रुद्रम -1

  • रुद्रम -1

    रुद्रम -1

    • 29 Oct 2020
    • Posted By : vaishali
    • 74 Views
    • 0 Shares

     

    Date : 26/10/2020

    रुद्रम -1

    ऑक्टोबर 2002 मध्ये डीआरडीओने स्वदेशी बनावटीच्या पहिल्या अँटी रेडिएशन मिसाइलची यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्रामुळे भारताची शत्रूवर हवाई हल्ला करण्याची क्षमता कैकपटीने वाढली. ब्रह्मोस, निर्भय, शौर्य या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्यानंतर, डीआरडीओने पहिल्यांदाच रुद्रम 1 या अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

    रुद्रम-1 मुळे काय फायदा?

    1.  रुद्रम 1 हे एक नव्या जनरेशनच अँटी रेडिएशन क्षेपणास्त्र आहे. अँटी रेडिएशन म्हणजे किरणोत्सर्ग विरोधी क्षेपणास्त्र. शत्रूच्या रडाराचे सिग्नल किंवा लहरी पकडून ते रडार उद्धवस्त करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे.

    2.  इंडियन एअर फोर्सच्या सुखोई-30चघख या फायटर विमानातून हे क्षेपणास्त्र डागता येते. आपल्यावर लक्ष ठेवणारी शत्रूची टेहळणी यंत्रणा, रडार सिस्टिम या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने उद्धवस्त करता येईल. चाचणीच्यावेळी या क्षेपणास्त्राचा माच 2 स्पीड होता. ध्वनीच्या वेगापेक्षा हा दुप्पट वेग आहे.

    एअर फोर्सची शक्ती वाढणार ?

    1.   या क्षेपणास्त्रामुळे इंडियन एअर फोर्सकडे शत्रूच्या प्रदेशात खोलवर घुसून, त्यांची हवाई सुरक्षा यंत्रणा उद्धवस्त करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. इंडियन एअर फोर्सला भविष्यात कुठल्याही अडथळयाविना आपल्या मोहिमा पार पाडता येतील.

    2.  रुद्रम 1 क्षेपणास्त्र सुखोई-30 एमकेआय या फायटर विमानामध्ये बसवले जाईल. सुखोई हे भारताचे चौथ्या पिढीचे अत्याधुनिक फायटर विमान आहे. युद्ध काळात रशियन बनावटीच्या या विमानांवर भारताची मुख्य भिस्त आहे. फायटर विमान किती उंचीवर उड्डाण करतंय, त्यावर या क्षेपणास्त्राची रेंज अवलंबून आहे.

    3.  500 मीटर ते 15 किलोमीटर उंचीवरुन हे क्षेपणास्त्र डागता येऊ शकतं. 250 किलोमीटरच्या रेंजमध्ये किरणोत्साराचे उत्सर्जन जिथून होतेय, त्या टार्गेटवर प्रहार करु शकते.

    4.  रुद्रम 1 चं वैशिष्टय म्हणजे हे क्षेपणास्त्र आधी आपलं टार्गेट ठरवतच पण ते डागल्यानंतरही टार्गेटची निवड करु शकतं.

    5.  रुद्रम 1 डागल्यानंतर शत्रूने आपलं स्थान समजू नये, यासाठी रडार यंत्रणा बंद केली, तरी ते टार्गेटवर अचूकतेने प्रहार करण्यास सक्षम आहे.

    6.  रुद्रम 1 ची अमेरिकेच्या अॠच्-88 ए या हवेतून जमिनीवर मारा करणार्या क्षेपणास्त्रा बरोबर याची तुलना होऊ शकते. अॠच्-88 ए हे एक अॅडव्हान्स अँटी रेडिएशन क्षेपणास्त्र आहे. अमेरिकन नौदलात 2017 साली या क्षेपणास्त्राचा समावेश झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिहं यांनी रुद्रम 1 च्या यशाबद्दल डीआरडीओच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केलं आहे.

Share this story

Total Shares : 0 Total Views : 74