२० जून : जागतिक निर्वासित दिन

  •  २० जून : जागतिक निर्वासित दिन

    २० जून : जागतिक निर्वासित दिन

    • 23 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 138 Views
    • 0 Shares
     २० जून : जागतिक निर्वासित दिन
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात मानवी हक्कया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात जागतिक निर्वासितदिनव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (३) : मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    २.१ जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र (युडीएचआर १९४८) :
        मानवी हक्काची आंतरराष्ट्रीय मानके, लोकशाही चौकटीत मानवी हक्क आणि मानवी सभ्यतेचे पालन करण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज, जागतिकीकरण आणि त्याचा विभिन्न क्षेत्रांवरील परिणाम

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    २० जून २०२१ : जागतिक निर्वासितदिन
     
    *   २० जून २०२१ रोजी ‘जागतिक निर्वासित दिन’ (World Refugee Day) पाळला जातो. जगाची लोकसंख्या ७५० कोटी असून अनेक लोक स्थलांतर करत राहतात, त्यामुळे नातेसंबंध तर जोडले जातातच व शांतताही प्रस्थापित होण्यास मदत होते; पण स्थलांतरित व निर्वासित यांत फरक आहे आणि निर्वासित लोकांचा फार मोठा संघर्ष असतो. काही प्रसंग किंवा कठीण अडचणींमुळे लोक स्थलांतरित किंवा निर्वासित होत राहतात. निर्वासित लोकांना इंग्लिशमध्ये रेफ्युजी Refugees  हा शब्द आहे.
     
    *   सध्या जगातील कुठल्या देशातील लोक जास्त निर्वासित होतात? तर या देशाचं नाव आहे ‘सीरिया’. सीरिया म्हटलं तर ‘वॉर’, ‘डेंजर’ किंवा ‘डार्क’ असंच समोर येतं.
     
    *   गेल्या दशकातील Global Refugee Population चा आकडा पाहिला तर जगातील २५ टक्के निर्वासित लोक हे सीरियातले आहेत. २०२० च्या आकडेवारीनुसार, ६६ लाख सीरियन हे जगातील १२६ देशांमध्ये निर्वासित झाले आहेत.
     
    *   तुर्कस्तान, कोलंबिया, पाकिस्तान, युगांडा व जर्मनी हे देश जास्तीत जास्त निर्वासित लोकांना स्वत:च्या देशात राहू देतात.
     
    सीरिया
     
    *   १५ मार्च २०११ पासून सरकार व विविध गट यांच्यात ‘सीरियन गृहयुद्ध’ सुरू झालं. इराण, रशिया, तुर्कस्तान व अमेरिका या देशांनी कुठल्या ना कुठल्या प्रकारे सीरियन गृहयुद्धात भाग घेतला आहे. जवळपास ३.८० लाख लोक तिथं मारले गेले. त्यांत १.१७ लाख हे तिथले नागरिक होते. अर्थात्, हा आकडा कागदोपत्री आहे. प्रत्यक्षात तो आकडा वेगळा किंबहुना अधिक असू शकतो.
     
    *   इस्राईलच्या ईशान्य बाजूला सीरिया आहे. सीरियाच्या उत्तरेला तुर्कस्तान, पूर्व बाजूला इराक, दक्षिणेकडे जॉर्डन, पश्रि्चमेला समुद्रकिनारपट्टी, तर नैर्ऋत्येला लेबनॉन व इस्राईल आहे. सीरियाची लोकसंख्या पावणेदोन कोटी असून दमास्कस ही देशाची राजधानी आहे. अरबी ही तिथली प्रमुख भाषा आहे.
     
    *   सीरियाची संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. समृद्ध, कलात्मक आणि सांस्कृतिक वारसा या देशाला लाभलेला आहे. त्याच्या प्राचीन मुळांपासून ते अलीकडील राजकीय अस्थिरता व सीरियन गृहयुद्धांपर्यंत या देशाचा प्रवास गुंतागुंतीचा आणि गोंधळाचाही राहिला आहे.
     
    *   Long Live Syria अशी घोषणा तिथले नागरिक देतात. दमास्कस, अलेप्पो, तार्तस , लट्टाकिया, पामिरा, होम्स , मालौला  व हमा अशा विविध ठिकाणी प्रेक्षणीय स्थळं आहेत. दमास्कस, बोसरा व अलेप्पो या शहरांतील काही ठिकाणांना ‘युनेस्को’नं जागतिक वारसास्थळांचा दर्जा दिलेला आहे. जुनं दमास्कास अप्रतिम असून तिथं पायी फिरण्यानं समृद्ध अनुभव मिळू शकतो. दमास्कसला City of Jasmine असंही म्हटलं जातं. तिथंच उमय्यदकाळातील मशीद, रोमनकाळातील टेम्पल ऑफ ज्युपिटर व जगातील सर्वात जुन्या चर्चपैकी एक चॅपेल ऑफ सेंट पॉल पाहण्यासारखं आहे. बोसरा इथलं १५ हजारांची आसनक्षमता असलेलं रोमन थिएटर हेही प्रेक्षणीय स्थळ. ऐतिहासिक युफ्रेटस नदी ही पश्रि्चम आशियातील लांब नदी आहे. अलेप्पो व इडलिब या शहरांच्या दरम्यान ओसाड पडलेली सातशे गावं म्हणा किंवा वसाहती आहेत. या ग्रामसमूहाला ‘मृत शहरं’ म्हणून संबोधलं जातं.
     
    सौजन्य व आभार : दैनिक सकाळ
    १९ जून २०२१ / प्रज्ञेश मोळक

Share this story

Total Shares : 0 Total Views : 138