कैलास पर्वत व गिर्यारोहण
- 18 Mar 2021
- Posted By : study circle
- 926 Views
- 0 Shares
कैलास पर्वत व गिर्यारोहण
कैलास पर्वताची ही उंची जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या एव्हरेस्ट ( 8,848.86 मीटर) पेक्षा 2200 मीटरनी कमी असूनही कैलास पर्वतावर कुणीही गिर्यारोहण करू शकलेले नाही. या पर्वतावर गिर्यारोहण करण्याचा प्रयत्न करण्यासही चीनने रितसर बंदी घातलेली आहे.
ठळक वैशिष्ट्ये -
• कैलास पर्वताची उंची 6638 मीटर इतकी आहे.
• कैलास पर्वताचा आकार एखाद्या शिवलिंगासारखा असून त्याच्या चहुबाजूंनी हिमनद्यांमुळे निर्माण झालेली घळ पिंडीसारखी आहे.
• कैलास पर्वाताचा स्लोप हा 65 डिग्रीपेक्षा जास्त आहे, तर माऊंट एव्हरेस्टचा स्लोप 40 ते 60 डिग्रीपर्यंत आहे. म्हणूनच अनेक गिर्यारोहक माऊंट एव्हरेस्ट चढू शकतात मात्र माऊंट कैलास चढणे त्यांच्यासाठी कठीण काम आहे.
• कैलाश पर्वतावर चढू न शकण्याचं महत्त्वाचं एक कारण आहे ते तिथलं खराब हवामान. या पर्वतावर राहणे अशक्य होते.
• सिंधू, ब्रम्हपुत्रा आणि सतलज अशा महत्त्वाच्या नद्या या पर्वताच्या परिसरात उगम पावतात.
ठळक नोंदी -
• अकराव्या शतकात जन्मलेले तिबेटी धर्मगुरू मिलारेपा यांनीच केवळ कैलास पर्वतावर आरोहण केले होते असे म्हटले जाते. कैलास पर्वतावर जाऊन जिवंत परतणारे ते एकमेव व्यक्ती असल्याचं म्हणतात.
• हा पर्वत भगवान शिवशंकराचे निवासस्थान आहे असे प्राचीन काळापासूनच भारतीयांना वाटते. वेगवेगळ्या कारणांसाठी हिंदू, जैन आणि बौद्ध लोकांना हा पर्वत परम पवित्र वाटतो. पवित्र स्थळ असल्याकारणाने या पर्वतावर आजवर एकही चढाई झालेली नाही.
• कैलास पर्वतावर गिर्यारोहणाचा प्रयत्न केलेल्या एका गिर्यारोहकाने आपल्या पुस्तकात म्हटले आहे की या पर्वतावर राहणे केवळ अशक्य होते. तिथे कोणत्या तरी अज्ञात कारणामुळे दिशाभ्रम होतो आणि दिशेचे ज्ञान होत नाही. चुंबकीय कंपासही तिथे कुचकामी ठरतो. केस आणि नखांची वाढ झपाट्याने होऊ लागते. ही जागा अतिशय रेडिओअॅक्टिव्ह (किरणोत्सारी) आहे असे जाणवते.
• अर्नेस्ट मुल्दाशिफ या रशियन डॉक्टरने कैलासबाबत अत्यंत आश्चर्यकारक दावे केले होते. त्याच्या म्हणण्यानुसार हा पर्वत नैसर्गिक नसून तो प्राचीन काळात तयार करण्यात आलेला मानवनिर्मित विशाल पिरॅमिड आहे. हा पिरॅमिड अनेक छोट्या-मोठ्या पिरॅमिडस्नी घेरलेला असून तो पारलौकिक क्रियांचे एक केंद्र आहे. अर्थातच डॉक्टरचा हा दावा अनेकांनी फेटाळून लावला आहे.
• 1926 मध्ये ह्यु रटलेज व कर्नल विल्सन यांनी या पर्वतावर आरोहण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना अचानक उद्भवलेल्या हिमवृष्टीसारख्या अडथळ्यांमुळे हा प्रयत्न सोडून द्यावा लागला.
• 1936 मध्ये हर्बर्ट टिची हा गिर्यारोहक कैलास पर्वताच्या परिसरात होता. त्यावेळी त्याने स्थानिक लोकांना तेथील गिर्यारोहणाबाबत विचारले असता केवळ पूर्णपणे पापमुक्त असलेली व्यक्तीच या पर्वतावर आरोहण करू शकते असे सांगितले.
• पौराणिक कथांमध्ये कैलास पर्वताला भगवान शिवाचे निवासस्थान मानले गेले आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, मत्स्यपुराण आदींमध्ये कैलास खंड नावाचा स्वतंत्र अध्याय आहे.
• काही लोक या पर्वताला पृथ्वीचा केंद्रबिंदू म्हणजेच अॅक्सिस मुंडी मानतात. आकाशीय ध्रुव आणि भौगोलिक ध्रुव यांचा हा केंद्र असल्याचे म्हटले जाते. याठिकाणी दहाही दिशांचे मिलन होते असेही म्हटले जाते.