प्रश्‍नमंजुषा 84 : फिस्कल रिस्पॉन्सिबिलीटी अँड बजेट मॅनेजमेंट

  • प्रश्‍नमंजुषा 84 : फिस्कल रिस्पॉन्सिबिलीटी अँड बजेट मॅनेजमेंट

    प्रश्‍नमंजुषा 84 : फिस्कल रिस्पॉन्सिबिलीटी अँड बजेट मॅनेजमेंट

    • 02 Feb 2021
    • Posted By : Study Circle
    • 991 Views
    • 2 Shares

    फिस्कल रिस्पॉन्सिबिलीटी अँड बजेट मॅनेजमेंट 

    1) केंद्र सरकारच्याही अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्यांनी ‘राजकोषीय जबाबदारी कायदा (FRL)अंमलात आणला? 
    a) उत्तर प्रदेश, पंजाब
    b) कर्नाटक, केरळ
    c) तामिळनाडू
    d) पश्‍चिम बंगाल
    खालीलपैकी कोणते उत्तर बरोबर आहे ? 
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त (a)
    2) (a),(b) आणि (c)
    3) फक्त (b)
    4) फक्त (d)
     
    2) राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा (FRBM)याचे हे उद्दिष्ट होय ः
    a) दीर्घकालीन समग्रलक्षी स्थैर्य
    b) आदर्श ऋण व्यवस्थापन
    c) सेवा कराचा घटलेला दर
    पर्यायी उत्तरे :
    1) (a) फक्त
    2) (a) व (b) फक्त
    3) (b) व (c) फक्त
    4) वरील सर्व
     
    3) फिस्कल रिस्पॉन्सिबिलीटी अँड बजेट मॅनेजमेंट बील (FRBM) ची ही उद्दिष्ट्ये होती :
    a) महसूली तुटीचे उच्चाटण करणे.
    b) राजकोषीय तूट कमी करणे
    c) वाढत्या सार्वजनिक कर्जास आळा घालणे
    d) संरक्षण खर्चात कपात करणे
    पर्यायी उत्तरे :
    1) (a) आणि (b) फक्त 
    2) (c) आणि (d)  फक्त बरोबर आहेत.
    3) (a), (b) आणि (c)  फक्त 
    4) (a), (b) आणि (d) फक्त 
     
    4) राजकोषीय असमतोल दुरुस्त करण्यासाठी आर्थिक सुधारणेच्या काळात मुख्य जबाबदारी या बाबींवर पडली. 
    अ) भांडवली खर्च
    ब) योजना बाह्य खर्च
    योग्य पर्याय निवडा :
    1) अ आणि ब दोन्ही
    2) फक्त ब
      3) फक्त अ
    4) वरीलपैकी कुठलेही नाही  
     
    5) राजकोषीय जबाबदार्‍या आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन अधिनियमा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
    अ) केंद्र सरकारने राज्यकोषीय जबाबदार्‍या आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2004 मध्ये मंजूर केला.
    ब)  मार्च 2009 पर्यंत महसुली तुटीत घट करुन शून्यावर आणणे.
    क) मार्च 2009 पर्यंत राज्यकोषीय तूट ही स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 3% इतकी कमी करणे.
    वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
    1) फक्त अ आणि ब
    2)  फक्त ब आणि क
    3) फक्त अ आणि क
    4) वरील सर्व 
     
    6) राजकोषीय जबाबदारी अंदाजपत्रकीय व्यवस्थापन कायदा, 2003 (FRBM Act, 2003) चे सन 2006 मध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची तूट स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) 2 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट होते ?
    अ) महसुली तूट
    ब) प्राथमिक तूट 
    क) राजकोषीय तूट
    ड) अंदाजपत्रकीय तूट
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त क
    4) फक्त क आणि ड 
     
    7) ‘राजकोषीय उत्तरदायित्व आणि व्यवस्थापन अधिनियम, 2003‘ नुसार कोणती तीन विवरणे संसदेत सादर करावी लागतात ?
    a) एकीकृत वित्तीय विवरण
    b) स्थूल - आर्थिक आराखडा विवरण
    c) मध्यम अवधी राजकोषीय धोरण विवरण
    d) राजकोषीय धोरण व्यूहरचना विवरण 
    पर्यायी उत्तरे :
    1) (a), (b) आणि (c)
    2) (a), (b) आणि (d)
    3) (b), (c) आणि (d)
    4) (a), (c) आणि (d) 
     
    8) राज्यकोषीय जबाबदार्‍या आणि अंदाजपत्रक व्यवस्थापना संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
    a) केंद्र सरकारने राज्यकोषीय जबाबदार्‍या आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2004 मध्ये मंजूर केला.
    b) ह्या कायद्यानुसार मार्च 2009 पर्यंत महसुली तुटीत घट करुन शून्यावर आणणे आणि
    c) मार्च 2009 पर्यंत स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 3% पर्यंत राज्यकोषीय तुट कमी करणे हे हेतू होते.
    वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत ?
    1) (a) आणि (b)
    2) (a) आणि (c)
    3) (b) आणि (c)
    4) वरील सर्व
     
    9) राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायद्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या ः
    अ) केंद्र सरकारने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2004 मध्ये मंजूर केला.
    ब) 2009 पर्यंत महसुली तुटीत घट करून शून्यावर आणली.
    क) मार्च, 2009 पर्यंत स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 3% पर्यंत राजकोषीय तूट कमी करणे निर्धारित होते.
    वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
    1) फक्त अ व ब
    2) फक्त ब व क
    3) फक्त अ व क
    4) वरीलपैकी सर्व
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (84)
    1-2
     
    2-2
     
    3-3
     
    4-3
     
    5-4
     
    6-3
     
    7-3
     
    8-3
     
    9-2

     

Share this story

Total Shares : 2 Total Views : 991