मंगळावर वाळूच्या टेकड्या
1 नोव्हेंबर 2020 - अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाच्या खगोलशास्त्रज्ञांनी लालग्रह म्हणून ओळखल्या जाणार्या मंगळावरील अब्जावधी वर्षांपूर्वीच्या वाळूच्या टेकड्यांचा शोध लावला.
1) प्लॅनेटरी सायन्स इन्स्टिट्यूटचे प्लॅनेटरी शास्त्रज्ञ मॅथ्यू चोजनाकी यांच्या मते, मंगळाच्या जमिनीखाली सापडलेल्या या टेकड्या म्हणजे वाळूचे प्राचीन थर आहेत. त्यांची निर्मिती किमान एक अब्ज वर्षांपूर्वी झाली असण्याची शक्यता आहे. टेक्टॉनिक्स व अन्य प्रक्रियांमुळेही या टेकड्यांचे कसलेच नुकसान झालेले नाही.
2) या ग्रहावर वाहणार्या वेगवान वार्यामुळे वाळूच्या टेकड्या तयार होणे, ही सामान्य बाब आहे. मात्र, मंगळावरील वल्से मारिनारिस व मेलम चस्मा दर्यांमधील वाळूच्या या टेकड्या नुकत्याच तयार झाल्या आहेत.