समुद्री चक्रीवादळ

  • समुद्री चक्रीवादळ

    समुद्री चक्रीवादळ

    • 05 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 19 Views
    • 0 Shares
     समुद्री चक्रीवादळ
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात हवामान आणि पर्जन्यमानया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात ’समुद्री चक्रीवादळ’ व त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (१) : भूगोल

    राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    २.२ हवामानशास्त्र :
        हवेचा दाब - वारेग्रहीय व स्थानिक वारे.
    महाराष्ट्रातील मोसमी वारे (मान्सून ) - पर्जन्यवृष्टीचे वितरण, अवर्षण, महापूर आणि त्याच्या समस्या

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    ५० वर्षांतील वादळांचा सांगावा 
     
    *   अलीकडच्या काळात भारताला पूर्व किनारपट्टीप्रमाणेच पश्रि्चम किनारपट्टीवरही वादळांचा तडाखा बसू लागला आहे. अर्थात, पर्यावरण बदलांचा तो परिणाम आहे. त्यासाठी गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे आहे, तसेच जीवनशैलीत बदल करणेही आवश्यक आहे.
     
    *   समुद्री चक्रीवादळ एक नैसर्गिक क्रिया आहे. समुद्री चक्रीवादळ फार गतीने जीवनावर प्रभाव टाकत आहे. तोक्ते चक्रीवादळ खूप विध्वंस करून गेले. तोक्ते वादळ विसावत असताना बंगालच्या उपसागरात यास वादळ आले. समुद्री चक्रीवादळांची नावे आणि इतर तपशील ठरविण्याचे काम विभागीय हवामान परिषदेच्या मदतीने जागतिक हवामान संघटना करत असते. पुढील १६९ चक्रीवादळांची नावे ठरविलेली असतात. आशिया खंडाचे १३ राष्ट्र सदस्यीय पॅनल नाव ठरविण्याचा भूमिकेत असते. यात भारत, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, थायलंड, इराण, कतार, सौदी अरेबिया, यूएई आणि येमेन आहेत. तोक्ते नाव म्यानमारने ठेवले होते, ज्याचा अर्थ होता खूप गरजणारा सरडा असा होतो. ‘यास’ नाव ओमानने ठेवले होते. ‘यास’ या पर्शियन शब्दाचा अर्थ ’चमेलीचे फूल ’असा आहे. पुढच्या वादळाचे नाव पाकिस्तानने ठेवले असून ते ‘गुलाब’ असे आहे आणि त्याचे पुढच्या वादळाचे नाव कतारने दिले असून ते ‘शाहीन’ असेल.
     
    *   १९७७ मध्ये बंगालच्या समुद्रात प्रचंड विध्वंसकारी वादळ झाले. त्यामुळे आंध्र प्रदेश किनारपट्टीला ‘न भूतो’ असा तडाखा बसला. प्रचंड नुकसान झाले. १९९९ साली त्यापेक्षाही जास्त ताकदीचे वादळ आले, त्यामुळे ओडिशा प्रांताचा मोठा भूभाग आणि किनारपट्टी उद्ध्वस्त झाली. त्याला ‘सुपर सायक्लोन’ म्हटले गेले. 
     
    *   विध्वंसकारी वादळे -
    -   १९७० मधील भोला चक्रीवादळ,
    -   १९७७ मधील आंध्र किनारपट्टीवर उद्भवलेले चक्रीवादळ,
    -   १९९० मधील मच्छलीपट्टणम (आंध्र) किनारी उद्भवलेले चक्रीवादळ,
    -   १९९९ मध्ये ओडिशा,
    -   २००८ मध्ये नर्गिस,
    -   २००९ मधील बिजली, फियान,
    -   २०१० मधील लैला,
    -   २०१२ मधील नीलम,
    -   २०१३ मधील हेलन आणि दुसरे फायलिन,
    -   २०१४ मधील वयारू, हुदहुद,
    -   २०१५ मधील गुजरात,
    -   २०१६ मधील वरदाह,
    -   २०१७ मधील मारूथा, ओक्छी,
    -   २०१८ मधील तितली, पेथाई,
    -   २०१९ मधील फनी, वायू, हिका,
    -   २०२० मधील अम्फान, निसर्ग
    -   २०२१ मधील तोक्ते आणि यास.
     
    *   वरील यादी स्पष्ट करते की, पन्नासपैकी पहिल्या २५ वर्षांत नोंद घेण्यासारखी ४ चक्रीवादळे झाली आणि शेवटच्या २५ वर्षांत १३ नोंद झाली. २५ वर्षांत निसर्गात असा मोठा बदल घडतोय.
     
    *   गेल्या ५० वर्षांत अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ उद्भवण्याचे प्रकार, त्याची व्यापकता आणि भीषणता वाढत गेली. ही धोकादायक स्थिती आहे.
     
    *   गेल्या फक्त ३०० वर्षांचा विचार केला, तर जागतिक लोकसंख्येत दहापट वाढ झाली आहे. जी वाढ होण्यासाठी दोन लाख वर्षे लागली, तिला दहापट उडी मारण्यासाठी फक्त तीनशे वर्षे लागली. हीच तीनशे वर्षे म्हणजे आधुनिकतेचा काळ आहे.
     
    *   गेल्या ६० वर्षांत  लोकसंख्येने  दुप्पट म्हणजे ३०० कोटींपासून ७०० कोटी असा टप्पा ओलांडला. म्हणजे लोकसंख्येत जी वाढ दोन लाख वर्षांत झाली नाही, ते रेकार्ड फक्त ६० वर्षांत तयार झाले.
     
    *   लोकसंख्येत अवाढव्य, अकल्पनीय आणि असहनीय वाढ ही एकांगी नाही. जंगल, जलस्रोताचा नाश आणि आधुनिकतेचे लाड पुरविण्यासाठी उद्योगांचेे, दळणवळणाचे  वाढते जाळे यातून नैसर्गिक स्रोतांची लूट सतत होत राहिली. अवाढव्य लोकसंख्या व आधुनिक आहार पद्धतीमुळे निसर्गाचे अमर्याद शोषण झाले. त्यामुळे नैसर्गिक संकटांचा डोंगर उभा राहत आहे. यात सर्वात धोकादायक आहे, पृथ्वीचे वाढते तापमान आणि त्यामुळे जल, वायूमध्ये होत असलेले बदल. पृथ्वी उष्ण होऊन तापत आहे. त्यामुळे हिमखंड झपाट्याने वितळत आहेत. त्यामुळे समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. परिणामी, समुद्रातही उष्णता वाढत आहे. या सर्वांमुळे चक्रीवादळे  निर्माण होत आहेत. शेवटी आज आम्ही स्वतःच्या जीवनाला चक्रव्यूहात अडकून टाकलेले आहे.
     
    *   आपण ज्याला विकास म्हणतो, तो वस्तुतः निसर्गाच्या नाशावर अवलंबून आहे आणि निसर्गाचा नाश म्हणजे जीवनाच्या आधाराचा नाश, हे स्पष्ट असूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. उदाहरणार्थ, आगाऊ सूचना देणारी यंत्रणा अद्ययावत करून आपण होणारे नुकसान कमी करू शकतो. तसा यशस्वी प्रयोगसुद्धा झाला; पण ही सुधारणा समस्यांचे कायमस्वरूपी निदान अजिबात नव्हे, तर मलमपट्टी इतकेच म्हणता येईल.
     
    *   मग आपण काय करावे? उत्तर सोपे आहे; पण सोप्या  विकल्पासाठी आम्ही सर्वजण अजिबात तयार नाही. थोतांड सांगण्यात काही अर्थ आहे का? १९०९ मध्ये महात्मा गांधींनी आधुनिक जीवनशैलीबद्दल सावध करून सांगितले होते की, ही आधुनिकता सैतानी संस्कृती आहे. आम्ही आज आधुनिकतेपासून स्वतःला  वेगळे केले नाही, तर उद्या असे करणे कठीण होणार.
     
    *   जागतिक पर्यावरणामध्ये सतत होत असलेल्या बदलांच्या मूळ कारणांचा विचार करून कायमस्वरूपी उपाय केल्याशिवाय तंत्रज्ञानाच्या आधारे चक्रीवादळासारखे प्रश्न कमी होणार नाहीत. त्यासाठी पुन्हा निसर्गाकडे जावे लागेल. म्हणजे निसर्गाचा आपण एक प्राणिमात्र आहे. अशी जीवनशैली परत स्वीकारावी लागेल.
     
    सौजन्य व आभार :  दैनिक पुढारी
    ३ जून २०२१ / कुमार कलानंद मणी, पणजी

Share this story

Total Shares : 0 Total Views : 19