एमी बँरेट

  • एमी बँरेट

    एमी बँरेट

    • 03 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 21 Views
    • 0 Shares

     एमी बँरेट

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या रिक्त जागी पुराणमतवादी विचारांच्या न्यायाधीश एमी कोनी बँरेट यांना नियुक्त केले. त्यांच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयात रिपब्लिकनांचे 6-3 असे मताधिक्य झाले. एमी कोनी बँरेट या मात्र ट्रम्प यांनी नियुक्त केलेल्या तिसर्या न्यायाधीश आहेत. सप्टेंबर 2019 मध्ये अमेरिकेच्या निडर आणि तडफदार न्या. रूथ बेडर गिंझबर्ग यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदी बॅटर यांची नेमणूक झाली.

    1) अमेरिकेत अध्यक्षांना सत्तेत असताना अनेक न्यायाधीशांची नेमणूक करण्याची संधी तशी कमी मिळते. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात (SCOTUS) 9 न्यायाधीशांची नियुक्ती केली जाऊ शकते.

    2) नियुक्त केलेल्या न्यायाधीशांना त्यांची निवृत्ती ठरवण्याचा अधिकार आहे. ते न्यायदानाचे काम आयुष्यभर करू शकतात. त्यांना फक्त महाअभियोगद्वारे हटवले जाऊ शकते.

    3) ट्रम्प यांच्या आधीच्या तीन अध्यक्षांनी म्हणजेच ओबामा, बुश आणि क्लिटंन यांनी त्यांच्या प्रत्येकी 8 वर्षांच्या कारकिर्दीत प्रत्येकी 2 न्यायाधीश नेमले होते.

    4) न्या. ॅटोनिन स्कालिया यांचे 2016 साली निधन झाले तेव्हा अध्यक्ष ओबामा यांना स्कालिया यांच्या जागी अन्य न्यायाधीशाची नियुक्ती करू देण्यास मिच मॅकाँनेल (Mitch McConnell) या पुराणमतवादी नेत्याने आडकाठी घातली होती. तेव्हा मॅकाँनेल यांनी एक स्वत:च तयार केलेला नियम रेटला होता.

Share this story

Total Shares : 0 Total Views : 21