प्रश्नमंजुषा (1)

  • प्रश्नमंजुषा (1)

    प्रश्नमंजुषा (1)

    • 10 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 522 Views
    • 0 Shares

     प्रश्नमंजुषा (1)

    1.   इंग्रजांच्या काळात मराठी बोलणारे लोक कोणकोणत्या प्रांतांत विभागले गेले होते?

         1)   मुंबई, पुणे इलाखा, विदर्भ

         2)   मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर

         3)   मुंबई प्रांत, खान्देश, विदर्भ

         4)   मुंबई राज्य, हैदराबाद संस्थान, मध्य प्रांत

    ·        इंग्रजांच्या काळात मराठी भाषिक लोक मुंबई राज्य, हैदराबाद संस्थान आणि मध्य प्रांतात विभागले गेले होते. पश्चिम महाराष्ट्राचा भाग मुंबई राज्यात मोडत होता. गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यात होतं, तर मराठवाडा हैदराबाद संस्थानात होता. विदर्भातील तेव्हाचे आठ जिल्हे मध्य प्रांताचा भाग होते.

    2.   मुंबईतील जामा मशीद कुठे आहे?

         1)   बेहरामपाडा

         2)   मोहम्मद अली रोड

         3)   काळबादेवी

         4)   बैल बाजार

    3.   बाबासाहेबांना कोणतं वाद्य वाजवायला आवडत असे?

         1)   तबला

         2)   हार्मोनियम

         3)   व्हायोलिन

         4)   बासरी

    ·        बाबासाहेबांना व्हायोलिन वाजवायला आवडत असे. साठे नावाचे गृहस्थ त्यांना व्हायोलीन शिकवायला यायचे.

    4.   पुण्यामध्ये सवाई गंधर्व महोत्सव कधी होतो?

         1)   भर थंडीत

         2)   उकाड्यात

         3)   ऐन पावसाळ्यात

         4)   कधीही

    5.   खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा मासिक पाळीवर परिणाम होतो?

         1)   अंडाशयाच्या कार्यपद्धतीत बदल (PCOS)

         2)   हॉर्मोन्समध्ये बदल

         3)   थायरॉईड

         4)   वरीलपैकी सर्व

    ·        Polycystic ovary syndrome (PCOS), Estrogen and Progesterone च्या पातळीत बदल, थायरॉईडच्या पातळीत बदल या सगळ्या गोष्टींमुळे पाळीवर परिणाम होतो.

    6.   मुंबईबद्दल नेहरू सरकारची काय योजना होती?

         1)   मुंबई गुजरातची राजधानी करावी

         2)   मुंबई शहर राज्य करावं

         3)   मुंबई महाराष्ट्राची राजधानी करावी

         4)   मुंबई महाराष्ट्र आणि गुजरातची संयुक्त राजधानी करावी

    ·        मुंबईचा तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारने 1956 साली ‘त्रिराज्य योजना’ जाहीर केली होती. त्याअंतर्गत सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भ व मराठवाड्यासह महाराष्ट्र आणि मुंबई शहरराज्य अशा प्रकारची तीन राज्ये स्थापन करण्याचा विचार मांडला. मुंबई महाराष्ट्राला देण्यासाठी केंद्र सरकार तयार नव्हतं. म्हणून महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत लोकांचा असंतोष वाढू लागला.

    7.   मुंबईत खड्या पारशाचा पुतळा कुठे आहे?

         1)   पारसी कॉलनी

         2)   भायखळ्याच्या पुलाखाली

         3)   दादरच्या पुलाखाली

         4)   पारशी जिमखान्यावर

    8.   डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अखेरचा श्वास कोणत्या शहरात घेतला?

         1)   महू

         2)   दिल्ली

         3)   मुंबई

         4)   सातारा

    ·     बाबासाहेबांचं दिल्लीतल्या राहत्या घरी 6 डिसेंबर 1956 रोजी अखेरचा श्वास घेतला. नंतर त्यांचं पार्थिव मुंबईला आणण्यात आलं. त्यांच्या अंत्ययात्रेला 10 लाखांचा विराट जनसमुदाय उपस्थित होता, असं निरीक्षक सांगतात.

    9.   पुण्याच्या इतिहासात फुटलेलं एकमेव धरण कोणतं?

         1)   कामशेत

         2)   खडकवासला

         3)   पानशेत

         4)   पवना

    10.  वारंवार हॉर्मोन्सच्या गोळ्या घेण्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात?

         1)   भूतबाधा होते.

         2)   काहीच परिणाम होत नाही.

         3)   मासिक पाळी पुढे कधीच येत नाही.

         4)   पाळी अनियमित होऊ शकते.

    ·        एखाद्या महिन्यात गोळी घेऊन पाळी पुढे ढकलल्यास काहीच परिणाम होत नाही. मात्र वारंवार हॉर्मोन्सच्या गोळ्या घेऊन पाळी पुढे ढकलल्यास पाळी अनियमित होण्याची शक्यता असते.

    सौजन्य : BBC न्यूज

     

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 522