आसाम
- 03 Mar 2021
- Posted By : study circle
- 1772 Views
- 0 Shares
आसाम
आसाम विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत नियोजित - 27 मार्च, 1 एप्रिल आणि 6 एप्रिलला मतदान आणि 2 मे रोजी निकाल जाहीर. आसाम विधानसभेचे एकूण संख्याबळ 126 आहे. 2016 मध्ये आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपला 60 जागा मिळाल्याने (भाजप आघाडी 86 जागा) भाजपने सत्ता स्थापन केली होती. 2016 च्या निवडणुकीवेळी भाजपसोबत बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ) आणि आसाम गण परिषद हे पक्ष होते. या पक्षांना अनुक्रमे 12 व 14 जागा मिळाल्या होत्या.
• मार्च 2021 मध्ये यातील बीपीएफने भाजपची साथ सोडली. बीपीएफची मागील काळातील वाटचाल पाहिल्यास हा पक्ष कायम सत्तेत राहिला आहे. या पक्षाने आघाडी केलेला पक्ष विजयी झाला आहे. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत बीपीएफने भाजपशी आघाडी केली होती. त्याआधीच्या दोन विधानसभा निवडणुकीत या पक्षाने काँग्रेसशी आघाडी केली होती. दोन्ही वेळा काँग्रेसला विजय मिळून हा पक्ष सत्तेत आला होता.
• 2021 च्या निवडणुकीसाठी भाजपने बोडोलँड क्षेत्रीय परिषदेचे (बीटीसी) मुख्य कार्यकारी सदस्य प्रमोद बोडो यांच्या नेतृत्वाखालील युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (यूपीपीएल) सोबत आघाडी केली. बोडो क्षेत्रीय परिषदेच्या निवडणुकीत भाजपला 9 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपची साथ सोडलेल्या बीपीएफचे 17 उमेदवार विजयी झाले होते. तर यूपीपीएलने 12 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेस व गणशक्ती पार्टीला प्रत्येकी 1 जागा मिळाली. त्यावेळी भाजपने बीपीएफची साथ सोडून यूपीपीएलशी आघाडी केली होती.
• बोडोलँड पीपल्स फ्रंट पक्षाचे अध्यक्ष - हागरामा मोहिलारी
राजकीय स्थिती
• भारतीय संघराज्याचे आसाम हे एक घटक राज्य असून राष्ट्रपतीने नेमलेल्या राज्यपालाच्या संमतीने मंत्रिमंडळ कारभार पाहते.
• सुरुवातीला आसामची राजधानी शिलाँग होती, तर 1973 पासून ती दिसपूर बनली. 1973 पसून शिलाँग ही मेघालयाची राजधानी आहे.
• मंत्रिमंडळ एकसदनी विधानसभेला जबाबदार असून विधानसभेचे 114 सदस्य आहेत. विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे बहुमत होते (2021). प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस
• राज्यातून लोकसभेवर 14 व राज्यसभेवर 7 सदस्य निर्वाचित होतात.
• 1905 च्या वंगभंगानंतर पूर्व बंगाल, स्वातंत्र्यानंतर आजचे मेघालय, मिझोराम, नागालँड व अरुणाचल मिळून बनवलेले बृहदासाम व ही राज्ये वेगळी झाल्यानंतर उरले ते आसाम.
• 1956 साली आसाम राज्यात पुढील राजकीय प्रदेश समाविष्ट होते- नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश व मिझोराम. कालांतराने या प्रदेशांना राज्याचा दर्जा देण्यात आला.
• बोडो व कार्बी लोकांना अलग राज्ये हवी आहेत व त्यासाठी चर्चा, आंदोलने चालू आहेत.
आसामी राष्ट्रवाद
ब्रिटीशपूर्व आसाम -
• ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या आगमनापूर्वी आसामात बेबंदशाही माजली होती. शैव वा शाक्त आणि वैष्णव या दोन पंथांमधील संघर्षाने राज्य यंत्रणा खिळखिळी झाली होती. त्यातच ब्रह्मदेशातून होणार्या आक्रमणांमुळे अराजकसदृशय स्थिती होती. कचार संस्थानचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये होते. 1826-27 या काळात ते 20 हजार रुपये एवढं झाले.
• ब्रह्मदेशातून होणार्या आक्रमणांचा बीमोड करण्याचे आर्थिक आणि लष्करी बळ अहोम राजेशाहीकडे नव्हते. या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी अहोम राजाला ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला पाचारण करावं लागले. कंपनीच्या सैन्याने ब्रह्मदेशातून होणार्या आक्रमणांचा पुरता बंदोबस्त केल्यानंतर आसामात शांतता प्रस्थापित झाली. पुढे कंपनीने अहोम राजेशाही बरखास्त करून आसामवर आपला अंमल प्रस्थापित केला.
• अहोम राजवटीत आसामातील गावे स्वयंपूर्ण नसली तरी आत्मनिर्भर होती. अहोम राजवटीत शेतसारा नव्हता. शेतकर्यांनी वर्षातले काही महिने राजदरबारासाठी कष्ट विकायचे अशी प्रथा होती. ही प्रथा गुलामगिरी सदृशय होती. शेतसारा नसल्याने साम्राज्याच्या रक्षणासाठी कायमस्वरुपी फौज उभारण्यासाठी सरकारी खजिन्यात पैसा नव्हता. त्यामुळे कंपनीला सहजपणे आसामात प्रवेश मिळाला.
ब्रिटिशांची आसाममधील राजवट -
• ‘प्लांटर राज टू स्वराज’, या ग्रंथात अमलेन्दु गुहा यांनी नोंदवले आहे की, ईस्ट इंडिया कंपनीने आसाम ताब्यात घेतल्यावर महसूल वाढवण्यासाठी चहामळे आणि अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणण्यावर भर दिला. कंपनीच्या राज्यात शेतसारा आणि कर लावण्यात आले. या प्रचंड भूप्रदेशातून मिळणार्या उत्पन्नामध्ये ब्रिटीशांना रस होता. त्यावेळी आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध होती. ही जमीन एक तर पाणथळ होती किंवा मोठ्या प्रमाणावर अरण्यांनी व्यापलेली होती. फॉरेस्ट कायदा वा वनविधेयक आणून ब्रिटिशांनी वनसंपत्तीची लूट वा शोषण सुरु केले. आसामात जंगल जमीन वहिताखाली आणण्याचं धोरण ब्रिटिशांनी अवलंबिले.
• आसाम त्या काळात बंगालला जोडण्यात आला होता. मेमनसिंग, ढाका इत्यादी जिल्ह्यांमध्ये परिपत्रक काढून ब्रिटीशांनी शेतकर्याना आसामात जमीन कसण्यासाठी येण्याचं आमंत्रण दिले. जंगल जमीन वहिताखाली आणली तर एक वर्षासाठी शेतसारा माफ करण्यात आला. परिणामी आसामात परप्रांतीयांचा ओघ सुरु झाला. नेपाळी, बंगाली, संथाळ मोठ्या प्रमाणावर आसामात स्थलांतरित झाले. त्यांनी स्वतंत्र गावे वसवली. जंगल जमिनीवर चहामळ्यांनाही उत्तेजन देण्यात आले. चहामळ्यांसाठी करमाफीची योजना होती.
• 1833 साली भारतात चहाची लागवड करण्याचा निर्णय ईस्ट इंडिया कंपनीने घेतला. लॉर्ड बेंटिकने या संबंधात एक समिती स्थापन केली. या समितीने आसामला भेट दिली त्यावेळी अहोम राजा पुरंदरसिंगाचा प्रतिनिधी म्हणून मणिराम दिवाण ह्यांनी चहा लागवडीसाठी आसामात भरपूर वाव असल्याचे समितीच्या निदर्शनास आणून दिलं.
• 1839 साली स्थापन झालेल्या आसाम टी कंपनीचे दिवाण म्हणून मणिराम यांची नियुक्ती झाली. दरमहा 200 रुपये पगाराच्या नोकरीला मणिराम यांनी वर्षभरात रामराम ठोकला आणि जोरहाट जिल्ह्यात चहाची लागवड सुरु केली. त्याशिवाय शिबसागर जिल्ह्यात त्यांनी चहामळे उभारले. हातमाग, वीटभट्टी, कापड रंगवणे, हस्तीदंतावरील कारागीरी, हत्तींचा व्यापार, लष्कराच्या बराकी बांधण्याचं कंत्राट, दगडी कोळशाचा व्यापार असे अनेक उद्योग मणिराम ह्यांनी सुरु केले.
मणिराम दिवाण यांची याचिका -
• आसाम टी कंपनीच्या मागोमाग अनेक कंपन्यांनी चहामळे फुलवायला सुरुवात केली. ह्या सर्व कंपन्या गोर्यांच्या होत्या. त्यांनी मणिरामना सतावायला सुरुवात केली. कंपनीच्या एका अधिकार्याने मणिरामच्या चहामळ्यावर जप्तीच आणली. मणिरामनी सदर कोर्टात याचिका दाखल केली. त्यांनी पुढील मुद्दे आपल्या याचिकेत मांडले -
1) कंपनी सरकारची कर-सारा पद्धती,
2) अफूच्या लागवडीला उत्तेजन देण्याचं धोरण,
3) मारवाडी आणि बंगाली लोकांचा कारभारातील आणि अर्थव्यवस्थेतील वाढता वरचष्मा,
4) कामाख्या मंदिरातील सरकारी पूजा बंद करण्याचा निर्णय,
5) अहोम राजांच्या प्रासादांची लूट
6) स्मारकांची हेळसांड
• आदिवासी, विशेषतः डोंगरातील आदिवासी समूहांना वाईट वागणूक कंपनी सरकार देते. कंपनीची धोरणे आणि कारभारामुळे आसामी जनतेची स्थिती हलाखीची झाली आहे, आसामी लोकांची प्रतिष्ठा, मानसन्मान, पत, नोकरी, जात, धंदा यावर या कारभाराने हल्ला केला आहे. आसामचे शोषण करण्याच्या कंपनीच्या नीतीमुळे ही परिस्थिती ओढवली आहे, असा आरोप मणिरामनी या याचिकेत केला. अहोम राज्यसंस्था आणि राज्यकारभाराची पुनःस्थापना करण्यात यावी, अशी मागणी मणिराम यांनी या याचिकेत केली. ही याचिका अर्थातच फेटाळण्यात आली.
मणिराम यांची ही याचिका म्हणजे आसामी राष्ट्रवादाचा ओनामा.
• अहोम, आसामी, हिंदू, मुस्लिम, शाक्त आणि वैष्णव पंथीय, आसामातील आदिवासी समूह यांच्या भाषा आणि संस्कृती ही आसामी राष्ट्रवादाची बैठक असावी असे या याचिकेद्वारे मणिराम यांनी स्पष्टपणे सुचवले.
1857 चे स्वातंत्र्य युद्ध आणि मणिराम दिवाण -
• 6 मे 1857 रोजी अहोम राजाचा वंशज कंदरपेश्र्वर सिंग याच्या वतीने त्यांनी त्यांनी कोलकाता न्यायालयात याचिका दाखल केली. अहोम राज्यसंस्था अर्थातच राजेशाहीची पुर्नस्थापना करण्यासाठी जमवाजमव करायला मणिराम कोलकात्याला गेले होते.
• 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडेने ब्रिटीश सेनाधिकार्याला ठार मारून क्रांतीचे रणशिंग फुंकले होते. त्यावेळी मंगल पांडेला आवरणार्या सैनिकावर बराकीतल्या अन्य सैनिकांनी दगडफेक केली होती. मंगल पांडेला निघून जाऊ दे, अन्यथा आम्ही तुझ्यावर गोळ्या चालवू अशी धमकीही दिली.
• 10 मे 1857 रोजी प्रत्यक्षात बंडाला सुरुवात झाली. या बंडात आसामनेही उडी घ्यावी आणि ब्रिटीशांच्या विरोधात बंड करून अहोम राजवटीची स्थापना करावी, यासाठी मणिराम दिवाण यांनी हालचाली सुरु केल्या.
• कोलकता, दिब्रुगढ, गोलाघाट, सिबसागर, जोरहाट अशा विविध ठिकाणच्या विश्वासू साथीदारांना त्याने एकत्र आणण्यात त्यांना यश मिळाले. कंदरपेश्वर सिंग या अहोम राजाचे विश्र्वासू साथीदार होते सुभेदार शेख भिकून आणि नूर मोहम्मद. त्याशिवाय अन्य दरबारीही सामील झाले. कोच राजबंशी, आसामी हिंदू, आसामी मुसलमान, अहोम असे विविध धार्मिक, भाषिक, वांशिक लोक या कटात सहभागी झाले होते. प्रथम जोरहाट ताब्यात घ्यायचे त्यानंतर दिब्रुगढ, सिबसागर हे जिल्हे मुक्त करायचे अशी व्यूहरचना आखण्यात आली.
• ब्रिटिशांनी ब्रह्मी सैन्याच्या तावडीतून आसामची मुक्तता केल्याबद्दल मणिराम दिवाण यांनी बुरांजीमध्ये (आसामी तवारिख) असे लिहून ठेवलंय की, अमरावतीच्या पुरंदराप्रमाणे ब्रिटिशांची संपत्ती आणि साम्राज्य वाढो. परंतु त्यानंतर मणिराम ही राजवट उलथून टाकण्यासाठी कटिबद्ध झाले.
• कोलकत्याहून मणिराम ह्या रणनीतीचे सूत्रसंचालन करत होते. परंतु ब्रिटिश पोलीसांना या कटाचा सुगावा लागला आणि अटकसत्र सुरु झाले. मणिराम दिवाण यांना कोलकत्यात अटक करण्यात आली.
• 26 फेब्रुवारी 1858 रोजी मणिराम दिवाण यांना जाहीरपणे फाशी देण्यात आले. त्याचे पडसाद आसामात उमटले. चहामळ्यातल्या हजारो कामगारांनी बंद पाळला. लोकांचा असंतोष उफाळून आला. या आंदोलनाला ना नेता नव्हता की संघटना वा कार्यक्रम. त्यामुळे हा असंतोष सहजपणे चिरडण्यात आला.
भूमिपूत्र आणि उपरे -
• चहामळ्यांवर काम करायला मोठ्या प्रमाणावर मजूरांची गरज होती. त्यासाठी बिहार, ओडिशा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगाल, मद्रास या प्रांतातील दुष्काळप्रवण भागातून प्रचंड प्रमाणावर मजूरांची आयात करण्यात आली.
• 1905 साली बंगालची पहिली फाळणी ब्रिटिश काळामध्ये लॉर्ड कर्झनने केल्यापासून बंगाली लोक आसाममध्ये यायला लागले. तेव्हापासून मूळचे आसाममध्ये राहणारे लोक (indigenous) आणि त्यानंतर बाहेरून येऊन स्थायिक झालेले (Settlers) यांच्यातल्या भांडणाला सुरुवात झाली. बाहेरून येणार्यांमध्ये सर्वांत जास्त प्रमाण होतं बंगालींचं.
• 1931 सालापर्यंत आसामातील परप्रांतीयांची संख्या 13 लाख झाली. त्यावेळच्या आसामच्या लोकसंख्येमध्ये हे प्रमाण 1/6 होते. जवळपास 15 लाख एकर जंगल जमीन लागवडीखाली आणण्यात आली.
• 1937 साली आसामच्या विधिमंडळात परप्रांतीय आसामातील वनसंपत्तीचे बेसुमार शोषण करत आहेत या विषयावर घमासान चर्चा झाली. लोकसंख्या वाढली, शेती वाढली त्यामागोमाग व्यापारही वाढला. चहा कारखान्यांची सर्व यंत्रसामुग्री इंग्लडातून आयात करण्यात आली होती. चहा मळ्यातील कामगारांचा शिधा आणि अन्य साहित्याचा पुरवठाही कोलकत्यातून व्हायचा. हा व्यापार, त्यासाठी लागणारा पतपुरवठा यासाठी कोलकत्यातून मोठ्या प्रमाणावर मारवाडी समाज आसामात आला. चहामळ्यांवरील कार्यालयात काम करण्यासाठी इंग्रजी शिक्षित बंगाली आले. वसाहतवाद म्हणजे काय तर एका प्रदेशातील लोकांनी दुसर्या प्रदेशात जाऊन तिथली जमीन आणि अन्य नैसर्गिक संसाधनांवर मालकीहक्क स्थापित करणे आणि तेथील राज्ययंत्रणा ताब्यात घेणे.
• आसाममध्ये राज्ययंत्रणा ब्रिटिशांच्या ताब्यात होती पण वसाहती झाल्या त्या परप्रांतीयांच्या अर्थातच भारतीयांच्या, जमीनीवर मालकी प्रस्थापित झाली परप्रांतीयांची, जंगलावर मालकीहक्क मिळाला ब्रिटीशांना वा परप्रांतीय भारतीयांना. नोकरशाहीत वरचष्मा राहिला परप्रांतीयांचा.
• आसामातील उच्चवर्णीय हिंदू (ब्राह्मण, कायस्थ), अहोम यांचे हितसंबंध त्यामुळे दुखावले गेले. अहोम सत्तेबाहेर फेकले गेले होते. त्यांच्याकडे जमीन वगळता अन्य संसाधनेही नव्हती. त्या जमीनीचीही लूट ब्रिटिशांनी केली. वसाहतवादाची सुरुवात जरी ब्रिटिशांनी केलेली असली तरी त्याचा चेहरा भारतीय राहिला. मार्क्सवादी दृष्टीने आसामी समाजातील वर्ग विग्रहाचं विश्लेषण करून अहोम आणि उच्च जातीय हिंदू यांनी आपल्या हितसंबंधांसाठी आसाम आंदोलन सुरु केले, असा निष्कर्ष अनेक अभ्यासकांनी काढला आहे. आपणच आपल्या भूमीवर अल्पसंख्य होत आहोत ह्याचा आसामी जनतेला धक्का बसला होता.
• 1938 साली आसाममध्ये गोपिनाथ बोर्दोलोई यांच्या नेतृत्वाखाली आसाममध्ये प्रांतिक सरकार स्थापन झाले. या मंत्रिमंडळात स्वातंत्र्यसैनिक फक्रुद्दीन अली अहमद यांच्याकडे वित्त, महसूल आणि कामगार ही खाती होती. त्यांना राज्यसभेची खासदारकीही मिळाली. त्यानंतर दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर दोन वेळा ते बारपेटा जिल्ह्यातून (खालचा आसाम) दोन वेळा लोकसभेत निवडून गेले.
• 1947 मध्ये फाळणीच्या वेळी तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानमधून लोंढे भारताच्या पूर्वेकडच्या राज्यांमध्ये आले. यापैकी बहुतेक लोक दाखल झाले पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये. आसाम हा शेतीवर चालणारा प्रदेश आहे. इथे इतर फारसे उद्योग नाहीत. त्यामुळे पाण्यावर आणि शेतीवर हक्क असणार्यांकडे रोजीरोटी राहते. आसामी माणूस हा तसा शांत स्वभावाचा आहे तर बंगाली माणूस स्वभावाने आक्रमक. यामध्ये राज्यात बिहारी आले, उद्योग करायला मारवाडी आले आणि यातून वाद रोजीरोटीपर्यंत गेला.
• 1971 च्या भारत-पाक युद्धानंतर लाखोंच्या संख्येने बांगलादेशातून आसामात निर्वासित आले. 1971 मध्ये पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होत बांगलादेशाची निर्मिती झाली आणि पुन्हा हेच घडलं. बंगाली भाषक निर्वासितांचे लोंढे आसाममध्ये दाखल झाले. तेव्हापासून आसाममध्ये आसामी विरुद्ध बंगाली या वादाला सुरुवात झाली. हा वाद फक्त बंगाली हिंदू वा फक्त बंगाली मुस्लिम यांच्याविषयीचा नाही. हा वाद हिंदू विरुद्ध मुस्लिम असा नाही, आणि कधीही नव्हता. यामध्ये आसामी हिंदू आणि आसामी मुस्लिम एकत्र आहेत. इथे सगळ्यात जास्त महत्त्व आहे आसामी भाषेला. इथे बाहेरून येणारी व्यक्ती कोणत्याही धर्माची असो, ती इथे नको असं आसामींचं म्हणणं आहे.
• 1974 साली फक्रुद्दीन अली अहमद राष्ट्रपती झाले. त्यांनी स्थलांतराला उत्तेजन दिले होते. त्यामुळे आसाम आंदोलनाची रुजवात झाली.
• 1979 साली आसाममध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला. ’बंगाल खेडा’ म्हणजेच बंगाली हटाव आंदोलन झालं. आसामच्या विद्यार्थ्यांनी तरुणांनी केलेलं हे सगळ्यांत मोठं आंदोलन होतं. हा तरूण मुलांचा उद्रेक होता. यातून पुढे ’आसाम गण परिषदेची’ स्थापना झाली. प्रफुल्लकुमार मोहंतो याचे नेते होते.
• 1985 साली आसाम गण परिषद सत्तेत आली. त्यांनी पंतप्रधान राजीव गांधींसोबत आसाम करार केला. या घडामोडींतूनच पुढे उल्फा म्हणजेच युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम जन्माला आली.
आसाममधील स्थलांतरीत आणि परकीय नागरीक यांची समस्या आसामच्या आर्थिक विकासाशी घट्टपणे निगडीत आहे. पुढील अनेक अंतर्विरोध त्यामध्ये आहेत -
1) बोडो-अहोम, बंगाली-असामी,
2) बोडो-परप्रांतीय,
3) बोडो-बांग्लादेशी (हिंदू आणि मुस्लिम),
4) अहोम-बांग्लादेशी (हिंदू आणि मुस्लिम),
5) अहोम-परप्रांतीय(बिहार-उत्तर प्रदेश),
6) बोडो-परप्रांतीय( संथाल व अन्य आदिवासी),
7) अहोम-बोडो-मारवाडी,
8) असमी-मेघालयी,
9) असमी-नागा,
10) असमी-अरुणाचली
• हे अंतर्विरोध मार्गी लावण्यासाठी जिल्हा स्वायत्त मंडळे, नवीन राज्यांची निर्मिती, 1985 चा आसाम करार, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स आणि आता सुधारित नागरीकत्वाचा कायदा असे उपाय योजण्यात आले. मात्र त्यामुळे आसाममधील समस्या मार्गी लागण्याऐवजी अधिकाधिक जटील झाली.
भाषिक संघर्ष -
• ब्रिटिश काळामध्ये 4 दशके बंगाली भाषा ही आसामवर राजभाषा म्हणून लादण्यात आली होती. ब्रिटिश अधिकार्यांना एक नवीन भाषा शिकावी लागू नये म्हणून त्यांना येत असलेल्या बंगाली भाषेला वापरण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केला. त्याचा परिणाम आसामी भाषेच्या वृद्धीवर झाला. लोकांना नाईलाजाने बंगाली भाषा शिकावी लागली. याला विरोध झाल्यानंतर आसामी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला होता. भाषेविषयीची ही भीती आजही कायम आहे.
• आसामी भाषेवर बंगालीचं वर्चस्व वाढेल आणि त्याचा परिणाम संस्कृतीवर, कामकाजावर होईल असं लोकांना वाटतंय. भाषेचा मुद्दा आसामच्या आणि एकूणच आसाम - बांगलादेश प्रांताच्या इतिहासातला महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे. पश्चिम पाकिस्तानापासून वेगळं होत बांगलादेशची निर्मिती होण्यामध्ये ’बंगाली’ या भाषेचा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता.
• आसाममध्ये ही सोनवाल जमात आहे. या सोनवालांचं साहित्य होतं, सोनवाली भाषा होती. पण एकूण बंगाली आक्रमणात सोनवाली भाषा लुप्त झाली. आता ना सोनवाली भाषेतून काम होत नाही किंवा कोणी बोलतही नाही. असं आसाममध्ये अनेक समाजांविषयी घडलेलं आहे. त्यामुळेच भाषा आधी जाते, मग संस्कृतीवर आक्रमण होतं आणि मग रोजीरोटीवर आक्रमण होतं.
• आसाम भौगोलिक दृष्ट्या दोन भागांमध्ये विभाजित झालेला आहे. एक आहे ब्रह्मपुत्रेचं खोरं आणि दुसरं बराकचं खोरं. बराक खोरं भौगोलिक, भाषिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या बांगलादेशच्या जवळ आहे. तिथे आजही आसामी राजभाषा नाही. बंगाली ही तिथली अधिकृत भाषा आहे. इथली परिस्थिती पाहून ब्रह्मपुत्रेच्या खोर्यातील आसामींना आपल्या भाषेची आणि संस्कृतीची चिंता वाटते.
• ऑल आसाम स्टुडंन्टस् युनियनच्या पोटात युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसामने जन्म घेतला.
• इंदिरा गोस्वामी यांच्यासारख्या ज्ञानपीठ विजेत्या लेखिकेला उल्फा या संघटनेबद्दल सहानुभूती होती.
आसाम करार
• 15 ऑगस्ट 1985 रोजी भारत सरकार आणि आसाम चळवळीच्या नेत्यांमध्ये हा करार झाला होता. आसाम करार राज्यातील जनतेच्या सामाजिक, भाषिक आणि सांस्कृतिक ओळखीला सुरक्षा प्रदान करतो. नागरिकत्व दुरुस्ती विधेयका 2018 च्या संदर्भात 1985 च्या आसाम करार महत्त्वाचा आहे.
• आसाम करारापूर्वी 6 वर्ष 1979 पासून आसाम स्टुडंट्स युनियनने (आसू) आसाममध्ये घुसखोरीविरोधी आंदोलन सुरू केलं होतं. बेकायदा प्रवाशांची ओळख पटवून त्यांना बाहेर काढलं जावं, अशी त्यांची मागणी होती.
• कटऑफ डेटवरून विरोध - 1985 च्या आसाम करारानुसार आसाममधील घुसखोरांना वैधता देण्याची तारिख 25 मार्च 1971 ही होतीे. मात्र, 2018 च्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकात ही तारिख 31 डिसेंबर 2014 करण्यात आली.
• आसाममध्ये सुरु असलेला सर्व विरोध या तारखेवरुन आहे. नव्या कट ऑफ डेटमुळे जे 31 डिसेंबर 2014 पूर्वी आसाममध्ये दाखल झाले आहेत, तेसुद्धा आसाममध्ये आश्रय घेऊ शकतात.
• या नव्या कट ऑफ डेटमुळे त्या लोकांनाही नागरिकत्व मिळेल ज्यांची नावं राष्ट्रीय नोंदणी यादी प्रक्रियेदरम्यान वगळण्यात आली होती.
• आसाम करारात आसाममध्ये 25 मार्च 1971 नंतर दाखल झालेल्या हिंदू आणि मुस्लिम सर्वांनाच बाहेर काढण्याची तरतूद होती. याच विरोधाभासामुळे आसाममधली बहुसंख्य जनता नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला तीव्र विरोध करत आहे.
बोडो आणि अहोम वा बोडो आणि बिगर-बोडो संघर्ष
• बोडो आसामचे सर्वात प्राचीन रहिवासी, कारण अहोम लोक म्यानमारमधून आसामात आले, त्यांनी 600 वर्षं राज्य केले. ढुबरी, कोक्राझार, बोंगाईगाव, गोलपारा, दरांग, मोरीगाव, बाक्सा, उदालगुरी, चिरांग, कामरुप, बारपेटा, नलबारी हे जिल्हे खालच्या म्हणजे लोअर आसाममध्ये आहेत. हा प्रदेश बोडोंचा.
• बोडो-कचारी या आदिवासी समूहामध्ये ब्रह्मपुत्रेच्या खोर्यातला अनेक आदिवासी समूहांचा समावेश होतो - गारो, राभा, हाजोंग, कोच-राजबंशी, दिमासा कचारी, सोनवाल कचारी, मिशिंग, तिवा हे आदिवासी समूह ब्रह्मपुत्रेच्या दोन्ही तीरांवर होते.
• ईशान्य भारतात पहाडी प्रदेशात आदिवासी जमाती आहेत - नागा, खाँसी, मिझो, इत्यादी. त्यांच्यासाठी यथावकाश स्वतंत्र राज्ये स्थापन झाली आहेत.
• मैदानी प्रदेशातही आदिवासी असून बोडो-कचारी हे आदिवासी मैदानी प्रदेशातले आदिवासी आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र राज्य स्थापन झालेले नाही.
• सुजीत चौधरी या इतिहासकाराने, बोडो आणि अहोम वा बोडो आणि बिगर-बोडो, हा फरक करण्यासाठी ‘शेतीचे तंत्रज्ञान’ हा निकष नोंदवला आहे. जमीनीवरचे जंगल साफ करायचे, काडी-कचरा जाळायचा. काठी जमिनीत रोवून छिद्र करायचे, त्यात बी पेरायचे किंवा सरळ बिया विखरून टाकायच्या. शेतीची निगराणी म्हणजे केवळ राखण करायची. भाते पिकूनी पिवळी झाली की काढणी करायची. पुढच्या वर्षी दुसर्या जागेवरचे जंगल कापायचे. असं करत परत पहिल्या जागी यायला 8-10 वर्षं लागायची. यालाच म्हणतात झूम शेती. ही आदिवासींची शेती. ती पूर्वी बोडो समुदायामार्फत केली जाई.
• प्रगत शेती तंत्रज्ञान म्हणजे नांगराची शेती. ही स्थिर शेती असते. नांगरणी करायची तर बैल पाळावे लागतात. बैलांनाही नांगरणी करायला शिकवावे लागतं, त्याशिवाय जमिनीची मशागत करावी लागते, निंदणी, खुरपणी करावी लागते. म्हणजे पिकाची निगा घ्यावी लागते. त्यामुळे स्थिर शेतीतून उत्पादन अधिक निघते म्हणजेच वरकड उत्पादन येते. ते बाजारात विकून अन्य वस्तू, सुविधा विकत घेता येतात. अप्पर आसामातल्या सुपीक जमिनीतून बोडोंना हद्दपार केल्यावर अहोम वा बंगाली वा अन्य प्रगत समूहांनी नांगराची शेती सुरु केली. आपल्या वहिवाटीच्या जमिनीवरून बोडोंची हकालपट्टी प्राचीन काळापासून सुरु होती. पण जोवर जमिनीची उपलब्धता होती तोवर या समस्येने उग्र रुप धारण केले नाही.
• 1930 पर्यंत म्हणजे विसाव्या शतकाच्या पहिल्या तीन दशकांत बोडो-कचारी समूहांनी शेत नांगरण्याचे तंत्र आत्मसात केले. झूम शेती होती तेव्हा शेतजमीन सारखी बदलत राह्यची. त्यामुळे त्यांच्या जमिनी हडप करणे परप्रांतीयांना सोपं होते. मात्र बोडो स्थिर शेती करू लागल्यावर शेतजमिनीवरून संघर्ष होऊ लागले. आसामची सूत्रे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या हाती आल्यानंतर हे संघर्ष अधिक तीव्र झाले.
• 1932 सालापासून आसामातील राज्यकर्त्यांनी बोडोंच्या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केले वा कायद्याची आणि कायद्याने निर्माण केलेल्या यंत्रणांची चेष्टा केली. त्यामुळे बोडो विरुद्ध बिगर-बोडो संघर्षाने कमालीचे हिंसक रुप धारण केले आहे.
• 1932 ते 1942 या काळात, परप्रांतियांच्या लोंढ्यांपासून बोडोंच्या जंगल-जमिनीवरील हक्कांचे रक्षण करावे या हेतूने इनर लाईन परमिट, संरक्षित जमिनीचे पट्टे अर्थात बोडोंची जमीन अन्य जमातीच्या लोकांच्या नावावर हस्तांतरित होण्यास निर्बंध घालण्यासारखे उपाय करण्यात आले. परंतु त्यात धरसोड वृत्ती होती. या कायद्यांमध्ये आदिवासी कोण हेच निश्चित केलेलं नव्हते. तसेच एका कायद्यान्वये कुरणे आणि गायरान जमिनी लागवडीखाली आणण्यावर निर्बंध घालायचे आणि अन्नोत्पादनात वाढ करण्याचा कार्यक्रम अंमलात आणण्यासाठी हे निर्बंध शिथिल करायचे असा खेळ आसामचे राज्यकर्ते करत होते.
• 1993 साली बोडोंसाठी प्रादेशिक स्वायत्त मंडळांची स्थापना झाली. बोडो संघटनांनी स्वतंत्र राज्याची मागणी मागे घेतली. परंतु या स्वायत्त मंडळांच्या निवडणुका कधीही झाल्या नाहीत. त्यांच्या नेमणुका राज्य सरकारने करण्याचा प्रघात चालू ठेवण्यात आला. लोकशाही विकेंद्रीकरणाचे तत्व लोकांपर्यंत झिरपलेच नाही.
• स्वायत्त मंडळांच्या सत्तेचे आमिष दाखवून विविध बोडो संघटनांमध्ये संघर्ष पेटवण्याचे काम प्रशासनाने केले. त्यातून समस्या सुटली नाही, उलट नियंत्रणाच्या बाहेर जाऊ लागली. तसेच आदिवासींसाठी स्वायत्त विकास मंडळांच्या स्थापनेमुळे आसामातील मैदानी प्रदेशातील आदिवासींच्या विकासाची समस्या सुटण्यास मदत झालेली नाही. सुधारित नागरिकत्वाच्या कायद्याच्या विरोधात बोडोलँण्डमध्ये निदर्शने झालेली नाही.
• 1996 पासून बोडो राज्याच्या मागणीसाठी, बोडो अतिरेकी हिंसक मार्गांचा अवलंब करत आहेत. बिगर-बोडो लोकसंख्येला म्हणजे अर्थातच संथाल, बंगाली, आसामी, नेपाळी यांना बोडोलँडच्या संकल्पित प्रदेशातून हुसकावून तिथे आपले वर्चस्व निर्माण करण्याची स्वतंत्र बोडो राज्याच्या मागणीसाठी बोडोंचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यांमध्ये बोडोंची लोकसंख्या वाढवायची असेल तर बिगर-बोडोंना हुसकावून लावण्याची बोडो राज्याच्या समर्थकांची अर्थातच बोडोंमधील अतिरेकी संघटनांची युद्धनीती आहे.
• 1993 ते 1998 या काळात बोडो टेरिटोरिअल एरिया डिस्ट्रिक्ट या प्रदेशात झालेल्या दंगलींमध्ये बळी पडलेल्यांची आणि विस्थापितांची संख्या अस्वस्थ करणारी होती -
• 1993 ऑक्टोबर मध्ये बोंगाईगाव जिल्ह्यात झालेल्या बोडो आणि बांगलादेशी मुसलमान यांच्यातील संघर्षात 50 व्यक्ती ठार झाल्या आणि जवळपास 5000 मुसलमान निर्वासित झाले.
• 1994 जुलै मध्ये बारपेटा जिल्ह्यातील हिंसाचारात 100 लोक मृत्युमुखी पडले. निर्वासितांनी बान्सबारी येथील छावण्यांमध्ये आसरा घेतला.
• 1996 मे मध्ये झालेल्या दंगलीत 200 पेक्षा अधिक माणसांनी जीव गमावला तर विस्थापितांची संख्या होती 2 लाख.
• कोक्राझार आणि बोंगाईगाव या जिल्ह्यामध्ये शेतजमीनीवरील नियंत्रणावरून उसळलेला हा हिंसाचार बोडो आणि संथाळ या दोन जमातींमधला होता.
• 2000 मे महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत उसळलेल्या हिंसाचारात बोडो आणि संथाळ या दोन आदिवासी जमातींमधले 50 हून अधिक लोक ठार झाले आणि 80 हजार विस्थापित.
• 2008 ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये मुस्लिम आणि बोडो संघर्षात उदालगिरी आणि दरांग जिल्ह्यात दोन्ही समाजातील 70 लोक ठार झाले तर 1 लाखांहून अधिक विस्थापित झाले.
• आसामातील विस्थापितांमध्ये सर्वाधिक संख्या संथाळ, बंगाली आणि नेपाळी यांची आहे, असे महाश्र्वेता सत्पती यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. त्यांनी लोकसंख्याशास्त्र आणि जिऑग्राफिकल इन्फर्मेशन सर्वे या दोन तंत्रांचा वापर करून (नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटी), बोडो प्रदेशातील हिंसाचाराची मीमांसा केली आहे.
• गोलपारा, कामरुप आणि दरांग या तीन जिल्ह्यांत बोडोंची लोकसंख्या एकवटत असल्याचे सत्पती यांनी निदर्शनास आणलं आहे. या तीन जिल्ह्यांमध्ये 93 टक्के बोडो आहेत. पूर्वी या तीन जिल्ह्यांमधील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात बोडोंचा वाटा केवळ 10-15 टक्के होता.
• बोडो अतिरेक्यांनी सुरुवातीला उदालगिरी, बारपेटा, कोक्राझार, बोंगाईगाव या जिल्ह्यांकडे लक्ष वळवलं होतं. 2012 या वर्षी चिरांग आणि ढुबरी या दोन जिल्ह्यांची त्यामध्ये भर पडली.
इनर लाईन परमिट
इनर लाईन परमिट हे एक प्रवासी प्रमाणपत्र आहे. बाहेरच्या राज्यांतून येणार्या भारतीय वा परदेशी नागरिकांना राज्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी देण्यात येणारा परवाना म्हणजे इनर लाईन परमिट. कुठल्याही संरक्षित क्षेत्रात विशिष्ट कालावधीसाठी प्रवास करण्यासाठी भारत सरकार आपल्या नागरिकांना हे प्रमाणपत्र देते.
• जितक्या कालावधीसाठी हा परवाना देण्यात येतो, तितकाच वेळ या व्यक्तींना या राज्यांत थांबता येतं. त्यापेक्षा जास्त काळ या राज्यात त्यांना थांबता येत नाही.
• दुसर्या राज्यांतल्या लोकांना इथे जमीन खरेदी करता येत नाही, घर बांधता येत नाही किंवा नोकरीही करता येत नाही.
• सध्या ईशान्य भारतातील सर्व राज्यांमध्ये इनर लाईन परमिट लागू नाही. अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड आणि मणीपूरमध्ये हे लागू आहे. त्यामुळे आसाम, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांमधूनदेखील या व्यवस्थेची मागणी सातत्याने होत आहे.
• ईशान्येकडील सगळ्यांच राज्यांमध्ये इनर लाईन परमिट लागू करण्यात यावं अशी मागणी नॉर्थ ईस्ट स्टुडंट्स ऑर्गनायझेनशन केली आहे.
• 1873 मध्ये सुरक्षेची खबरदारी म्हणून आणि स्थानिक जातींच्या संरक्षणासाठी याची सुरुवात करण्यात आली होती. इंग्रजांच्या काळात सुरक्षा व्यवस्था आणि स्थानिक जातीय समुदायांच्या रक्षणासाठी इनर लाईन परमिटची तरतूद करण्यात आली होती.
• 1873 च्या बंगाल-ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन कायद्यात ब्रिटिश हितसंबंधांना केंद्रस्थानी ठेवून हे पाऊल उचलण्यात आलं होतं. स्वातंत्र्यानंतर काही बदलांसह हे नियम भारत सरकारने कायम ठेवले.
• 1971 सालच्या बांगलादेश मुक्तीसंग्रामानंतर बांगलादेशमधून मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिकांनी पलायन करुन ईशान्य भारतात आश्रय घेतला होता. त्यानंतर इनर लाईन परमिटच्या मागणीला बळ मिळालं होतं.
• 2018 वर्षी मणिपूर विधानसभेत मध्ये, ’बिगर-मणिपुरी’ आणि ’बाहेरच्या’ लोकांना मणिपूरमध्ये प्रवेश करण्यासाठी काही कठोर नियम असावेत, असं विधेयक पारित झाले होते. 1891 साली मणिपूरमध्ये बंड झाले होते.
• 2019 - नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत सादर करताना ईशान्येकडील मणिपूर राज्याला इनर लाईन परमिटमध्ये ((ILP)) सामील करणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत सांगितलं होतं.
भारतीय राज्यघटनेची सहाव्या अनुसूची-
• भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीत ईशान्य भारतातील आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोरम ही राज्य आहेत तिथे राज्यघटनेनुसार स्वायत्त आदिवासी विकास परिषदा आहेत. या परिषदा आदिवासींच्या हक्कांची काळजी घेतात. आदिवासींची सामाजिक, भाषिक आणि सांस्कृतिक ओळख टिकवण्यासाठी हे करण्यात आलेलं आहे.
• 1949 साली संविधानसभेने सहाव्या अनुसूची द्वारे स्वायत्त आदिवासी विकास परिषदांची स्थापना करून राज्यांच्या विधानसभांना संबंधित अधिकार प्रदान केले गेले. राज्यघटनेतील अनुच्छेद 244 मध्ये यासंबंधीची तरतूद आहे.
• सहाव्या अनुसूचीत क्षेत्रीय परिषदांचा ही उल्लेख आहे. या सर्वांचा उद्देश स्थानिक आदिवासींची सामाजिक, भाषिक आणि सांस्कृतिक ओळख टिकवून ठेवणं, हा होता.
• सहाव्या अनुसूचीमध्ये येणार्या ईशान्य भारतातील भागांना नागरिकत्व दुरुस्ती विधेयकात सूट देण्यात आली आहे.
• नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या पार्श्वभूमीवर इनर लाईन परमिटसह भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीचा उल्लेख झालेला आहे.
• सहाव्या अनुसूचीत येणार्या ईशान्य भारतातील राज्यांना नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आलं आहे. याचा अर्थ असा की पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशांमधून 31 डिसेंबर 2014 पूर्वी आलेले हिंदू, जैन, बौद्ध, शीख, ख्रिश्र्चन आणि पारसी म्हणजेच मुस्लिमेतर शरणार्थी भारताचं नागरिकत्व मिळवून देखील आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरममध्ये कुठल्याच प्रकारची जमीन किंवा व्यापारी अधिकार मिळवू शकणार नाही.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे आसाम कराराचं उल्लंघन (1985) होत असल्याचं म्हणत आसाममध्ये या विधेयकाला विरोध झाला. आसाम करार राज्यातल्या लोकांना सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक सुरक्षा देतो. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे परप्रांतियांना किंवा शरणार्थींना नागरिकत्व मिळेल आणि त्याचा परिणाम आसामची ओळख, भाषा आणि संस्कृतीवर पडेल, अशी भीती आसामी लोकांना आहे.
• नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 9 डिसेंबर 2019 रोजी हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं. 11 डिसेंबर रोजी ते राज्यभेत मंजूर झालं होतं.
• नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा फायदा पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून येणार्या निर्वासितांना होणार आहे. यापैकी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून येणार्या लोकांची संख्या कमी आहे. पण बांगलादेशातून येणार्यांची संख्या जास्त आहे.
• आसाम करारानुसार 25 मार्च 1971 पर्यंत राज़्यात आलेल्या लोकांना वैध मानलं जातं. यामध्ये धर्माचा विचार केला जात नव्हता. जे लोक आसाममध्ये 25 मार्च 1971 नंतर दाखल झाले आहेत त्या हिंदू आणि मुसलमानांना परत पाठवण्यात यावं, असं आसाम करारात म्हटलं आहे. पण नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामध्ये ही तारीख 31 डिसेंबर 2014 करण्यात आली असून यामध्ये धर्माचा विचार करण्यात आलेला आहे. या विरोधाभासामुळे आसाममधल्या लोकसंख्येचा एक मोठा गट नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करतोय.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा कुठे लागू होईल?
• ईशान्येकडील 7 राज्यांपैकी आसाम आणि त्रिपुरा या दोन राज्यांमधल्या मोजक्याच भागात हा कायदा लागू होईल. आसाममध्ये बोडो, कार्बी आणि दिमासा हे भाग घटनेच्या कलम 6 खाली येतात, म्हणून तिथेही नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू होणार नाही. आसामच्या आदिवासी बहुल भागांमध्ये या विधेयकाचा परिणाम होणार नाही.
• त्रिपुरातल्या काही भागांमध्येही नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू होणार नाही.
• मेघालय, नागालँड, मिझोराम आणि मणिपूर या राज्यांमध्ये हा कायदा लागू होणार नाही.
• इनर लाईन परमिट लागू असणार्या भागांमध्येही हा कायदा लागू होणार नाही.
एनआरसी
नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स. राष्ट्रीय नागरिक नोंदणी प्रक्रिया. देशामध्ये राहणारी कोणती व्यक्ती भारतीय नागरिक आहे आणि कोण नाही, हे ठरवण्यासाठी ही प्रक्रिया राबवण्यात येते. 1951 मध्ये आसाममध्ये पहिली एनआरसी झाली. ही देशातली पहिली प्रक्रिया होती.
• आसामचे पहिले मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते लोकमान्य गोपीनाथ बोरडोलोई यांनी 1951 साली पंतप्रधान पंडित नेहरूं यांच्याकडे पहिल्या एनआरसीची मागणी केली होती. त्यानंतर जनगणनेप्रमाणेच ठराविक काळानंतर नियमित एनआरसी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण तसं घडलं नाही.
• 1985 पासून 2014 पर्यंत पुन्हा कधीही एनआरसी झाली नाही. त्यामुळे 2014 मध्ये काहीजणांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आणि सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनंतर केंद्र सरकारकडून एनआरसीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. 4 वर्षं ही प्रक्रिया चालली आणि टप्प्याटप्प्याने याद्या जाहीर करत, अखेरीस एक अंतिम यादी तयार करण्यात आली. आपलं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी लोकांनी निवासाची कागदपत्रं, दाखले, वाडवडील इथेच राहत असल्याचे पुरावे दिले. पण 2019 मध्ये अंतिम यादी जाहीर झाली तेव्हा 19 लाख लोक या यादीतून बाहेर करण्यात आले. आणि त्यापैकी 12 लाख बंगाली हिंदू होते.
• 19 लाख लोकांसाठी आसाममध्ये 200 ट्रिब्युनल्स सुरू करण्यात आलेली आहेत. या लोकांना इथे जाऊन आपलं भारतीयत्व सिद्ध करायचं आहे. तिथेही ते सिद्ध झालं नाही तर या लोकांना हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावता येतील आणि तिथेही नागरिकत्व सिद्ध झालं नाही तर मग या लोकांची रवानगी डिटेन्शन कॅम्पमध्ये होईल.
• याविषयी आसाम राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केलेली आहे. राज्य सरकारनेच राबवलेली एनआरसी प्रक्रिया चुकीची असून आम्हाला ही मान्य नाही, याचा पुनर्विचार करावा, पुनरावलोकन करावं अशी मागणी आसाम सरकारने केलीय. याविषयी सुप्रीम कोर्टाने अद्याप निर्णय दिलेला नाही.
एनआरसीतून बाहेर झालेल्या लोकांचं काय?
• एनआरसी यादीतून बाहेर झालेल्या 19 लाख लोकांपैकी जे सुमारे 12 लाख हिंदू आहेत त्यांना नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा फायदा होईल आणि इतरांना ट्रिब्युनल्सकडे जावं लागेल असा समज आहे. पण ते खरं नाही. या 19 लाख लोकांपैकी साधारण 1.50 लाख लोकं अशी होती ज्यांनी भारतीय नागरिकत्वाचा दावाच केला नव्हता किंवा प्रक्रिया केलीच नव्हती. त्यामुळे हे लोक यादीतून बाहेर गेले. यातून उरलेल्या लोकांमध्ये हिंदूही आहेत.
• या लोकांनी आधीच आपण भारतीय असल्याचा दावा केला. त्यांचे दावे पडताळून पाहताना कागदपत्रं पूर्ण नसल्याने वा काही गोष्टी न जुळल्याने हे लोक यादीबाहेर राहिले. पण या लोकांनी आधीच आपण भारतीय असल्याचा दावा केल्याने ते बांगलादेशातून धार्मिक त्रासाला कंटाळून भारतात आल्याचा दावा करू शकत नाहीत. या लोकांना ’फॉरेन ट्रिब्युनल’च्या प्रक्रियेतून जावंच लागेल. मग तो हिंदू असो वा मुसलमान.
• आसाम सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार सुमारे 5 लाख लोक नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात. हे असे लोक आहेत ज्यांनी भारतीय असल्याचा दावा केलेला नाही, वा आपण बांगलादेशातून आल्याचं सांगितलेलं आहे किंवा ज्यांच्याकडे ’रेफ्युजी कार्ड्स’ आहेत वा शरणार्थी असल्याची कागदपत्रं आहेत. त्या लोकांना नागरिकत्व मिळू शकतं.
एनआरसी आणि आसाम आंदोलन
• 1951 मध्ये पहिल्यांदा भारतात एनआरसी म्हणजे ’नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स’ केले गेले. त्याची सुरुवात आसामपासून झाली.
• 1920 पासून आसाममध्ये इतर राज्यांतून येणार्या लोकांची संख्या वाढत गेली.
• 1971 मध्ये बांगलादेशची स्थापना झाली आणि भारत सरकारने हे मान्य केले, की 1971 नंतर आसाममध्ये आलेल्या प्रवाशांना (घुसखोर) त्यांच्या देशात परत पाठवण्यात येईल. मात्र 2019 मध्ये कायद्याद्वारे याच लोकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद केली गेली. मतपेढी तयार करण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे.
• 1978 च्या निवडणुकांमध्ये ही संख्या (घुसखोर) कित्येक पटीने वाढल्याचे लक्षात आले. ’आसू’ म्हणजे ’ऑल आसाम स्टुडंट युनिअन’ने मागणी केली, की अवैध रीतीने आलेल्या लोकांची संख्या जाहीर करावी, या लोकांचे नाव मतदार यादीतून काढून टाकावे आणि मगच निवडणूक घेण्यात यावी.
• 1979 मध्ये ’ऑल आसाम स्टुडंट युनियन’ आणि ’ऑल आसाम गण संग्राम परिषद’ यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान आणि बांगलादेशमधून अवैधपणे घुसलेल्या लोकांमुळे आपली संस्कृती आणि भाषा संपून जाईल, या भीतीतून, आसाम आंदोलनाची सुरुवात झाली. पुढे आंदोलन उग्र बनत गेले.
• या आसाम आंदोलनात 22 वर्षीय खारगेश्वर तालुकदार या तरुण कार्यकर्त्याचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. खारगेश्वर बारपेटा गावचा होता आणि म्हणून या गावाला विशेष महत्त्व आहे.
• 1979 ला सुरू झालेल्या आसाम आंदोलनांचा मोर्चा सांभाळणारा ’आसाम गण परिषद’ हा पक्ष 2018 मध्ये भाजपबरोबर सत्तेत होता.
• 1979 नंतर आसाममध्ये सुरू झालेल्या आंदोलनाने जेव्हा उग्र रूप धारण केले, तेव्हा आचार्य विनोबा भावेंनी आसाममधले लोकप्रिय गांधीवादी हेमभाईंना त्यांच्या काही साथीदारांबरोबर आसाममध्ये शांतता प्रस्थापित करायला पाठवले. हेमभाईनी आसाममध्ये ’शांती साधना आश्रम’ स्थापन केला.. आसामी, हिंदी, मराठी आणि इंग्लिश या भाषांवर उत्तम प्रभुत्व असलेल्या हेमभाईंनी आसामी संस्कृती, भाषा आणि गांधीजींच्या आयुष्यावर अनेक पुस्तके लिहली आहेत.
• 1985 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि आंदोलक यांच्यामध्ये ’आसाम करार’ झाला. त्याद्वारे 1 जानेवारी 1966 च्या आधी आलेल्या नागरिकांना आसाममध्ये स्वीकारले जाईल, हे मान्य केले गेले. हा आसाम करार धर्माच्या आधारावर समाजाची विभागणी करत नाही. आसामची नवीन लोक सामावून घेण्याची क्षमता संपलेली आहे. आसामी भाषेपेक्षा बंगाली भाषेचे प्रभुत्व वाढत आहे. अशा परिस्थितीत आपले अस्तित्व टिकवण्याचा संपूर्ण अधिकार आसामी जनतेला आहे.
• 2009 मध्ये ज्यांची नावे एनआरसीमध्ये नाहीत, त्यांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्यात यावीत, या मागणीसाठी ’आसाम पब्लिक वर्क्स’ ही स्वयंसेवी संस्था सुप्रीम कोर्टात पोहोचली.
2017 मध्ये सरकारने एनआरसीचा पहिला ड्राफ्ट तयार केला.
• 31 ऑगस्ट 2019 रोजी बनलेल्या अंतिम यादीत एनआरसीमध्ये नाव नसलेल्या लोकांची संख्या 19 लाख इतकी आहे.
• डिसेंबर 2019 महिन्यात झालेल्या उग्र आंदोलनादरम्यान, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सहा लोकांचा मृत्यू झाला. त्यात एक मुस्लिम, एक ख्रिश्चन आणि इतर हिंदू धर्माचे लोक होते. आसाममध्ये सीएएला विरोध करणारे सर्वधर्मीय रस्त्यावर उतरले असल्याचे कळते.
• ज्या लोकांना आसाममधून बाहेर काढण्यासाठी इतकी वर्षे आंदोलने केली, ज्यासाठी आसाम करार झाला, त्याची थट्टा अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या मुस्लिमखेरीज सर्व धर्माच्या लोकांना भारतीय नागरिकत्व देण्याच्या निर्णयाने झाली. त्यामुळे आसामच्या जनतेत भाजप सरकारने नव्याने आणलेल्या सीएए कायद्याबद्दल राग आहे. उर्वरित भारत हिंदू-मुस्लिम या मुद्द्यावर तापलेला असताना, आसाममध्ये हे चित्र खूप वेगळे आहे. येथे प्रश्न हिंदू-मुस्लिम हा नसून, आसामी आणि परप्रांतीय असा आहे.
• आसामी लोकांचा विरोध आहे तो बाहेरून आलेल्या लोकांना, मग तो हिंदू असो वा मुस्लिम. हा कायदा आसाम कराराचे उल्लंघन करणारा आहे.
• काश्मीरनंतर आसाम हे देशातील मुस्लिमबहुल राज्य आहे; पण आसामच्या इतिहासात कधी हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण झालेला नाही. धर्मावरून भेदभाव आसामने कधी मान्यच केला नाही. याचे सगळ्यांत मोठे उदाहरण म्हणजे, आसामच्या शिवसागर येथील शिवमंदिरात हिंदू पूजा करतात आणि पूजेचा पहिला प्रसाद एका मुस्लिम कुटुंबाला दिला जातो.
• ’शंकरदेव आणि माधवदेव या महापुरुषांच्या शिकवणीवर आसाम आजपर्यंत जगतो आहे. त्यांनी सर्वधर्मीय लोकांना एकत्र घेऊन आसाममध्ये समाजाची निर्मिती केली. तेव्हापासून आसाममध्ये धर्माच्या नावावर कधी राजकारण, समाजकारण झालेले नाही.
• आंदोलनाचा इतिहास असलेल्या आसाममध्ये आंदोलन म्हणजे एक उत्सव. आंदोलनाच्या दिवशी गावातल्या स्त्रिया पारंपरिक आसामी साड्या घालून आंदोलनात सहभागी होतात. आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचताना जवळपासच्या गावातून चालत येणार्या महिला, पुरुष जागोजागी दिसत होते. लोकगीते, लोकनृत्य आणि सरकार विरोधी घोषणा, या स्वरूपात झालेल्या या आंदोलनात 50 टक्क्यांपेक्षा जास्त महिलांचा सहभाग होता. मुलेबाळे घेऊन कुटुंबच्या कुटुंब आंदोलनात सहभागी झाली होती.
• भाषिक अस्मिता, देशप्रेम आणि संस्कृतीच्या नावावर लढवल्या जाणार्या निवडणुका - उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्यांना परप्रांतीय म्हणून मारहाण करणारे राजकीय पक्ष आहेत. आपल्या राज्यात या सगळ्याला पाठिंबा देणारे नागरिक आसामच्या लोकांचा भाषा आणि संस्कृती जपण्याचा तीन दशकांचा संघर्ष समजू शकलेले नाहीत. ईशान्य भारतातून आलेल्या मुलामुलींना ’चिंकी’ म्हणून हिणवले जाते.
इतिहास
सध्याचे आसाम म्हणजे पूर्वेकडील प्राचीन प्राग्ज्योतिष, कामरूप, दुर्जय, शोणित व लौहित्य जनपदांची भूमी. महाभारत काळास समांतर अशी भागवत व हरिवंशातील नरकासुराच्या वधाची कथा हि प्राग्ज्योतिषपुरातील. पुढे भगदत्त महाभारत युद्धात कौरवांकडून लढल्याचेही वर्णन आहे.
• 13 व्या शतकात ब्रह्मदेशातून येऊन ब्रह्मपुत्रेच्या खोर्यात स्थायिक झालेल्या व पुढे राज्य करू लागलेल्या शानवंशीयांना आहोम हे नाव स्थानिक लोकांनी दिले व त्यावरून या राज्याचे नाव पडले असावे (आहोम). असम या संस्कृत शब्दाशी आहोम भाषेतील अचाम (अपराजित) किंवा बोडो भाषेतील हा-कोण (उंचसखल) या शब्दांचाही संबंध ह्याच्या नावाशी जोडला जातो.
• पुराणकाळी या प्रदेशाची प्रागज्योतिष व कामरूप ही नावे आढळतात. दिब्रुगड, सदिया, विश्र्वनाथपूर (दरंग जिल्हा) येथे अशमयुगातील दगडी हत्यारे मिळाली आहेत.
धनसिरी नदीच्या खोर्यातील कासोमारी आणि सामुबुरी येथील अवशेषांत आर्यांचा प्रभाव दिसतो, परंतु आर्यसंस्कृतीचा प्रसार या भागात बर्याच उशिरा झाला असावा. कालिकापुराण व योगिनीतंत्र या ग्रंथांतून ज्या अनेक प्राचीन राजांची नावे येतात, ते दानव व असुर होते असे उल्लेख आहेत. मार्हरांग वंशाच्या दानवांचा पराभव करून प्राग्ज्योतिषपुरचे राज्य स्थापणारा नरक, नरकाचा मुलगा भगदत्त यांची वर्णने महाभारत-भागवतात येतात. शांखायन गृह्यसंग्रह व रामायण यांत कामरूपाचा उल्लेख आहे. नरक-भगदत्त, माधव, जितारी आणि आशीर्मत्त या चार वंशांनी प्राचीन आसामात राज्य केले, असे वंशावळींवरून दिसते.
• ऐतिहासिक काळात गोलपाडा येथील सूर्यमंदिर व प्राचीन वेधशाळा, गुवाहाटी म्हणजेच प्राचीन प्राग्ज्योतिषपुरातील नवग्रह मंदिर इत्यादी खगोल संबंधित स्थाने असलेला प्रदेश ’प्राग्ज्योतिष’, मदन कामदेवाचे प्राचीन मंदिर व त्यावरून आलेले ’कामरूप’ हे नाव, तिथून पूर्वेकडे शोणितपूर म्हणजे आजचे तेझपूर, व त्याहून पूर्वेकडे लौहित्य हि परशुरामांच्या आईच्या वधानंतर परशु धुण्याच्या कथेशी संबंधित रक्ताचा निर्देश असणारी नावे असे पौराणिक संदर्भ. मगधापासून पूर्वेस तसे जवळ असल्याने चक्रवर्ती राजांच्या राज्यविस्ताराच्या उल्लेखात या प्रदेशाचे नाव आढळते.
वर्मन वंश-
• चौथ्या शतकापर्यंतचा आसामचा इतिहास अस्पष्ट आहे. या शतकाच्या मध्यास वर्मन वंशाचा मूळ पुरुष पुष्यवर्मन याने कामरूपात राज्य स्थापले, असा अंदाज आहे. या वंशातील महेंद्रवर्मन (450-80) याच्या काळापासून कामरूपाचे महत्त्व वाढू लागले.
• सहाव्या शतकाच्या मध्यात भूतिवर्मनने राज्यविस्तार केला. या वंशातील भास्करवर्मन हर्षाचा समकालीन होता. त्याचे व कामरूप राज्याचे वर्णन चिनी प्रवासी ह्युएन त्सेंग यांने केले आहे. हर्षाशी संधी करून भास्करवर्मनने बंगाल्यातील कर्णसुवर्ण राज्य बळकावले, पण तो हर्षाचा मांडलिक होता की नाही, हे अनिश्चित आहे. भास्करवर्मन हा आसामचा थोर, कर्तृत्ववान राजा दिसतो. चिनी प्रवासी ह्युएन त्सेंगच्या नोंदीनुसार भास्करवर्मा राजाच्या कारकिर्दीत या प्रदेशाची सर्वांगीण विशेष भरभराट झाली होती. वैभवशाली आसामची झलक मिळते.
शालस्तंभ वंश-
• सातवे ते नववे अशी 3 शतके शालस्तंभवंशीयांनी कामरूपावर राज्य केले. त्यांतील हर्षदेवाने आठव्या शतकात नेपाळशी विवाहसंबंध जोडले होते. कनोजच्या यशोवर्म्याने त्याचा पराभव केला. या वंशातील प्रलंभ व हरिराज पराक्रमी असले, तरी कामरूप राज्य लहानच राहिले.
पाल वंश -
• दहाव्या शतकाच्या अखेरीस पालवंशीयांचे राज्य सुरू झाले व अकराव्या शतकाच्या मध्यापर्यंत टिकले. ते शैवपंथी होते. त्यांतील रत्नपाल हा विशेष पराक्रमी दिसतो. जयपाल हा शेवटचा राजा होय. या काळात बंगालच्या पालांनी कामरूप जिंकून घ्यावा किंवा त्यावर अधिसत्ता गाजवावी, असा प्रकार अधूनमधून झालेला दिसतो.
• अकराव्या शतकाच्या मध्यास सहाव्या विक्रमादित्य चालुक्याने कामरूप जिंकला होता, असे बिल्हण कवी म्हणतो, पण ते अतिशयोक्त वाटते.
• बाराव्या शतकाच्या मध्यास पाल राजांचा मांडलिक तिंग्यदेव याचे बंड मोडण्यासाठी गेलेला सेनापती वैधदेव स्वतःच त्या राज्याचा स्वतंत्र अधिपती झाला. यानंतर बंगालच्या सेन राजांनी कामरूपावर आधिपत्य गाजविले.
• तेराव्या शतकाच्या सुरुवातीस आहोम जमातीचा नायक सुकाफा पतकाई पर्वतरांगा ओलांडून सध्याच्या लखिमपूर-सिबसागर जिल्ह्यांच्या दक्षिण भागात आला. तेथील स्थानिक वन्य जमातींना जिंकून आहोमांनी राज्यविस्ताराला सुरुवात केली. या शतकात लखनावतीच्या मुसलमान राजांनी केलेल्या स्वार्या अयशस्वी ठरल्या.
• वेगवेगळ्या राजवंशांच्या काळात या प्रदेशातील राज्यांचे विस्तार वेळोवेळी बदलत राहिले. पुष्कळदा अनेक लहानलहान स्वतंत्र राज्ये शेजारी शेजारी असत. विशेषत: सुरमा खोर्यातले राज्य कामरूपच्या आधीन नसे, त्याचा इतिहास अस्पष्ट आहे. ताम्रपटांवरून तेराव्या शतकात गोविंददेव आणि ईशान्यदेव यांनी येथे राज्य केले असे दिसते. पश्चिम आसामात कामता हे प्राचीन राज्य होते.
चौदाव्या शतकाच्या सुरुवातीचा येथील राजा दुर्लभनारायण विद्वानांना आश्रय देणारा होता. त्याने वैष्णवपंथाला उत्तेजन दिले.
• चौदाव्या शतकाच्या मध्यास पूर्व बंगालमधील मुसमानांच्या आक्रमणामुळे दक्षिणेचे कामता राज्य खिळखिळे झाले होते त्यावर त्यांनी जय मिळविला. पूर्वेस सदिया भोवताली चुतियांचे राज्य होते. त्यांच्याशी संघर्ष चालू ठेवून अखेर आहोम राजा सुहुंगमुंग याने त्यातला बराच भाग जिंकला (1538) व चुतियांना तेझपूर नजीक हद्दपार केले. दरम्यान नागांच्या विरूद्धही मोहिमा चालू होत्या. नौगोंगच्या बाजूस काचारांचे प्रबळ जुने राज्य होते. त्यांची राजधानी दिमापूर.
खेण वंश-
• पंधराव्या शतकात या भागात खेणवंशाचा उदय झाला. त्यातला तिसरा राजा नीलांबर याचा पाडाव 1498 मध्ये बंगालच्या हुसैनशहाने केला.
• सोळाव्या शतकात पश्चिम आसामातील किरकोळ राजांना जिंकून खेणवंशीय राजा विश्र्वसिंगाने कोच राज्य स्थापले. त्याने कामाख्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, आहोमांशी सख्य राखून मुसलमानांना दूर ठेवले. त्याचा मुलगा नरनारायण याने सर्व दिशांना राज्यविस्तार केला (1533-84). या काळात कलावाङ्मय फुलले. त्याने काही काळ आहोमांवरही अधिसत्ता गाजवली. त्याच्या वैभवाचे वर्णन अकबरनाम्यात आहे. पण त्याचा भाऊ व सेनापती शुक्लध्वज याचा पराभव पूर्व बंगालच्या इसाखानाने केला (1498). शुक्लध्वजाचा मुलगा रघू याने 1581 मध्ये बंड केले तेव्हा त्याला संकोश नदीच्या पलीकडे कुचबिहार राज्य तोडून देण्यात आले.
• सोळाव्या शतकात आहोमांनी, दिमापूरच्या काचार राजांशी लढून त्यांना मैबांग (उत्तर काचार) पर्यंत मागे रेटले, दिमापूर लुटून त्यांचा पूर्वेकडील प्रदेश आपल्या राज्यास जोडला. ब्रह्मपुत्रेच्या खोर्यातून याप्रमाणे आहोमांचे वर्चस्व प्रस्थापित होत असता, त्यांनी पूर्व बंगालमधील मुसलमानी सत्तेच्या आसामवरील आक्रमणालाही यशस्वी रीत्या तोंड दिले. 1529 च्या स्वारीत तर खुद्द मुस्लिम सेनापती तुर्बक पडला. त्यांचे कित्येक अनुयायी आहोम राज्यात स्थायिक झाले. आहोमांनी याच सुमारास तोफाबंदुकांचा वापर सुरू केला.
• सतराव्या शतकाच्या सुरुवातीस मोगलांचे काचारवरील (कोच) आक्रमण फसले, पण कुचबिहार कामरूपावर त्यांनी वर्चस्व बसविल्यामुळे पुढील शतकभर आहोमांना मोगलांशी संघर्ष करावा लागला. अंत:कलहामुळे काचार राज्याचा काही भाग मोगल साम्राज्यात समाविष्ट झाला व बाकीचा आहोमांच्या अधीन राहिला.
• 1637 मध्ये कोच राजकुलातल्या भाऊबंदकीत बलिनारायण याला आहोम राजा प्रतापसिंगाने मोगलांविरुद्ध आश्रय दिल्यामुळे संघर्षाला तीव्र स्वरूप आले. युद्धोत्तर मोगल-आहोम राज्यांच्या दरम्यान बडनदी ही सीमा ठरली.
• 1658 मध्ये कुचबिहारच्या प्राणनारायणाने मोगलांविरुद्ध केलेल्या उठावाचा फायदा घेऊन आहोम राजा जयध्वजसिंगाने पुन्हा ब्रह्मपुत्रेच्या खोर्याचा ताबा मिळविला. त्याला शासन करायला आलेल्या मीर जुम्ल्याने आहोमांना त्यांची राजधानी गोरगावपर्यंत रेटले खरे, पण त्याचा विजय तात्पुरता होता (1663). गेलेला मुलूख आहोमांनी दोनच वर्षांत परत मिळविला व कामरूप व्यापून मोगल ठाणे रांगामातीपर्यंत मागे ढकलले.
• 1681 मध्ये राज्यावर आलेल्या गदाधरसिंगाने मोगलांना या भागातून कायमचे हाकून लावले. त्याचा मुलगा रुद्रसिंग (1696-1714)याने आणखी राज्यविस्तार केला. त्याने काचारी लोकांकडून नौगोंगचा दक्षिण भाग व उत्तरेतील मैबांग ठाणे घेतल्यामुळे काचारांनी आपली राजधानी खाग्नपूरला हलविली. खासी-जैंतिया जमातींचा पराभव केला, पण त्यांचा प्रदेश घेतला नाही. रुद्रसिंगाने मांडलिक राजांचा संघ निर्मिण्याचा प्रयत्न केला.
• अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात आहोमांनी हिंदुधर्माचा पूर्णतया स्वीकार केला. त्यांनी विद्याकलांना उत्तेजन दिले. परंतु त्यांच्यात धार्मिक झगडे सुरू झाले - शाक्त विरुद्ध वैष्णव असे वाद विकोपाला गेले. राजपुरस्कृत शाक्तपंथीयांकडून होणारा छळ असह्य झाल्यावर मोआमारिया या नववैष्णवपंथीयांनी 1769 मध्ये बंड करून राजा लक्ष्मीसिंगास कैद केले. ते बंड मोडून काढण्यात आले. परंतु 1786 मध्ये मोआमारियांनी राजसेनेचा पराभव केला, तेव्हा राजा गौरीनाथसिंग गौहातीला पळून आला. प्रधान पूर्णानंद बडा गोहाइन याने बंडखोरांशी कसाबसा लढा चालू ठेवला पण देशात अराजक माजले. कोच राजा कृष्णनारायण याने दरंग ठाण्यावर छापा घालून उत्तर कामरूप व्यापला व गौहातीलाही धोका उत्पन्न केला. यावेळी गौरीनाथसिंगाने ब्रिटिशांचे साहाय्य मागितले.
• अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ईस्ट इंडिया कंपनीचा आसामशी व्यापार चालू करण्याचा प्रयत्न होता. त्यांना आसामच्या राजकारणात चंचुप्रवेश मिळाला. लॉर्ड कॉर्नवॉलिसने 1792 मध्ये कॅप्टन वेल्शच्या नेतृत्वाखाली एक तुकडी पाठविली. वेल्शने आसामात शांतता प्रस्थापित केल्यावर नंतरचा गव्हर्नर जनरल सर जॉन शोअर याने त्याला परत बोलाविले.
ब्रिटिश राजवट -
• एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस ईस्ट इंडिया कंपनीने तटस्थपणाचे धोरण स्वीकारले. त्यामुळे 1810 मध्ये राज्यावर आलेल्या चंद्रकांताची गौहातीच्या राज्यपालावर जेव्हा इतराजी झाली, तेव्हा त्याने ब्रह्मदेशाचे साहाय्य मिळविले. त्यांच्या कलहात ब्रह्मदेशाचे फावले आणि त्यांनी आसामवर आपली सत्ता गाजवायला सुरुवात केली. अंत:कलहामुळे आहोम सत्तेचा असा र्हास होत असता, खासपूरच्या काचारांनी व मणिपूरच्या राजांनी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला.
• ब्रिटिशांची मदत 1817 पासून मागणार्या आहोमांना अखेर 1824 मध्ये ती मिळाली. पुढील दोन वर्षे ब्रह्मदेशाशी युद्ध करून 1826 च्या तहानुसार कंपनीने आसामवर आपली अधिसत्ता प्रस्थापित केली. मणिपूरविरुद्ध काचारला मदत करून तोही भाग आपल्या वर्चस्वाखाली आणला.
• ब्रिटिश काळात आसामला बंगालच्या प्रभावळीत मानून बृहदबंगालची रचना करण्यात आली. गमधर गोहाइन (1838) हा आसामातील ब्रिटिश सत्तेला प्रतिकार करणार्यामध्ये आघाडीवर होता. या काळात आसाममधील काचार तुलाराम सेनापतीकडे, लखिमपूरचा काही भाग व सिबसागर आहोम राजा पुरंदरसिंगाकडे, दक्षिण लखिमपूर बोड सेनापतीकडे आणि सदिया सदियाखोबा गोहाइन या नायकाकडे अशी व्यवस्था होती. पण 1842 पर्यंत हा सर्व प्रदेश कंपनीने खालसा केला.
• 1857 मध्ये कंपनीचा पूर्वीचा नोकर मणिराम बरुआ याने शेवटचा आहोम युवराज कंदर्पेश्र्वरसिंगचा पक्ष घेऊन आसामातील शिपायांच्या पलटणीनांही चेतविले पण युवराज स्थानबद्ध झाला व मणिराम, पिटाली बरुआ, मल्लिका इ. त्याच्या सहकार्यांना फाशी देण्यात आले. पुढे 1874 पर्यंत आसामचा कारभार कलकत्त्याहून चालत असे. चहाचे मळे व तेलाच्या खाणी यांमुळे या प्रदेशाचे महत्त्व वाढले.
• 1874 मध्ये आसाम हा मुख्य आयुक्ताचा प्रांत झाला. त्याच्या अधिकारात सध्याचे नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश, लुशाई टेकड्या इ. प्रदेशही असले, तरी गिरिप्रदेशातील जमातींना बरीच स्वायत्तता असे.
• विसाव्या शतकात स्वातंत्र्यासाठी झालेल्या सर्व काँग्रेसप्रणीत आंदोलनात आसामच्या जनतेने भाग घेतला. दुसर्या महायुद्धात जपानी फौजा सरहद्दीवर आल्यामुळे आसामच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला होता.
• 1905 ते 1911 या काळात आसाम हा फाळणी झालेल्या बंगालच्या पूर्व भागाला जोडलेला होता व त्याच्यावर एक नायब राज्यपाल असे.
• 1911 साली वंगभंग रद्द झाल्यावर पुन्हा आसाम मुख्य आयुक्ताचा प्रदेश व त्यानंतर 1919 च्या कायद्याने राज्यपालाचा प्रांत झाला.
स्वातंत्र्योत्तर काळ -
• 1947 च्या फाळणीत आसामचा सिल्हेट जिल्हा पूर्व पाकिस्तानात व देवनागरी प्रदेश भूतानात गेला.
• 1950 च्या संविधानानुसार आसाम ‘अ’ वर्गीय राज्य झाले, तसेच पूर्वीच्या आसाम प्रांतापैकी त्रिपुरा व नेफा हे भाग केंद्रशासित प्रदेश झाले.
• 1963 डिसेंबर मध्ये नागालँड आसाममधून हे वेगळे घटक राज्य बनले.
• 1969 मध्ये 22 व्या घटनादुरुस्तीद्वारे मेघालयाला आसाम अंतर्गत स्वायत्तशासी राज्य बनवले गेले. राज्यघटनेत कलम 371(इ) चा समावेश करुन मेघालयाला स्वतंत्र विधिमंडळ व मंत्रिमंडळ देण्यात आले. 21 जानेवारी 1972 रोजी मेघालयला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला. 1905 साली बंगालच्या फाळणीनंतर मेघालयाचा समावेश पूर्व बंगालमध्ये, तर 1912 मध्ये फाळणी रद्द झाल्यानंतर मेघालयाचा समावेश आसाममध्ये करण्यात आला होता.
• 1972 मध्ये आसाममधील मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश (1985 राज्याचा दर्जा) यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्याने आसामचा आणखी संकोच झाला.
भौगोलिक माहिती
आसाम हा विरळ वस्तीचा पण सुसंघटित समाजव्यवस्था असलेला अविकसित पावसाळी प्रदेश आहे. चहा, ताग, तांदूळ, पेट्रोल, कोळसा इ. साठी भारतात तो महत्त्वाचा असला तरी प्रामुख्याने सरहद्दीवरील राज्य म्हणून त्याला अधिक महत्त्व आहे. भूतान व बांगला देशची सरहद्द आसामला लागून आहे, तर चीन व ब्रह्मदेश यांची हद्द फारशी दूर नाही. 1962 च्या भारत-चीन युद्धात आसामसरहद्दीवर बरीच गडबड झाल्याने तिकडे कायमची संरक्षणव्यवस्था करण्यात आली आहे. बांगला देशच्या 1971 च्या उठावात बर्याच निर्वासितांचा लोंढा आसाममध्ये आल्याने कित्येक प्रश्र्न निर्माण झाले होते.
• आसाम हे भारताच्या ईशान्य कोपर्यातले राज्य असून ते प. बंगालच्या ईशान्य सिलीगुदी कोरीडॉरद्वारे (22 किमी रुंद) जोडलेले आहे.
• आसामचा बराचसा भाग ब्रह्मपुत्राच्याा खोर्यात असून दक्षिणेकडील सिल्चरचा भाग बराक खोर्यात आहे.
• उत्कृष्ट प्रतीचा आसामी चहा, आसामी रेशीम, एकशिंगी गेंडा, आशिया खंडातील सर्वप्रथम उत्खनन झालेल्या खनिज तेलाच्या विहिरी, ब्रह्मपुत्रा महानद व वारंवार येणारे पूर ही राज्याची मुख्य ओळख.
• आसाम हे नाव असम या संस्कृत शब्दापासून आले आहे. आसामी (आहोमी) भाषेत स बद्दल ह येतो.
राजधानी - दिसपूर
क्षेत्रफळ - 78,523 चौ.किमी. देशातील 16 वे मोठेे राज्य
सर्वात मोठे शहर - गौहाती
लोकसंख्या - 3.13 कोटी (2011), देशातील 15 वे मोठेे राज्य
लोकसंख्या घनता - 397 प्रति चौ. किमी.
स्त्रियांचे प्रमाण दर 1,000 पुरुषांमागे - 958
साक्षरतेचे प्रमाण - 72.2 %
अध़िकृत राज्यभाषा - आसामी, बंगाली (बराक खोरे), बोडो
विस्तार- उ. अ. 220 19’ ते 280 16’, पू. रे. 890 42’ ते 970 12’
सीमा -
वायव्येस व उत्तरेस - भूतान
उत्तरेस व ईशान्येस - अरुणाचल प्रदेश व तिबेट
पूर्वेस - अरुणाचल प्रदेश, नागालँड व मणिपूर
दक्षिणेस - मेघालय व मिझोराम
नैर्ऋत्येस - त्रिपुरा
पश्चिमेस - बांगला देश व पश्रि्चम बंगाल राज्याचे जलपैगुरी व कुचबिहार जिल्हे
नैसर्गिक विभाग -
आसामचे तीन नैसर्गिक विभाग पडतात-
1) ब्रह्मपुत्रा खोरे
2) सुरमा खोरे
3) आसाम डोंगरांची रांग
1) आसामचे ब्रह्मपुत्रा खोरे -
• आसाममधील ब्रह्मपुत्रेचे खोरे ‘आसामचे खोरे’ म्हणून ओळखले जाते. या खोर्याची लांबी 750 किमी. व रुंदी सरासरी 80 किमी आहे.
• ब्रम्हपुत्रेला आसाममधील आहोमांच्या राजवटीत रूढ असलेल्या आहोम भाषेत तिला ‘नाम-दाओ-फी’ म्हणजे ‘तारकांची नदी’ असे नाव होते. ‘बुलुम बुथुर’ म्हणजे बुडबुड्यांची नदी या तिच्या मूळ नावाचे संस्कृतीकरण होऊन ब्रह्मपुत्र हा शब्द बनला असावा. आसामी लोक अनेकदा ‘दर्या’ म्हणून तिचा उल्लेख करतात.
ब्रह्मपुत्रा नदी उंचावरून सखल भागात येते त्यानुसारे आसामचे दोन भाग झालेले आहेत-
• अप्पर वा वरचा आसाम
• लोअर वा खालचा आसाम.
अप्पर आसाम -
• येथील जमीन सुपीक असून चहामळ्यांची सुरुवात इथून झाली. कोळसा, तेल, नैसर्गिक वायू ही महत्वाची खनिजे तिथेच आहेत.
• ढेमाजी, दिब्रुगढ, लखिमपूर, गोलाघाट, जोरहाट, सिबसागर, तिनसुकीया हे महत्त्वाचे जिल्हे
• अहोम राजांची राजधानी सिबसागर आणि त्यानंतर जोरहाट, या प्रदेशात होती.
2) आसामचे सुरमा खोरे -
• आसामचा दुसरा नैसर्गिक विभाग सुरमा किंवा बराक नदीखोर्याचा होय. हा 200 किमी. लांब व 96 किमी. रुंद असून हा सपाट प्रदेश आहे.
• सुरमा नदी बराक या नावाने नाग टेकड्यांच्या सीमेवर उगम पावून मणिपूर प्रदेशसीमेवर तिपैमुख येथे उत्तराभिमुख होऊन आसाम राज्यात प्रवेश करते.
• काचार भागातून वेड्यावाकड्या मार्गाने पश्चिमेला वाहात ती दुभंगून बांगला देशात शिरते.
सुरमेला मिळणार्या मुख्य नद्या -
1) उत्तरेकडून - जिरी व जनिंगा
2) दक्षिणेकडून - सोनाई व ढालेश्र्वरी
3) आसाम डोंगरांची रांग -
• आसामच्या डोंगररांगा ब्रह्मपुत्रा व सुरमा खोर्यांमध्ये पूर्व-पश्चिम पसरल्या आहेत.
• या डोंगरापैकी खासी टेकडयांत शिलांग शिखर सर्वांत उंच (6450 फूट) आहे. गारो, खासी व लखिमपूरच्या दक्षिणेकडील टेंकडयांत दगडी कोळसा सांपडतो.
• ब्रह्मपुत्रेच्या दक्षिनेला मेघालयात गारो, खासी, जैंतिमा तसेच पूर्वेला नागालँडमध्ये पातकई टेकड्यांचे समूह आहेत.
ब्रह्मपुत्रा नदी
ब्रह्मपुत्रा हिमालय पर्वतरांगेतील तिबेटच्या बुरांग जिल्ह्यामध्ये त्सांगपो किंवा यारलुंग झांबो (यार्लुंग त्सांग्पो) ह्या नावाने उगम पावते. तेथून पूर्वेकडे वाहत येऊन ब्रह्मपुत्रा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये प्रवेश करते. अरुणाचल व आसाममधून नैर्ऋत्य दिशेने वाहत जाऊन ब्रह्मपुत्रा बांगलादेशामध्ये शिरते. बांगलादेशमध्ये तिला जमुना ह्या नावाने ओळखले जाते. बांगलादेशात ब्रह्मपुत्रेला प्रथम पद्मा ही गंगेपासून फुटलेली नदी व नंतर मेघना ह्या दोन प्रमुख नद्या मिळतात. गंगेच्या त्रिभुज प्रदेशामध्ये येऊन ब्रह्मपुत्रा बंगालच्या उपसागराला मिळते.
• चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेस (सीएएस) च्या शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार ब्रह्मपुत्रा नदीचे उगमस्थान तिबेटमधील बुरांग काउंटी येथील हिमालय पर्वतामधील उत्तरी भागातील आंग्सी ग्लेशियर येथे आहे.
• भौगोलिकतज्ञ स्वामी प्रणवानंद यांनी 1930 च्या दशकात या नदीचे उगमस्थान हिमालयाच्या कैलास पर्वतश्रेणीतील 7,200 मी. उंचीवर चीमा-युंगडुंग ग्लेशियर येथे असल्याचे सांगितले होते. हे उगमस्थान मानसरोवरापासून 100 किमी. तर सिंधू नदीच्या उगमापासून 160 किमी. अंतरावर आहे.
• प्राचीन हिंदू धर्मग्रंथांतील उल्लेखांनुसार ब्रह्मपत्रेचा उगम मिचिनू पर्वतातल्या ब्रह्मकुंडातून झाल्याचे मानले जाते. कुबी, आंगसी व चेमा-युंगडुंग हे या नदीचे तीन शीर्ष प्रवाह होत.
ब्रम्हपुत्रा नदीची लांबी -
• ब्रम्हपुत्रा नदीची लांबी एकूण 3,848 किमी आहे. तर तिचे क्षेत्रफळ 7.12 लाख चौ. किमी आहे.
• तिबेटमध्ये 1650 किमी, भारतामध्ये 918 किमी आणि बांग्लादेशमध्ये 1363 किमी.
• आधीच्या माहितीनुसार या नदीची लांबी 2900 ते 3350 किमी दरम्यान, तर क्षेत्रफळ 5.20 ते 17.30 लाख चौ. किमी मानले जाई.
ब्रह्मपुत्रा नदीची नावे -
1) तिबेटमध्ये त्सांगपो (म्हणजे शुद्ध करणारी)
2) अरुणाचल प्रदेशात दिहांग
3) आसाममध्ये ब्रह्मपुत्रा
4) बांगला देशात जमुना
5) तिबेट स्थानिक भाषेत यारलुंगजांग
6) आहोम भाषेत नाम-दाओ-फी (तारकांची नदी)
7) चिनी भाषेत या-लू-त्सांगपू चिअँग
• ब्रह्मपुत्रेचे तिबेटमधील खोरे रुक्ष, कोरडे व थंड हवामानाचे, तर बांगला देश व आसाममधील खोरे उष्ण व आर्द्र हवामानाचे आहे. आसामच्या खोर्यातील बराचसा प्रदेश रेझिन उत्पादनासाठी उपयुक्त ठरणार्या साल वृक्षांच्या अरण्यांनी व्यापलेला आहे. दलदलीच्या भागात वेताची जंगले, तर वसाहतीच्या परिसरात फळझाडे आढळतात. बांबूची वने सर्वत्र आहेत. एकशिंगी गेंडा हा दुर्मिळ प्राणी प्रामुख्याने आसामच्या दलदलीच्या प्रदेशात आढळतो. याशिवाय वाघ व हत्तीही या खोर्यात आहेत.
ब्रम्हपुत्रेच्या तिबेटमधील उपनद्या-
• डावीकडून मिळणार्या- जो-का त्सांगपू (रागा त्सांगपो), ला-सा हो(चीचू), नि-यांग हो (ग्यामडा चू)
• उजवीकडून मिळणार्या - न्येन-चू हो (न्यांग)
• चीचू उपनदीतीरावर ल्हासा हे तिबेटच्या राजधानीचे ठिकाण
• उगमानंतर ब्रम्हपुत्रा नदी दक्षिणेकडील हिमालयाची मुख्य पर्वतश्रेणी व उत्तरेकडील नीएन-चेन-टांगला पर्वतश्रेणी यांच्यामधून हिमालयाच्या मुख्य श्रेणीला समांतर अशी पश्चिम-पूर्व दिशेने वाहत जाते. तिबेटमधील पी ठिकाणापासून पुढे ती एकदम ईशान्यवाहिनी होऊन ग्याल परी व नामचा बारवा या पर्वतीय प्रदेशातील मोठमोठ्या खोल व अरुंद निदर्यांमधून उड्या घेत वाहू लागते. नंतर ती दक्षिणवाहिनी होऊन हिमालय पार करते व भारतात प्रथम सिआँग व पुढे दिहांग नावांनी प्रवेश करते.
• भारतात सदियाजवळ तिला दिबांग व लुहित या उपनद्या मिळाळ्यावर ती नैऋत्यवाहिनी होते व येथून पुढे ती ब्रह्मपुत्रा नावाने ओळखली जाते. येथून तिचे पात्र विशाल होऊन त्यात अनेक बेटांची निर्मिती झाल्याचे आढळते. माजुली हे अंतर्गत मोठ्या बेटांपैकी एक बेट या नदीमुळेच निर्माण झाले आहे.
ब्रम्हपुत्रेच्या भारतातील उपनद्या-
• उत्तरेकडून मिळणार्या- सुबनसिरी, भरेळी, मानस, चंपावती, सरलभंगा, कोपिली, दिबांग, धनसिरी, बोरनदी, मनास, पामती व संकोश
• पूर्वेकडून मिळणार्या- लोहित
• दक्षिणेकडून मिळणार्या- नोआ, बुरी, दिहिंग, दिसांग, दिखो, झांझी व दक्षिण धनसिरी
• दक्षिण धनिसिरीच्या संगमानंतर काही अंतरावर ब्रह्मपुत्रेचा एक फाटा कलांग मा नावाने नौगाँग जिल्ह्यातून वाहून गौहातीच्या वर 16 किमी. पुन्हा मुख्य नदीला मिळतो त्याआधी कलांगला कपिली व दिग्नू नद्या मिळालेल्या असतात.
• गौहातीखालीही कलसी व जिंजीराम सारख्या काही नद्या ब्रह्मपुत्रेला मिळतात.
• गुवाहाटीच्या दोन्ही बाजूला असलेल्या डोंगरामधून जाण्यासाठी ब्रम्हपुत्रा आपला आकार कमी करते. तेथील नीलचल डोंगरावर कामाख्या मंदिर आहे. त्यानंतर ही नदी आपले विराट रूप धारण करते. डिब्रूगढ़ येथे ब्रम्हपुत्रा नदीच्या विशालतेचे दर्शन येते.
• डिब्रूगढ़, जोरहाट, तेजपुर, गुवाहाटी, धुबड़ी आणि ग्वालपाड़ा ही शहरे ब्रम्हपुत्रेच्या किनार्याजवळ वसलेली आहेत.
• माजुली बेट -आसाममध्ये ब्रह्मपुत्रेचा एक फाटा खेरकुटिया नावाने ब्रह्मपुत्रेपासून वेगळा होतो. पुढे हा फाटा उत्तरेकडून येऊन मिळणार्या सुबनसिरी नदीसह धनसिरीच्या मुखासमोर मूळ प्रवाहाला येऊन मिळतो. यामुळे ब्रह्मपुत्रेचा मूळ प्रवाह व तिचा खेरकुटिया हा फाटा यांदरम्यान माजुली बेटाची निर्मिती झाली आहे. उत्तर सुबनसिरी-ब्रह्मपुत्रा संगमाजवळ सिबसागर समोर माजुली हे 1,261 चौ. किमी. क्षेत्रफळाचे बेट सर्वांत मोठे आहे.
• दक्षिणेपेक्षा उत्तरेकडून वाहत येणार्या उपनद्या अधिक पाणी व गाळ वाहून आणत असल्याने ब्रह्मपुत्रेचे पात्र थोडेथोडे दक्षिणेकडे सरकत असलेले आढळते.
• 1954 पासून ब्रह्मपुत्रा नदी तसेच तिच्या उपनद्यांमुळे होणारी धूप व पूरपरिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पूरनियंत्रक प्रकल्पांच्या, बंधार्यांच्या व नदीकाठांवर बांध घालण्याच्या कामाला आरंभ झाला.
• 31 डिसेंबर 1981 भारत सरकारने रोजी ‘ब्रह्मपुत्रा मंडळ’ नेमले असून त्याचे मुख्यालय गौहाती येथे आहे. पूरनियंत्रण, नदी खोर्याची धूप कमी करणे, जलनिःसारणातील सुधारणा, जलसिंचन, वीजनिर्मिती, जलवाहतूक इ. उपयुक्त सोयींच्या विकासाची सर्व कार्ये या मंडळाकडे आहेत. गौहातीजवळील बरपणी व उमिअम हे 60,000 किवॉ विद्युतनिर्मिती क्षमता असलेले दोन प्रकल्प उल्लेखनीय आहेत.
• आसाममधील चहाचे मळे, खनिज तेल, कोळसा, नैसर्गिक वायू व बांगला देशातील ताग ही ब्रह्मपुत्रेच्या खालच्या टप्प्यातील प्रमुख आर्थिक संपदा आहे. आसामचा 55 % व्यापार या नदीमार्गातून चालतो.
• 1963 मध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर गौहातीजवळ एक पूल बांधण्यात आला आहे.
• 26 मे 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रम्हपुत्रेची उपनदी लोहित वरील 9.15 किमीचा विस्तीर्ण पूलाचं लोकार्पण केले होते. आसाममधल्या ढोला आणि अरुणाचलमधल्या सदिया यांना हा पूल जोडतो. पूर्वी या दोन ठिकाणांचं अंतर पार करण्यासाठी 6 तासांचा प्रवास करावा लागतो तो या पुलामुळे 1 तासावर आला.तसेच 165 किमीचे अंतरही वाचले. याचा सगळ्यात मोठा फायदा भारतीय लष्कराला झाला आहे. ब्रम्हपुत्रा नदीवर बांधला गेलेला हा चौथा पूल आहे. 2017 पूर्वी देशातला नदीवरील सर्वात मोठा पूल, पाटण्यातला गंगा नदीवरचा महात्मा गांधी सेतू 5.50 किमी लांबीचा, मानला जायचा.
• आसाममधील सदिया, दिब्रुगड, जोरहाट, तेझपुर, गौहाती, गोआलपाडा व धुब्री तर बागंला देशातील कुडिग्राम, रहुमारी, चिलमारी, बहादुराबाद घाट, फुलचरी, सरिशाबारी, जगन्नाथगंज घाट, नगरबारी, सिराजगंज व ग्वालंदो ही ब्रह्मपुत्रा नदीतीरावरील प्रमुख शहरे असून नदी पार करण्याच्या दृष्टीने ती महत्त्वाची आहेत.
ब्रम्हपुत्रेच्या बांगला देशातील उपनद्या-
• ब्रम्हपुत्रेला बांगला देशात जमुना नावाने ओळखतात.
• बांगला देशात प्रवेश करताच जमुनेला उत्तरेकडून मिळणार्या उपनद्या-तोरसा, जलढाका, तिस्ता
• गायबांडच्या दक्षिणेस जमुना (ब्रह्मपुत्रा) नदीपासून जुनी ब्रह्मपुत्रा हा नदीप्रवाह वेगळा होतो. हा ब्रह्मपुत्रा नदीचा मूळ प्रवाहमार्ग होय. हा प्रवाहमार्ग जमालपूर व मैमनसिंगवरून आग्नेय दिशेने वाहत गेल्यावर पुढे भैरवबाझारजवळ मेघना नदीला मिळतो
• जमुना (ब्रह्मपुत्रा) नदीचा सध्याचा मुख्य प्रवाह दक्षिणेस वाहत जाऊन ग्वालंदोच्या उत्तरेस गंगा नदीला मिळतो.
• तत्पूर्वी जमुनेला उजवीकडून येऊन मिळणारा संयुक्त प्रवाह - बारल, अत्राई, हुरासागर
• स्वतंत्रपणे मेघना नदीला मिल्ळणार्या उपनद्या-धालेश्वरी व बडी गंगा
• ग्वालंदोपासूनचा गंगा-जमुना यांचा संयुक्त प्रवाह पद्मा नदी म्हणून ओळखला जातो.
• पद्मा नदीला उत्तरेकडून मेघना येऊन मिळाल्यावर त्यांचा संयुक्त प्रवाह मेघना या नावाने ओळखला जातो.
• मेघना खाडीमधून व इतर उपप्रवाहांमधून ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते.
भूकंपाची आपत्ती -
• आसामवर पुन:पुन्हा ओढवते गेल्या साडेतीनशे वर्षांत या प्रदेशात सात वेळा मोठाले भूकंप झाले. 1950 चे हादरे जगात नोंद झालेल्या सर्वांत जोराच्या तीव्र भूकंपांपैकी होते आणि 1897 चा भूकंप तर मानवेतिहासातील सर्वांत तीव्र भूकंपांपैकी एक होता.
हवामान -
• आसाम राज्यात उन्हाळ्याचे दिवस कमी असून तपमानही सरासरी 29 अंश से. च्या वर जात नाही. एप्रिल-मे महिन्यात वर्षांचा पंचमांश (25 ते 50 सेंमी.) पाऊस पडतो. दक्षिणेकडील वळचणीस (गौहातीला तपमान 16 अंश से.) उन्हाळी तपमान 29 अंश से. व सरासरी पाऊस 168 सेंमी. पडतो.
• दिवसाचे तापमान सुमारे (36 डिग्री सेल्सियस) पर्यंत वाढते, ज्यामुळे ग्रीनहाऊस सारखी अत्यंत आर्द्रता आणि उष्णतेची परिस्थिती निर्माण होते. हे उष्णकटिबंधीय हवामान आसामच्या अद्वितीय माल्टीच्या चवमध्ये योगदान देते, ज्यासाठी हा चहा सर्वश्रुत आहे.
• आसाम राज्यात उत्तर भागात सरासरी 200 सेंमी पाऊस पडतो व अगदी पूर्वभाग अतिवृष्टीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात दररोज 200-300 मिमी पाऊस पडतो.
• उंच टेकड्यांवर हिवाळ्यात कधीकधी हिमपात होतो.
• पश्चिम भागात उन्हाळ्याच्या अखेरीस वादळे होतात
मृदा-
• ब्रह्मपुत्रेच्या अगदी काठालगतची जमीन पुराखाली बुडणारी, तिच्या पलीकडची सखल भूमी पाणी धरून ठेवणारी व पुराच्मा हद्दीबाहेरची डोंगरातल्मा प्रवाहांनी भिजणारी, या सर्व गाळमातीच्या जमिनी आहेत.
• सुरमाकाठची जमीन विशेष सुपीक आहे. कारण तिच्या कमी वेगामुळे गाळात वाळूचे प्रमाण कमी असते. नदीगाळाची माती थरांचे खडक झिजून झालेली असून डोंगराळ भागात ती लाल व कंकरमिश्रित असते, तर वनप्रदेशात ती कुजलेल्या पाचोळ्याने बनलेली आहे.
वन संपत्ती-
• सदाहरित वर्षावनांपासून समशीतोष्ण कटिबंधीय झुडुपापर्यंत वनस्पतींच्या सर्व जाती येथे आहेत.
• साल, साग, देवदार, ओक, होलौंग, बंसम, अमारी, गमारी, अझार, सिसू, सिमुल, वेत, कळक, बोरू हे प्रकार प्रामुख्माने दिसतात.
• वन्य प्राण्यांच्या बाबतीत आसाम हे एक समृद्ध राज्य आहे. एकशिंगी गेंडा, हत्ती आणि वाघ हे तीनही प्राणी असणारे आसाम हे देशातले एकमेव राज्य आहे. वन्य प्राण्यांमुळे आसाममधील पर्यटनाला चालना मिळाली आहे.
• हिमालयाच्या पायथा टेकड्यात हत्ती, गेंडा, रानरेडा, अनेक जातीचे हरिण, काळा चित्ता, मलायी अस्वल, सांभर, कस्तुरीमृग, रानडुक्कर व शुभ्रमुख कपी (गिबन) आहेत.
• शासनाने कझिरंगा व मनास ही दोन विस्तीर्ण अभयारण्ये वन्यपशूंसाठी राखून ठेवली आहेत.
• आसामातील 22% जमीन जंगलाने व्याप्त असून, त्यात सदाहरित, मिश्र व शुष्क पानझडी, नदीप्रदेशीय, गवताळ मुलुखातील, दलदलीतील समशीतोष्ण प्रदेशीय, बांबू जातीची वने आहेत.
• साल, देवदार, साग, हालाक, होलौंग, बन्सम, अमारी, गमारी, अझार, सिसू, सिमुल, वेत, कळक, बोरू आणि अनेक औषधी वनस्पती आहेत. त्यापासून कापीव इमारती व जळाऊ लाकूड, बांबू, तेल, लाख, वेत, औषधी वनस्पती, छपरी गवत, ऊद, अत्तरे, काष्ठतंतू आणि सालबुरशी हे वन्यपदार्थ उपलब्ध होतात.
• भारतातील सर्वांत मोठे राखीव वेणुवन आसामात होते व देशाच्या एकूण बांबू उत्पादनापैकी 42% या राज्यात होत असे.
खनिज संपत्ती-
• कोळसा, चुनखडी, सिलिमॅनाइट व विशेषत: पेट्रोलियम ही राज्यात मिळणारी महत्त्वाची खनिजे होत.
• कोळसा, चुनखडी, पेट्रोलिमम, सिलिमॅनाइट, भट्टीमाती, डोलोमाइट, कॉरंडम व नैसर्गिक वायू या खनिजांचे उत्पादन होते.
• दिग्बोई व गौहातीजवळील नूनमती येथे तेलशुद्धीकरणाचे कारखाने आहेत.
• नहरकटिआ व मोरान भोवती अंदाजे 43 कोटी टन तेल व 57 कोटी घमी. ज्वलनवायू यांचे साठे आहेत.
• बिहारमधील बराउनीपर्यंत 1,152 किमी. लांबीचे नळ टाकले असून ते आसाम, बंगाल व बिहार या राज्यांतील 79 नद्या ओलांडून जातात. एकूण 84,000 टन वजनाच्या या नळांपैकी काही राउरकेला लोखंड कारखान्यात तयार झाले.
• उत्तम चुनखडी मिकीर व काचार टेकड्यांवर मिळते. मिकीर व उत्तर काचारमध्ये पहिल्या प्रतीचा कोळसाही सापडतो.
• इतर खनिजांपैकी कॉरंडम, भट्टयांसाठी व विटांसाठी चिकणमाती, शाडू इ. काही प्रमाणात उपलब्ध आहेत.
आसामचा चहा
• आसामचा चहा - आसाम हे भारतातील चहा उत्पादनाचं सर्वांत मोठं केंद्र आहे. तेथे जोरहाटमध्ये टोकलाईमध्ये चहा संशोधन केंद्रही आहे. हे केंद्र सर्वांत मोठे संशोधन केंद्र असल्याचे मानले जाते. आसमचा चहा हा त्याच्या विशिष्ठ स्वादासाठी ओळखला जातो.
• डुआर्स आणि तराई - डुआर्स आणि तराई हा आसाममधीलच सिलिगुडीचा एक भाग आहे. डुआर्सचा चहा खूप स्वच्छ, काळासर आणि तेवढाच ताजा असतो. तर, तराईचा चहा मसालेदार आणि थोडा गोड असतो.
• दार्जिलिंगचा चहा - दार्जिलिंगमध्ये 1841पासून चहाचे उत्पादन सुरू झाले आहे. दार्जिलिंगचा चहा हा प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात विकला जातो. दार्जिलिंगचा चहा खूपच स्पेशल आहे. तिथल्या चहाचं उत्पादन तिथचं होऊ शकतं. इतर ठिकाणी त्या चहाचं उत्पादन होत नाही.
• काँगडा - ईशान्मेकडील राज्यांबरोबरच हिमाचल प्रदेश मध्येही चहाचं उत्पादन होतं. तेथील काँगडा जिल्हा चहा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. हिरवा आणि काळा चहा ही काँगडा चहाची ओळख आहे.
• चहा कॅमेलिया सिनेनेसिस वर वनस्पतीपासून तयार केला जातो. आसाम चहा हा स्वदेशी आहे. आसामच्या मातीत चिनी जातीची लागवड करण्याचा प्रारंभिक प्रयत्न यशस्वी झाला नाही.
• आयरिश ब्रेकफास्ट चहा, माल्टिर आणि ब्रेकफास्ट चहामध्ये लहान आकाराच्या आसाम चहाची पाने असतात.
• ब्रह्मपुत्र नदीच्या दोन्ही बाजूला आणि बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेला लागून आसाम हे उत्पादन जगातील सर्वात मोठे चहा उत्पादक प्रदेश आहे.
• आसाममध्ये सामान्यत: आसाममधील विशिष्ट काळ्या चहाचा अर्थ दर्शविला जात असला तरी, या प्रदेशात त्यांच्या विशिष्ट वैशिष्ट्यांसह हिरव्या आणि पांढर्या चहाचे उत्पादन होते.
• 1823 साली युरोपमध्ये आसाम चहाच्या झुडुपाचा परिचय स्कॉटिश साहसी रॉबर्ट ब्रुसशी याच्यामुळे झाला. मनिराम दिवाण यांनी त्याला स्थानिक सिंगफो प्रमुख बेसा गॅमकडे निर्देशित केले होते.
• 1830 च्या दशकाच्या सुरुवातीला रॉबर्ट ब्रुसचे बंधू, चार्ल्स ब्रुस यांनी आसाम चहाच्या झाडाची काही पाने योग्य तपासणीसाठी कलकत्ताच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली. तेथे शेवटी या वनस्पतीस विविध प्रकारचे चहा किंवा कॅमेलिया सिनेनेसिस वर असमिका म्हणून ओळखले गेले. काही काळानंतर चीनी आणि आसाम चहाच्या वनस्पतींचे संकरित रूप अधिक यशस्वी झाले.
• 1834 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने आसाम चहाचे वैज्ञानिक स्वरूप आणि व्यावसायिक संभाव्यता तपासण्यासाठी चहा समितीची स्थापना केली.
• पहिल्या दोन दशकांत (1840 - 60) आसाम चहाची लागवड आणि उत्पादन यावर आसाम कंपनीची मक्तेदारी केली होती, ती अप्पर आसामच्या जिल्ह्यांत कार्यरत होती.
• 1860 च्या सुरूवातीस चहा लागवड करणार्याना जमीन देण्याच्या फीच्या सोप्या नियमांमुळे आसाम चहा उद्योगात काळात भरभराट व विस्तार झाला.
• आसाम चहा बुशची पाने चिनी चहा वनस्पतीच्या तुलनेत गडद हिरव्या आणि तकतकीत आणि बर्यापैकी रुंद आहेत. हे बुश नाजूक पांढर्या फुलांचे उत्पादन करते.
• आसामच्या सखल प्रदेशात, दार्जीलिंग्ज आणि नीलगिरीपेक्षा कमी उंच प्रदेशात चहाची वनस्पती उगवते. ब्रह्मपुत्र नदीच्या खोर्यात, पुरामुळे पोषक तत्त्वांनी समृद्ध चिकणमाती माती आहे. हवामान थंड, रखरखीत हिवाळा आणि गरम, असून दमट पावसाळ्याच्या चहाच्या वाढत्या चहासाठी अनुकूल हवामानात बदलते.
• आसाम चहा साधारणपणे दोन वेळा काढला जातो, प्रथम फ्लश आणि सेकंड फ्लश मध्ये. प्रथम फ्लश मार्चच्या उत्तरार्धात निवडला जातो. दुसर्या फ्लश, ज्याची नंतर काढणी केली जाते, ती अधिक किंमतीची टिप्पी चहा आहे, ज्याला पानांवर दुसर्या सोन्याच्या टिपांसाठी असे नाव दिले जाते. हा दुसरा फ्लश, टिप्पी चहा गोड आणि अधिक शरीरयुक्त आहे आणि सामान्यतः पहिल्या फ्लश चहापेक्षा श्रेष्ठ मानला जातो.
अर्थव्यवस्था
शेती
• आसाममधील जमिनदारी रद्द करून शासनाने बहुतेक भूमी रयतवारी पद्धतीने वाटून दिली असून राज्यातल्या श्रमिकांपैकी 70%हून अधिक लोक कृषि-उद्योगात आहेत.
• लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी 70% क्षेत्र अन्नधान्याखाली असून मुख्य पीक भाताचे आहे. त्याशिवाय मोहरी, बटाटा, डाळी, मका ही पिके होतात.
• नगदी पिके - चहा, ताग, कापूस, तेलबिया, ऊस व मुसुंबी वगैरे फळे ही होत.
• सध्या 750 चहामळे असून वार्षिक उत्पादनाचा 81%पेक्षा अधिक भाग निर्यात होतो.
• मत्स्य उत्पादन - राबा, कटला, मिगल, माली इ.
हातमाग व ग्रामोद्योग
• कृषीखालोखाल हातमाग हा पूरक उद्योग मैदानी व डोंगरी प्रदेशातही महत्त्वाचा आहे. हे काम बहुधा स्त्रिया करतात. रेशमाची पैदास, कताई व सुती-रेशमी कापड विणकाम मुख्यत: कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी होते तथापि उत्पादन वाढविण्यासाठी शासनाने सहकारी संस्थांमार्फत व यंत्रशक्ती उपलब्ध करून देऊन उत्तेजन दिले आहे.
• कुटीरोद्योगात बांबू, वेत व गवताच्या टोपल्या, इतर कलापूर्ण वस्तू, विशेषत: झापी या शेतकामाच्या वेळी वापरण्याच्या मोठ्या गोल गवती टोप्या या वस्तू विशेष उल्लेखनीय आहेत.
हस्तकला -
• बांबू वेत किंवा ताडाच्या पानापासून बनवलेली टोकदार गोलाकार ’जापी’ शिरोवेष्ट आसामची ओळख आहे.
• येथील विशेष म्हणजे पितळ व काशयाची भांडी व खेळणी. जेवणाची ताटे, वाट्या, भांडी अजूनही पितळ्याचीच वापरतात.
वस्त्रकला -
• सुती कापडाचा लाल काठाचा ’गामोसा’ हि जापीबरोबर आसामची दुसरी ठळक ओळख. बरेच राजकारणी गामोसा वापरताना दिसतात. यात रेशमी प्रकारही मिळतो परंतु सुती सर्वात सामान्य.
• सामाजिक चालीरीतींमध्ये या कपड्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. अगदी शेजारी मिठाई देण्यापासून ते वरदक्षिणेपर्यंत सर्वत्र या वस्त्राची आवश्यकता असते.
आसामी रेशमाचे तीन प्रकार-
1) ’पाट’ रेशीम, तुतीच्या झाडावर पोसलेल्या किड्यांपासून मिळणारे, सर्वात तलम व महाग. इतरत्र मिळणारी रेशमी वस्त्रेही याच प्रकारच्या सुताची असतात.
2) ’मुगा’ रेशीम, हे नैसर्गिक सोनेरी झाक असलेले तुलनेत कमी तलम रेशीम आसामची खासियत. यावर लाल रंग फार उठून दिसतो व बर्याच पारंपरिक वस्त्रात हि रंगसंगती वापरली जाते.
3) अधिक जाडसर रेशीम ’ईरी’. हे किडे एरंडाच्या झाडावर वाढतात, एरंडाचे आसामी नाव इरी. याच्या शाली किंवा स्टोल सारखी जाडसर वस्त्रे बनवतात. हे रेशीम कोसा/टसर च्या वर्गातले असले तरी त्यापेक्षा अधिक तलम व चमकदार.
उद्योग
• सूतगिरण्या, पोलाद काम व हलके कारखानदारी धंदे, साखर, ताग, रेशीम, कागद, लगदा, लाकुडचुरा, पातळ व जाड लाकडी तक्ते तयार करणे, इमारती लाकूड मुरविणे असे उद्योग आहेत.
• लहान उद्योगधंद्यांत हातमाग, रेशीम, नावा बांधणे पितळी व काशाची भांडी बनविणे मातीची भांडी, विटा व चुना भाजणे वेत व बांबूकाम, फर्निचर, भेंडाच्या सोला टोप्या, लोहारकाम, सुतारकाम तसेच तेलघाण्याच्या, भात सडण्याच्या व लाकूड कापण्याच्या गिरण्या यांचा समावेश होतो.
• धुब्री येथे आगपेट्याचा एक मोठा कारखाना आहे.
• रेशीम धाग्याचा सरकारी कारखाना जागीरोड येथे आहे.
• नामरूप येथे सरकारी खत कारखाना आहे.
• तेलशुद्धीकरण कारखान्यातील शिलकी इंधनावर नारंगी येथे 125 मेवॉ. क्षमतेचे एक औष्णिक वीजनिर्मिती-केंद्र गौहातीच्या आसपासच्या संरक्षणविषयक व औद्योगिक गरजा भागविण्यासाठी आहे.
• अप्पर-आसाम भागासाठी नहरकटिआ तेलक्षेत्रातील ज्वलन वायूवर 69,000 किवॉ. क्षमतेचे एक केंद्र, उम्त्रू येथे कामरूप-खासी-जैंतिया टेकड्यांसाठी जलविद्युत निर्मितेचे एक केंद्र आणि उमिअन-उम्त्रू ग्रिड योजना यांमुळे परिणामी 8.2 मेवॉ. वीज पुरविली
लोक व समाजजीवन
• आसामच्या लोकात अनेक वंशीयांचे मिश्रण आहे.
• मिकीर, नागा, पाची, लखेर, कुकी, हमार व चकमा या डोंगरी जमाती आणि बर्मान, बोरोकाचारी, लालुंग, राधा, मिरी, देवरी, व मेच या मैदानी जमाती आहेत. काचारी व हनाँग या जमाती डोंगरी व मैदानीही आहेत.
• चहाच्या मळ्यांतून काम करणारे मजूर बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथून आलेले आहेत.
• बांगला देशातून आलेले मुस्लिम शेतकरी काचार व गोआलपाडा जिल्ह्यांत वसले आहेत.
• इतर निर्वासित नौगाँग, कामरुप व गोआलपाडा जिल्ह्यांतून पसरले आहेत.
• राज्यातल्या 73% हिंदूधर्मीयांत शैव व श्रीशंकरदेव- माधवदेवप्रणीत महापुरुषीय नववैष्णव पंथाचे अनुयायी आहेत. 245% लोक इस्लाम धर्माचे, 26% ख्रिश्र्चन आणि 11,920 शीख, 22,565 बौद्ध, 12,914 जैन आहेत.
• मैदानातील ग्रामीण प्रजा कुडाच्या भिंती आणि गवताची छपरे असलेल्या घरातून राहते. नागरी वस्तीतही पक्की घरे कमी. लोकांचा पोषाख, सामान्यतः पुरुषांचा धोतर व पांघरण्याची शाल आणि स्त्रियांचा साडी व शाल असा असतो.
संगीत व वाद्ये
आसामी साहित्याचे पितामह समजण्यात येणार्या शंकरदेव ह्यांना आसामी संगीताचेही पितामहपद देण्यात येते कारण त्यांनी चौदाव्या-पंधराव्या शतकांत आपल्या भक्तिसंप्रदायासाठी विपुल स्वररचना केल्या. त्या आसामी संगीताचे एक अमोल भांडार आहेत. आरंभीच्या आसामी साहित्यामध्ये विविध रागांवर आधारलेली गीतरचना विपुल आहे.
• प्राचीन आसामी संगीताच्या कंठसंगीत आणि वाद्यसंगीत अशा दोन्ही प्रकारांचे उल्लेख कालिकापुराणात सापडतात. आसाममधील भक्तिमार्गी चळवळीमुळे आसामी संगीतामध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
• शंकरदेवांनी आपल्या शिष्यांना संगीत, नृत्य आणि नाट्य (भावना) ह्यांचे शिक्षण दिल्यामुळे त्यांना आसामी गांधर्वविद्येचे ‘बरा-गायना’ (संगीत कुलगुरू) समजतात.
• बोरगीत व बोनगीत: शंकरदेव-माधवदेवांचे वरदान, बोरगीत भक्तिपर गीतरचना... लोकगीतांच्या सुरावटीवर गायली जाणारी संथ गीते. यात तालाची साथ बर्याच वेळेला आवशयक मनाली जात नाही. बोनगीत म्हणजेच वनगीत लोकगीताचाच प्रकार.
• ‘ बरगीत’ हा वीरश्रीयुक्त आणि उमद्या गीतांचा प्रकार, तसेच ‘अंकियागीत’ ह्या नावाने ओळखली जाणारी नाट्यगीते आसामी संगीताला उपकारक ठरली.
• परवीन सुलताना व ‘बनगीत’ गायिका म्हणून प्रसिद्ध असलेली दीपाली बरठाकूर लोकप्रिय आसामी गायिका होत.
वाद्ये -
• ढोल, मृदुन्ग व बासरी हे उर्वरित भारताप्रमाणे असामातही लोकसंगीतात महत्वाची भूमिका बजावतात पण याशिवाय खास आसामची काही वाद्ये आहेत. आसामी वाद्यवादनाची प्रथाही फार पुरातन असून येथील जुन्या मंदिरांमध्ये विविध वादकांच्या मूर्ती आढळतात.
1) पेपा : गव्याच्या शिंगापासून बनवलेली लहानशी तुतारी. याचे बिहू उत्सवात अनन्यसाधारण महत्व आहे.
2) झुतुली: मातीची किंवा बांबूची लहानशी शिटी.
3) गोगोना : हे मजेदार टॉय टॉय वाजणारे लहानसे मौखिक वाद्य बांबू पासून बनवलेले असते. भारतात इतरत्र याला मोरचंग किंवा मोरसिंग (संस्कृत मुखशंकु) म्हणतात.
• आसामी वाद्यवादनाची प्रथाही फार पुरातन असून येथील जुन्या मंदिरांमध्ये विविध वादकांच्या मूर्ती आढळतात.
नृत्य
मणिपुरी हा एक प्रमुख भारतीय नृत्यप्रकार आसामच्या पूर्व सरहद्दीवरून आसाममध्ये प्रचारात आला. प्राचीन काळापासून मणिपुरी नृत्यप्रकारामध्ये आसामी कलावंत पारंगत आहेत. अमुबी सिंग हे ज्येष्ठ व श्रेष्ठ कलावंत.
• सूर्यास्तानंतर उघड्यावर करण्यात येणार्या पुष्कळशा लोकनृत्यांच्या वेळी सभोवती जाळ केला जातो. नृत्यकलेत रममाण झालेल्यांना हिंस्र पशूंपासून संरक्षण लाभावे आणि एक प्रकारचे विशिष्ट वातावरण निर्माण व्हावे, हाच ह्या जाळाचा उद्देश.
• लायहरोबा- हा नृत्यनाटिकाप्रकार आसामात लोकप्रिय आहे. साधारणपणे दर वर्षी मे महिन्यात आसाममध्ये हा नृत्यप्रकार दहा दिवस रंगमंचावर सादर केला जातो आणि त्यात माणसाचा जन्म, तारुण्य, विवाह, प्रौढत्व इ. वेगवेगळ्या अवस्था दाखविल्या जातात. प्रेमलता देवी, टंडन देवी, रजनी माईबी, बिनोकुमारी देवी, सुधीर सिंग इ. नर्तक या नृत्यप्रकारात पारंगत आहेत.
• ‘बिहू’ हा आसामचा एक प्रादेशिक नृत्यप्रकार असून तेथील वेगवेगळ्या सणांच्या वेळी त्याचे कार्यक्रम होतात. उदा., नूतनवर्षप्रसंगी रंगाली बिहू व शेतीच्या हंगामात भोगाली बिहू, वन्य जमातींमधील ‘बोडा’ या सांघिक नृत्यप्रकार प्रसिद्ध आहे.
• ओजापाली ह्या नृत्यप्रकारात ‘शक्तिपूजा’ केली जाते आणि ढोलाच्या साथीवर गाणी म्हणण्यात येतात. ह्या नृत्यामधील एकसुरीपणा घालविण्यासाठी अधूनमधून जादूचे प्रयोगही करण्यात येतात.
• ‘देवधनी’ ह्या नृत्यप्रकारात देवाचा ध्वनी ऐकू येतो, असा समज रूढ असल्यामुळे नृत्य चालू असताना देवतेच्या वेषातील नर्तिका भविष्यकथन करतात.
• खुलिया नृत्य - बंगालमधील ‘जात्रा’ ह्या लोककलाप्रकाराशी जुळता असा आसामी नृत्यप्रकार म्हणजे ‘खुलिया’ नृत्य. ह्या प्रकारात वीस-पंचवीस पखवाज आणि मृदंग वाजवून गोपीकृष्णाची रासक्रीडा दाखविली जाते.
• ‘ढुलिया’ नृत्यामध्ये नर्तक आपल्या चेहर्यांवर मुखवटे चढवितात आणि नृत्याच्या अखेरीस कुस्ती खेळली जाते.
• ‘पुतला’ नृत्यामध्ये कळसूत्री बाहुल्यांच्या धर्तीवरील ढोलकच्या तालावर संपूर्ण रामायणाची कथा सांगितली जाते.
• नौकानृत्य - आसामच्या सुरमा नदीच्या खोर्यातील गावकरी नौकानृत्य करतात. ह्या प्रकारात दोन होड्यांमध्ये शर्यती होतात आणि ह्या होड्यांच्या मधल्या ताफ्यांवर नृत्य केले जाते.
सत्रिया नृत्य -
आसामचे हे शास्त्रीय नृत्य. आचार्य शंकरदेवांच्या ’संगीत रत्नाकर’ ग्रंथातून त्यांनी आसामच्या सांस्कृतिक जीवनात अमूल्य भर घातली त्यातील हा नृत्यप्रकार एक. यात प्रामुख्याने तीन प्रकार-
1) ’नृत्त’ म्हणजे केवळ विशुद्ध शास्त्रीय नर्तन,
2) ’नृत्य’ म्हणजे अभिनयासहित नर्तन, व
3) ’नाट्य’ म्हणजे सामूहिक कथा सादरीकरण.
यात ’पौरुषीक भंगी’ व ’स्त्री/लास्य भंगी’ असे दोघांसाठी वेगळे नियम. पोशाख, उत्तम प्रतीच्या रेशमाची ’चादोर’ व कमरेभोवती ’कांची’. अतिशय देखणा नृत्यप्रकार...
भाऊना नृत्य -
• एक धार्मिक नृत्य-नाट्य, मोठाले टाळ व मृदुन्ग घेऊन लयबद्ध नृत्य करणारे शुभ्रावेशातील वैष्णव भक्त व दशावतार सादरीकरणात असतात तसे नटलेले कलाकार वेगवेगळ्या अंकात कला सादर करतात.
• लोकनृत्याची आसामची एक खास शैली आहे. केवळ हाताच्या तळव्यांची लयबद्ध हालचाल करत अगदी बसल्या बसल्याही ठेका पकडणारे साधे नृत्य. दुसरी खास ओळख म्हणजे विशेषतः स्त्रियांचे हात पाठीमागे दुमडून कोपरांची लयीत हालचाल करीत नृत्य.
साहित्य
आसाम खोर्याची आसामी ही इंडोआर्यन वंशाची भाषा असून तिचे व्याकरण बंगालीसारखे आहे. शब्दभांडार मुख्यत: तद्भव शब्दांचे त्यावर आणि रचनेवरही तिबेटी-ब्रह्मी बोलींच्या सान्निध्याचा परिणाम दिसून येतो.
• असमिया साहित्याची परंपरा बरीच जुनी असून त्यात गौरवाचे स्थान ऐतिहासिक लिखाणाला आहे. सची किंवा अगरूवृक्षाच्या अंतर्सालीवर लिहिलेल्या बुरंजी या आहोम राजांच्या बखरी तेराव्या शतकापासूनच्या असून पुष्कळशा अजून सांभाळून ठेवलेल्या आहेत.
• सोळाव्या शतकापासून गद्यलेखन सुरू झाले. भट्टकृत कथागीता व कथाभागवत (1593), शंकरदेव-माधवदेव यांचे महापुरुषीय पंथनिरूपण, अनेक अधिकारी लेखकांच्या ज्योतिष, गणित, रतिशास्त्र, नृत्यमुद्रा, पशुरोग, इत्यादींविषयक कृती, वैष्णवोत्तर कालात कीर्तन व नामघोषासंबंधी धार्मिक ग्रंथ, इतर प्रांतासारखी लोकगीते, दोहे, तंत्रमंत्रविषयक लेखन, बिहुगीते, बारगीते अशा प्रकारांनी असमिया साहित्य समृद्ध झाले.
• एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आधुनिक साहित्यनिर्मितीस सुरुवात झाली. तेव्हापासून विशेष उल्लेखनीय लेखक गुणाभिराम बरुआ, हेमचंद्र बरुआ, हेमचंद्र गोस्वामी, लक्ष्मीनाथ बेझबरुआ, चंद्रकुमार अगरवाला, रजनीकांत बार्दोलोई, पद्मनाथ गोहाइन बरुआ, रघुनाथ चौधरी, डॉ. एस्. के. भूयान, डॉ. वाणीकांत काकती, डिंबेश्र्वर नेओग, ज्योतिप्रसाद आगरवाला, रत्नकांत बरकाकती, दंडिनाथ कलिता, चंद्रधर बरुआ, माफिनुद्दीन अहमद इझारिका व वेणुधर राजखोवा हे झाले.
• साहित्य अकादमीचे पारितोषिक विजेते (व त्यांचे ग्रंथ) जतीन्द्रनाथ दुआरा (वनफूल), वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य (ऐरूगिननाम), वेणुधर शर्मा (काँगेसोर कंचिआली रोदोत), डॉ. बिरिंचीकुमार बरुआ (लोकसंस्कृती), अंबिकागिरी रायचौधरी (आहुती), त्रैलोक्यनाथ गोस्वामी (आधुनिक बाल साहित्य) हे होते.
भाषा व लिपी -
• प्राकृत कालखंडात महाराष्ट्री, शौरसेनी व मागधी या प्रमुख तिघींपैकी मागधी हि पुर्वेकडची. पुढे त्यातून कामरूपी हि प्राकृत उदयास आली व तिचे आधुनिक रूप म्हणजे आसामी भाषा.
• बंगाली, ओडिया, मैथिली, मणिपुरी प्रमाणेच मागधी मध्ये या भाषेचे मूळ व आजही या भगिनींमध्ये बरेच साम्य आहे.
• लिपीमध्येही कानडी-तेलुगू प्रमाणे आसामी-बंगाली मध्ये बरेच साम्य असले तरी आसामी मध्ये बंगालीपेक्षा पेक्षा अक्षरे अधिक आहेत.
लेखक -
1) ज्ञानपीठ विजेते लेखक बिरेंद्र कुमार भट्टाचार्य व इंदिरा गोस्वामी
2) इंदिरा गोस्वामी यांची (छिन्नमस्तार मनूहतो) अनुवादित The Man from Chinnamasta व इतर शाक्त मंदिरातील बळीप्रथेवर टीका करणारी कादंबरी विशेष उल्लेखनीय.
3) राष्ट्रीय पुरस्कार विजेता अदाह्या (Adajya//) चित्रपट त्यांच्या स्वतःच्या वृन्दावनातील विधवा म्हणून वास्तव्याच्या काळातील अनुभवांवर आधारित ’नीलकंठ ब्रज’ अनुवादित The blue necked सेव या कादंबरीवरून घेतलेला आहे.
वास्त्तूकला -
• आसाममधील पुरातन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे दरंग जिल्ह्यातील दाह पर्वतीया या गावातील दगडी देऊळ. गुप्तकाळातील वास्तुकलेच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या ह्या मंदिराचे बांधकाम आजही अभेद्य आहे.
• सतराव्या आणि अठराव्या शतकांमध्ये आहोम राजांनी आसाममध्ये शेकडो मंदिरे बांधली. महावैदाब, विश्र्वनाथ, शिव, कामाख्या, नवग्रह, उमानंद इत्यादींची मंदिरे आसामी वास्तुकलेचे वैभव दर्शवितात. शिवादोल, देवीदोल, विष्णुदोल, रानघर आणि कारेनघर येथील मंदिरे वास्तुकलेच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
• कामाख्यामधील ‘उमाचल शिलालेख’ हा उपलब्ध असलेला अतिप्राचीन शिलालेख होय. गौहातीच्या आसपास सरकारी पुरावास्तुसंरक्षण खात्याला अनेक जुन्या प्रतिमा सापडल्या असून त्यावरून प्राचीन वास्तुकलेची कल्पना येते.
• कामाख्येचे मंदिर महाभारतकालीन राजा नरक ह्याने बांधल्याचा समज आसामी लोकांमध्ये रूढ आहे. आसामममधील सर्वांत जुने कलात्मक मंदिर ह्या दृष्टीने या मंदिराला विशेष महत्त्व आहे.
• घुमटाकार स्तूप, पॅगोडासारखी छपरे, मंदिरांची शिखरे, चैत्य गवाक्षे, स्तंभ अशा विविध प्रकारच्या आकृतिबंधांनी आसामातील प्राचीन वास्तुकला समृद्ध झाली आहे. तीत भौमितिक आकृतिबंध, मानवी आकृत्या, पशुपक्षी आणि अन्य प्राणी यांच्या उत्कृष्ट शिल्पाकृती आढळतात.
• दक्षिण कामरूप, तेझपूर आदी भागांतील पॅगोडासारख्या छपरांचा संबंध शिवाच्या कळसाशी जोडला जातो, तर चैत्य गवाक्षांच्या कमळपत्रांच्या आणि पिंपळपानांच्या ज्ञापकांवरून ब्रह्माशी अथवा शिवाशी अशा आकृतिबंधांचे नाते जोडले जाते.
• बुद्ध, ब्रह्मा, विष्णू, लक्ष्मी, सरस्वती, वासुदेव, राम, लक्ष्मण इत्यादींची मूर्तिशिल्पे आसाममध्ये जागोजाग दृष्टीस पडतात.
चित्रकला -
आसाममधील चित्रकलेलाही पूर्वपरंपरा आहे. चौदाव्या-पंधराव्या शतकांत शंकरदेवांच्या नाटकांच्या प्रयोगांसाठी तयार केलेल्या पडद्यांवर देवदेवतांची चित्रे रंगविलेली होती. त्या काळातील चित्रकारांनी श्रेष्ठ लेखकांच्या हस्तलिखितांची मुखपृष्ठे रंगविण्यासाठीही आपली कला राबविली.
• गीतगोविंद आणि भागवतपुराण यांच्या अनेकांनी केलेल्या हस्तलिखित प्रतींवरील चित्रे रंगविण्यासाठी तत्कालीन चित्रकारांमध्ये अहमहमिका लागलेली असे.
• पौराणिक प्रसंगांवरील चित्रांप्रमाणेच आसामी चित्रकारांनी आहोम राजांच्या दरबारांतील प्रसंगांची चित्रे हस्तलिखितांसाठी काढली होती.
उत्सव -
बिहू हे आसामचे वैशिष्ट्य. लोकजीवनात बिहूचे अनन्यसाधारण महत्व आहे. खाद्यान्न, संगीत, नृत्य, सजावट याद्वारे मोठ्या उत्साहात हे सण इथे साजरे करतात.
1) बोहाग किंवा रोंगाली बिहू म्हणजेच एप्रिल मध्यावरील मेष संक्रांत व हिंदू सौर नववर्ष.
2) भोगाली बिहू म्हणजे मकर संक्रांत
3) तिसरा कोंगाली बिहू, ऑक्टोबर महिन्यातील तूळ संक्रांत
• दुर्गापूजा आणि होळी ह्या सणांव्यतिरिक्त आसाममध्ये नूतनवर्ष, शेतीचा हंगाम, गौहातीच्या कामाख्या मंदिरातील अंबुबाशी मेळा इ. प्रसंग नृत्यसंगीताने साजरे केले जातात.
वेशभूषा -
आसामी लोकांची वेशभूषा साधीच पण आकर्षक असते.
• प्राचीन काळी आसामी स्त्रियांत किनखाब हा जरीकामाचा प्रकार फार लोकप्रिय असे.
• रेशमी वस्त्रांचा वापर करण्याकडे असलेला त्यांचा पूर्वीचा कल आता लोप पावलेला आहे. त्याऐवजी कझिरंगा-कपूर आणि गामोशा हे येथील वेशभूषांचे लोकप्रिय प्रकार आहेत.
• कझिरंगा येथे आसामातील वन्य पशूंसाठी राखीव राने असून या पशूंची चित्रे आसामी कपड्यांवर रेखाटलेली असल्यामुळे कझिरंगा-कपूर (कपडा) असा वाक्प्रचार रूढ झाला.
• गामोशा हे हातमागावर विणलेले पंचे असून आप्तेष्टांमध्ये मंगलप्रसंगी त्यांची देवाणघेवाण होते.
• साधारणपणे येथील बायका व मुली परकरवजा मेखला, त्यावर घट्ट गुंडाळून घेतलेली रिहा आणि तीन वारी चद्दर वापरतात व त्यावर रंगसंगती साधणारे पोलके घालतात. अलीकडे रिहाचा वापर फक्त विवाहित आणि जुन्या बायकांत दिसतो.
• आसामी स्त्रियांमध्ये अंबाड्याचे गाठी-खोपा आणि कोल्डिलिआ-खोपा असे दोन प्रकार प्रचलित असल्याचे दृष्टीस पडतात.
• गाठी-खोपा हा साध्या अंबाड्याचा प्रकार असून कोल्डिल या प्रकारच्या फुलाशी कोल्डिलिआ - खोप्याचे साम्य असते.
• घील-खोपा हाही केशभूषेचा एक प्रकार आसामी स्त्रियांमध्ये लोकप्रिय आहे.
अलंकार -
• मोठ्या पदकांचे गळाबंद हार हे आसामी अलंकारातील विशेष.लाल रंगाचे फार महत्व.
• ’जुनबीरी’, गोल पदकाचे ’जेठीपोटा’, चौकोनी पदकाचे ’मेजबिरी’ हे अलंकार आहेत.
• हातातील जाड कंकण ’गाम खारू’ हे हि एक वेगळेपण.
अन्न -
आसामी लोकांचा सर्वसाधारण आहार, भात, डाळी, भाज्या व मासे आणि मधूनमधून मांस असा असतो.
• मुख्य अन्न भात. सणासुदीला तांदुळाचे वडे, घावन, धिरडी, केक अशा प्रकारचे ’पिठा’ बनवतात. भाताबरोबर विविध स्थानिक भाज्या व डाळ. मासे सुद्धा महत्वाचे. ’
• माछ तेंगा’ हि ईडलिंबू किंवा कोकम वापरून अशा आंबट चवीचे प्राधान्य असलेली एक स्थानिक डिश.
• ’पिटिका’ म्हणजे ’भरीत’, आलू-पिटिका म्हणजेच बटाट्याचा मसालेदार कुस्करा
• वांग्याचे भरीत व ’खोरीसा तेंगा’ हे खारवलेल्या बांबूच्या कोवळ्या अंकुराचे
कला व क्रीडा -
• आसामी मुलांमध्ये विशेष प्रचलित असलेला काठयांचा खेळ म्हणजे ‘भंटा’ हा होय.
• आसामात खूप पाऊस पडत असल्यामुळे आसामी मुले घरातील बैठे खेळ खेळणेच अधिक पसंत करतात. त्यांपैकी सर्वात अधिक लोकप्रिय खेळ म्हणजे राजाचे झाड हा होय. या खेळात सर्व मुले गोलाकार बसून आपल्या डाव्या हाताची मूठ जमिनीवर ठेवून आणि अंगठा वर ठेवून उंच उंच झाड लावीत जातात आणि शेवटी ज्याची मूठ सर्वांत वर असेल, ते मूल ते राजाचे झाड मध्यावर तोडून टाकते आणि खेळ संपतो.
• घोड्यांच्या शर्यती, पोहणे, नौकाविहार, शिकार इ. आसामींच्या मनोरंजनाचे आणि छंदाचे विषय आहेत. श्री.बी. एस. बरुआ या खेळाडूस 1966 साली व्यायामी खेळांबद्दल अर्जुन पुरस्कार लाभला.
आसामधील अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने
1) काजीरंगा नॅशननल पार्क
• आसाममधील गोलाघाट व नागांव जिल्ह्यामध्ये स्थित आहे.
• बर्याच दुर्मिळ प्रजातींच्या सुरक्षिततेमुळे युनेस्कोने हे जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केले आहे - गोल्डन लंगूर, बंगाल फ्लोरिकॉन, पायम हॉग, व्हाइट - विंग्ड वुड डक इत्यादी प्राणी
• जगातील दोन तृतीयांश अशा एक मोठे शिंग असलेला गेंड्याचे घर आहे.
• येथे वाघ, गेंडा, हत्ती, दलदल हरण, वन्य म्हैस इत्यादी प्रजाती आढळतील.
• हे राष्ट्रीय उद्यान नोव्हेंबर एप्रिल दरम्यान सुरू होते.
• काजीरंगा राष्ट्रीय उद्यान मध्य आसाम मध्ये 430 चौ किलोमीटर क्षेत्र मध्ये पसरलेले आहे.
• ब्रह्मपुत्रा नदीच्या सुमारे 858 चौ.किमी अंतरावर पसरलेल्या या उद्यानात मोठ्या संख्येत हत्तींची होणारी निपज, जंगली म्हैस आणि दलदलीतले हरीण यांचा समावेश होतो.
• अनेक प्रकारचे पक्षी आढळतात जसे - प्रवासी पक्षी , शिकारी जल पक्षी , आणि गेम वर्ड्स पक्षी आढळतात.
• 1905 मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले.
• 1916 मध्ये गेम रिज़र्व म्हणून ठेवण्यात आले.
• 1950 मध्ये पार्क ला काजीरंगा वन्यजीव अभयारण्य बनवले गेले.
• 1968 मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले.
• 11 फेब्रुवारी 1974 मध्ये भारतीय सरकार ने अधिकृतरित्या या पार्कला मान्यता दिली.
काजीरंगा नॅशननल पार्क मध्ये आढळणारे प्राणी -
• एक सिंग गेंडा , जंगली म्हशी (वाइल्ड वाटर बफेलो) आणि दलदली हरणे सर्वात जास्त प्रमाणात इथे आढळतात. ॠांभर, जंगली सुअर जंगली मांजरी, बंगाल कोल्हे, गोल्डन सियार, भालू , भारतीय मोंटजैक, भारतीय ग्रे नेबला, छोटा भारतीय नेबला, बंगाल वाघ आणि आशियायी हत्ती
• या नॅशनल पार्क मध्ये एकूण 35 सस्तन प्राण्याच्या जाती आढळतात. परंतु 15 प्रजाती य धोक्यमध्ये आहेत
• पक्षी - सफेद हंस , फेरुगिन बदक , बेयर पोर्चड बदक , काळे मान वाले सारस , एशियाई ओपनबिल कॉर्क,बेलीथ किंगफिशर , सफेद बगळे , डालमेशियन पेलिकन, स्पॉट-बिल्व्ड पक्षी
• या नॅशनल पार्क मध्ये गिधाडांच्या 3 प्रजाती आढळतात - भारतीय गिधाड , बारीक गिधाड आणि इंडियन वाइट वल्चर.
काजीरंगा राष्टीय उद्यान मध्ये आढळणारे वनस्पती -
• काज़ीरंगा राष्ट्रीय उद्यान मध्ये 3 प्रकारच्या वनस्पती आढळतात. त्यात विविध प्रकारचे गवत सुद्धा शामिल आहे. कमळ , जलकुंभी आणि जल लिली इत्यादी प्रकारचे वनस्पती आढळतात. 41 % हत्ती गवत (टाल एलीफैंट ग्रास) . 29% खुले जंगल , 11% छोटे गवत 8% नदी आणि अन्य वनस्पती जल स्तोत्र , 6 % वाळू , 4% स्वामपलैंड आढळतात.
2) मानस अभयारण्य
• मानस अभयारण्य हे बारपोटा जिल्यामध्ये स्थित आहे. मानस अभयारण्य वाघ क्षेत्र आहे.
• हत्ती , चित्ता पिगमी , सुवर आणि वन्यजीव प्राणी अढळतात.
• हे अभयारण्य यूनेस्को मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
3) कार्बी अँग्लाँग वन्यजीव अभयारण्य
• इथे वाघ, हत्ती, गौर, सांबर, अस्वल, बार्किंग हरण, रीसस मकाक, हूलॉक गिब्न, वन्य डुकरांना, जंगली मांजरी इत्यादी दोन्ही अभयारण्यांमध्ये पाहायला मिळतात.
• पूर्व कार्बी आंग्लॉन्ग वन्यजीव अभयारण्य 221. 81 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले आहे. पायथन, कोब्रा, मॉनिटर सरडे, हिल कासव, वुडलँड पक्ष्याच्या अनेक प्रजाती देखील पाहायला मिळतात.
• काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या दक्षिणेस स्थित, उत्तर कार्बी आंग्लाँग वन्यजीव अभयारण्य, काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या प्राण्यांसाठी एक आश्रयस्थान आहे जे वार्षिक पूर दरम्यान स्थलांतर करते.
4) पोबितोरा वन्यजीव अभयारण्य गुवाहाटी
• गुवाहाटी मध्ये पोबितोरा वन्यजीव अभयारण्य मध्ये एक शिंग वाले गेंडे इथे मोठ्या प्रमाणावर आढळतात. हि वाइल्डलाइफ सेंचुरी मोबिगांव जिहील्यामध्ये गुवाहाटी पासून सुमारे 30 किमी अंतरावर स्थित आहे. इथे अनेक प्रजातीचे पक्षी पाहायला मिळतात.
• पोबीटोरा वन्यजीव अभ्यारण्य गुवाहाटी पासून 50 किमी अंतरावर मारीगाव जिल्ह्यामध्ये स्थित आहे. हे अभयारण्य एक शिंग वाला गेंडा साठी प्रसिद्ध आहे. 30.8 वर्ग किमी वर पसरलेले 16 किमी मध्ये गेंडे राहतात. इथे मोठ्या प्रमाणावर गेंडे आढळतात, म्हणून याला गेंड्याचे अभयारण्य असे म्हणतात.
• गेंड्याच्या व्यतिरिक्त इथे प्रवासी पक्षी पाहायला मिळतात. दर वर्षी इथे 2000 प्रवासी पक्षी येतात. अभयारण्य मध्ये आशियायी म्हशी , तेंडुआ , जंगली मांजर , भालू सारखे असे अनेक प्राणी पाहायला मिळतात.
5) पाभा अभयारण्य,आसाम
• अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या सीमेत असलेले पाभा अभयारण्य आसामच्या लखीमपूर जिल्ह्यात आहे. सुमारे 49 चौरस किमी अंतरावर असलेले छोटे अभयारण्य मिलरोय अभयारण्य म्हणूनही ओळखले जाते.
• एशिया पाण्याच्या म्हशीच्या संरक्षणासाठी पाभा अभयारण्य विशेष तयार केले गेले आहे.
6) बोरैल वन्यजीव अभयारण्य
• 326.24 वर्ग किलोमीटर क्षेत्र मध्ये पसरलेले विस्तीर्ण बोरैल वन्यजीव अभयारण्य,आसाम मधील सर्वात मोठ्या अभयारण्य पैकी एक आहे, आणि उष्ण कटिबद्ध सदाबहार झाडासाठी प्रसिद्ध आहे.
• येथी चीनी वज्रदेही, उड़न लोमड़ी,शर्मीली बिल्ली,स्टम्प टेल्ड मकाक, रीसस मकाक, कैप्ड लंगूर, हूलाक बबून आणि हिमालय काळा भालू इथे पाहायला मिळतात
• विविध प्रजातीचे प्राणी इथे पाहू शकतात. पांढरी मान असलेला गिधाड पहाडी तितर , माऊंटेन बैम्बू , तपकिरी कासव , पाली इथे आढळतात.
7) औरंग राष्ट्रीय उद्यान
• औरंग राष्ट्रीय उद्यान दररंग व सोनितपूर जिल्ह्यात 78 चौरस कि.मी.पर्यंत पसरलेले आहे मिनी काझीरंगा पार्क म्हणून देखील ओळखले जाते. दोन्ही उद्यानांमध्ये दलदलीचा झरे, नाले आणि गवताळ प्रदेशांचे समान लँडस्केप आहे
• ओरंग नॅशनल पार्कमध्ये ग्रेट इंडियन वन-हॉर्नड गेंडादेखील सापडतो. ऑरंग नॅशनल पार्कमध्ये दरवर्षी व्हाइट पेलिकन, क्षडजुटंट सारस, शेल्डक, मल्लार्ड, किंग फिशर आणि वुडपेकर असे अनेक प्रवासी पक्षी येताना दिसतात.
• या उद्यानात रॉयल बंगालचे वाघ, बिबट्या, इंडियन पँगोलिन, सिव्हेट्स, पिग्मी हॉग्ज इत्यादी अनेक प्राणी या उद्यानात राहतात.
8) लाओखोवा वन्यजीव अभयारण्य
• ब्रह्मपुत्र नदीच्या काठावर वसलेले, लाइखोवा वन्यजीव अभयारण्य, लाओकोवा-बुराचापोरी इको सिस्टमचा एक भाग आहे. हे आसाममधील नागाव जिल्हा प्रशासनाच्या अंतर्गत येते.
• हे गेंडे आणि वन्य म्हशींचे नैसर्गिक निवासस्थान आहे.
• या दोन प्राण्यांव्यतिरिक्त वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांना हॉग हरण, वाघ, बिबट्या कार, हत्ती, फिशिंग मांजर, सिव्हेट्स इत्यादी आढळू शकतात.
• शिवाय, तेथे 225 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आहेत या ठिकाणी 39 प्रजातींच्या माशांचे, प्रजाति उभयचरांच्या, सरीसृपांच्या 14 प्रजातींचे प्रजनन क्षेत्र आहे.
9) डिब्रु सैखोवा वन्यजीव अभयारण्य
• 11. 19 वर्ग किलोमीटर मध्ये हे अभयारण्य पसरलेले आहे. अभयारण्य आसाम घाट डिब्रूगड आणि तिनसुकिया जिह्ल्यामध्ये स्थित आहे. अरुणाचल प्रदेश सीमेजवळ हे अभयारण्य आहे
• प्रसिद्ध स्टिलवेल रोड जवळ आहे हीच जागा विश्व युद्ध चे कब्रीस्थान आहे.
• इथे चीनी वज्रदेही , स्टंप मकाक, हिमालयी काळा हरीण , मलायी विशालकाय गिलहरी प्राणी आढळतात. इथे पहाडी तितर , ग्रे मोर , पांढरे बदक , हर्न बिल असे अनेक प्रजातीचे पक्षी इथे पाहू शकतात.
10) बोर्नाडी वन्यजीव अभयारण्य
• बोर्नाडी वन्यजीव अभयारण्य हिसपीड हरे आणि पिग्मी हॉगचे घर आहे. वन्यजीव अभयारण्य दररंग जिल्ह्यात आहे. केवळ 26.23 चौ.कि.मी.पर्यंत पसरलेला बोर्नाडी वन्यजीव अभयारण्य एक आदर्श भाबर मार्ग आहे.
• गौर, हत्ती, वाघ, स्मॉल इंडियन सिव्हेट, बिबट्या, जंगल कॅट, पोर्क्युपिन, चायनीज पँगोलिन, हिमालयीन ब्लॅक बीयर, बार्किंग हिरण याशिवाय पिग्मी हॉग आणि हिस्पिड हरे यासारख्या सस्तन प्राणी दिसतात.
• पीफॉल, हॉर्नबिल, बंगाल फ्लोरिकन आणि दलदलीचा पोपट हे पक्षी वन्यजीव अभयारण्यात दिसतात.
11) सोनई रुपाई वन्यजीव अभयारण्य
• सोनाईपूर जिल्ह्यातील हिमालयातील पायथ्याशी सोनई रुपाई वन्यजीव अभयारण्य आहे. अंदाजे 200 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले हे अभयारण्य भव्य दृश्ये तसेच मुबलक वन्यजीव प्रदान करते.
• पर्यटक सोनई रुपाई वन्यजीव अभयारण्य मध्ये टायगर, लेसर मांजरी, हत्ती, गौर, बार्किंग हरण आणि हॉग हिरण यांना बघू शकतात.
• वन्यजीवांव्यतिरिक्त, या ठिकाणी समृद्ध वनस्पती देखील आहेत. अभयारण्यात अनेक प्रकारच्या वनस्पती आढळतात. वन्यजीव अभयारण्यात कित्येक डोंगर पक्षी देखील दिसू शकतात.
12) गरंपणी वन्यजीव अभयारण्य
• गरंपनी वन्यजीव अभयारण्य त्या ठिकाणच्या सापडलेल्या उष्ण वातावरणामुळे त्याचे नाव पडले. गरमपानी वन्यजीव अभयारण्य कर्बी अँगलाँग जिल्ह्यात आहे. हे एक अगदी लहान अभयारण्य आहे जे केवळ 6. 05 किलोमीटर क्षेत्राचे क्षेत्रफळ आहे.
• गरम पाण्याचे झरे व्यतिरिक्त अभयारण्यात अनेक धबधबे आढळतात. गरंपणी वन्यजीव अभयारण्य हिलॉक गिब्न्स आणि गोल्डन लंगर्सचे घर आहे. त्यांच्याशिवाय वन्यजीव अभयारण्यात इतर अनेक प्रकारचे सस्तन प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी देखील आढळू शकतात.
• गरंपनी वन्यजीव अभयारण्यात वाघ, हत्ती, गॉरस, हॉर्नबिल, पायथन, कोब्रा आणि मॉनिटर सरडे आढळतात. गरंपणी वन्यजीव अभयारण्य गोलाघाटापासून 25 किलोमीटर आणि ••• काझीरंगा राष्ट्रीय उद्यानापासून 65 किलोमीटर अंतरावर आहे.
13) चक्रशिला वन्यजीव अभयारण्य
• चक्रशिला वन्यजीव अभयारण्य गोल्डन लंगूरचा दुसरा संरक्षित निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. चरकशीला पूर्वी आरक्षित वन होते, परंतु 1994 मध्ये हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. हे एकूण 45. 50 चौरस किमी क्षेत्रफळ व्यापते आणि त्याचा कार्यकाळ आसाममधील धुबरी आणि कोकराझार जिल्हा या दोन जिल्ह्यांत येतो.
• चक्रशीला वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांना 14 वेगवेगळ्या जातीचे सरपटणारे प्राणी, 60 प्रकारचे मासे आणि 11 प्रकारच्या उभयचर प्राणी याशिवाय पक्ष्यांच्या 273 प्रजाती आहेत.
• वन्यजीव अभयारण्यात दोन तलाव आहेत जे त्या ठिकाणच्या सौंदर्यात भर घालत आहेत. त्यांना धीर बील आणि दिप्लाई बेल असे म्हणतात आणि ते अभयारण्याच्या दोन्ही बाजूंनी आहेत.
14) देहिंग पटकाई वन्यजीव राष्ट्रीय उद्यान
• 2004 साली देहिंग पटकाई वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले गेले होते. राष्ट्रीय उद्यान घोषित झाल्यानंतर ते काझीरंगा, नामेरी, मानस, ओरंग आणि डिब्रू-सैखोवा यानंतर आसाममधील 6 वे राष्ट्रीय उद्यान असेल.
• 6 जुलै, 2020 रोजी, आसाम सरकारने आसामच्या कोळसा आणि तेलाने समृद्ध (दिब्रूगड, तिनसुकिया आणि शिवसागर) जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या 111.942 चौरस कि.मी. देहिंग पटकाई वन्यजीव अभयारण्याला राष्ट्रीय उद्यानात सुधारित
• देहिंग पटकाई भाग भारतातील उष्णकटिबंधीय कमी-जमीन असणार्या वर्षावनांचा सर्वात मोठा भाग असून आसाममधील कमी जमीन असलेल्या रेन फॉरेस्ट क्षेत्राचा शेवटचा उर्वरित भाग आहे, म्हणूनच याला पूर्व अमेझॉन म्हणून देखील ओळखले जाते.
• आशियाई हत्ती व्यतिरिक्त, बिबट्या, हूलॉक गिब्स, पँगोलिन आणि अस्वल यांच्यासह देहिंग पटकाई येथे 200 हून अधिक पक्षी, विविध सरपटणारे प्राणी आणि फुलपाखरे आणि ऑर्किड्सच्या अनेक प्रजाती आहेत. दुर्मीळ, संकटात सापडलेल्या व्हाईट विंग्ड वुड डकच्या सर्वाधिक घनतेचे हे ठिकाण आहे.
1) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
• क्षेत्रफळ - 430 चौ. किमी
• जवळचे शहर - गोलाघाट
• स्थापना- 1974
• 1985 साली युनेस्कोने या उद्यानाचा जागतिक वारसा स्थान यादीत समावेश केला.
• 2005 साली या उद्यानाने आपला शताब्दी महोत्सव साजरा केला. यामध्ये लॉर्ड कर्झनच्या वंशजांना सुद्धा आमंत्रण देण्यात आले होते.
• 2007 सालाच्या सुरुवातीला दोन गेंडे व एक हत्ती यांचे मानस राष्ट्रीय उद्यानात पुनर्वसन करण्यात आले. हा भारतातील पहिलाच हत्तींच्या पुनर्वसनाचा प्रयत्न होता.
• काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे भारतातील आसाम राज्यातील गोलाघाट व नागांव जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान आहे.
• याचा समावेश जागतिक वारसा स्थानांत केलेला असून, जगात सापडणार्या भारतीय एकशिंगी गेंड्यांपैकी दोन-तृतीयांश गेंडे या अभयारण्यात सापडतात.
• काझीरंगामध्ये अनेक वाघ असून 2006 मध्ये त्याला वाघांचे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.
• या जंगलात अनेक हत्ती, पाणम्हशी तसेच हरणे आढळतात.
• काझीरंगा अभयारण्यामध्ये अनेक दुर्मिळ पक्षी आढळतात.
• काझीरंगा हे भारतातील सर्वात जास्त सुरक्षित अभयारण्य मानले जाते.
• काझीरंगामध्ये चार प्रमुख नद्या आहेत. उद्यानाला ब्रह्मपुत्रा नदीने विळखा घातलेला आहे व याची उत्तरेची तसेच पूर्वेची सीमा म्हणजे ही नदी आहे. या उद्यानाच्या दक्षिणेला मोरा दिफ्लु ही नदी आहे. उर्वरित 2 नद्या- दिफ्लु नदी व मोरा धनसिरी नदी.
• काझीरंगा हे नाव कार्बी भाषेतील काझीर-ए-रंग या शब्दातून तयार झाले. याचा अर्थ काझीरांचे गाव असा आहे. कार्बी लोकांमध्ये काझीर हे मुलीचे नाव मोठ्या प्रमाणात वापरले जाते,4 व असे म्हणतात की पूर्वी काझीर नावाच्या एका स्त्रीने या भागावर राज्य केले. या भागात सापडणार्या काही अवशेषांमुळे या तर्काला पुष्टी मिळते.
• 1904 साली तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांच्या पत्नीने (मेरी व्हिक्टोरिया लॅटर) या भागाला भेट दिली. जेव्हा तिला एकही गेंडा दिसला नाही तेव्हा तिने आपल्या पतीकडे गेंड्यांचे संरक्षण करण्याची मागणी केली. मेरी व्हिक्टोरिया लैटर, लॉर्ड कर्झन (व्हाईसरॉय) यांच्या पत्नीला गेंड्यांचे संरक्षण सुरु करण्याचे श्रेय दिले जाते.
• 11 जून 1905 रोजी सुमारे 232 वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असणारा भाग प्रस्तावित संरक्षित वनक्षेत्र म्हणून राखून ठेवण्यात आला. त्यानंतरच्या तीन वर्षात ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरील सुमारे 152 वर्ग कि.मी. भाग या क्षेत्राला जोडण्यात आला.
• 1916 मध्ये याचे रुपांतर काझीरंगा संरक्षित शिकार वनक्षेत्रामध्ये करण्यात आले.
• 1938 मध्ये या जंगलात शिकारींवर बंदी घालण्यात आली.
• 1950 साली पी.डी. स्ट्रसी यांनी या जंगलाचे नाव बदलून काझीरंगा अभयारण्य असे ठेवले.
• 1954 मध्ये तत्कालीन आसाम राज्य सरकारने एक कायदा केला. या कायद्यान्वये गेंड्यांची शिकार करणार्याला मोठा दंड ठोठावण्याची शिक्षा मुक्रर केली गेली.
• 1968 साली राज्य सरकारने आसाम राष्ट्रीय उद्यान कायदा - 1968 संमत केला. त्यानुसार काझीरंगा अभयारण्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला.
• 11 फेब्रुवारी 1974 रोजी केंद्र सरकारने या 430 चौरस कि.मी. च्या जंगलाला राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत मान्यता दिली.
• काझीरंगा 378 चौरस कि.मी. क्षेत्रावर पसरलेले आहे, कारण 51.14 चौरस कि.मी. क्षेत्रफळाची धूप झालेली आहे. एक वाढीव 429 चौरस कि.मी.चे क्षेत्रफळसुद्धा राखीव ठेवण्यात आलेले आहे. हे क्षेत्रफळ सध्याच्या सीमेच्या सभोवती पसरले आहे. त्यामुळे प्राण्यांसाठी जास्तीचे वसतीस्थान मिळालेआहेत. सेच कर्बी आँगलाँग डोंगरांमध्ये जाण्यासाठी सुरक्षित रस्ता मिळाला आहे.
• एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे 5% जागा या तलावांनी व्यापलेली आढळते.
• जास्त उंचीच्या क्षेत्रांना स्थानिक भाषेत चपोरी असे म्हणतात व पूर आल्यास प्राण्यांना या चपोरी वर आश्रय मिळतो.
• जुलै व ऑगस्ट महिन्यांमध्ये काझीरंगा उद्यानाचा तीन चतुर्थांश इतका भाग ब्रह्मपुत्रेच्या पाण्याखाली जातो. या पुरामुळे प्राणी जवळच्या मिकिर पर्वतरांगेचा आश्रय घेतात.
• काझीरंगा उद्यानात मुख्यत: चार प्रकारचे वनस्पती विभाग आढळतात-पाण्याने भरलेला गवताळ प्रदेश, सवाना जंगले, विषववृत्तीय पानगळीची जंगले व वृत्तीय अर्ध सदाहरित जंगले.
• उंच गवतांमध्ये मुख्यत्वे उस व बांबू आढळतात. तर इतर झाडांमध्ये कुंभी तसेच कापसाची झाडे आढळतात. गवताळ प्रदेशामध्ये सफरचंदाची झाडे सुद्धा आढळतात.
• 1986 साली लँडसॅट उपग्रहाने दिलेल्या माहितीनुसार या जंगलाचा 41% भाग हा उंच गवताने, 11% भाग हा छोट्या गवताने, 29% भाग उघड्या जंगलाने, 4% भाग दलदलीने, 8% भाग नद्या व अन्य पाण्याने, व उरलेला 6% भाग हा वाळूने व्यापलेला होता.
प्राणीजगत -
1) भारतीय एकशिंगी गेंडा
2) पाणम्हैस
3) भारतीय रोलर पक्षी
• काझीरंगा उद्यानात 35 विविध प्रकारचे सस्तन प्राणी आढळतात. यापैकी सुमारे 15 प्रजाती या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
• ह्या उद्यानात जगात असणार्या एकशिंगी गेंड्यांच्या एकूण संख्येपैकी सर्वात जास्त संख्या (1,855), पाणम्हशी (1,666) व बाराशिंगा (468) आढळते.
• शाकाहारी प्राण्यापैकी हत्ती (1,940),25 रानगवे (30) आणि सांबर (58) आहेत. छोट्या प्राण्यांमध्ये भेकर, रानडुक्कर व हॉग हरणे सुद्धा आढळतात.269
• काझीरंगा हे वाघांचे एक मुख्य आश्रयस्थान आहे. काझीरंगा उद्यानाला 2006 साली व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. या उद्यानात जगातील सर्वात जास्त वाघांची घनता आढळते (प्रत्येक 5 किलोमीटरमध्ये एक वाघ).
• वाघांखेरीज इथे रानमांजर, बिबटे व पाणमांजरी सुद्धा आढळतात. इतर छोट्या प्राण्यांमध्ये मुंगूस, कोल्हा, तरस, अस्वल, इ. प्राणी सुद्धा इथे दिसतात.
• भारतात आढळणार्या माकडांच्या 14 जातींपैकी 9 जाती या उद्यानात आहेत. यांमध्ये आसामी माकड, सोनेरी वानर व भारतात आढळणारे एकमेव एप माकड यांचा समावेश होतो.
• काझीरंगाच्या नद्यांमध्ये दुर्मिळ असे डॉल्फिन सुद्धा आहेत.
• काझीरंगाला आंतरराष्ट्रीय पक्षीजगत संस्थेकडून एक महत्त्वाच्या पक्षी अभयारण्याचा दर्जा मिळालेला आहे. काझीरंगामध्ये अनेक प्रकारचे स्थलांतर करणारे पक्षी, पाणपक्षी, शिकारी पक्षी, इ. आढळतात. हिवाळ्यामध्ये मध्य आशियातून विविध प्रकारची बदके, बगळे, करकोचे, इ. पक्षी स्थलांतर करून येतात. नदीकाठच्या पक्ष्यांमध्ये खंड्या, पेलिकन, सारंग, इ. पक्षी आहेत. शिकारी पक्ष्यांमध्ये दुर्मिळ असे इंपिरियल घार, ठिपक्यांची घार, पांढर्या शेपटीची घार, पल्लास मत्स्य घार, करड्या डोक्याची घार, व केस्ट्रेल घार हे पक्षी आढळतात.
• काझीरंगामध्ये एकेकाळी सात प्रकारची गिधाडे आढळत. पण त्यापैकी बर्याच जाती नष्ट झालेल्या दिसतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे मेलेल्या प्राण्यांच्या शरीरात आढळणारे डायक्लोफेनाक नावाचे औषध हे होय. आता फक्त भारतीय गिधाड, पातळ चोचीचे गिधाड व भारतीय पांढर्या रंगाचे गिधाड याच प्रजाती आढळतात.
• या उद्यानातील वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे करण्यात आले. त्यापैकी आसाम जंगल सुरक्षा कायदा 1891 व जैवविविधता सुरक्षा कायदा 2002 हे याच उद्यनासाठी अस्तित्वात आले आहेत.
• पर्यटक हत्ती किंवा जीपमधून केलेल्या जंगल सफारी इथे उपलब्ध आहेत. या उद्यानात पायी चालण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. सोहोला, मिहिमुख, कठपारा, फॉलियामारी व हरमोटी इथे निरीक्षण-मनोरे उभारण्यात आलेले आहेत.
• काझीरंगाचा पहिला उल्लेख 1961 साली बर्लिन दूरचित्रवाणीवर प्रसारित झालेल्या रॉबिन बॅनर्जी यांच्या काझीरंगा या माहितीपटात आढळतो.
• अमेरिकेचा लेखक, एल. स्प्रेग डि कॅम्प ने त्याच्या काझीरंगा, आसाम कवितेमध्ये या उद्यानाचा उल्लेख केलेला आहे. ही कविता प्रथम 1970 साली डेमॉन्स ंड डायनोसोर्स मध्ये प्रसिद्ध झाली व नंतर काझीरंगा या नावाने 2005 मध्ये पुनःप्रकाशित झाली.
• काझीरंगा ट्रेल (चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट), 1979), नावाच्या एका लहान मुलांसाठीच्या अरूप दत्ता यांनी लिहिलेल्या गोष्टीच्या पुस्तकाला शंकर पुरस्कार मिळालेला आहे.
• आसामी गायक भूपेन हजारिका यांनी त्यांच्या एका गाण्यामध्ये काझीरंगाचा उल्लेख केलेला आढळतो.
• बीबीसीचे पर्यटन लेखक मार्क शॅन्ड यांनी काझीरंगातील पहिल्या महिला माहूत पार्वती बारुआ यांच्यावर एक पुस्तक व माहितीपट (क्वीन ऑफ द एलिफंट्स) लिहिलेले आहेत. या पुस्तकाला 1996चा थॉमस कुक ट्रॅव्हल बुक पुरस्कार व प्रिक्स लिटरेअर डि’अमिस पुरस्कार मिळालेले आहेत.