कोरोनावरील लस

  • कोरोनावरील लस

    कोरोनावरील लस

    • 03 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 29 Views
    • 0 Shares

    कोरोनावरील लस

    Date : 26/10/2020

    मार्च 2021 ते एप्रिल 2021 या कालावधीत कोरोनाची लस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहेपरंतु औषधनिर्माणकर्ते त्यांच्या काही गणितांबद्दल अधिक महत्त्वाकांक्षी आहेतमॉडर्ना इंक सारख्या काही कंपन्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना देण्यासाठी 2020 च्या अखेरिस लस उपलब्ध करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, 2021 जानेवारी महिन्यात लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

    ऑक्टोबर 2020 मध्ये जगभरात वैद्यकीय किंवा वैद्यकीय पूर्व 182 लसींच्या चाचण्या सुरू होत्यायापैकी 36 लसींची वैद्यकीय चाचणी सुरू होतीतर 9 लसी मानवी चाचणीच्या अखेरच्या टप्प्यात होत्याभारतातही दोन लसींची दुसर्या टप्प्यातील चाचणी सुरू होतीअशावेळी अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफर्डच्या लशीचे दुष्परिणाम दिसून आल्याने गोंधळ निर्माण झाला होताऑक्सफर्ड लसीची तिसर्या टप्प्यातील चाचणी सुरू होतीया लशीमुळे ब्रिटनमधील एका महिला स्वयंसेवकांच्या हाडामध्ये सूज येऊन ती गंभीर आजारी पडली होतीत्यानंतर कंपनीकडून लशीच्या चाचण्या थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

    1. फिझरची लस

    1. फिझर ही कंपनी जर्मनीची कंपनी बायो-एन-टेक एसई या कंपनीसोबत मिळून करोनावरील लस विकसित करत आहे.

    2.  ही लस सुरक्षेच्या सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी आणि प्रभवी ठरली तर हे वर्ष संपण्यापूर्वी अमेरिकेत वितरित करण्याची योजना - मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोर्ला

    3. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरिस या लसीच्या चाचण्यांचा अहवाल एफडीएकडे सादर.

    2. ऑक्सफर्ड लस

    1. ऑक्सफर्ड लसीला ख्रिसमसपर्यंत युनाडेट किंगडममध्ये आवश्यक ती परवानगी मिळण्याची शक्यता.

    2. परवानगी मिळाल्यानंतर ही लस उपलब्ध होण्यासाठी सहा महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधी लागू शकतो.

    3. जॉन्सन अँड जॉन्सन लस

    1. जॉन्सन अँड जॉन्सन लसीची तिसर्या टप्प्यातील चाचणी सुरू असून 60 हजार स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली.

    2. या चाचणीचा अहवाल या वर्षाच्या अखेरिस अथवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहेजर अहवाल सकारात्मक असेल तर त्याच्या आपात्कालिन वापरासाठी परवानगी मागितली जाणार.

    3. पुढील वर्षी 1 अब्ज डोस उपलब्ध करण्याची तयारीही जॉन्सन अँड जॉन्सनकडून करण्यात येत आहे.

    4. रशियन लस

    1. करोनावरील लसीला मान्यता देणारा रशिया हा पहिला देश

    2. 15 ऑक्टोबरपर्यंत एपिवॅक करोना या लसीला रशिया मंजुरी

    3. सुरूवातीच्या टप्प्यात 10 हजार डोस तयार करण्याची योजना - नोव्हेंबर महिन्यापासून याचं उत्पादन

    मॉडर्ना लस -

    अमेरिकेत मॉडर्ना या लसीची ऑक्टोबर 2020 मध्ये , 30 हजार स्वयंसेवकांवर तिसर्या टप्प्यातील चाचणी सुरू होतीमॉडर्नाच्या लसीच्या पहिल्या टप्प्यातील अधिक वयाच्या (55 वर्षांवरीलव्यक्तींवर करण्यात आलेल्या चाचणीचे निकाल सकारात्मक असून त्यांच्या उत्तम प्रतिकारशक्ती तयार झाल्याचं दिसून आलंवृद्ध स्वयंसेवकांना दिलेल्या लसीनंतर त्यांच्यात तयार झालेली प्रतिकारशक्ती तुलनेत कमी वयोगटातील स्वयंसेवकांइतकीच होतीतसंच लसीकरण केलेल्या स्वयंसेवकांच्या रक्तात सार्स कोव्ह 2 च्या विरोधातील न्यूट्रिलायझिंग अँटिबॉडिजही तयार झाल्या होत्या. 25 नोव्हेंबरपर्यंत आपात्कालिन परिस्थितीत लसीच्या वापरासाठी एफडीएची मंजूरी मिळवण्यासाठी आवश्यक असलेला डेटा उपलब्ध

    मॉडर्नाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टिफन बॅन्सेल

Share this story

Total Shares : 0 Total Views : 29