धरणातील पाणीसाठा व बाष्पीभवन

  • धरणातील पाणीसाठा व बाष्पीभवन

    धरणातील पाणीसाठा व बाष्पीभवन

    • 08 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 41 Views
    • 0 Shares
     धरणातील पाणीसाठा व बाष्पीभवन
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात सिंचन व जलव्यवस्थापनया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात धरणातील पाणीसाठा व बाष्पीभवनआणि त्यावर विचारले जाऊ शकणारे प्रश्‍न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (१) : कृषी भूगोल

    राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    ३.३ जलव्यवस्थापन :
        * जल विज्ञान चक्र

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    धरणातील पाणीसाठा व बाष्पीभवन
     
    *   प्रदूषण आणि पर्यावरणाचा र्हास यामुळे जागतिक तापमानात प्रचंड वाढ झाल्याने ग्लोबल वॉर्मिंगचा धोका अधिकाधिकच वाढला आहे. चारही बाजूंनी नैसर्गिक साधनसंपत्ती असताना कोयना धरणालाही ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसला आहे. १०५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणातून सन २०१२ ते २०२१ या दहा वर्षात तब्बल ७४.७४ टीएमसी पाणी हे बाष्पीभवनाद्वारे ढगात गेले आहे. यावर्षी ७.८४ टीएमसी पाणी याच पद्धतीने गेले.
     
    *   १०५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात दरवर्षी सरासरी सात ते आठ टीएमसी  पाणी बाष्पीभवनाद्वारे ढगात जाते. मागील दहा वर्षांत याद्वारे ७४.७४ टीएमसी वाया गेले. परंतु त्याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. जंगले, वनसंपदेमुळे धरणांतर्गत विभागात जमिनीची धूप कमी प्रमाणात होते. बाष्पीभवन व वर्षानुवर्षे साचलेल्या गाळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.
     
    *   कोयना ते तापोळा साडेसदुसष्ठ किलोमीटर अंतरावर हा जलाशय विस्तारलेला आहे. तब्बल १८० चौरस किलोमीटर अंतरावरील या परिसरात तापमान, वारा, सुर्यप्रकाश, हवेतील अद्रता याचा  परिणाम बाष्पीभवनावर होत असतो. इतर धरणांच्या तुलनेत कोयना धरणातील बाष्पीभवनाद्वारे जाणार्या पाण्याचे प्रमाण अधिक असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली गेली आहे.
     
    *   बाष्पीभवनाद्वारे दहा वर्षांत गेलेले पाणी (टीएमसी)
        सन २०२१    -    ७.८४
        सन  २०२०   -    ७.८८
        सन  २०१९   -    ७.६५
        सन  २०१८   -    ७.९२
        सन  २०१७   -    ६.९९
        सन  २०१६   -    ६.२०
        सन   २०१५  -    ७.५४
        सन   २०१४  -    ७.३७
        सन   २०१३  -    ७.६०
        सन  २०१२   -    ७.४५
        एकूण        -    ७४.७४
     
    *   धरण साठवण क्षमता दरवर्षीची महाकाय पाणी आवक, साडेसदुसष्ठ किलोमीटर परिसरातून धरणात येणारी माती त्यामुळे धरणाच्या गाळात दरवर्षी काहीना काही प्रमाणात गाळात वाढ होत असते. वर्षानुवर्षे केवळ पाच टीएमसी मृतसाठा एवढ्या ढोबळ कागदोपत्री आकडेवारीवर शासन, प्रशासन धन्यता मानते. याबाबत किमान पाच वर्षांनी याचा आढावा, अभ्यास महत्वाचा आहे. पण सन २००२ मध्ये मेरी इन्स्टीट्यूट नाशिक या संस्थेने किरणांद्वारे येथील गाळाची तपासणी केली. त्याला आता तब्बल एकोणीस वर्षांचा कालावधी उलटून गेला. दरम्यानच्या काळात निसर्गात अमुलाग्र बदलही झाले. परंतु येथे आजतागायत कोणत्याही तपासणी झाल्या नाहीत. वास्तविक त्याचवेळी मेरीने दिलेल्या अहवालात गाळ असल्याचे सांगितले होते. मात्र त्याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही.
     
    सौजन्य व आभार : दैनिक पुढारी
    ४ जून २०२१ / गणेशचंद्र पिसाळ

Share this story

Total Shares : 0 Total Views : 41