कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर)

  • कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर)

    कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर)

    • 13 Mar 2021
    • Posted By : s
    • 50 Views
    • 0 Shares

     कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर)

              उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. हिरेन मृत्यूप्रकरणी एटीएसने हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मनसुख हिरेन यांच्या पत्नीने या हत्येमागे पोलीस सचिन वाझे असल्याचा संशय व्यक्त केला. विरोधी पक्षाने वाझेंच्या अटकेची मागणी केली, तर सरकारने वाझेंची क्राइम ब्रांचमधून बदली केली. हिरेन प्रकरणात सचिन वाझेंचं सीडीआर प्रकरण विधीमंडळात गाजलं. सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्या दोन वेळा संभाषण झालं, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात केला. त्याचा सीडीआर आपल्याकडे असल्याचे फडणवीस म्हणाले होते. सचिन वाझे यांच्या सीडीआरच्या मुद्यावर विरोधीपक्ष आणि सत्ताधारी यांच्यात जुंपली होती. सचिन वाझेंच्या अटकेची मागणी विरोधकांनी करताच, सत्ताधारी शिवसेनेने अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर विधीमंडळात गोंधळ सुरू झाला. सगळ्या गदारोळानंतर वाझे यांची क्राईम ब्राँचमधून अन्यत्र बदली करण्यात 

    कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) म्हणजे काय?
          ’कॉल डिटेल रेकॉर्ड’ ला सीडीआर म्हणतात. प्रत्येक मोबाईल फोन नंबरचा रेकॉर्ड असतो. मोबाईल सर्व्हिस कंपनीकडे या नंबरचा पूर्ण डेटा असतो. पुढील सर्व गोष्टींचा रेकॉर्ड सीडीआरमधून मिळतो -
    1) ग्राहकाने कोणाला फोन केला.
    2) इनकमिंग कॉल कोणते
    3) आउटगोइंग कॉल कोणते
    4) एसएमएसवर कोणाशी संपर्क करण्यात आला
    5) कुठल्या कंपनीचा मोबाईल वापरला
    6) ग्राहकाचं लोकेशन काय आहे

    सीडीआर कोणाला मिळू शकतो?
    1) टेलिकम्युनिकेशन विभागाच्या नियमांनुसार तपासयंत्रणा आणि कोर्टाने CDR मागवल्यास सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीला CDR द्यावाच लागतो.
    2) 12 महिन्यांपर्यंतचा CDR मोबाईल कंपनीकडे मिळू शकतो.
    3) पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त दर्जाचे वरिष्ठ अधिकारी सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडून टेलिफोनचा CDR मागवू शकतात.
    4) सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीमध्ये एक नोडल अधिकारी असतो. हा तपासयंत्रणांशी संपर्कात असतो.
    5) गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तपासयंत्रणांना CDR ची मदत होते.

    कोणीही सीडीआर मागू शकतो?
    1) कॉल डेटा रेकॉर्ड हा प्रत्येकाचा खासगी असतो. त्यामुळे कोणीही व्यक्ती सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांकडून CDR  मागू शकत नाही.
    2) सामान्य व्यक्तीला CDR मागवता येत नाही. पोलीस आणि तपासयंत्रणांनाच CDR मिळतो. गुन्ह्याचा तपास किंवा इंटलिजन्स गोळा करण्यासाठी CDR मागवता येतो. कोणत्या कारणासाठी CDR ची गरज आहे याबाबत माहिती द्यावी लागते.
    3) कोणाचाही डेटा त्याच्या संमतीशिवाय मिळवणं म्हणजे डेटा चोरी आहे. त्याच्या गोपनीयतेचं उल्लंघन आहे. डेटा अनधिकृतरित्या मिळवणं हा गुन्हा आहे.
    4) डेटा अनधिकृतरित्या मिळवण्यात आला असेल. तर डेटा देणार्‍या व्यक्तीला अटक होऊ शकते 

    सीडीआर  पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो?
    1) भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 65 ब नुसार सर्टिफिकेट असल्याशिवाय कोर्टात CDR ग्राह्य ठरत नाही.
    2) अनधिकृतरित्या काढलेला CDR कोर्टात सादर करता येत नाही.

    अवैध सीडीआर रॅकेटवर कारवाई -
    1) ठाणे पोलिसांच्या क्राइमब्रांचने 2018 मध्ये अवैधरित्या CDR देणार्‍या रॅकेटवर कारवाई केली होती. ठाणे पोलिसांनी जानेवारी 2018 मध्ये चार खासगी डिकेक्टिव्हना कतिथ रित्या CDR विकल्याप्रकरणी अटक केली. हे आरोपी 25 ते 50 हजार रूपये घेऊन CDR विकत होते.
    2) ठाणे पोलिसांनी या प्रकरणी पहिला महिला डिटेक्टिव्ह रजनी पंडीत यांना 2018 साली अटक केली होती. मार्च 2018 मध्ये कोर्टाने पंडीत यांना जामीन मंजूर केला.
    3) फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबई क्राइमब्रांचने CDR रॅकेट उघडकीस आणलं होतं. या प्रकरणात 11 जणांना पोलिसांनी अटक केली होती.
    4) अवैध सीडीआर प्रकरणी अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकीचा वकील रिझवान सिद्धीकीला ठाणे पोलिसांनी अटक केली होती. अवैध सीडीआर प्रकरणी पोलिसांच्या संशयाची सूई जॅकी श्रॉफची पत्नी आएशा आणि कंगना रनौतकडे होती.

Share this story

Total Shares : 0 Total Views : 50