ग्रीड फेल्युअर

  • ग्रीड फेल्युअर

    ग्रीड फेल्युअर

    • 29 Oct 2020
    • Posted By : vaishali
    • 36 Views
    • 0 Shares

    Date : 26/10/2020

    ग्रीड फेल्युअर

    ऑक्टोबरमध्ये मुंबईमध्ये वीजपुरवठा करणार्या - महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा - वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला. 2012 साली झालेल्या ब्लॅक आऊटदरम्यान असचं झालं होतं. हा जगातील सर्वात मोठा ब्लॅक आऊट होता. यावेळी अचानक विजेची मागणी वाढली आणि ट्रिपिंग झालं. त्यावेळी 60 कोटी भारतीयांचा वीज पुरवठा खंडित झाला होता.

    ग्रीड फेल्युअर -

    1. वीजनिर्मिती आणि वीजपुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होऊन फ्रिक्वेन्सी नियंत्रणात न राहिल्याने लाईन ट्रिप होण्याची शक्यता असते. असे झाल्यास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होतो.

    2. भारतामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून वीजनिर्मिती केली जाते. यामध्ये थर्मल (औष्णिक), हायड्रो (जलविद्युत) , गॅस, वारा आणि सौरऊर्जा अशा वेगळ्यावेगळ्या माध्यमांचा समावेश आहे.

       घरात वीज कशी येते?

       घरापर्यंत वीज पोहचवणार्या यंत्रणेमध्ये तीन मुख्य घटक आहेत-

    1. वीज निर्माण कऱणार्या कंपन्या. यामध्ये टाटा पॉवर, राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ अर्थात एनटीपीसी यासारख्या आणि इतर कंपन्यांचा समावेश होतो.

    2. वितरक कंपन्या म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) सारख्या राज्य स्तरावरील वितरक कंपन्या.

    3. स्टेट लोड डिस्पॅच सेंटर म्हणजेच एसएलडीसी. एसएलडीसीच्या माध्यमातून वीजनिर्मीती आणि त्याचा पुरवठा यामधील समतोल राखला जातो.

       फ्रिक्वेन्सी किती असावी लागते?

    1. एसएलडीसी हे वीज निर्माती करणार्या कंपन्या आणि वीज वितरक कंपन्यांदरम्यान समन्वय साधण्याचं काम करतात.

    2. एखाद्या ग्रीडमध्ये किती वीज पुरवली जावी हे एसएलडीसी मागणीनुसार ठरवते.

    3. वीजेची मागणी आणि पुरवठा यासाठी वापरण्यात येणार्या दिवसाच्या प्रत्येकी 15 मिनिटं याप्रमाणेच्या 96 भाग करण्यात येतात. 15 मिनिटांचे हे चक्र एखाद्या ठराविक दिवसासाठी पूर्णपणे बदलता येणं शक्य नसतं. या 96 भागांनुसार प्रत्येक राज्यातील एसएलडीसी त्यांचे वेळापत्रक तयार करुन ठेवतात. ही खूप तांत्रिक आणि स्वयंचलित यंत्रणा असते. त्यामुळे वीज निर्मिती आणि वीज वितरण करताना एसएलडीसीची भूमिका महत्वाची असते.

    4. पॉवर ग्रीडमध्ये असणार्या वीजेची फ्रिक्वेन्सी ही 48.5 ते 51.5 हर्ट्हसमध्ये ठेवण्याची जबाबदारी एसएलडीसीवर असते. जर ही फ्रिक्वेन्सी अचानक वाढली अथवा कमी झाली तर वीजपुरवठा करणार्या लाईन्स ट्रिप होऊ शकतात आणि गोंधळ उडू शकतो

     

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 36