
Date : 23/10/2020
लसीकरणासाठी होणार 50 हजार कोटींची तरतूद
कोरोनावरील लसीकरणासाठी देशात एकूण 50 हजार कोटी इतका खर्च येणार आहे. बिहार निवडणुकीत भाजपने कोरोना विषाणूची लस गोरगरीबांना विनाशुल्क दिली जाईल, अशी घोषणा केली. मध्य प्रदेशातील गरीबांनाही भाजप सरकार ही लस विनामूल्य देईल. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांनीही कोविड-19 ची लस उपलब्ध झाल्यावर राज्यातील सर्व विभागांना मोफत लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन दिले.
1) लसीसाठी प्रत्येक व्यक्तीमागे साडेचारशे ते पाचशे रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. प्रत्येकी पाचशे रुपये खर्चाबरोबरच साठवण आणि वाहतुकीसाठीही खर्च येणार आहे.
2) प्रत्येक व्यक्तीला कोरोनाचे दोन डोस दिले जातील.