डॉ. जयंत माधब

  • डॉ. जयंत माधब

    डॉ. जयंत माधब

    • 27 Oct 2020
    • Posted By : vaishali
    • 19 Views
    • 0 Shares

    Date : 23/10/2020

    डॉ. जयंत माधब

    19 ऑक्टोबर रोजी वयाच्या 91 व्या वर्षी आसामी अर्थशास्त्रज्ञ डॉ. डॉ. जयंत  माधब यांचे निधन झाले. त्यांचा शिवसागर जिल्ह्यात जन्म झाला होता. त्यांनी गुवाहाटी विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली आणि तेथील एका असमिया दैनिकात उपसंपादक म्हणून काम करू लागले. आसामच्या वित्तीय व्यवस्थापनाशी संबंधित विषयात पीएच.डी. संशोधन करण्यासाठी ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये दाखल झाले. इथून त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू झाली.

    1)   आशियाई विकास बँकेचे (एडीबी) प्रशासन संचालक या पदावरून निवृत्त झाल्यानंतर ते आसामला परतले.

    2)   डॉ. मनमोहन सिंग यांनी ईशान्येकडील राज्यांसाठी निराळया विकास-वित्त महामंडळाचा - ‘नॉर्थ ईस्टर्न डेव्हलपमेंट फायनान्स कॉपरेरेशन’चा - आराखडा आखण्याचे काम डॉ. माधब यांच्यावर सोपवले. माधब यांनी ही आखणी उत्तम केली आणि या महामंडळाचे ते पहिले व्यवस्थापकीय संचालक ठरले.

    3)   2003 पासून 2009 पर्यंत, आसामच्या मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार या मानद पदावर त्यांनी काम केले आणि केंद्रीय नियोजन मंडळाचे सदस्यपद सांभाळले.

    4)   त्यांनी केलेले महत्त्वाचे काम म्हणजे ‘रोजगार निर्माण आयोग’ (एम्प्लॉयमेंट जनरेशन कमिशन) स्थापणे. योजनांचा सांधा रोजगार निर्मितीशी जुळवणारी यंत्रणा यामुळे अस्तित्वात  आली.

    5)   आसामी अस्मितेचा गेल्या अर्धशतकभरातील हिशेब मांडताना दोन टोके दिसून येतात- विद्यार्थी संघटनांच्या हिंसाचारापासून ते भूपेन हजारिकांच्या शांतगंभीर गीतांपर्यंत- या दोन टोकांमधले अंतर कमी करण्यासाठी  डॉ. जयंत माधब यांनी 25 वर्षे कार्य केले.

Share this story

Total Shares : 0 Total Views : 19