चांगल्या मान्सूनचा लाभ घ्यायचा तर...

  • चांगल्या मान्सूनचा लाभ घ्यायचा तर...

    चांगल्या मान्सूनचा लाभ घ्यायचा तर...

    • 16 Jul 2021
    • Posted By : study circle
    • 23 Views
    • 0 Shares
     चांगल्या मान्सूनचा लाभ घ्यायचा तर...
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात हवामानशास्त्र-वातावरण’ या घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात  चांगल्या मान्सूनचा लाभ घ्यायचा तर...व त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (१) : भूगोल

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
    २.२ हवामानशास्त्र : वातावरण - संरचना, घटना व विस्तार, हवा व हवामानाची अंगे. तापमान - पृथ्वीपृष्ठावरील तापमानाचे ऊर्ध्व व क्षितिज समांतर वितरण. हवेचा दाब - वारे, ग्रहीय व स्थानिक वारे. महाराष्ट्रातील मोसमी वारे (मान्सून ) - पर्जन्यवृष्टीचे वितरण, अवर्षण, महापूर आणि त्याच्या समस्या

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    चांगल्या मान्सूनचा लाभ घ्यायचा तर...
     
    *   देशात सुमारे ६० टक्क्यांहून अधिक शेती ही पावसावर अवलंबून आहे. मान्सूनचा प्रभाव हा केवळ देशातील कोट्यवधी लोकांच्या रोजी-रोटी आणि दैनंदिन जीवनावर पडत नाही तर समाज, कला, संस्कृती आणि लोकजीवनावरही त्याचा प्रभाव राहतो. कृषी क्षेत्रावर आधारित कच्च्या मालाचे उद्योग आणि खाद्य पुरवठा करणारे उद्योग हे थेटपणे शेतीवर अवलंबून आहेत. साहजिकच, चांगल्या मान्सूनची वार्ता वा अंदाज हा खूप मोठा दिलासा असतो. कोरोनाच्या आव्हानांचा मुकाबला करताना गरिबांना मोफत धान्य देण्याची गरज भागवण्यास विक्रमी खाद्योत्पादन महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
     
    *   कोरोनाच्या दुसर्या धोकादायक लाटेने देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक आव्हाने उभी राहिली आहेत. अशा वेळी कृषी क्षेत्रासाठी मात्र दिलासादायक बातमी आहे. यंदा मान्सून चांगला राहणार असून याबाबतची भविष्यवाणी अनेक संस्थांनी केली आहे. अंदाजानुसार आणि अपेक्षेप्रमाणे पावसाने वेळेवर आगमन केले. सध्या महाराष्ट्रात पावसाने दडी दिली असली तरी येणार्या काळात मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज आहे. पाऊस चांगला राहिल्यास यंदाही विक्रमी धान्योत्पादन होईल, असा अंदाज आहे. आरबीआयने देखील चांगल्या मान्सूनच्या वार्तेने समाधान व्यक्त केले आहे. संसर्गाच्या संकटकाळात चांगला पाऊस हा देशातील महागाई रोखण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उपयुक्त आहेे, असे आरबीआय म्हणते.
     
    *   यंदा नैऋत्य मान्सूनची दीर्घावधी सरासरी (एलपीए) हा ९८ टक्के म्हणजेच सामान्य राहू शकतो. नैऋत्य मान्सूनच्या आधारे जून ते सप्टेंबर या काळात देशभरात पाऊस होतो. या काळात ९६ ते १०४ टक्के पाऊस पडला तर तो सामान्य म्हणून गृहित धरला जातो. आतापर्यंत मान्सूनचा अंदाज बांधण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता, ते ठराविक काळानंतर उपयुक्त ठरत नाही. अशा वेळी वेधशाळेने जून ते सप्टेंबर या काळासाठी मासिक आधारावर लाँग रेंज फॉरकास्ट (एलआरएफ) जाहीर केले आणि त्यानुसार देशातील शेतकरी आणि संपूर्ण कृषी क्षेत्र हे अधिक फायद्यात राहू शकते, असा तर्क बांधला गेला. 
     
    *   कृषी मंत्रालयाकडून जाहीर कृषी वर्ष २०२०-२१ साठी प्रमुख पिकांच्या तिसर्या आगाऊ अंदाजाचे आकलन केल्यास कोरोनाचे संकट असतानाही देशात विक्रमी धान्योत्पादन झाल्याचे लक्षात येते. यानुसार देशभरात ३०.५४ कोटी टन धान्योत्पादन गृहित धरले आहे. ९ जूनला केंद्र सरकारने खरीप पिकाची आधारभूत किंमत जाहीर केली. यंदा डाळी आणि तिळाच्या एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढ केल्याने खरीप पिकात वाढ होण्याचीही शक्यता आहे. कृषिमंत्र्यांच्या अंदाजानुसार सर्व प्रमुख पिकांच्या एमएसमीमध्ये उत्साहजनक वाढ, पीएम किसानमार्फत शेतकर्यांना केली जाणारी आर्थिक मदत आणि विविध कृषी विकास योजनांतून शेतकर्यांना दिले जाणारे प्रोत्साहन यामुळे उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचले आहे.
     
    *   कोव्हिडच्या पहिल्या लाटेत अर्थव्यवस्थेत मोठी घसरण झाली; परंतु कृषी क्षेत्र त्यास अपवाद राहिले. प्रामुख्याने अन्य क्षेत्रांच्या तुलनेत सर्वाधिक वाढ कृषीत नोंदली गेली. आर्थिक सर्वेक्षण २०२०-२१ नुसार कृषी क्षेत्राच्या विकास दरात सुमारे तीन टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. अशावेळी जीडीपीत कृषी क्षेत्राची भागीदारी ही १७.८ टक्क्यांहून १९.९ टक्क्यांवर पोहोचू शकते. २०२१ मध्ये कृषी उत्पादन आणि चांगला पाऊस हा देशातील आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात ‘अच्छे दिन’ आणू शकतो.  देशात सुमारे ६० टक्क्यांहून अधिक शेती ही पावसावर अवलंबून आहे. मान्सूनचा प्रभाव हा केवळ देशातील कोट्यवधी लोकांच्या रोजी-रोटी आणि दैनंदिन जीवनावर पडत नाही तर समाज, कला, संस्कृती आणि लोकजीवनावरही त्याचा प्रभाव राहतो. कृषी क्षेत्रावर आधारित कच्च्या मालाचे उद्योग आणि खाद्य पुरवठा करणारे उद्योग हे थेटपणे शेतीवर अवलंबून आहेत. कोरोनामुळे अन्य उद्योग अडचणीत आलेले असताना २०२१ च्या काळातील चांगला पाऊस हा महत्त्वाचा ठरत आहे.
     
    *   कोरोनाच्या दुसर्या लाटेत आव्हानांचा मुकाबला करत असताना गरीब वर्गातील नागरिकांना मोफत धान्य देण्याची गरज भागवण्यास विक्रमी खाद्योत्पादन महत्त्वाची भूमिका बजावू शकते. भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामात १ एप्रिल २०२१ रोजी सुमारे ७.७२ कोटी टन धान्यांचा सुरक्षित साठा आहे. हा साठा बफर गरजेच्या पेक्षा तीन पट अधिक आहे. अशावेळी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेनुसार ८० कोटी लाभार्थ्यांना नोव्हेंबर २०२१ पर्यंत खाद्यान्नाचा अतिरिक्त पुरवठा सहजपणे करू शकतो. खाद्यान्नाचे विक्रमी उत्पादन पाहता देशातील अन्नधान्यांचा आणि विविध गरजा पाहता पुरेशा प्रमाणात धान्याची निर्यातदेखील करता येऊ शकते. कोरोनामुळे आर्थिक आव्हाने असताना देशात कृषीच्या आघाडीवर विकासासाठी अनुकूल वातावरण आहे; परंतु कृषी क्षेत्रात आणखी लक्ष देण्याची गरज आहे. सरकारकडून कृषी उत्पादनाचे चांगले वितरण करण्यासाठी त्यात सुलभता आणायला हवी. त्यामुळे ग्रामीण भागातील मागणीत वाढ होऊ शकते. परिणामी ग्रामीण क्षेत्रातील उत्पादन आणि सेवा क्षेत्रामध्ये वाढ होऊ शकते. कृषी उत्पादन जसे फळ, भाजीपाला यासाठी लॉजिस्टिक सेवा सक्षम करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या कृषी मालास चांगला भाव मिळाला आणि त्याची उत्तमरीत्या साठवणूक झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळू शकते. २०२० पासून सुरू झालेली किसान रेल्वे ही कृषी आणि ग्रामीण विकासाला नवीन रूप देणारी आहे. किसान रेल्वेने शेतमालाला चांगली किंमत मिळू शकते. त्याचबरोबर गरजूंना चांगल्या किमतीत फळे आणि भाजीपाला मिळू शकतो. सरकारने एक लाख कोटी रुपयांची तरतूद कृषीच्या पायाभूत सुविधांसाठी केली आहे. त्याची तातडीने उपलब्धता करून देणे गरजेचे आहे. कृषी मालाची साठवणूक आणि वितरण व्यवस्थेत सुधारणा केल्यास पीक घेतल्यानंतर होणारे संभाव्य नुकसान टाळले जाऊ शकते. कोरोना लाटेत आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली आव्हाने यात कृषी क्षेत्रासाठी चालू आर्थिक वर्षात २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजना तातडीने लागू होतील, अशी अपेक्षा आहे. दुसर्या लाटेने आर्थिक आव्हानांचा मुकाबला करत असताना कृषी क्षेत्र हे आम आदमी आणि अर्थव्यवस्थेला आर्थिक आधार म्हणून समोर येत आहे.
     
    सौजन्य व आभार : दैनिक पुढारी
    ३ जुलै  २०२१ / विलास कदम

Share this story

Total Shares : 0 Total Views : 23