मान्सून पाऊस व मान्सूनपूर्व पाऊस

  • मान्सून पाऊस व मान्सूनपूर्व पाऊस

    मान्सून पाऊस व मान्सूनपूर्व पाऊस

    • 05 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 16 Views
    • 0 Shares
     मान्सून पाऊस व मान्सूनपूर्व पाऊस
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात पर्जन्यमानया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात ’मान्सून व मान्सूनपूर्व पाऊस ’ व त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (१) : भूगोल

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
    २.२ हवामानशास्त्र :
        महाराष्ट्रातील मोसमी वारे (मान्सून) - पर्जन्यवृष्टीचे वितरण, अवर्षण, महापूर आणि त्याच्या समस्या

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    मान्सून पाऊस व मान्सूनपूर्व पाऊस यातील फरक
     
    *   ३ जून २०२१ रोजी केरळमध्ये मोसमी वारे दाखल झाले. हवामान विभागाने यंदा सरासरीच्या १०१ टक्के  पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जून महिना जवळ आला की सगळीकडे मान्सून कधी येणार अशी चर्चा सुरु होते. पण मान्सून आणि मान्सूनपूर्व पाऊस या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. मान्सून आणि मान्सूनपूर्व पाऊस यातील फरक काही सामान्य निरीक्षणांवरुन ओळखता येतो.
     
    *   मे महिन्यात किंवा जूनच्या सुरुवातील आलेला पाऊस म्हणजे मान्सूनपूर्व आणि विशिष्ट तारखेला येणारा पाऊस म्हणजेच मान्सून असे हवामान खाते आणि हवामान तज्ज्ञांकडून सांगितले जाते.
     
    *     मान्सून पाऊस व  मान्सूनपूर्व पाऊस यातील फरक -
    १)  मान्सूनपूर्व पावसादरम्यान दिवसभर खूप उकडते, हा उकाडा असह्य होतो आणि मग पाऊस कोसळतो. मान्सूनमध्ये ढग जमा होतात. ऊन आणि सावली यांचा खेळ सुरु होतो, काहीवेळा संथ वाराही वाहतो आणि मग हा पाऊस पडतो.
    २)  मान्सूनपूर्व पावसात उष्णतेमुळे ढग निर्माण होतात. वारा खालून वर जातो आणि बाष्प साठून पाऊस येतो. मान्सूनमध्ये ढग जमिनीला समांतर दिशेने पुढे पुढे सरकतात आणि पाऊस पडण्यास सुरुवात होते.
    ३)  मान्सूनपूर्व पावसाचे ढग दाट असतात तसेच त्याची जाडी आणि उंचीही खूप असते. मान्सूनचे ढग तितके उंच नसतात. त्याची जाडीही कमी असून ते पसरलेले असतात.
    ४)  मान्सूनपूर्व पाऊस स्थानिक आणि कमी पट्ट्यात पडतो तर मान्सून तुलनेने जास्त टप्प्यात विस्तृत दिसतो.
    ५)  मान्सूनपूर्व पाऊस गडगडाटी, धडाकेबाज आणि रौद्र असतो. मान्सून संततधार, संथ आणि शांतपणे येतो.
     
    *   शास्त्रीय दृष्ट्या मान्सूनपूर्व आणि मान्सून ओळखण्याच्या काही पद्धती -
    १)  मान्सूनमध्ये वार्‍याची दिशा, गती यांचा अभ्यास केलेला असतो. त्यानुसार या पावसाचा अंदाज बांधता येतो. मान्सून नैऋत्य दिशेने येतो. मान्सूनपूर्व पावसासाठी असे विशेष कोणते अंदाज नसतात.
    २)  आकाश ढगांनी किती आच्छादलेले आहे यावरुन मान्सून ओळखता येऊ शकतो. मान्सूनपूर्वमध्ये असा निकष लावता येत नाही.
    ३)  मान्सून केरळमध्ये आला हे ओळखण्यासाठी त्या विशिष्ट ठिकाणी काही जागा निश्रि्चत केली जाते. त्या ठिकाणी विशिष्ट प्रमाणात पाऊस पडल्यास तो मान्सून आहे असा निष्कर्ष बांधता येतो.
    ४)  याशिवाय ढगांचा पट्टा कुठपर्यंत सरकला आहे यानुसार मान्सून ओळखता येतो. हे मोजण्याच्या काही शास्त्रीय पद्धती आहेत. त्यांचा अभ्यास करुन मान्सूनची ओळख पटते.

Share this story

Total Shares : 0 Total Views : 16