स्थलांतरित सैबेरियन पक्षी

  • स्थलांतरित सैबेरियन पक्षी

    स्थलांतरित सैबेरियन पक्षी

    • 12 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 345 Views
    • 0 Shares

     स्थलांतरित सैबेरियन पक्षी

    नोव्हेंबर 2020 च्या सुरुवातीस राजस्थानच्या भरतपूरमधील केवलदेव राष्ट्रीय पक्षी अभयारण्यात मोठ्या संख्येने सैबेरियन स्थलांतरित पक्षी आले. येथील ऊबदार वातावरण आणि मुबलक खाद्य यामुळे दरवर्षी सैबेरियातून असे पक्षी याठिकाणी स्थलांतर करून येतात.

    1.   हिवाळ्यात रशियाच्या सैबेरिया प्रांतात हाडे गोठवणारी थंडी असते. तेथील सरासरी तापमान उणे 20 अंश सेल्सिअस असते.

    2.   थंडीपासून दूर राहण्यासाठी हे पक्षी सुमारे 7 हजार किलोमीटरचा प्रवास करून भारतात येत असतात.

    3.   स्थलांतरित पक्षामध्ये पिन टेल, शॉब्लर, वर्ड ऑफ प्रे यासारख्या पक्ष्यांचा समावेश आहे.

    4.   भरतपूर परिसरातील ऐंचा नावाचे गवत, शेतांमधील गहू व अन्य धान्य या पक्ष्यांना पसंत असते.

    5.   हायड्रोला, स्पायरी डोला, अजोला यासारख्या वनस्पती त्यांना आवडतात.


    प्रश्नमंजुषा (8)

    1.   भरतपूरमधील केवलदेव राष्ट्रीय पक्षी अभयारण्यात स्थलांतरित होणारे पक्षी कोणते ?

         1)   हायड्रोला, स्पायरी डोला, अजोला

         2)   ऐंचा, शॉब्लर, फ्लेमिंगो, सैबेरियन

         3)   पिन टेल, शॉब्लर, वर्ड ऑफ प्रे

         4)   वरील सर्व

    2.   बिहार विधानसभा 2020 निवडणुकीनंतरच्या पक्षीय बलानुसारचा योग्य उतरता क्रम शोधा-

         अ.   अजोला

         ब.   स्पायरी डोला

         क.   हायड्रोला

         ड.   वर्ड ऑफ प्रे

         इ.   ब्लूग्रीन अल्गी

         पर्यायी उत्तरे ः

         1)   अ, ब आणि क  

         2)   ब, क आणि ड  

         3)  अ, क आणि ड  

         4)   अ, ब आणि ड

    3.   केवलदेव राष्ट्रीय पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?

         1)   मध्यप्रदेश

         2)   छत्तीसगड

         3)   उत्तर प्रदेश

         4)   राजस्थान

    उत्तरे : प्रश्नमंजुषा (8)

    1-3

    2-1

    3-4

Share this story

Total Shares : 0 Total Views : 345