केपलर मिशन
1 नोव्हेंबर 2020 - नासाच्या केपलर मिशन मोहिमेचा प्रमुख उद्देश : सूर्यासारख्या तार्यांच्या खडकाळ ग्रहांना शोधून तेथे काही जीवनाचे संकेत मिळतात का ते पाहणे.
1) नासाच्या केपलर स्पेस टेलिस्कोपकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, जीवनाचे संकेत मिळू शकतात अशा ग्रहांची अंदाजित संख्या 30 कोटींच्या घरात आहे.
2) यासाठी डार्क इक्वेशनचा वापर केला गेला. या इक्वेशनच्या मदतीने अनेक बाह्यग्रहांचा शोध लागला, की जे पृथ्वीच्या आकाराचे होते. तसेच या इक्वेशनच्या मदतीने ब्रह्मांडात सक्रिय व संचार करणार्या पृथ्वीबाहेरील संभ्यतांच्या आकडेवारीचे विश्लेषण करता येते. हे इक्वेशन म्हणजे अॅस्ट्रोबॉयोलॉजीसाठी एक रोडमॅप आहे.