मरियाना ट्रेंच

  • मरियाना ट्रेंच

    मरियाना ट्रेंच

    • 02 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 70 Views
    • 0 Shares
     मरियाना ट्रेंच
        महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ’प्राकृतिक भूगोलावर’ अनेक प्रश्‍न विचारले जातात.  सदर लेखात ’मरियाना ट्रेंच या पृथ्वीवरील सर्वात खोल समुद्र’ व त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
     
    सामान्य अध्ययन पेपर (१) : भूगोल
     
    २.१ भूरुपशास्त्र -
    *   पृथ्वीचे अंतरंग,  भूमीस्वरूपांच्या उत्क्रांतीवर परिणाम करणारे घटक
     
    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात  नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    मरियाना ट्रेंच...पृथ्वीवरील सर्वात खोल समुद्र
     
    *   १५ एप्रिल १९१२ रोजी टायटॅनिक जहाज अटलांटिक समुद्रात बुडाले, त्यावेळी प्रवासी पाण्यात बुडून मरण्यापेक्षा जास्त लोक हायपोथर्मियांने म्हणजेच पाण्याच्या अतिथंडपणामुळे गारठून मरण पावले.
     
    *   टायटॅनिक जवळपास १२ हजार फूट खाली गेले. समुद्र तळ १२ हजार फूट म्हणजेच ३.८० किलोमीटर  इतक्या खोलीवर होता.
     
    *   अटलांटिक समुद्राची खोली जवळपास ४ किलोमीटर आहे.
     
    *   समुद्राची जागतिक सरासरी खोली ही ३८०० ते ४००० मीटर अशी मानली जाते.
     
    *   १८७५ साली एचएमएस चॅलेंजर जहाज पॅसिफिक समुद्रातून जात होते. चॅलेंजर जहाज कामानिमित्त पॅसिफिक समुद्रात एकेठिकाणी थांबले. त्यावेळी नांगर टाकण्यासाठी समुद्रात सोडलेल्या दोराची लांबी ८ किलोमीटरपेक्षा जास्त भरली तरीही समुद्राचा तळ लागलेला नव्हता.
     
    *   १८७७ मध्ये अटलांटिक व पॅसिफिक समुद्राचे नकाशे प्रकाशित केले गेले त्यात चॅलेंजरने शोधलेल्या जागेचा उल्लेख करत त्या जागेला जहाजाच्या या कामाच्या गौरवार्थ चॅलेंजर डीप असे नाव देण्यात आले. त्याची ज्ञात खोली म्हणून ८१८४ मीटर इतकी नमूद केली.
     
    *   १९५१ साली चॅलेंजर २ ने हे नेमकं चॅलेंजर डीप आहे तर किती खोल हे बघायचं ठरवलं.त्यांनी जागेची नेमकी खोली त्याकाळी उपलब्ध इको साउंडर तत्रज्ञान वापर करून मोजली. सध्या ती खोली १०९८४ मीटर, जवळपास ११ किलोमीटर मानली जाते.
     
    *   मरियाना ट्रेंच म्हणजे पॅसिफिक महासमुद्राच्या पश्रि्चमी भागात मरियाना बेटांपासून २०० किलोमीटर पूर्वेकडे असणारी समुद्रातळाशी असलेलया पर्वतरांगांतील एक अतिविशाल, अतिखोल व अतिलांबट अशी चंद्रकोर आकाराची अतिभव्य दरी आहे. याच दरीतील खोल जागा म्हणजे चॅलेंजर डीप.आजही तीच खोली मानवाला माहीत असलेली समुद्राची शेवटची खोली ग्राह्य मानली जाते.
     
    *   टायटॅनिक चित्रपटाचा हॉलिवूड दिग्दर्शक म्हणजे जेम्स कमेरून याने चॅलेंजर डीपला चॅलेंज द्यायचे ठरवले. २६ मार्च २०२१ रोजी त्याने प्रेशर वेसलमधून हा प्रवास केला होता.
     
    *   हिमालयतील एव्हरेस्ट समुद्रसपाटीपासून ८ किलोमीटर ८५० मीटर उंचीवर आहे.
     
    *   मरियाना ट्रेंचमधील सर्वात खोल पॉइंटवर पाण्याचे तापमान १ ते ४ डिग्री सेल्सियस असते. प्रेशर इतकं प्रचंड आहे, की तिथं पर्यंत माणूस जिवंत पोचणे अशक्य. येथे पाण्याचा दाब १०८६ बार असतो.
     
    *   १ बार प्रेशर म्हणजे१ वर्ग सेंटिमीटरवर  १ किलो वजन देणे. असे एका सेंटिमीटर भागावर १०८६ किलो वजन पडले तर शरीराचा भुगा होऊन जाईल. तिथं विना प्रेशर वेसल पाण्यातील यान घेऊन गेल्याशिवाय जाणे अशक्य.
     
    *   जास्त दाबामुळे पाण्याची घनताही जवळपास ५ टक्क्यांनी वाढलेली असते.
     
    *   १ लिटर पाणी जे एक किलो असतं ते इथं १ किलो आणि ५० ग्राम इतके भरते.
     
    *   इथं सूर्य प्रकाश अजिबात पोचत नाही.
     
    *   सूर्यप्रकाश समुद्रात जास्तीत जास्त ३३०० फूट म्हणजेच १००० मीटरपर्यंतच पोचू शकतो, तेही वातावरण साफ व भर दुपार असेल तरच. अशा अंधार्‍या, प्रचंड पाण्याच्या दबावातही कांही समुद्री जीव घर बनवून आहेत.
     
    *   मरियाना ट्रेंचची वैशिष्ट्ये -
    -   लोकेशन : पश्रि्चमी पॅसिफिक महासमुद्र, मारियाना बेटांपासून २०० किमी पूर्वेकडे.
    -   मरियाना ट्रेंच लांबी : २५५० किलोमीटर. रुंदी : ६९ किलोमीटर.
    -   पाण्याचे तापमान : १ ते ४ डिगरी सेल्सियस.
    -   पाण्याचे प्रेशर : १०८६ बार (किलोग्राम प्रति चौरस सेंटीमीटर) (समुद्र सपाटीवर हे प्रेशर फक्त १ बार असते)
    -   चॅलेंजर डीरच्या खोलीचे बर्‍याच संशोधक, शास्त्रज्ञांना कुतूहल, जिज्ञासा राहिली आहे.
    -   २३ जानेवारी १९६० रोजी डॉन मालश आणि जॅक स्पाकर ही पहिली मानव जोडी त्या खोलीपर्यंत जाऊन आले.

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 70