ग्रॅन चाको

  • ग्रॅन चाको

    ग्रॅन चाको

    • 27 Oct 2020
    • Posted By : vaishali
    • 43 Views
    • 0 Shares

    Date : 23/10/2020

    ग्रॅन चाको

    ग्रॅन चाको ही लॅटिन अमेरिकेतील बोलिव्हिआ, पॅराग्वे आणि अर्जेटिना या तीन देशांमध्ये पसरलेली संवेदनशील आणि तणावग्रस्त परिसंस्था. 3,400 वृक्ष प्रजाती, 500 पक्षी प्रजाती, सस्तन प्राण्यांच्या 150 प्रजाती, 120 प्रजातींचे सरपटणारे प्राणी आणि सुमारे 100 उभयचर प्रजातींच्या विपुलतेचा अधिवास असलेला हा प्रदेश बोलिव्हिआ, पॅराग्वे आणि अर्जेटिना हे तीन देश संवर्धनासाठी एकत्र येतील तेव्हाच संपूर्ण ग्रॅन चाको संवर्धित होईल.

    1)  गेल्या काही वर्षांपासून शेतीचा विस्तार, रस्ते आणि इतर सुविधांसाठी होत असलेल्या मोठया प्रमाणातील जंगलतोडीमुळे येथील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

    2) इथे आढळणार्या उंटसदृश दुर्मीळ ‘ग्वानॅको’ या प्राण्याचे अस्तित्व त्यामुळे धोक्यात आले.

    3) ग्वानॅको हा बोलिव्हियातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान असलेल्या ‘का-इया ग्रॅन चाको’तील सस्तन प्राण्यांच्या 70 प्रजातींपैकी एक वन्यप्राणी.

    4) जंगलतोडीमुळे ग्वानॅकोंचे अस्तित्व धोक्यात आले. या प्रजातीबरोबरच बिबटे, चित्ते या सस्तन प्रजातींच्याही अस्तित्वाला धोका निर्माण झाला.

    5) तरुण संशोधिका डॉ. एरिका कुइयार या ग्रॅन चाको  परिसंस्थेचेविशेषतग्वानॅकोंचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या 10 लाख चौरस कि.मी.च्या विस्तीर्ण प्रदेशात संवर्धनकार्य सुरू केले, तेव्हा त्यांना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागले. त्यांनी स्थानिक महिलांची साथ घेतल्याने व अथक प्रयत्नांमुळे स्थानिक मंडळींकडून ग्वानॅकोंची केली जाणारी शिकार पूर्णपणे थांबलीत्यांना 2012 साली अत्यंत प्रतिष्ठेच्या रोलेक्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते

     

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 43