प्रश्नमंजुषा 78 : महाराष्ट्रातील स्वयंसेवेची उज्ज्वल परंपरा

  • प्रश्नमंजुषा 78 : महाराष्ट्रातील स्वयंसेवेची उज्ज्वल परंपरा

    प्रश्नमंजुषा 78 : महाराष्ट्रातील स्वयंसेवेची उज्ज्वल परंपरा

    • 23 Jan 2021
    • Posted By : Study Circle
    • 199 Views
    • 0 Shares

     प्रश्नमंजुषा (78) : महाराष्ट्रातील स्वयंसेवेची उज्ज्वल परंपरा

    1) 1958 मध्ये  झालेल्या एका कार्यक्रमात ते म्हणाले होते,  ’माझ्या आयुष्यातल्या सर्व आकांक्षा पूर्ण झाल्या. आता फक्त एक इच्छा आहे. मला संयुक्त महाराष्ट्र झालेला पहायचा आहे.’ त्यांच्या या वाक्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला नैतिक बळ मिळालं. दोनच वर्षांनी त्यांची इच्छा पूर्ण झाली. हा संदर्भ या महान व्यक्तीबाबत आहे.
    1) महर्षी धोंडो केशव कर्वे 
    2) आचार्य प्र. के. अत्रे 
    3) सी. डी. देशमुख
    4) महाराष्ट्रभूषण रामकृष्ण पाटील
     
    2) महाराष्ट्र राज्य स्थापन व्हायच्या आधी सामाजिक कामाचे कोणते प्रमुख वैचारिक प्रवाह मराठी समाजाला प्रभावित करीत होते ?
    अ) गांधीवादी विचारसरणी
    ब) महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रबोधन व परिवर्तनवादी विचारसरणी
    क) मिशनरी कामाची विचारसरणी
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ 
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    3) खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रात स्वयंसेवी संस्थांनी पाण्याच्या प्रश्र्नांवर प्रभावी काम केलेले आहे ?
    अ) मराठवाडा ईको ग्रुप
    ब) मानवलोक
    क) ग्रामायन
    ड)  अफार्मचा इंडो-जर्मन वॉटरशेड प्रकल्प
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब, क आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    4) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) 2005 च्या सुमारास यातल्या काही संस्था संघटना स्थिरावल्या आणि त्यांनी संशोधन, धोरण समर्थन (अ‍ॅडव्होकसी), माध्यम समर्थन (मीडिया अ‍ॅकव्होकसी) अशी कामं सुरू केली.
    ब) 2010 नंतर महिला बचत गटांनी ग्रामीण गरीब आणि शहरी कष्टकरी महिलांचं भावविश्र्व आर्थिक स्वावलंबनाच्या ध्यासानं भरून टाकले आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    5) एखाद्या उद्योग संस्थेला बरोबर घेऊन, उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाचे (सीएसआर) प्रकरण सुरू होण्याआधी, निधी संकलन करत कोनत्या संस्थेने प्राथमिक शिक्षणाच्या दूरवस्थेवर नेमकं बोट ठेवून उत्तरे शोधली ?
    1) रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी
    2) असर
    3)  प्रथम
    4) एससीईआरटी
     
    6) खालीलपैकी कोणत्या पुढील आंदोलनांमुळे आदिवासी, जल-जंगल-जमीन अशांसारख्या विषयांवर नवे कायदे अस्तित्त्वात आले ?
    अ) शिवसेनेचे आंदोलन
    ब) जबरनजोत आंदोलन कृती समितीचे आंदोलन
    क) रायगडमधील दळी जमिनींचे आंदोलन
    ड) श्रमजीवी संघटनेचे आंदोलन
    इ) श्रमिक संघटनेचे आंदोलन
    फ) भूमिसेनेचे आंदोलन
    ग)  लेखा-मेंढा गावातील आदिवासी स्वशासनाचा आग्रह
    पर्यायी उत्तरे :
    1) वरील सर्व
    2) ड आणि फ वगळता सर्व  
    3) अ वगळता सर्व
    4) ड, फ, ग वगळता सर्व
     
    7) 1967 साली ’भारतीय अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन’ (बाएफ) ची स्थापना कोणी केली ?
    1) गिरीश गांधी
    2) मोहन धारिया
    3) विठ्ठलराव विखे पाटील
    4) मणिभाई देसाईं
     
    8) 1970 चे दशक, जगाच्या इतिहासात ’बदलांचं दशक’ म्हणून  ओळखले जाते. महाराष्ट्रातही या काळात बरीच उलथापालथ झाली, त्यासंदर्भातील संस्था/ चळवळी शोधा-
    अ) ग्रंथाली वाचक चळवळ 
    ब)  युक्रांद
    क) पतित पावन यांसारख्या संघटना
    ड) छात्र युवक संघर्ष समिती
    पर्यायी उत्तरे :
    1) विधाने अ, ब आणि क बरोबर
    2) विधाने ब, क आणि ड बरोबर
    3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
    4) विधाने अ, ब, क आणि ड बरोबर
     
    9) खालीलपैकी कोणती संस्था पाण्यावर (जलसंधारण व सिंचन)  काम करते, तसेच स्वयंसेवी संस्थांना तंत्रज्ञानाची मदत करते ?
    1) मराठवाडा शेती साह्य मंडळ
    2)  अफार्म
    3) अ‍ॅफ्रो (अ‍ॅक्शन फॉर फूड)
    4) पाणी पंचायत
     
    10) आध्यात्मिक किंवा धार्मिक प्रेरणेतून शुद्ध ’सेवा’ असा हेतू ठेवून महाराष्ट्रात विकासकामे कोणी केली ?
    अ) पांडुरंगशास्त्री आठवले 
    ब) न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी 
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    11) 1919 साली स्थापन झालेल्या रयत शिक्षण संस्थेमागे कोणाची प्रेरणा होती ?
    1) ब्राम्हणेतर चळवळीची प्रेरणा
    2) महात्मा फुले यांच्या विचारातून प्रेरणा
    3) गांधीवादी विचारातून प्रेरणा
    4) स्वातंत्र्य  चळवळीतील राष्ट्रीय शिक्षणाची प्रेरणा
     
    12) महर्षी धोंडो केशव कर्वे यांना ’भारतरत्न’ पुरस्कार मिळाला, या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) भारतरत्न मिळालेली व वयाची शताब्दी साजरी केलेली पहिली व्यक्ती.
    ब) महाराष्ट्राला मिळालेला दुसरा सन्मान.
    क) समाजकार्यासाठीचे हे पहिले ’भारतरत्न’.
    ड) 1958 मध्ये पंदित नेहरुंच्या उपस्थितीत प्रदान
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    13) 1960 च्या दशकातील धान्यटंचाईकडे पाहून शेतीतलं उत्पन्न वाढावं म्हणून  तांत्रिक मदत करणारी  कोणती संस्था दुष्काळी अहमदनगर जिल्ह्यात स्थापन झाली होती ?
    1) भारतीय अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन (बाएफ)
    2) अ‍ॅफ्रो (अ‍ॅक्शन फॉर फूड)
    3) महात्मा फुले कृषी विद्यापीठ
    4) यापैकी नाही.
     
    14) खालील जोड्या अचूक जुळवा :
            स्तंभ अ (संस्थापक)    स्तंभ ब (कार्य)
    अ. डॉ. रजनीकांत आरोळे           i.  वरोरा (चंद्रपूर) येथे ’आनंदवन’ 
    ब. बाबा आमटे                       ii.  अमरावतीचे ’तपोवन
    क. शिवाजीराव पटवर्धन         iii.  चंद्रपूर जिल्ह्यातील सर्च
    ड. डॉ. अभय बंग                   iv.  जामखेडला आरोग्यसेवेचे काम 
    पर्यायी उत्तरे :
    1) II      III       I     IV
    2) IV     I       II      III
    3) III     II      IV      I
    4) IV    III       I      II
     
    15) खालीलपैकी कोणत्या चळवळींनी सामाजिक उणिवांवर नेमकं बोट ठेवले आहे ?
    अ) मानवी हक्क अभियान 
    ब) शोषित जनआंदोलन
    क) अंधश्रद्धा निर्मूलन
    ड) दारूमुक्ती आंदोलन
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर

    उत्तरे : प्रश्नमंजुषा (78)
    1-1
     
    2-4
     
    3-3
     
    4-4
     
    5-3
     
    6-3
     
    7-4
     
    8-4
     
    9-2
     
    10-1
     
    11-2
     
    12-4
     
    13-2
     
    14-2
     
    15-4
     

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 199