कांदा

  • कांदा

    कांदा

    • 29 Oct 2020
    • Posted By : vaishali
    • 83 Views
    • 0 Shares

    Date : 26/10/2020

    कांदा

    जगातील सर्वाधिक कांदात उत्पादन करणार्या देशांच्या यादीमध्ये भारत दुसर्या स्थानी आहे. पहिल्या क्रमांकावर चीन आहे. भारतामध्ये दोन ते अडीच कोटी टन कांदा उत्पादन होते.

    1. कांद्याचा सर्वाधिक खप हा भारतात आहे. भारतामध्ये दर हजार व्यक्तींपैकी 908 जण कांदा खातात.

    2. सर्वेक्षणानुसार एक कुटुंब महिन्याला किमान साडेचार ते पाच किलो कांदा खाते.

    3. सरकारी संस्था असणार्या नाफेडने (नॅशनल अॅग्रीकल्चरल को-ऑप्रेटीव्ह मार्केटींग फेड्रेशन ऑफ इंडिया लिमिटेड) जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारताकडे 25 हजार टन कांदा आहे.

    4. देशामध्ये रोज दीड ते दोन टन कांदा वापरला जातो.

    5. कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेणार्या देशांमध्ये दोन्ही प्रमुख देश हे आशियातील आहेत.

    6. कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेणार्या देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर चीन असून दुसर्या क्रमांकावर भारत आहे. मात्र कांद्याच्या पिकाखाली असणारे चीनमधील क्षेत्र हे 956 हेक्टर आहे तर भारतातील एक हजार 64 हेक्टर जमीन ही कांदा उत्पादनासाठी वापरली जाते. अमेरिकेमध्ये 3.34 मिलियन टन, इजिप्तमध्ये 2.21 तर इराणमध्ये 1.92 मिलियन टन कांद्याचे उत्पादन होते.

Share this story

Total Shares : 0 Total Views : 83