२१ जून : समर सॉलस्टाईस

  • २१ जून : समर सॉलस्टाईस

    २१ जून : समर सॉलस्टाईस

    • 22 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 31 Views
    • 0 Shares
    २१ जून : समर सॉलस्टाईस
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात भूगोलया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात २१ जून वर्षातला सर्वात मोठा दिवसव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (१) : भूगोल

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :

    २.२ हवामानशास्त्र :
        वातावरण - संरचना, घटना व विस्तार, हवा व हवामानाची अंगे.  

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    २१ जून वर्षातला सर्वात मोठा दिवस
     
    *   २१ जून २०२१ हा उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस, तर दक्षिण गोलार्धात या दिवशी सर्वात मोठी रात्र होती. उत्तर गोलार्धातल्या प्रत्येक देशासाठी हा कालावधी वेगवेगळा असतो. भारतात २१ जून २०२१ ला दिवस १३ तास १२ मिनिटांचा  होता. २१ जून या दिवसाला झिरो शॅडो दिवस म्हणूनही ओळखले जाते.
     
    *   २१ जूननंतर दक्षिणायनाला सुरुवात होते. सूर्य दक्षिण गोलार्धात सरकू लागतो. दिवसाचा अवधी कमी होत जातो आणि रात्र मोठी होत जाते. २१ सप्टेंबर येताच दिवस आणि रात्र समान कालावधीचे असतात. २१ सप्टेंबरनंतर रात्रीचा कालावधी वाढू लागतो. ही प्रक्रिया २३ डिसेंबरपर्यंत सुरू असते. या कालावधीत उत्तर गोलार्धात सूर्य कमी वेळ तळपत असतो. म्हणजेच सूर्याचे तापमान कमी असते. याच कालावधीला आपण हिवाळा म्हणूनही ओळखतो. या काळात दिवस लहान आणि रात्र मोठी असते.
     
    *   २० जून ते २२ जून दरम्यानच्या एका दिवशी दरवर्षी समर सॉलस्टाईस घडतं. म्हणजे २०, २१ वा २२ पैकी एक दिवस हा त्या वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो. याला इंग्लिशमध्ये Summer Solstice म्हटलं जातं. Solstice हा शब्द sMlstitium या लॅटिन शब्दावरून आला आहे. या लॅटिन शब्दातल्या sMl या शब्दाचा अर्थ होतो सूर्य. sistere या शब्दाचा अर्थ 'to stand still' म्हणजे स्तब्ध उभं राहणं.
     
    *   पृथ्वी सूर्याभोवती फिरत असतानाचा तिचा वेग आणि कक्षेतलं पृथ्वीचं सूर्यासमोरचं स्थान यामुळे रोजचा दिवस आणि रात्रीचा कालावधी वेगवेगळा असतो. २१ जूनच्या दिवशी पृथ्वी सूर्यासमोर कक्षेत अशा विशिष्ट ठिकाणी येते ज्यामुळे यादिवशी सर्वाधिक सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो. जगातल्या अनेक देशांमध्ये या दिवशी दिवस १२ तासांपेक्षाही मोठा असतो.
     
    *   पृथ्वीचा उत्तर धृव हा २१ जूनच्या दिवशी सूर्याच्या दिशेने सर्वाधिक कोनामध्ये कललेला असतो. यादिवशी सूर्य कर्कवृत्तात (Tropic of Cancer) थेट डोक्यावर येतो आणि यामुळेच पृथ्वीवर या दिवशी सर्वाधिक प्रकाश पडतो.
     
    *   नॉर्वे, फिनलंड, ग्रीनलंड, अलास्का आणि उत्तर ध्रुवाजवळ इतर प्रदेशांमध्ये या सुमारास ’मिडनाईट सन’ म्हणजे मध्यरात्रीही सूर्य पहायला मिळतो. तर आर्क्टिक प्रदेशातल्या भागांमध्ये सूर्यास्तच होत नाही.
     
    *   २१ जूनचं महत्त्वं काय ?
     
    १)  अनेक देशांमध्ये २१ जूनचा दिवस हा ऋतुबदलाचा दिवस मानला जातो.
    २)  मराठी पंचांगांमध्येही २१ जूनची नोंद ’वर्षा ऋतू प्रारंभ’ अशी केलेली असते.
    ३)  पश्‍चिमेतल्या देशांमध्ये २१ जूनच्या दिवशी 'Spring' म्हणजे वसंत ऋतू संपून 'Summer' म्हणजेच उन्हाळा सुरू होतो. हा उन्हाळा २१ वा २२ सप्टेंबरला Autumn Equinox ने संपतो. या दिवशी दिवस आणि रात्र समान तासांचे असतात. यानंतर पश्‍चिमेकडच्या देशांमध्ये Autumn म्हणजे पानगळीचा मोसम सुरू होतो.
    ४)  २२ डिसेंबर हा वर्षातला सर्वात लहान दिवस असतो.

Share this story

Total Shares : 0 Total Views : 31