भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राज
- 13 Mar 2021
- Posted By : Study Circle
- 182 Views
- 0 Shares
भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राज
12 मार्च 2021 - भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये महिला एकदिवसीय मालिकेतील लखनौ येथील सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली राज ही पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली. हा टप्पा पार करणारी मिताली ही जगभरात केवळ दुसरी क्रिकेटपटू आहे. याआधी इंग्लंडच्या शेरलोट एडवर्ड्सनं 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. 10,273 धावांनंतर एडवर्ड्स निवृत्त झाली. गेली 22 वर्षांहून अधिक काळ मिताली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.
ठळक नोंदी -
• 10 हजार धावा पूर्ण करण्यासाठी मितालीनं आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये आत्तापर्यंत 310 सामने खेळले आहेत. त्यापैकी 10 कसोटी सामने, 211 एकदिवसीय सामने तर 82 टी 20 सामन्यांचा समावेश आहे. 1999 मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्याद्वारे मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
मिताली राज हिच्या नावे अनेक विक्रमांची नोंद आहे -
• आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करणारी जगातील दुसरी तर भारताची पहिलीच क्रिकेटपटू
• क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधार राहिलेली महिला क्रिकेटपटू
• 200 हून अधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम
• एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 6,938 धावांचा विक्रम
• सर्वाधिक सलग 111 एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळण्याचा विक्रम
• पहिली महिला टी-20 कर्णधार. भारताचा महिला क्रिकेट संघ 2006 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळण्यासाठी उतरला होता. त्यावेळी भारताची कर्णधार.
• भारताकडून महिला टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा रेकॉर्ड. महिला टी-20 मध्ये दोन हजार धावा बनवणारी एकमेव भारतीय खेळाडू
भरतनाट्यम सोडून क्रिकेटची बॅट हाती घेणारी मिताली -
1) 3 डिसेंबर 1982 रोजी जन्मलेली मिताली
2) 10 वर्षांची असताना भरतनाट्यम किंवा क्रिकेट यापैकी एकाची निवड करायची वेळ आली त्यावेळी तिने क्रिकेटची निवड केली.
3) 16 व्या वर्षी मितालीने 26 जून 1999 साली आयरलँडविरोधातल्या सामन्यात वन-डेमध्ये डेब्यू केलं होतं. त्या सामन्यातल्या आपल्या पहिल्याच डावात तिने नाबाद 144 धावा केल्या होत्या.
4) 2002 साली तिची कसोटी संघात निवड झाली.
5) 2005 च्या वर्ल्ड कपमध्ये तिने पहिल्यांदा भारतीय संघाचं नेतृत्त्व केलं होतं. त्यावेळी भारत उपविजेता ठरला होता. मितालीने आजवर 5 वर्ल्ड कप खेळलेत.
6) 19 व्या वर्षी इंग्लंडविरोधातल्या सीरिजमध्ये मितालीने दमदार 214 धावा केल्या. कसोटी सामन्यातला हा तिचा वैयक्तिक सर्वोत्तम स्कोर आहे.
7) ऑस्ट्रेलियाविरोधाच्या सामन्यापूर्वी मितालीने 182 वन-डे सामन्यांमध्ये 51.37 च्या रेटने बॅटिंग केली होती.
8) ती अधून-मधून बॉलिंगही करते. तिने आतापर्यंत 8 विकेट्स घेतल्या आहेत.