थ्री फिंगर सॅल्यूट आंदोलन

  •  थ्री फिंगर सॅल्यूट आंदोलन

    थ्री फिंगर सॅल्यूट आंदोलन

    • 22 Feb 2021
    • Posted By : study circle
    • 39 Views
    • 0 Shares

     थ्री फिंगर सॅल्यूट आंदोलन

              म्यानमारमध्ये लष्कराने बंड करत लोकप्रिय नेत्या आंग सान सूू ची यांच्या  नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पक्षाचं सरकार बरखास्त केलं. आंग सान सूू यांना ताब्यात घेतले. या सत्तांतरणाला स्थानिकांनी विरोध करुन देशभरामध्ये हजारोच्या संख्येने लोकं रस्त्यावर उतरले.

    ••     ‘लाँग लिव्ह मदर सू’ आणि ‘लष्करी हुकूमशाहीचा निषेध असो’ अशा घोषणा देत हजारो नागरिक लष्करी हुकूमशाह कमांडर-इन चीफ जन. मिन आँग हलेइंग विरोधात घोषणा रस्त्यावर उतरले. लोकशाही व्यवस्थेच्या समर्थनार्थ अनेकजण या आंदोलनामध्ये सहभागी झाले.

    3 बोटांचा सलाम विरोधाचं प्रतिक  -
    •••     या सत्तांतरणाला विरोध करताना अनेक लोकशाहीवादी आंदोलनकर्त्यांनी 3 बोटांनी आकाशाकडे सलाम करत आपला विरोध नोंदवला. हा तीन बोटांनी करता येणारा सलाम खास आहे. 
    •••      म्यानमारमधील आंदोलकांकडून वापरण्यात येणारा तीन बोटांचा सलाम हा विरोधाचं प्रतिक आहे. 
    ••     ऑक्टोबर 2020 महिन्यामध्ये थायलंडमधील राजाविरोधात लोकशाहीचं समर्थन करणार्‍या आंदोलकांनी जी निदर्शने केली होती त्यावेळेसही विरोध करण्यासाठी हा तीन बोटांचा सलाम वापरण्यात आला होता. 
    • ••     म्यानमारमध्ये सर्वात आधी सत्तांतरणाला विरोध करण्यासाठी हा तीन बोटांचा सलाम येथील आरोग्य सेवेत काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी वापरला. त्यानंतर तरुणांनी लोकशाही मार्गाने निवडून दिलेलं सरकार पाडल्याच्याविरोधात आंदोलन करताना हा तीन बोटांचा सलाम वापरला. सत्तांतरणानंतर पुढच्या रविवारी यांगूनच्या निरनिराळ्या भागांत निदर्शने सुरू करण्यात आली. 

    3 बोटांच्या सलामाची सुरुवात -
    • ••     हा सलाम हुकूमशाही व्यवस्थेला विरोध करण्याचं प्रतिक म्हणून वापरला जातो. 
    • ••     2014 साली हाँगकाँगमधील बहुचर्चित अंब्रेला रिव्हल्यूशनच्या (लोकशाहीवादी आंदोलनामध्ये) काळातही हा तीन बोटांचा सलाम आंदोलनकर्त्यांनी वापरला.
    • ••     तीन बोटांनी सलाम करण्याची पद्धत सुझॅन कॉलिन्सचे चित्रपट आणि हंगर गेम्स पुस्तकामधून झाली. हा सलाम करताना अंगठ्याने हाताची सर्वात छोटं बोटं म्हणजेच करंगळी दाबून तीन बोटांनी सलाम केला जातो. हा सलाम पुस्तक आणि चित्रपटाच्या कथेनुसार काल्पनिक जगातील हुकुमशाह असणार्‍या प्रेसिडंट स्नो च्या शासनाविरोधात आवाज उठवणार्‍यांना केला जातो. हा सलाम म्हणजे हुकूमशाहीविरोधातील एकतेचे प्रतिक असल्याचं कथेत दाखवण्यात आलं आहे.
    •••      2014 साली पहिल्यांदा थायलंडमध्ये आंदोलन झालं तेव्हा हा सलाम वापरण्यात आला होता. त्यावेळेस थायलंडमधील तरुणांनी लष्कराने सत्ता ताब्यात घेण्याच्या निर्णयाविरोधात आवाज उठवताना हा सलाम वापरला होता. जवळजवळ प्रत्येक रॅलीमध्ये हा सलाम दिसून लागला. या सलाम इतका लोकप्रिय झाला की थायलंडमधील लष्कराने यावर बंदी घातली. मात्र त्यानंतरही अनेकदा आंदोलकांनी हा सलाम वापरला. 
    • ••     आंग सान सूू यांना बळजबरीने ताब्यात घेण्याच्या निर्यणावरोधात झेंडे, बॅनर आणि पोस्टर घेऊन रस्त्यावर उतरलोएल्या आंदोलनकर्त्यांनी 3 बोटांचा सलाम करत आम्ही एक आहोत आणि आमचा या हुकूमशाहीला विरोध आहे हे दर्शवण्यासाठी हा सलाम वापरण्यास सरुवात केली.
    • ••     2010 मध्ये म्यानमारमध्ये लोकशाही सरकार यावे यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. या कालावधीमध्ये देशातील लोकांना जगभरातील लोकांशी जोडण्याच्या उद्देशाने इंटरनेटची सेवा सुरु झाली. इंटरनेटमुळे म्यानमारमधील तरुणांना जगभरातील संस्कृती आणि वेगवेगळ्या गोष्टींबद्दल माहिती मिळू लागली. म्यानमारमधील लोकांनी पेपे आणि फ्रॉगसारख्या गोष्टींचाही वापर विरोध दर्शवण्यासाठी केला. 2016 साली याचा वापर अमेरिकेतील आंदोलनातही करण्यात आला होता.
     
     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 39