चिनी कम्युनिस्ट पक्षाला १०० वर्षं पूर्ण

  • चिनी कम्युनिस्ट पक्षाला १०० वर्षं पूर्ण

    चिनी कम्युनिस्ट पक्षाला १०० वर्षं पूर्ण

    • 10 Jul 2021
    • Posted By : study circle
    • 17 Views
    • 0 Shares
     चिनी कम्युनिस्ट पक्षाला १०० वर्षं पूर्ण
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात आंतरराष्ट्रीय घडामोडीया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात चिनी कम्युनिस्ट पक्षाला १०० वर्षे पूर्णव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
    *   आंतरराष्ट्रीय घडामोडी

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    चिनी कम्युनिस्ट पक्षाला १०० वर्षं पूर्ण
     
    *   १ जुलै रोजी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या स्थानपेला शंभर पूर्ण होत आहेत. गेल्या काही दिवसांत सीसीपीनं तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवान प्रयत्न केले आहेत.
     
    *   राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तरुणांना पक्षाची गोष्ट सांगण्यापासून ते पक्षासंबंधित इतर महत्त्वाची माहिती देण्यावर जोर दिला आहे.
     
    *   सोशल मीडियावर प्रचार कार्यक्रम सुरू करण्यापासून ते प्रमुख विद्यालयांमध्ये सीसीपीविषयीच्या अभ्यासासाठी रिसर्च सेंटर स्थापना करेपर्यंत, सरकारनं हाती घेतलेले कार्यक्रम पाहून असं वाटतंय की चिनी सरकार सध्या देशातल्या तरुणांना भुरळ घालायचा प्रयत्न करत आहे.
    -    तरुणांमध्ये ’बायकी’ गुण येऊ नयेत म्हणून चीन सरकार देणार ’धडे’
    -   चीनमध्ये एका जोडप्याला आता २ ऐवजी ३ अपत्यांना जन्म देण्यास परवानगी
    -    १९६२ च्या भारत-चीन युद्धातले थरारक अनुभव...
     
    *   माध्यमांनीही शी जिनपिंग यांच्या विद्यार्थ्यांबरोबर झालेल्या चर्चेला प्रमुख बातम्यांमध्ये स्थान दिलं आहे. हे तरुणांसाठी एक उत्तम उदाहरण आहे, असं पक्षाचं म्हणणं आहे.
     
        ’आदर्शतरुण’ -
     
    *   १८ जून रोजी ’रायटिंग द यूथफूल चॅप्टर ऑन द मदरलँड’ ही संकल्पना सुरू करण्यात आली. ज्याला चीनचं शिक्षण मंत्रालय, सेंट्रल सायबरस्पेस अडमिनिस्ट्रेशन, कम्युनिस्ट यूथ लीगची केंद्रीय समिती आणि बीजिंग यूनिव्हर्सिटीनं संयुक्तपणे प्रसिद्ध केलं आहे.
     
    *   प्रसिद्ध पोर्टल Sohu.com च्या २१ जूनच्या रिपोर्टनुसार, ’रायटिंग द यूथफूल चॅप्टर ऑन द मदरलँड’ ही संकल्पना नवीन मीडिया उत्पादनांना लॉँच करेल. वैचारिक आणि राजकीय शिक्षणासाठी एक ऑनलाईन प्रचारचंत्र तयार करेल आणि सायबरस्पेसमध्ये आदर्श तरुणांवर केंद्रित सेमिनारचं आयोजन करेल.
     
    *   पक्षाला १०० वर्षं पूर्ण होत असताना मे महिन्यात ’ऐतिहासिक शून्यवाद’ याविषयी लिहिलेल्या २० लाखांहून अधिक पोस्ट हटवण्याचा चीनचा निर्णय पाहिल्यास पक्षाच्या या निर्णयाकडे महत्त्वपूर्ण नजरेनं पाहिलं जात आहे.
     
    *   गेल्या वर्षी भारतीय लष्करासोबत झालेल्या हिंसक झटापटीदरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या चिनी सैनिकांचा अपमान केल्याप्रकरणी यंदाच्या फेब्रुवारीमध्ये चीन सरकारनं ३ ब्लॉगर्सला अटक केली होती.
     
    *   यापैकी एका ब्लॉगरनं या झटापटीत जखमी झालेल्या सैनिकांच्या सरकारी आकडेवारीविशषयी प्रश्‍न उपस्थित केले होते.
     
        संस्कृतीच्या आडून प्रपोगंडा -
     
    *   सरकारी मीडिया ’रेड टुरिझम’ वाढवण्याविषयी बोलत असतं, यात सरकार आपल्या क्रांतिकारी भूतकाळाला घट्ट करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार्‍या स्थळांमधील पर्यटनाला प्रोत्साहन देत असतं.
     
    *   ग्लोबल टाइम्सच्या मते, ४ मे रोजी जेव्हा देशात युवा दिन साजरा केला जातो, तेव्हा देशाच्या क्रांतिकारी वारशाच्या सन्मानार्थ या ऐतिहासिक स्थळांचा दौरा करण्यासाठी पोहोचलेले युवक रेड टुरिझमची ताकद बनले आणि वातावरणात देशभक्तीचं दर्शन पाहायला मिळालं.
     
    *   शांघायची एक वेबसाईट सिक्स्थ टोनच्या मते, शताब्दी वर्षाच्या निमित्तानं रॅप आर्टिस्टनी ’१००%’ असं शीर्षक असलेलं गाणं गायलं होतं. ज्यात चीन आतापर्यंत काय कमावलं, याचं गुणगाण करण्यात आलं होतं. यात ५ जी तंत्रज्ञान आणि देशाच्या सध्याच्या अतंराळ कार्यक्रमाची प्रशंसा करण्यात आली आहे.
     
    *   हॉँगकाँगस्थित प्रमुख वर्तमानपत्र साऊन चाईना मॉर्निंग पोस्टनुसार, या गाण्यामध्ये १०० रॅपर्सपैकी मर्सा या रॅपरनं अमेरिका, कॅनडा आणि जर्मनीसहित जी-७ देशांवर टीका केली आहे. या देशांवर त्यांनी चीनविरोधी असल्याचा आरोप केला आहे.
     
        विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर लक्ष -
     
    *   शताब्दी वर्षाच्या आयोजनापूर्वी २२ जूनला राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पेकिंग यूनिव्हर्सिटीत शिक्षण घेणार्‍या ३२ विदेशी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींच्या पत्रांना उत्तर दिलं. यात त्यांनी आपली जागतिक पोहोच अधिक मजबूत बनवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आपल्या प्रतिक्रियांमध्ये शी यांनी विद्यार्थ्यांना सगळ्या देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यासाठी आग्रह केला आहे.
     
    *   सरकारी मीडिया चायना ग्लोबल टेलीव्हिजन नेटवर्क नुसार, यंदा सीसीपीच्या स्थापनेला १०० वर्षं होत आहे. शी यांनी असंही म्हटलं की, २०२१ हे वर्षं समाजवादाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेनं चीनच्या नवीन प्रवासाच्या सुरुवातीचं वर्षं आहे.
     
    *   मे महिन्यात चीनच्या पेकिंग यूनिव्हर्सिटीत सीसीपीवरील इतिहासाच्या अभ्यासासाठी एक नवीन शैक्षणिक संशोधन संस्थेचं उद्घाटन करण्यात आलं.
     
    *   दुसरीकडे ग्लोबल टाईम्सनं ५ मे रोजीच्या रिपोर्टमध्ये बीजिंगस्थित समीक्षकांच्या हवाल्यानं लिहिलंय, सीसीपीच्या स्थापनेच्या शताब्दीनिमित्त या नवीन संस्थेच्या स्थापनेवरून हे संकेत मिळत आहेत की, पक्ष आपल्या इतिहासावरील शिक्षण मजबूत करत आहे.
     
        तरुणांमध्ये अंसतोष -
     
    *   तरुण पीढीला डोळ्यासमोर ठेवत सीसीपीनं ज्या संकल्पना आणल्या आहेत, त्या आश्‍चर्यजनक आहेत.
     
    *   तरुण विशेषत: विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी सीसीपीच्या इतिहासाला आकार देण्याकरता महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. यांतले अनेक सदस्य १९१९च्या मे फोर्थ आंदोलनातून बाहेर पडले होते.
     
    *   पक्षाची युवा शाखा कम्युनिस्ट यूथ लीग सध्या गटतटांमुळे त्रस्त आहे. असं असतानाही पक्ष तरुणांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे.
     
    *   राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर शी जिनपिंग यांनी कम्युनिस्ट यूथ लीगच्या प्रमुख पदापर्यंत पोहोचलेल्या लोकांचे पंख कापले होते. २०१७ मध्ये त्यांनी सीसीपी यूथ लीगचे प्रमुख किन यिझी यांचे अधिकार कमी केले होते.
     
    *   चीनमधील तरुणांमध्ये तेथील वर्क कल्चर आणि इतर काही मुद्द्यांमुळे असंतोष आहे. मे महिन्यात तरुणांनी देशातील कंत्राटी नोकरी पद्धत आणि खालावणार्‍या रोजगाराच्या संख्येवर नाराजी व्यक्त केली होती.
     
    *   सिक्स्थ टोननं २७ मे रोजी लिहिलं की, दुसरा एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डोबनवर लाईंग डाऊन ग्रूपमध्ये जवळपास ६ हजार सदस्य आहेत.
     
    *   यातल्या एका प्रसिद्ध अशा पोस्टमध्ये एक विशेष लाईफस्टाईल (टॅग पिंग) स्वीकार करण्यासाठी ७ स्टेप्स सांगितल्या आहेत. कार्यक्षेत्रात कामाच्या वाढत्या दबावामुळे तरुणांनी या आंदोलनाची सुरुवात केली होती.
     
    *   सरकारी मीडिया यापद्धतीच्या पावलांची निंदा करतं. ग्वांगझूमधील वर्तमानपत्र नानफैंग डेलीनं हे कृत्य लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे.
     
    *   अधिकृत अशा चायना डेलीनं १ जूनला तरुणांच्या तक्रारींना आपण जागा देत आहोत, असं दाखवायचा प्रयत्न केला, पण निराशावादाला खतपाणी घालू नका, अशी सूचनाही केली.
     
    *   यात म्हटलंय, सरकार याप्रश्‍नी मार्ग काढत हे, हे चांगलं आहे. यातून तरुणांच्या समस्या दूर केल्या जातील. गेल्या काही वर्षांत घरांच्या किंमती कमी करणं आणि तरुणांसाठी भाड्याच्या घरांची सार्वजनिकरित्या उपलब्धता करून देण्याच्या दिशेनं चीननं आपले प्रयत्न वाढवले आहेत.
     
    सौजन्य व आभार :  बीबीसी मराठी
    १ जुलै २०२१ / पद्मजा वेंकटरमण

Share this story

Total Shares : 0 Total Views : 17