सोशल मिडिया व खासगीपणा

  •  सोशल मिडिया व खासगीपणा

    सोशल मिडिया व खासगीपणा

    • 22 Jan 2021
    • Posted By : Study Circle
    • 42 Views
    • 0 Shares

    सोशल मिडिया व खासगीपणा

            भारतासारख्या ज्या देशांत लोक नव्याने इंटरनेट वापरू लागले आहेत, तेथे व्हॉटसअ‍ॅप खूप लोकप्रिय आहे. तिथली संपूर्ण बाजारपेठ बदलण्याचे सामर्थ्य व्हॉटसअ‍ॅपमध्ये आहे. फेसबुकच्या या सेवांच्या एकत्रीकरणाच्या योजनेमुळे खासगीपणावर मोठे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आपले खासगी माहिती शेअर करण्याबाबतचे धोरण बदलल्यामुळे, समाजमाध्यमांमध्ये गदारोळ उडालेला आहे. स्वत:च्या खासगीपणाला अलविदा करावा की व्हॉट्सअ‍ॅपला, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या अटींच्या वादंगाच्या निमित्ताने सायबरस साक्षर होण्याची संधी आणि गरज दोन्ही निर्माण झालेल्या आहेत.

    • व्हॉट्सअ‍ॅपची मालकी असलेल्या कंपनीने, म्हणजेच फेसबुकने या अ‍ॅपच्या वापरकर्त्यांना नव्या अटी मान्य करण्यासाठी 8 फेब्रुवारी ही अंतिम मुदत दिली होती, ती नंतर वाढविण्यात आली. निशु:ल्क सेवा देणारी प्रत्येक कंपनी ग्राहकांचा डेटा मिळवण्यासाठी सेवा पुरवत असते. ’इफ एनिथिंग इज फ्री, देन यू आर द प्रॉडक्ट’ हाच समाजमाध्यमांतल्या जगाचा मूलमंत्र असल्याने आवश्यक तितकीच माहिती शेअर केली, तर सायबर धोका   नियंत्रित करता येतो.
     
    • सन 2000 च्या दशकात ’ब्लॅकबेरी मेसेंजर’ ही सशुल्क सेवा अत्यंत लोकप्रिय होती. तिला पर्याय म्हणून व्हॉट्सअ‍ॅप ही अत्यंत वेगाने आणि खात्रीशीरपणे चालणारी सेवा निर्माण झाली. त्यातच ती पूर्णत: नि:शुल्क आणि विनाजाहिरात असल्यामुळे, मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली. 

    • 2012 मध्ये तरुणाईत लोकप्रिय असलेले ’इन्स्टाग्राम’ हे अ‍ॅप निर्माण करणारी कंपनीही संस्थापक केविन सिस्टॉर्म आणि आणि माइक क्रिगर यांच्याकडून झुकेरबर्गने विकत घेतली. या दोघांनाही फेसबुकच्या स्वामित्वाखालील कंपनीत उच्चपदी घेण्यात आले होते. 

    • 2014 मध्ये जगभरात अब्जावधी वापरकर्ते असलेली ही कंपनी फेसबुकने 19 अब्ज डॉलर मोजून विकत घेतली. व्हॉट्सअ‍ॅपचे संस्थापक जेन कोम आणि ब्रायन अ‍ॅक्टन यांनाही आपल्या कंपनीत सामावून घेण्यात आले. 

    • फेसबुकने 2020 मध्ये ’कस्टोमर’ या नावाची एक स्टार्टअपही 1 अब्ज डॉलरना विकत घेतली. ही कंपनी सोशल मीडिया अ‍ॅपचा वापर करून व्यापार करत असते.

    • जगातल्या तीन महत्त्वाच्या सोशल नेटवर्कची मालकी फेसबुककडे (मार्क झुकेरबर्ग या व्यक्तीकडे) आहे. ती तीन नेटवर्क म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक. या तीन समाजमाध्यमांपैकी फेसबुक आणि इन्स्टाग्राम ही अनुक्रमे लेखन किंवा फोटो पोस्ट करण्यासाठी असली, तरी या दोन्हींच्या आपापल्या ’मेसेंजर’ सेवा आहेत. व्हॉट्सअ‍ॅप हे तर मेसेंजर म्हणूनच वापरले जाते. 

    • झुकेरबर्गला भविष्यात या तिन्ही मेसेंजर सेवा एकत्र आणायच्या आहेत. ही तिन्ही नेटवर्क एकत्र आल्यावर, जगातले 300 कोटी लोक त्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे वापर करतील. सध्या व्हॉटसअ‍ॅप आणि फेसबुक या दोन्हीची माहिती कंपन्यांकडे असली, तरी त्यांचा डेटा मात्र वेगवेगळा साठवला जातो. यामुळे फेसबुकला आपल्या वापरकर्त्यांबद्दल जास्त माहिती मिळणार आहे. भविष्यात वापरकर्त्यांना वरकरणी ही अ‍ॅप वेगळी दिसतील; पण त्यांचे अंतर्गत कार्य एकाच मुख्य सर्व्हर यंत्रणेवरून चालू असेल.

    व्हॉट्सअ‍ॅप -
     
     
    ••  व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ’एंड टू एंड एन्क्रिप्शन’ हे तंत्रज्ञान वापरले जाते. म्हणजेच, वापरकर्त्याच्या स्मार्टफोनवरून पाठवलेला संदेश हा दुसर्‍या इच्छित वापरकर्त्यापर्यंत पोहोचेपर्यंत मधले कोणीही वाचू शकत नाही. व्हॉटसअ‍ॅप खासकरून वैयक्तिक संपर्कासाठी वापरले जाते. फेसबुकला यातून कुठलाही पैसा मिळत नाही. अनेकदा जाहिरातदार व्हॉटसअ‍ॅपवर मोठ्या प्रमाणात मेसेज पाठवून आपली जाहिरात करतात. 

    • 2020 मध्ये भारतात व्हॉटसअ‍ॅपला यूपीआय तंत्रज्ञान वापरून पेमेंट सिस्टीम वापरण्याची परवानगी मिळालेली आहे. भविष्यात व्हॉटसअ‍ॅप वापरून लोकांनी वेगवेगळे आर्थिक व्यवहार करावेत, वस्तू खरेदी कराव्यात, विमानांची तिकीटे बुक करावीत, अशी फेसबुकची योजना दिसते. 

    • व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी केवळ फोन क्रमांकाची आवश्यकता होती. त्या व्यक्तीची ओळख गोपनीय राहत होती. ही व्यक्ती कोण आहे स्त्री आहे की पुरुष, ती कुठे राहते, ती काय करते, अशी कोणतीही माहिती देण्याची गरज नव्हती. याउलट फेसबुक आणि फेसबुक मेसेंजर वापरकर्त्यांना आपली खरी ओळख द्यायला भाग पाडते. अशा प्रकारे फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या वापरकर्त्यांचा डेटा जर व्हॉटसअ‍ॅपवरच्या फोन क्रमांकाशी जुळवून पाहिला, प्रचंड माहिती फेसबुकच्या हाती लागेल.

    • सध्या व्हॉटसअ‍ॅपवरचा वापरकर्त्यांचा डेटा फेसबुकला मिळत नाही. नव्या धोरणामुळे मात्र व्हॉटसअ‍ॅपच्या वापरकर्त्यांचे मेसेज वाचता आले नाहीत, तरी त्यांचा बराचसा डेटा फेसबुकला वापरता येणार आहे. यामुळे फेसबुकच्या एकाधिकारशाहीचे प्रश्‍न जसे उभे राहतात, तसेच वापरकर्त्यांच्या खासगीपणाचाही प्रश्‍न उभा राहतो. शिवाय खासगीपणा म्हटला, की सुरक्षिततेचा प्रश्‍न त्याबरोबर ओघाने येतो. एका कंपनीच्या (व्यक्तीच्या) हातात तीनशे कोटी वापरकर्त्यांची माहिती असणे धोक्याचे आहे.

    • व्हॉटसअ‍ॅपला पर्याय म्हणून लोक ’सिग्नल’ किंवा ’टेलिग्राम’ यांसारखी अ‍ॅप वापरू पाहत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच सिग्नलदेखील एंड टू एंड एन्क्रिप्टेड आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या संस्थापकांपैकी एकाने, म्हणजे ब्रायन अ‍ॅक्टन यांनीच ’सिग्नल’ची निर्मिती केली आहे. ही दोन्ही अ‍ॅप एकाच तंत्रज्ञानावर चालतात; मात्र सिग्नलची मालकी कुठल्याही व्यक्ती किंवा खासगी कंपनीकडे नसून, ते एका ’ना नफा’ सामाजिक संस्थेद्वारे चालवले जाते.  

    • तंत्रज्ञान क्षेत्रातील अब्जाधीश इलॉन मस्क आणि विख्यात हॅकर एडवर्ड स्नोडेन यांसारख्या दोन पराकोटीच्या टोकांच्या व्यक्तींनी ’सिग्नल’ या नव्या अ‍ॅपचा पुरस्कार केला. हे अ‍ॅप पुरवत असलेल्या डेटा सुरक्षिततेमुळे या दोघांनी त्याची पाठराखण केली. या घटनेमुळेही अनेक लोक नव्या पर्यायांचा विचार करू लागलेले आहेत. 

    • टेलिग्रामला एन्क्रिप्शनची सोय आहे; पण ते आपोआप होत नाही. त्यासाठी खास सेटिंग करून, ती सुविधा सुरू करावी लागते. 

    • कोणत्याही समाजमाध्यमाची लोकप्रियता त्याचे वापरकर्ते किती आहेत, यावर अवलंबून असते. समजा एखाद्याने व्हॉट्सअ‍ॅपऐवजी ’सिग्नल’सारखे दुसरे माध्यम वापरायचे ठरवले, तरी जोवर त्याचे मित्र, नातेवाइक आणि व्यवसायाशी संबंधित लोक, त्या अ‍ॅपचा वापर करत नाहीत, तोवर त्या एकट्या व्यक्तीला नव्या अ‍ॅपचा काहीच उपयोग होणार नाही. 


    फेसबुकची एकाधिकारशाही -
     
     
    • आज फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप अत्यंत लोकप्रिय आहेत, म्हणून वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

    • फेसबुकची एकाधिकारशाही चालू नये, म्हणून अमेरिकन सरकारच्या फेडरल ट्रेड कमिशनने आणि त्या देशातील 47 राज्यांनी या कंपनीविरुद्ध ’अँटीट्रस्ट’ खटला दाखल केला आहे.

    • फेसबुकच्या वापरकर्त्यांच्या माहितीच्या वापराबाबतच्या धोरणावरून मतभेद झाल्याने, इन्स्टाग्रामचे संस्थापक केविन सिस्टॉर्म आणि आणि माइक क्रिगर यांनी आपल्या फेसबुकच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. याच कारणामुळे व्हॉट्सअ‍ॅपचे संस्थापक जेन कोम आणि ब्रायन अ‍ॅक्टन यांनी देखील संचालकपद सोडले. 

    • एका तौलनिक अभ्यासानुसार, फेसबुक वापरकर्त्यांकडे सर्वाधिक माहिती मागते, अ‍ॅपलचे मेसेजिंग अ‍ॅप तुलनेने ती कमी मागते, तर सिग्नल अजिबात माहिती गोळा करत नाही, असे दिसून आले आहे. 

    • केवळ समाजमाध्यमेच वापरकर्त्याच्या अकाउंटवर नजर ठेवून असतात, असे नाही. गुगलसारख्या ई-मेल सेवाही मेल वाचत असतात. ई-मेलमध्ये लिहिलेल्या मजकुराशी संबंधित जाहिराती लगेच नेटवर दिसू लागतात.

    • फोनमधील गुगल, नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन यांसारखे जवळजवळ प्रत्येक लहानमोठे अ‍ॅप वापरकर्त्यांचा जास्तीत जास्त डेटा मिळवण्याचा प्रयत्न करत असते. वापरकर्त्यांच्या संपर्कातील लोकांची यादी, फोटो इथपासून सगळी माहिती सातत्याने गोळा केली जाते. आपण ज्या रस्त्याने दररोज जातो, त्या रस्त्यावर कोणकोणत्या जाहिरातींची होर्डिंग आहेत, याबद्दलचा डेटाही जीपीएसद्वारे गोळा करून, आपल्याला त्याच जाहिराती अन्य अ‍ॅपवर पाहायला भाग पाडू शकतात.
     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 42