उच्चतर शिक्षण सर्वेक्षण २०२०

  • उच्चतर शिक्षण सर्वेक्षण २०२०

    उच्चतर शिक्षण सर्वेक्षण २०२०

    • 19 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 46 Views
    • 0 Shares
     उच्चतर शिक्षण सर्वेक्षण २०२०
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात शिक्षणया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात उच्चतर शिक्षण सर्वेक्षण २०२०व त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न बाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (२) : भारतीय संविधान, राजकारण व कायदा

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    १०. शिक्षण पद्धती :
    *   उच्च शिक्षणातील समकालीन आव्हाने

    सामान्य अध्ययन पेपर (३) : मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
    १.२ शिक्षण :
    *   भारतातील शिक्षण प्रणाली (पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण), राष्ट्रीय उच्च शिक्षण व संशोधन आयोग

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    उच्चतर शिक्षण सर्वेक्षण २०२०
     
    *   जून २०२१ मध्ये अखिल भारतीय उच्चतर शिक्षण सर्वेक्षण २०१९-२० चा अहवाल सार्वत्रिक झाला. नोंद झालेल्या सर्व उच्चतर शिक्षण संस्थांची बहुतांश संख्यात्मक, अत्यल्प प्रमाणात गुणात्मक माहिती अशा पाहणीतून मिळते. ही पाहणी सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या उच्चतर शिक्षण खात्यामार्फत कार्यान्वित केली जाते. शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव व संबंधित खात्यातील अतिरिक्त महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली हा १० वा अहवाल तयार झाला असून या पाहणीत विद्यापीठे, महाविद्यालये व स्वतंत्र संस्था यांचा समावेश होतो.
     
    *   उच्चतर शिक्षणाचा अलीकडच्या काळात अधिक  वेगाने विस्तार झाला. महिलांचे समावेशन समाधानाचे व मागासवर्गाचे समावेशन प्रमाणबद्ध मिळते. संशोधनाशी संबंधित संस्था, विद्यार्थी संख्या अजून वाढली पाहिजे. येथून पुढच्या काळात  संस्थात्मक विस्तारापेक्षा गुणात्मक विस्ताराकडे आशय, व्यवस्था,  समन्याय व समावेशकता या निकषांवर लक्ष देण्याची गरज आहे.
     
        अखिल भारतीय उच्चतर शिक्षण सर्वेक्षण २०१९-२० अहवालातील  काही महत्त्वाची निरीक्षणे -
     
    १) स्वांतत्र्यानंतरच्या ७५ वर्षांनंतरही उच्चस्तर शिक्षणाचे स्थूल प्रवेश प्रमाण ३० टक्क्यांच्या आत आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब स्त्रियांचे स्थूल प्रवेश प्रमाण पुरुषांच्या तुलनेने काहीसे जास्त आहे.
     
    २) संख्यात्मक पातळीवर भारताची उच्चस्तर शिक्षण संस्था जगातील मोठ्यापैकी एक आहे.
     
    ३) उच्चस्तर शिक्षण व्यवस्थेचा ग्रामीण भागातील  प्रवेश समाधानकारक आहे.
     
    ४) देशात दूर व मुक्तशिक्षणाचे प्रमाण वाढते आहे. तामिळनाडूत (१३ विद्यापीठे) हे प्रमाण कमाल आहे.
     
    ५) देशपातळीवर कॉलेज घनता ३०, महाराष्ट्रात ३४, तर बिहारमध्ये ७ आहे. उच्चतर शिक्षणाचा विस्तार विषम आहे.
     
    ६) महाविद्यालयांमध्ये बहुशाखीय महाविद्यालये अधिक आहेत.
     
    ७)  उच्चतर शिक्षणात पुढच्या काळात  संस्थात्मक विस्तारापेक्षा गुणात्मक विस्ताराकडे आशय, व्यवस्था,  समन्याय व समावेशकता या निकषांवर लक्ष देण्याची गरज आहे.
     
        देशात उच्चतर शिक्षण संस्थांची संख्या  -
     
    १)  विद्यापीठे - १०४३,
    २)  महाविद्यालये - ४२,३४३,
    ३)  स्वतंत्र संस्था - ११,७७९.
     
        १०४३ विद्यापीठांचे वर्गीकरण-
    १)  सर्वसाधारण (समावेशक) ५२२
    २)  तांत्रिक १७७
    ३)  शेती ६३
    ४)  वैद्यकीय ६६
    ५)  विधी २३
    ६)  संस्कृत १२
    ७)  भाषा ११
    ८)  इतर १४५
     
        १०४३ विद्यापीठांची स्थिती -
    १)  १०४३ विद्यापीठांपैकी फक्त ३०७ विद्यापीठांना संलग्न महाविद्यालये आहेत.
    २)  ३९६ विद्यापीठे (३८ टक्के) खासगी व्यवस्थापनाची आहेत.
    ३)  ४२० विद्यापीठे (४० टक्के) ग्रामीण भागात आहेत.
    ४)  बहुतेक राज्यात किमान एक तरी महिला विद्यापीठ आहे. राजस्थान (३), कर्नाटक (४),   तामिळनाडू (२) महिला विद्यापीठे व एक राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, १४ राज्य मुक्त विद्यापीठे व एक खासगी मुक्त विद्यापीठ आहे.
    ५)  ११० विद्यापीठांत दूर शिक्षण पद्धतीनेही शिक्षण दिले जाते. यापैकी १८ टक्के विद्यापीठे, ९४ टक्के महाविद्यालये व ८६ टक्के संस्थांनी माहिती दिली.
     
        महाविद्यालयांची संख्या -
     
    *   कॉलेज घनता : उच्चतर शिक्षणास पात्र (१८ ते २३) असणार्‍या एक लाख लोकांमागे महाविद्यालयांची संख्या म्हणजे कॉलेज घनता.
     
    १)  कॉलेज घनता - बिहारमध्ये ७ , कर्नाटकात ५९. राष्ट्रीय प्रमाण ३०. महाराष्ट्रात हे प्रमाण ३४.
    २)  ६०.५६ टक्के महाविद्यालये ग्रामीण भागात आहेत.
    ३)  फक्त महिलांसाठी महाविद्यालये १०.७५ टक्के आहेत.
    ४)  एकूण महाविद्यालयांपैकी ३५.०४ टक्के पदव्युत्तर अभ्यास चालवतात
    ५)  पीएच.डी. अभ्यास चालविणार्‍या महाविद्यालयांचे प्रमाण फक्त २.७ टक्के आहे.
    ६)  ३२.६ टक्के महाविद्यालये एकच अभ्यासक्रम चालवतात. त्यात शिक्षणशास्त्र महाविद्यालये अधिक आहेत.
    ७)  ४ टक्के महाविद्यालयांत ३००० पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत.
     
        एकूण विद्यार्थी -
    १)  उच्चतर शिक्षणातील पुरुष विद्यार्थी १९.६ दशलक्ष व स्त्री विद्यार्थी १८.९ दशलक्ष अशी एकूण संख्या ३८.५ दशलक्ष.
    २)  स्थूलप्रवेश प्रमाण - (१८-२९ वर्षे) भारतासाठी २७.१ टक्के, पुरुषासांठी २६.९ टक्के तर स्त्रियांसाठी २७.३ टक्के. एससी प्रवर्ग २३.४ टक्के, तर एसटी प्रवर्गात १८ टक्के असे कमी प्रमाण आहे.
    ३)  दूर शिक्षणातील विद्यार्थ्यांचे प्रमाण ११.६ टक्के आहे.
    ४)  ७९.५ टक्के विद्यार्थी पदवीपूर्व वर्गात, तर फक्त ०.५ टक्के विद्यार्थी संशोधन पातळीला आहेत.
    ५)  बीए अभ्यासक्रम विद्यार्थी संख्या सर्वाधिक आहे. पदवीपूर्व पातळीच्या एकूण विद्यार्थ्यांत ३२.७ टक्के कला शाखा, २६ टक्के विज्ञान शाखा, १४.९ टक्के अभियांत्रिकी शाखेत आहेत. अभियांत्रिकी शाखेत पीएच.डी. प्रवेश सर्वाधिक आहेत.
    ६)  परकीय विद्यार्थी संख्या ४९,३४८ आहे व ते १६८ देशांतून येतात. त्यात १० प्रमुख देशांतून ६३.९ टक्के विद्यार्थी येतात.
    ७)  सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांत मुलींचे प्रमाण किमान आहे.
    ८)  उच्चतर शिक्षणात एकूण शिक्षक संख्या १५,०३,१५६ आहे. त्यापैकी ५७.५ टक्के पुरुष शिक्षक आहेत
     
    सौजन्य व आभार :  दैनिक पुढारी
    १७  जून २०२१ / प्रा. डॉ. जे. एफ. पाटील

Share this story

Total Shares : 0 Total Views : 46