निवृत्त अधिकार्‍यांचे लिखाण

  • निवृत्त अधिकार्‍यांचे लिखाण

    निवृत्त अधिकार्‍यांचे लिखाण

    • 12 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 62 Views
    • 0 Shares
     निवृत्त अधिकाऱ्यांचे लिखाण
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षातलोकप्रशासनया घटकावर अनेक प्रश्न विचारले जातात. सदर लेखात निवृत्त आधिकार्यांच्या लिखाणावर निर्बंध त्यावर येऊ शकणारे प्रश्न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    *   संदर्भ : मे 2021 मध्ये केंद्र शासनाने संरक्षण, गुप्तवार्ता आदी विभाग किंवा संघटनांतून निवृत्त झालेल्या अधिकार्यांच्या लिखाणाचा संबंध त्यांचे निवृत्तिवेतन रोखू शकणार्या नियमांशी लावला गेला. सदर बाबीचा सबंध लोकप्रशासनाशी आहे.

    सामान्य अध्ययन पेपर (2) : भारतीय संविधान, राजकारण व कायदा

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    17. सार्वजनिक सेवा :
    अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा राज्य सेवा - सांविधानिक दर्जा व कार्ये.

    19. लोकप्रशासनातील संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांत :
    संकल्पना - नवीन सार्वजनिक व्यवस्थापन, नागरी संस्था, विकेंद्रीकरण प्रदत्तीकरण आणि-गव्हर्नन्स

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    निवृत्त अधिकाऱ्यांच्या लिखाणावर निर्बंध
     
    *   केंद्र सरकारने 31 मे  2021 रोजी अधिसूचित केलेले ‘(सुधारित) निवृत्तिवेतन नियमहे संरक्षण आणि गुप्तवार्ता आदींशी संबंधित असलेल्या अनेक यंत्रणांमधील निवृत्त अधिकार्यांच्या लिखाणावर कठोर निर्बंध लादणारे ठरतात. असाच प्रयत्न यापूर्वी सन 2008 मध्ये तत्कालीन मनमोहन सिंग सरकारच्या काळातही झाला होता परंतु तेव्हा तोआयबी’ (गुप्तवार्ता विभाग) आणिरॉ’ (‘रिसर्च ण्ड नालिसिस विंगहा गुप्तचर विभाग) या दोनच यंत्रणांतील अधिकार्यांपुरता मर्यादित होता. अर्थात, त्यावरही तेव्हा अत्यंत प्रतिकूल प्रतिक्रिया उमटल्यानंतर ते धोरण कधीही अमलात आणले गेले नाही.
     
    *   अलीकडे प्रसृत झालेले नियम हे चार वर्षांपूर्वीच सचिवस्तरीय समितीने संमत केलेले होते, असे सांगण्यात येते. अशा प्रकारचा विषय जर माझ्या कार्यकाळात सचिवस्तरीय समितीपुढे आला असता -आणि केंद्रीय गृहसचिव या नात्याने मीही त्या समितीत असतोच- तर मी ते सरकारच्या मंजुरीसाठी पुढे पाठवू दिले नसते. आताच्या समितीला संशयाचा फायदा देऊन एवढेच म्हणता येईल की, कदाचित त्यांनी निव्वळ तत्त्वत: संमती दर्शवली असावी. तिचा अवाजवी व्यापक अर्थ काढला गेल्याने नियमावलीचा असमर्थनीय मसुदा करण्यात आला असावा. न्यायालयात कायद्याच्या कसोटीवर उतरणारे असे हे नियम आहेत.
     
    *   कुणा एका पुस्तकामुळे डिवचले गेल्यामुळे 2008चे आदेश निघाले होते. हे पुस्तकरॉमध्ये प्रतिनियुक्तीवर काम केलेल्या एका निवृत्त लष्करी अधिकार्याने लिहिले होते. माझ्या माहितीप्रमाणे, त्या अधिकार्यावर गुदरला गेलेला खटला न्यायालयात आजही प्रलंबित आहे. अर्थात, त्या पुस्तकावर सरकारने बंदी घातली नाही.
     
    *   अशी प्रकरणे योग्यरीत्या व्यापक संदर्भात पाहणे आवश्यक असते. मुळात राष्ट्रीय सुरक्षेशी संबंध असलेल्या निवृत्त अधिकार्यांनी लिहिलेली आणि काही प्रमाणात वादाचा वा चर्चाविषय ठरलेली पुस्तके ती किती, तर अत्यल्प- अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत. म्हणजे असे एखादे प्रकरण उद्भवलेच, तरी ते त्या-त्या वेळी हाताळले जाऊ शकते. तसे करता सरसकट सर्वच निवृत्त अधिकार्यांवर निर्बंध घालणे हे केवळ अनाकलनीयच नव्हे तर अकारण आहे.
     
    *   निवृत्त अधिकार्यांची संख्या मोठी असली तरी, प्रसारमाध्यमांतून नियमितपणे व्यक्त होणार्या -लिहिणार्या किंवा बोलणार्या- अधिकार्यांची संख्या तुलनेने अगदी कमी असते, हे आधीच स्पष्ट केलेले बरे. साधारणपणे या निवृत्त अधिकार्यांच्या लिखाणातून महत्त्वाच्या विषयांवर जनप्रबोधन होण्यास मदतच होत असते. पोलीस सुधारणा, जातीय हिंसाचार, संरक्षण धोरणे, संघटनात्मक कच्चे दुवे अशा कैक विषयांवर असे प्रबोधनपर लिखाण निवृत्त अधिकार्यांनी केलेले आहे. असे लिखाण महत्त्वाचेच, कारण त्या-त्या अधिकार्याचा प्रदीर्घ अनुभव आणि त्यातून आलेले शहाणपण यांचे प्रतिबिंत त्यात असते. अशांचे हे लिखाण अनेकदा सरकारच्या निर्णय-प्रक्रियेस साह्यभूत ठरते आणि निकोप लोकमतासाठी तर ते आवश्यकही असते. अनुभवाधारित माहितीचा भक्कम आधार जनमताला असणे हे अंतिमत: लोकशाहीला बळकटी देते.
     
    *   अधिसूचित झालेल्या या नव्या नियमांतील अनेक मुद्दे दोषपूर्ण ठरू शकतात. एक तर त्यातीलकोणतेही प्रकाशनआणिकोणतीही माहितीअसा उल्लेख. किंवासंबंधित संघटनेत / हुद्द्यावर केलेल्या कामामुळे मिळालेले ज्ञान अथवा तज्ज्ञतायांचा वापर करण्यास या नियमांनी केलेली मनाई -मग या ज्ञानाला निवृत्तीनंतर एखाद्या अधिकार्याने संशोधन, विचार- वाचन यांची जोड दिली तरीही मनाईच. प्रकाशनार्थ असलेला मजकूरसंवेदनशीलआहे की नाही आणि मुळात हे काम ज्या आपल्या अखत्यारीतील आहे की नाही हे त्या-त्या संघटनेचे प्रमुख प्रत्येक प्रकरणात ठरवणार. हे असे निर्बंध अतीच व्यापक आणि सरकारला बेबंद स्वेच्छाधिकार देणारे आहेत.
     
    *   काही निवृत्त अधिकार्यांच्या मुलाखती माध्यमांसाठी माहितीपूर्ण, दिशादर्शक म्हणून महत्त्वाच्या असतात. पण याच नियमांचा आणखी अर्थ काढून उद्या एखाद्या संघटनेच्याराजापेक्षाही राजनिष्ठप्रमुखांनी जर अशा मुलाखतींवर बंदी लादली तरीही नवल नाही. यापुढे, सर्व निवृत्त अधिकार्यांना या नियमांचे पालन करणार असल्याचे पत्र द्यावे लागणार आहे आणि त्याचा भंग झाल्यास निवृत्तिवेतनात कपात होणे किंवा निवृत्तिवेतनच बंद होणे हे संबंधित अधिकार्यास मंजूर असल्याचे मानले जाणार आहे. हे नियम निवृत्त अधिकार्यांना आजीवन पाळावेच लागणार असे दिसते. परिणामी, अगदी ज्युलिओ रिबेरोंसारख्या आदरणीयआयपीएसअधिकार्यांनाही, यापुढे सार्वजनिक धोरणविषयक मुद्द्यांवर किंवा आणखी कशावरही लिखाण करताना वयाच्या 92 व्या वर्षी संबंधित प्रमुखांची पूर्वपरवानगी मिळेपर्यंत ताटकळावे लागणार असा याचा अर्थ. थोडक्यात, अधिकार्यांना आयुष्यभर या नियमांचा काच होणारच. वास्तविक, हे नियम ठेवायचेच असतील तर किमान निवृत्तीनंतर किती वर्षे ही बंधने पाळावी लागणार याचा काहीएक कालावधी तरी ठरवला जावा, अशी माझी स्पष्ट सूचना राहील.
     
    *   समजा, यांपैकी काही बंधने कायम राहणार असली तरी त्यांत कार्यकारणभाव हवा आणि पारदर्शकताही हवी, जेणेकरून या नियमांचा वाटेल तो अर्थ लावण्यास वावच राहू नये. उदाहरणार्थ, ‘संवेदनशीलहा शब्द. त्याचा अन्वयार्थ संदर्भांनुसार, परिस्थितीगणिक आणि काळानुरूप बदलणार; कारण एखादी बाब काही सदैव संवेदनशील राहू शकत नाही. जेव्हा अशी प्रकरणे संबंधित संघटनांच्या प्रमुखांपुढे येतील, तेव्हा ते सक्षम, प्राधिकृत अधिकार्यांमार्फत ती हाताळतील. पण एकापेक्षा अधिक संघटनांमध्ये सेवाकाळ घालविलेले अधिकारीही अनेक असतील. मग अशा अधिकार्यांचे लिखाण हे त्या सार्या संघटनांच्या प्रमुखांना (किंवा त्यांनी नेमलेल्या प्राधिकृतांना) कसे वाटते, याची वाट पाहात राहणार. अशा अनेकपरींच्या अधिकार्यांवर नियमांचा अन्वयार्थ लावण्याचे काम सोपवणे, हे तर रोगापेक्षा इलाज भयंकर या उक्तीचा प्रत्यय देणारे ठरेल.
     
    *   त्याऐवजी, सरकारने अशी सर्वच प्रकरणे हाताळण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी एक अंशकालीन स्थायी प्राधिकरण नेमावे. त्यामुळे नियमांचा अर्थ लावण्याच्या कामी सुसूत्रता आणि प्रमाणीकरण येईल. संबंधित निवृत्त अधिकार्याला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी दिल्याखेरीज अशा प्राधिकरणाने निर्णय देऊ नये, अशी शिस्तही लावता येईल. या प्राधिकरणात केवळ विद्यमान अधिकार्यांचाच नव्हे तर नागरी समाजातील तज्ज्ञांचा - म्हणजे उदाहरणार्थ न्याय, कायदा तसेच प्रशासन या क्षेत्रातील तज्ज्ञ अनुभवी व्यक्तींचा समावेश असावा. हे काम वेळखाऊ असणार हे उघडच आहे पण ते फक्त पुस्तके आणि महत्त्वाच्या परिसंवादांमध्ये सादर होणारे निबंध (पेपर) इत्यादींपुरते मर्यादित असावे आणि त्याविषयी निर्णय घेण्यासाठी समितीला तीन ते चार आठवड्यांची कालमर्यादा असावी. बाकीच्या सर्व बाबतींत- म्हणजे वृत्तपत्रीय लिखाण, भाषणे, टिप्पणी किंवा मुलाखती आदींबाबत निवृत्त अधिकार्यांच्या सदसद्विवेकबुद्धीवर विश्वास ठेवणे अधिक चांगले. अपवादात्मक प्रसंगी आवश्यकच वाटल्यास, त्या प्रकरणापुरती एखाद्या निवृत्त अधिकार्यावर कारवाई सुरू करता यावी.
     
    *   सरकारने या संपूर्ण प्रकरणाचा फेरविचार करून नियम मागे घ्यावेत किंवा किमान वरील सूचनांनुसार त्यांमध्ये बदल करावेत, हे उत्तम. तसे सरकारने केल्यास, मात्र या नियमांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याखेरीज काही पर्याय उरणार नाही.
     
    सौजन्य व आभारदैनिक लोकसत्ता
    10 जून 2021  /  माधव गोडबोले

Share this story

Total Shares : 0 Total Views : 62