लिहिता न येणं, उच्चारानुसार लिहिण्याचा प्रयत्न करणं व चुका करणं. अक्षरं उलटी लिहिणं (b-d) (p-q) हस्ताक्षर खराब असणे. शब्द किंवा वाक्ये अर्धवट लिहिणे. लिहायला जास्त वेळ लागणे.
     
    सौजन्य व आभार : दैनिक पुढारी
    १२ जून २०२१ / डॉ. रमा मराठे

Share this story

Total Shares : 0 Total Views : 33