प्रश्नमंजुषा 87 : सार्वजनिक खर्च

  • प्रश्नमंजुषा 87 : सार्वजनिक खर्च

    प्रश्नमंजुषा 87 : सार्वजनिक खर्च

    • 03 Feb 2021
    • Posted By : Study Circle
    • 9097 Views
    • 12 Shares
    सार्वजनिक खर्च 
     
     
    केंद्र व राज्याचा सार्वजनिक खर्च 
     
    1) “सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिद्धांत” कोणी मांडला?
    1) प्रो. पिकॉक व प्रो. वाईजमन
    2) प्रो. पिगू
    3) डॉ. मार्शल
    4) वरीलपैकी कोणही नाही
     
    2) अ‍ॅडॉल्फ वॅगनरचे नाव, खालीलपैकी कोणत्या घटकाशी जोडले गेले आहे ?
    1) संतुलित अर्थसंकल्प
    2) तुटीची वित्तव्यवस्था
    3) कराच्या अटी (Canons)
    4) वाढणारा सार्वजनिक खर्च
     
    3) सार्वजनिक वस्तूचे “सार्वजनिक वस्तू आणि गुणात्मक वस्तू“ असे विभाजन करणारे अर्थशास्त्री कोण ?
    1) जॉन डाल्टन
    2) फिंडले शिरास
    3) मिसेस उर्सूला हिक्स
    4) प्रा. मसग्रेव्ह
     
    4) ‘राज्याच्या कार्यातील वृद्धीचा नियम‘ कोणी मांडला ?
    1) डॉ. डाल्टन
    2) उर्सूला हिक्स
    3) वॅगनर
    4) डिमार्की
     
    5) भारताच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे आहेत.
    अ) संरक्षण खर्चात वाढ
    ब) प्रशासकीय खर्चात वाढ
    क) किंमत पातळीत वाढ
    ड) करा मधील वाढ
    योग्य पर्याय निवडा :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ,ब आणि क
    4) फक्त अ,क आणि ड 
     
    6) खालीलपैकी कोणते उदाहरण भारीत खर्चाचे नाही  ?
    1) राज्यपालांच्या वित्तलब्धी व भत्ते
    2) उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांचे वेतन व भत्ते
    3) राज्य लोकसेवा आयोगाचा खर्च
      4) सचिवांचे वेतन व भत्ते 
     
    7) खालीलपैकी कोणता भारताच्या केंद्रशासनाच्या भांडवली खर्चाचा भाग नाही ?
    1) संरक्षणावरील खर्च
    2) सामाजिक आणि सामूहिक विकासावरील खर्च
        3) व्याजाचा भरणा
    4) सर्वसाधारण सुविधांवरील खर्च 
     
    8) खालीलपैकी कोणता खर्च हा अविकासात्मक सरकारी खर्चाचा भाग नाही ?
    1) कर वसुली आकार
    2) लष्करी उपकरणांवरील खर्च    
    3) शैक्षणिक सेवांवरील खर्च
    4) व्याज प्रदानावरील खर्च 
     
    9) जेव्हा सार्वजनिक खर्चामध्ये घट करून चलन वाढीवर नियंत्रण ठेवले जाते, तेव्हा त्या उपायाला काय म्हणतात?
    1) राजकोषीय धोरणाचा उपाय
    2) द्रव्यविषयक धोरणाचा उपाय
    3) व्यापारी धोरणाचा उपाय
    4) कर विषयक धोरणाचा उपाय 
     
    10) खालीलपैकी कोणते खर्च राज्यसरकारच्या वाढत्या खर्चास कारणीभूत आहेत?
    a) नागरी प्रशासनाचा विस्तार
    b) वाढत्या किमती व राहणीमान खर्चामुळे जालेला वाढीव पगार
    c) सरकारचा शिक्षण व सार्वजनिक आरोग्य यावर होणारा खर्च
    d) विकासखर्चातील वाढ
    पर्यायी उत्तरे :
    1) वरीलपैकी सर्व
    2) (a) फक्त
    3) (b) फक्त
    4) (c) फक्त
     
    11) राज्य सरकारच्या विकास खर्चातील एकमेव महत्त्वाचा घटक म्हणजे ः
    1) शिक्षण
    2) शेती
    3) नागरी कामकाज
    4) ग्रामीण प्रकल्प 
     
    12) खालीलपैकी कोणती कार्ये सार्वजनिक आयव्ययाची आहेत?
    a) संसाधनांची वाटणी
    b) उत्पन्न विभाजन
    c) स्थिरीकरण कार्ये
    d) खाजगी वस्तूंचा पुरवठा
    दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा ः
    1) (a) फक्त
    2) (b) आणि (c)
    3) (a), (b) आणि (c)
    4) वरील सर्व
     
    13) भारत निर्माण, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा (MNREGA) आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (NRHM) हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या खर्चाचे उदाहरण आहेत?
    1) भांडवली खर्च
    2) नियोजित खर्च
      3) अनियोजित खर्च
    4) अहस्तांतरणीय खर्च  
     
    14) जेव्हा सरकारची आर्थिक गरज करांमधून उपलब्ध होत नाही, तेव्हा तो विकास खर्च कशातून भागवला जातो?
    अ)भारतीय रिझर्व्ह बँके कडील त्यांचा रोख निधी कमी करुन
    ब) बाजारपेठेतून कर्ज घेऊन
    क) भारतीय रिझर्व्ह बँकेतूून कर्ज घेऊन
    ड) वरीलपैकी सर्व 
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) फक्त क
    4) फक्त ड
     
    15) सार्वजनिक आयव्यय/वित्त ही अर्थशास्त्राची शाखा असून ती शासनाच्या राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवरील वित्तीय घडामोडी/क्रियाकलाप शी संबंधित आहे. खालीलपैकी कोणती सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती नाही/नाहीत ?
    अ) सार्वजनिक महसूल
    ब) चलनविषयक व्यवस्थापन
    क) सार्वजनिक कर्ज
    ड) वित्तीय प्रशासन
    1) फक्त अ
    2) फक्त ब
      3) फक्त ड
    4) फक्त क आणि ड 
     
    16) भारताच्या संचित निधीतून पैसा काढण्याचा अधिकार या पदाला/अधिष्ठानाला आहे ?
    1) राष्ट्रपती
    2) संसद
    3) पंतप्रधान
    4) केंद्रीय वित्तमंत्री
     
    17) भारतात बचतीचा सर्वात महत्त्वाचा स्रोत खालीलपैकी कोणता?
    1) खाजगी कॉर्पोरेट बचत
    2) सरकारी बचत
    3) घरगुती बचत
    4) परदेशी नागरीकांकडून होणारी बचत
     
    18) ‘नॅशनल डिफेन्स फंड‘ (NDF) संदर्भात योग्य विधाने शोधा.
    a) त्यातील निधी, केंद्र आणि राज्य सरकारमार्फत जमा केला जातो.
    b) सीमा भागातील पायाभूत संरचनेचे आधुनिकीकरण करण्यासाठी त्याचा वापर होतो.
    c) त्याचे लेखा रिझर्व्ह बँक इंडिया (RBI) मार्फत ठेवले जातात.
    d) या फंडाचे प्रमुख पंतप्रधान असतात, तर खजिनदार वित्त मंत्री असतात.
    1) फक्त (a)
    2) फक्त (a), (c), (d)
    3) फक्त (c), (d)
    4) फक्त (d) 
     
    19) भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनातील सर्वाधिक टक्के अनुदान हे सार्वजनिक खर्चाच्या स्वरूपात ...... वर खर्च केले जाते.
    1) तांदूळ
    2) केरोसीन
    3) खते 
    4) वीज 
     
    20) खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत ?
    a) 1950-51 मध्ये विकास खर्चाचे एकूण खर्चाशी असणारे प्रमाण 36.2% होते. 
    b) 1980-81 मध्ये विकास खर्चाचे एकूण खर्चाशी असणारे प्रमाण 65.8% होते. 
    c) 2007-08 मध्ये विकास खर्चाचे एकूण सार्वजनिक खर्चाशी असणारे प्रमाण 85.0% होते. 
    पर्यायी उत्तरे :
    1) (a) आणि (b)
    2) (b) आणि (c)
    3) फक्त (c)
    4) फक्त (b)
     
    21) केंद्र सरकारच्या योजनेतर खर्चामध्ये कोणत्या खर्चाचे प्रमाण सर्वात जास्त आहे? 
    1) संरक्षणावरील खर्च
    2) व्याजावरील खर्च
    3) अनुदानांवरील खर्च
    4) सर्वसामान्य सेवांवरील खर्च
     
    22) भारताच्या सार्वजनिक खर्चात कोणत्या कारणांनी वाढ होते?
    1) संरक्षण खर्चाची वाढ
    2) जास्तीची चलनवाढ  
    3) विकासासाठी वित्तपुरवठा
    4) वरीलपैकी सर्व
    सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण
     
    1) 1987-88 नंतर सार्वजनिक खर्चाचे कोणते वर्गीकरण अमलात आले?
    a) नागरी खर्च आणि संरक्षण खर्च
    b) नियोजित खर्च आणि अनियोजित खर्च
    c) अनुदाने व बिगर अनुदाने खर्च
    d) महसुली व भांडवली खर्च
    दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा :
    1) (a) आणि  (b)
    2) (b) फक्त   
    3) (b) आणि (c)
    4) (d) फक्त 
     
    2) सन 1987-88च्या अंदाजपत्रकापासून केंद्र सरकारने कोणत्या नवीन पद्धतीने सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण करण्यास सुरुवात केली ? 
    1) विकास खर्च आणि विकासेतर खर्च
    2) योजनेतर खर्च आणि योजना खर्च
    3) उत्पादक खर्च आणि अनुत्पादक खर्च
    4) महसुली खर्च आणि भांडवली खर्च
     
    3) सरकारचा ’कायदा व सुव्यवस्था’ यावरील खर्च हा ...... आहे.
    1) उत्पादक खर्च
    2) अनुत्पादक खर्च
    3) भांडवली खर्च
    4) वरीलपैकी नाही
     
    4) .......... हा खर्च केंद्र सरकारचा विकासखर्च नाही.
    1) व्याज अदा करण्यासाठीचा खर्च
    2) सामाजिक सेवांवरील खर्च
      3) अनुदानांवरील खर्च
    4) विकास उपक्रमांचा विस्तार खर्च 
     
    5) संरक्षण वसाहतीच्या व्यवस्थापनावरील सरकारचा खर्च हे ......... उदाहरण आहे.
    1) विकास खर्चाचे
    2) अविकासात्मक वा अनुत्पादक खर्चाचे
    3) भांडवली खर्चाचे
    4) उत्पादक खर्चाचे  
     
    6) ...... खर्च हा अनुत्पादक खर्च नव्हे
    1) संरक्षण
    2) प्रशासकीय
      3) ऊर्जा
    4) व्याज परतावा 
     
    7) खालीलपैकी कोणता विकासखर्च मानला जात नाही ?
    1) विकास उपक्रमांचा विस्तार
    2) अनुदानावरील खर्च
      3) व्याज अदा करण्यावरील खर्च
    4) सामाजिक सेवांवरील खर्च 
     
    8) खालील विधानांचा विचार करा ः
    a) व्याज देणे हा महसुली योजनाबाह्य खर्च आहे.
    b) सार्वजनिक उपक्रमांना दिलेले कर्ज हे भांडवली योजनेअंतर्गत खर्च आहे. 
    पर्यायी उत्तरे :
    1) (a) फक्त बरोबर आहे 
    2) (b) फक्त बरोबर आहे 
    3) (a) आणि (b) दोन्हीही बरोबर आहेत.
    4) (a) आणि (b) दोन्हीही चूक आहेत.
     
    9) भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनातील सर्वाधिक टक्के अनुदान हे सार्वजनिक खर्चाच्या स्वरूपात ..... वर खर्च केले जाते. 
    1) तांदूळ
    2) केरोसीन
    3) खते
    4) वीज 
     
    10) उच्च शिक्षणावरील वाढता खर्च नियंत्रित करण्यासाठी शासनाने कोणते मार्ग अवलंबिले आहेत ?
    अ) दूर शिक्षणपद्धतींचा स्वीकार व प्रसार.
    ब) उच्च शिक्षण क्षेत्रात खाजगी प्रयत्नांना उत्तेजन.
    क) उच्च शिक्षणावरील शासकीय खर्चाच्या कपातीचे धोरण. 
    ड) औपचारिक शिक्षणाला उत्तेजन.
    खालीलपैकी योग्य पर्याय निवडा :
    1) अ फक्त
    2) अ आणि ब फक्त
    3) अ, ब आणि क
    4) अ, ब आणि ड
     
    11) खालीलपैकी कोणती कार्ये सार्वजनिक आयव्ययाची आहेत?
    a) संसाधनांची वाटणी
    b) उत्पन्न विभाजन
    c) स्थिरीकरण कार्ये
    d) खाजगी वस्तूंचा पुरवठा
    दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा ः
    1) (a) फक्त
    2) (b) आणि (c)
    3) (a), (b) आणि (c)
    4) वरील सर्व
     
    12) कोणत्या घटकात घट झाल्यामुळे ‘भांडवल संचय‘ होतो? 
    1) उपभोग खर्च
    2) गुंतवणूक
    3) उत्पन्न
    4) बचत
     
    13) खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडून रिक्त जागा भरा.
    आर्थिक सुधारणांच्या काळात राजवित्तीय असमतोलाच्या दुरुस्तीचा भार मुलत: ......... वर आहे.
    1) महसुली खर्च
    2) सार्वजनिक कर्ज
    3) भांडवली खर्च
    4) वरीलपैकी एकही नाही
     
    14) भारतीय करपद्धतीत बदल घडवून आणण्याच्या खालीलपैकी कोणत्या मार्गाचा अवलंब, डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कृतिदलाने केला होता ?
    1) खर्च नियमनापेक्षा अधिक प्रमाणात महसूल वाढ करणे.
    2) अनुत्पादक खर्चाचे नियमन करणे. 
    3) करांची संख्या वाढवणे.
    4) कर चुकवेगिरीचे प्रमाण कठोर उपायांनी कमी करणे. 
     
    15) महागाई भत्त्याबाबत खालील दोन विधाने विचारात घ्यावी.
    a) केंद्र सरकारी कर्मचारी/निवृत्ती वेतनधारक यांना मिळणारा महागाई भत्ता दर वर्षी 1 जुलै रोजी सुधारित होतो.
    b) अखेरचा जाहीर झालेला वाढीव भत्ता 10% वाढला असून तो 1.7.2013 पासून 90% झाला आहे.
    आता सांगा की : 
    1) (a) बरोबर (b) नाही
    2) (b) बरोबर (a) नाही
    3) (a) आणि (b) दोन्ही बरोबर
    4) (a) आणि (b) दोन्ही बरोबर नाही  
     
    16) खालीलपैकी कोणता प्रकार हा राज्य सरकारच्या कर्जदायित्वाचा भाग नाही ?
    1) भविष्य निर्वाह निधी
    2) बाह्य कर्ज 
    3) आकस्मिक निधी
    4) राखीव निधी 
     
    17) खालीलपैकी कोणते बिन्दू होम चार्ज मधील नव्हते, होम चार्ज अर्थात एकोणिसाव्या शतकातील दुसर्‍या भागात झालेल्या भारतापासून इंग्लंडकडे धनाच्या प्रवाहासंबंधी घटना ?
    1) भारतापासून इंग्लंडला कॉटन आणि सिल्क वस्त्रांचा निर्यात
    2) भारतात कार्यालय स्थापना संबंधी खर्च 
    3) रेल्वेच्या भांडवली निवेश संबंधी व्याज
    4) सैन्य स्टोअर्स खरेदी
     
    18) खालील विधाने विचारात घ्या :
    अ) केंद्र सरकारच्या महसुली खर्चाचे स्थूल देशांतर्गत उत्पादनाशी असणारे प्रमाण 2015-2016 मध्ये 11.4% होते.
    ब) केंद्र सरकारच्या व्याज देयकाचे स्थूल देशांतर्गत उत्पादनाशी असणारे प्रमाण 2015-2016 मध्ये 8.3% होते.
    क) केंद्र सरकारच्या भांडवली खर्चाचे स्थूल देशांतर्गत उत्पादनाशी असणारे प्रमाण 2015-2016 मध्ये 1.7% होते.
    वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
    1) फक्त अ व ब
    2) फक्त ब व क
    3) फक्त अ व क
    4) वरील सर्व 
     
    19) खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत ?
    a) 1950-51 मध्ये विकास खर्चाचे एकूण खर्चाशी असणारे प्रमाण 36.2% होते. 
    b) 1980-81 मध्ये विकास खर्चाचे एकूण खर्चाशी असणारे प्रमाण 65.8% होते. 
    c) 2007-08 मध्ये विकास खर्चाचे एकूण सार्वजनिक खर्चाशी असणारे प्रमाण 85.0% होते. 
    पर्यायी उत्तरे :
    1) (a) आणि (b)
    2) (b) आणि (c) 
    3) फक्त (c)
    4) फक्त (b)
     
    20) सन 2014-15 मध्ये भारतातील विकास खर्च व एकूण सार्वजनिक खर्च, तसेच भांडवली खर्च व सकल राष्ट्रीय उत्पन्न यांचे गुणोत्तर अनुक्रमे असे होते:
    अ) 68.5% व 5.1%
    ब) 58.6% व 1.5%
    क) 60.2% व 3.5%
    1) फक्त ब
    2) फक्त क
      3) फक्त अ
    4) वरीलपैकी कुठलेही नाही  
    उत्तरे : प्रश्नमंजुषा (87)
    केंद्र व राज्याचा सार्वजनिक खर्च 
     
    1-1
     
    2-4
     
    3-4
     
    4-3
     
    5-3
     
    6-1
     
    7-3
     
    8-3
     
    9-1
     
    10-1
     
    11-1
     
    12-3
     
    13-2
     
    14-4
     
    15-2
     
    16-2
     
    17-3
     
    18-3
     
    19-1
     
    20-1
     
    21-2
     
    22-4
     
    सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण
     
    1-2
     
    2-2
     
    3-2
     
    4-1
     
    5-2
     
    6-3
     
    7-3
     
    8-1
     
    9-1
     
    10-3
     
    11-3
     
    12-1
     
    13-3
     
    14-1
     
    15-2
     
    16-3
     
    17-1
     
    18-3
     
    19-1
     
    20-1

Share this story

Total Shares : 12 Total Views : 9097