
Date : 26/10/2020
मिडसिझन ट्रान्सफर
2020 च्या हंगामात गव्हर्निंग काऊन्सिलने खेळाडू भारतीय असो किंवा परदेशी हंगाम मध्यावर आल्यानंतर मिडसिझन ट्रान्सफर ची सोय केली आहे. आयपीएलच्या 2019 हंगामातह गव्हर्निंग काऊन्सिलने अन्कॅप्ड प्लेअर साठी मिडसिझन ट्रान्सफर ची सोय केली होती. पण मुंबई इंडियन्सचा अपवाद वगळता एकही संघ यासाठी पुढे आला नाही. क्रीडा जगतात लिग कल्चरमध्ये मिडसिझन ट्रान्सफर ही संकल्पना राबवली जाते. एखाद्या स्पर्धेचा हंगाम मध्यावर आल्यानंतर दोन प्रतिस्पर्धी संघ एकमेकांच्या संमतीने खेळाडूला विश्वासात घेऊन खेळाडूंची देवाण-घेवाण करुन शकतात. इंग्लिश प्रिमीअर लिग आणि युरोपियन फुटबॉल स्पर्धांमध्ये अनेक मान्यवर संघ या सुविधेचा फायदा घेत संघात नवीन खेळाडूंना जागा देतात.
1) कोणताही खेळाडू, मग तो भारतीय असो किंवा परदेशी, आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला असो किंवा न खेळलेला तो मिडसिझन ट्रान्सफरसाठी उपलब्ध आहे.
2) मिडसिझन ट्रान्सफरचा कालावधी सुरु होईपर्यंत जर एखाद्या खेळाडूने दोन पेक्षा जास्त सामने खेळले नसतील अशाच खेळाडूंची देवाण-घेवाण करण्यात येऊ शकते.
3) प्रत्येक संघाने आपले पहिले 7 सामने पूर्ण केल्यानंतरच मिडसिझन ट्रान्सफरची सुविधा देण्यात येईल.
4) मिडसिझन ट्रान्सफर मध्ये खेळाडूची देवाणघेवाण करण्यासाठी लागणारे पैसे हे ऑक्शन पर्सबाहेरुन द्यावे लागतील.
5) यासाठी दोन्ही संघांचं एकमत आणि खेळाडूची समहती मिळणं गरजेचं आहे.
6) या प्रक्रियेत खेळाडूला त्याची लिलावात ठरवली गेलेली रक्कम मिळेल, याव्यतिरीक्त त्याला कोणताही फायदा होणार नाही.