-
लिगेटर मासा
- 16 Jan 2021
- Posted By : Study Circle
- 63 Views
- 0 Shares
लिगेटर मासा
ठाणे जिल्ह्यातील कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या देसाई खाडीत मासेमारी करणार्या धनाजी भोईर यांच्या जाळ्यात लिगेटर जातीचा मासा अडकला. हा मासा जाळ्यातून बाहेर काढल्यावर काही वेळ जिवंत होता. त्यानंतर तो मृत पावला. देसाई खाडीत लिगेटर आढळून आल्याने या खाडीत विविध प्रकारची जैव विविधता असल्याचे मानले जाते.
• ठळक नोंदी -
1) लिगेटर हा मासा उत्तर अमेरिकेतील गोड्या पाण्यात आढळून येतो. हा मासा स्वच्छ पाण्यात आढळून येतो.
2) 2018 सालच्या पुरानंतर हा केरळमध्ये दिसून आला होता. त्यानंतर तो गेल्या काही वर्षांपासून कोलकाता, भुवनेश्वर या ठिकाणी आढळला आहे.
3) हा मासा पाण्यात प्रचंड मारका मासा म्हणून ओळखला जातो. सुसर सारखे याचे तोंड असते.
4) लांब लंचक असलेल्या वाम माशासारख्या लिगेटर दिसतो. जवळपास 10 फूट लांब असतो. त्याचे वजन खूप असते.
5) भारतात त्याला प्रति किलोमागे 500 रुपये भाव मिळतो.
• मोथली नदी -
1) सह्याद्रीच्या फूट हिल्स ओळखल्या जाणार्या मलंगगडाच्या डोंगरपट्टीतून वाहत येणारी मोथली नदी ही पुढे देसाई खाडी म्हणून ओळखली जाते. देसाई खाडीत गोड्या व खार्या पाण्याचा संगम आढळून येतो.
2) लिगेटर मासा नदीत मिळून आल्याने नदी व खाडी परिसरात चांगल्या प्रकारची व विविध जातीची मस्त्य संपदा असण्याची दाट शक्यता आहे.
3) तळोजा एमआयडीसीपासून मोथली नदी वाहते. मोथली नदी देसाईला खाडीला येऊन मिळेपर्यंत प्रचंड प्रदूषित झालेली आहे.
4) उल्हास नदीच्या प्रदूषणाविरोधात हरीत लवाद व सर्वोच्च न्यायालयात लढा सुरु आहे. मात्र मोथलीला प्रदूषणापासून वाचविण्यासाठी अशा प्रकारचा कोणताही लढा सुरु नाही.