इंधन कर

  •  इंधन कर

    इंधन कर

    • 12 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 93 Views
    • 0 Shares
     इंधन कर
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात सार्वजनिक वित्तव्यवस्थाया घटकावर अनेक प्रश्न विचारले जातात. सदर लेखात  ”इंधनकरावरील अवलंबित्व त्यावर येऊ शकणारे प्रश्न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (4) : भारतीय अर्थव्यवस्था

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    2.5 सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था :
        महसुलाचे स्रोत - (केंद्रीय राज्यस्तरीय), मूल्यवर्धित कर - वस्तू सेवा कर

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    इंधनकरावरील अवलंबित्व
     
    *   मे 2021 मध्ये भारताच्या अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली डिझेलही त्याच मार्गावर होते. गेले वर्षभर इंधनाच्या किमती चढ्या राहिल्या. अपवाद फक्त निवडणूक काळाचा. निवडणूक प्रचाराच्या महिन्यांत या किमती स्थिर होत्या आणि निकाल लागताच पुन्हा चढू लागल्या. इंधनाच्या दरवाढीमध्ये सरकारचा काहीही हात नाही, बाजारपेठेनुसार त्या वाढतात वा कमी होतात हा केंद्र सरकारचा दावा किती खोटा आहे हे यावरून लक्षात येईल. बिहार निवडणुकीच्या वेळीही इंधनाच्या किमती वाढलेल्या नव्हत्या. पेट्रोलियम कंपन्या आर्थिक निर्णय घेण्यास स्वायत्त असल्याचे सांगितले जात असले तरी इंधनाच्या किमतीवर सरकारची बारीक नजर असते दरवाढ ही प्रचाराचे साधन होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाते हे आता सर्वांनाच कळून चुकले आहे.
     
    *   सरकारच्या तिजोरीत हमखास पैसे आणण्यासाठी याहून चांगला मार्ग नाही. हा मार्ग केंद्र राज्य या दोन्ही सरकारांसाठी फायद्याचा आहे. दोन्ही सरकारांचे मुख्य उत्पन्न इंधनावरील कर हेच आहे. दरवाढीसाठी विरोधी पक्षांची राज्य सरकारे केंद्राकडे बोट दाखवित असली तरी स्वतःच्या राज्यातील व्हॅट कमी करीत नाहीत. तो केला तरी महाराष्ट्रातील पेट्रोल 20 रुपयांनी स्वस्त होईल. ठाकरे सरकार ते करणार नाही, कारण इंधनावरील कर हे हमखास उत्पन्नाचे साधन आहे. आज केंद्र सर्व राज्य सरकारे मिळून 400 अब्ज रुपये इंधनावरील करातून मिळवितात. इतकी रक्कम अन्य कोणतेही क्षेत्र देऊ शकत नाही. इंधनावरील कर हा पूर्वीपासून चढा होता.
     
    *   मोदी सरकारने इंधनकराला सरकारच्या मिळकतीचे प्रमुख साधन बनविले आणि तंत्रशुद्धरीतीने कर जमा केला. हे तंत्र म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले तरी भारतातील दर चढे ठेवायचे कराचे उत्पन्न अनेक पटीने वाढवायचे. मनमोहनसिंग सरकारपेक्षा मोदी सरकारने इंधन दरवाढीतून तिपट्टीहून जास्त उत्पन्न मिळविले असल्याचे आकडेवारी सांगते. मोदी सरकारने हा पैसा गरिबांसाठीच्या अनेक योजनांसाठी वापरला आहे हे खरे असले तरी या योजना चालविण्यासाठी मध्यमवर्गाचा खिसा खाली केला जात आहे.
     
    *   पेट्रोल दरवाढीचा मोठा फटका मध्यमवर्गाला बसतो. गेल्या वर्षभरात मध्यमवर्गाचा पेट्रोलवरील महिन्याला सरासरी खर्च 4 टक्क्यांनी वाढला, म्हणजे तितका पगार कमी झाला. आता डिझेलही महागल्यामुळे शेतकर्यांचे उत्पन्नही दरवाढीच्या तुलनेत कमी झाले आहे. याशिवाय दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढतो त्याचा परिणाम उद्योगक्षेत्रातील सर्व व्यवसायांवर होतो. महागाई वाढण्याचे ते एक प्रमुख कारण असते. रिझर्व्ह बँकेने त्याकडे लक्ष वेधले आहे इंधनावरील करांचा पुनर्विचार करावा असे आवाहन केंद्र राज्य सरकारांना केले.
     
    *   कोविडच्या काळात अर्थव्यवस्था मंदावल्यामुळे उत्पन्नाचे अन्य मार्ग कोरडे पडले आहेत. सरकारमधील अनेक खाती गेले वर्षभर कामाशिवाय आहेत; पण त्यांचा पगार कमी झालेला नाही. तो खर्च सरकारच उचलीत आहे. कोविडने कणा मोडलेल्या गरिबांसाठीच्या नव्या योजनांना लागणारा पैसा सरकारला फक्त इंधनावरील करातूनच मिळतो. कदाचित यामुळेच इंधन दरवाढीविरोधात जनतेचा उद्रेक दिसत नाही भाव वाढले तरी मध्यमवर्गाचे मोदी प्रेम आटलेले नाही.
     
    *   पेट्रोल डिझेल यांना जीएसटीमध्ये आणणे हेही सोपे नाही. सध्या पेट्रोलवर 161 टक्के तर डिझेलवर 124 टक्के इतका भरभक्कम कर आहे जीएसटीची कमाल मर्यादा 28 टक्के आहे. म्हणजे पेट्रोल डिझेलला जीएसटीमध्ये आणून 400 अब्ज रुपये करातून मिळवायचे असतील तर इंधनाच्या किमतीमध्ये 100 टक्क्यांहून अधिक वाढ करावी लागेल. हे करण्याची हिम्मत कोणत्याच सरकारमध्ये नाही.
     
    *   ब्रेन्ट क्रूडवरून आंतरराष्ट्रीय बाजारात किमती ठरतात. गोल्डमन सॅकच्या अहवालानुसार ब्रेन्ट क्रूड 80 डॉलरपर्यंत चढेल. म्हणजे बाजारपेठ भारताला अनुकूल नाही. रुपयाच्या तुलनेत डॉलर महागला की तेलही महाग होते. ती शक्यताही पुढील काळात आहे. जगातील आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले की तेलाची मागणी वाढेल आणि त्यानुसार भावही वाढतील. बाजारातील या घडामोडी आणि मंदावलेली स्थानिक अर्थव्यवस्था पाहता तंत्रशुद्ध मार्गाने इंधनावरील कर वाढते ठेवून तिजोरी भरणे गरिबांच्या योजना राबविणे याकडे सरकारचा कल राहील हे स्पष्ट आहे. उद्योग, व्यवसाय, व्यापार यातून अर्थव्यवस्था बलवान झाली तरच इंधनकरावरील अवलंबित्व कमी होईल. परंतु, या शाश्वत मार्गावर चालण्याचा उत्साह मोदी सरकारमध्ये आहे असे गेल्या सात वर्षांतील कारभारातून दिसत नाही.
     
    सौजन्य व आभारदैनिक  लोकमत
    10 जून 2021

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 93