झेंडू

  • झेंडू

    झेंडू

    • 29 Oct 2020
    • Posted By : vaishali
    • 376 Views
    • 0 Shares

    Date : 26/10/2020

    झेंडू

    हा झेंडू मुळचा भारतीय नसून मेक्सिकोचा आहे. झेंडूचे झुडूप वाढण्यासाठी विशिष्ट प्रकारचे हवामान किंवा जमीन आवश्यक नसते. कोणत्याही प्रकारचे हवामान झेंडूला मानवते. या फुलझाडाची लागवड भारतभर केली जाते. गुजरातीमध्ये गुलहिरो किंवा मखमला, हिंदीमध्ये गेंदा, गुतोरा, कालगा, संस्कृतमध्ये स्थूलपुष्प,संदू, झंडु.

    1. कंपॉझिटी कुलातील झेंडूचे शास्त्रीय नाव टॅजेट्स इरेक्टा असे आहे.

    2. झेंडूचे बियाणे पेरल्यानंतर साधारण तीन महिन्यानंतर फूल यायला सुरुवात होते. झेंडूचे स्वतंत्र पीक घेतले जाते. किंवा द्राक्ष, पपई अशा फळांच्या बागांमध्येही झेंडूची लागवड केली जाते.

    3. कर्नाटक राज्य झेंडू उत्पादनात अग्रेसर समजले जाते. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही मोठया प्रमाणात झेंडूचे पीक घेतले जाते.

    4. झेंडूची पाने एकाआड येतात. पानावर बारीक लव असते आणि आकारही विशिष्ट असा असतो. पानांना एक वेगळाच गंध असतो.

    5. झेंडूची काही फुले एकेरी असतात, काही मोठी गोंडयासारखी असतात. पुष्पबंधात दोन प्रकारची फुले एका ठिकाणी जोडलेली असतात, आपण ज्या भागाला पाकळी समजतो ती पाकळी नसून ती अनेक फुले आहेत. त्यांना रे फ्लोरेट्स असे म्हणतात. मधल्या भागावर डिस्क फ्लोरेट्स असतात. अशा प्रकारची फुले सूर्यफूल, झेनिया, ॅस्टर, जब्रेरा या वनस्पतींमध्ये स्पष्ट दिसून येतात.

    औषधी गुणधर्म -

      1.   झेंडूची फुले चवीला तिखट, कडू आणि तुरट असतात. ती अपस्मार आकडीत उपयोगी आहेत.

      2.   झेंडूची पाने मुळव्याध, मूत्रपिंडाची दुखणी आणि स्नायूंच्या दुखण्यावर गुणकारी आहेत.

      3.   फुलांचा रस कानदुखी असल्यास कानात टाकतात. पाने केसतूट आणि कानपुळीत लावण्यासाठी वापरतात.

      4.   गळू या विकारावरही झेंडूच्या रसाचा उपयोग केला जातो.

    *    आफ्रिकन झेंडू  -

      1. या प्रकारातील झेंडूची झुडपे उंच वाढतात. झुडूप काटक असते.

      2. पावसाळी हंगामात झुडपे 100 सें.मी. ते 150 सें.मी.पर्यंत उंच वाढतात.

      3. फुलांचा रंग पिवळा, फिकट पिवळा, नारंगी असतो.

      4. या प्रकारात कंकर जॅक, अलास्का, ऑरेंज ट्रेझन्ट, आफ्रिकन डबल मिक्स आणि भारतीय पुसा नारंगी गेंदा, पुसा बसंती गेंदा. या उपजाती आहेत.

    फ्रेंच झेंडू  -

      1. या प्रकारातील झेंडूची झुडपे उंचीला कमी असतात व झुडपासारखी वाढतात.

      2. झुडपाची उंची 30 ते 40 सें.मी. असते. फुलांचा आकार लहान-मध्यम असून, अनेक रंगांची फुले असतात. या प्रकारातील जाती कुंडीत, बागेत, रस्त्याच्या दुतर्फा तसेच फुलांचा गालिचा तयार करण्यासाठी, हिरवळीच्या कडा सुशोभीकरणासाठी लावतात.

      3. स्प्रे, लेमन ड्रॉप्स, फ्रेंच डबल मिक्स आणि भारतीय पुसा अर्पिता ह्या उपजाती आहेत. संकरित झेंडूच्या पिटाइट, जिप्सी, रेड हेड, इंका ऑरेंज आणि इंका यलो ह्या जाती आहेत.

     

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 376