-
पाणथळ जमीन
- 16 Mar 2021
- Posted By : study circle
- 787 Views
- 1 Shares
पाणथळ जमीन
पाणथळ जमीन म्हणून कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव होतो -1971 मध्ये पार पडलेल्या रामसार अधिवेशनात याची रीतसर व्याख्या निर्मित झाली. पाणथळ अधिवास म्हणून गृहीत धरल्या जातात -
ठळक वैशिष्ट्ये -
• दलदल
• कुजून रुपांतर झालेले वनस्पतीजन्य-जमीन किंवा पाण्याचे क्षेत्र
• नैसर्गिक किंवा कृत्रिम, स्थायी किंवा तात्पुरते, साचलेल्या पाण्यासह जेथे कधी ताजे पाणी येते ती जमीन मग ते पाणी गोड असो वा खाडी वा समुद्राचे खारे पाणी व त्याच बरोबर सागरी पाण्याच्या क्षेत्रासह जेथे ओहोटीच्या वेळी पाण्याची खोली 6 मीटरपेक्षा कमी असते अशा सगळ्या जागा
ठळक नोंदी -
• जगभरातील उपलब्ध एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे 7 टक्के इतके क्षेत्र हे पाणथळ अधिवास क्षेत्रांमध्ये मोडते. या 7 टक्के क्षेत्रातून समस्त मानवी समाजाला लाभदायक ठरेल असे 45% नैसर्गिक संसाधने मिळतात. याच बरोबर 20,000 हजार दशलक्ष वर्ष पुरेल इतकी विविध पद्धतीच्या सोई-सुविधा याचं पुरवठा हे पाणथळ क्षेत्र करतात.
• सत्तरीचे दशक गाठण्यापूर्वी पाणथळ आधिवास हा तसा एक दुर्लक्षित अभ्यासाचा विषय. सर्वसामान्य जनता व संशोधक मंडळी असे दोन्ही गट हे याबाबत उदासीन होते. परंतु 1971 या वर्षी पार पाडलेल्या रामसार पाणथळ अधिवास संमेलनानंतर मात्र हे चित्र पुरते बदलून गेले.
• जलविज्ञान, पर्यावरणीय आणि भूवैज्ञानिक पैलू या सगळ्या विषयांना सोबत करत 1979 मध्ये कोवर्दिन आणि इतर संशोधक चमू याने एक संशोधक शोधनिबंध प्रसिद्ध केला ज्यात सगळ्यात पहिल्यांदा पाणथळ जमीन आणि तिचे उपप्रकार असं सर्वसमावेशक स्पष्टीकरण मांडण्यात आले.
• मिलेनियम इकोसिस्टम मूल्यांकन या जगविख्यात संकेतस्थळावर नोंदवलेल्या सूचनेनुसार जगभरातील उपलब्ध एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे 7 टक्के इतके क्षेत्र हे पाणथळ अधिवास क्षेत्रांमध्ये मोडते. या 7 टक्के क्षेत्रातून समस्त मानवी समाजाला लाभदायक ठरेल असे 45% नैसर्गिक संसाधने मिळतात. याच बरोबर 20,000 हजार दशलक्ष वर्ष पुरेल पुरवठा हे पाणथळ क्षेत्र करतात.
• भारत सरकारद्वारा 2010 मध्ये प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र राज्य पाणथळ क्षेत्र अहवालानुसार देशभरात असलेल्या पाणथळ क्षेत्रामधील सुमारे 46,844 हेक्टर क्षेत्र हे फक्त रायगड जिल्ह्यामध्ये मोडते.
• पाणथळ जागेचे प्रकार अनुरूप एकूण 1,760 पाणथळ अधिवास रायगड जिल्हात अंतर्भूत होतात.
• अलिबागमधील रेवदंडा किल्ला आणि समुद्र किनारा हा नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असतो परंतु याच प्रसिद्ध पर्यटन क्षेत्राभोवती असे काही छोटे मोठे अधिवास आहेत जे निसर्ग निरीक्षण व खास म्हणजे पक्षी निरीक्षण करणार्या पक्षी मित्रांपासून अजूनही आडोसा घेऊन आहेत.